नूडल्स रेसिपी मराठी Noodles Recipe in Marathi

Noodles Recipe in Marathi नूडल्स रेसिपी मराठी नुडल्स म्हंटल कि सर्वांच्या तोंडाला पाणी येते कारण ते तितके टेस्टी असतात आणि हे कोणाला आवडत नाही असे नाही तर हि रेसिपी सर्वांना आवडते. नुडल्स हा एक चायनीज पदार्थ असून हा पदार्थ आपण नाश्त्यासाठी किंवा काहीजण हा जेवणामध्ये देखील खातात. नुडल्स हि रेसिपी जरी लोक विकत आणून किंवा ऑर्डर करून खात असले तरी ते आपल्याला घरच्या घरी अगदी उत्कृष्ट पध्दतीने बनवून खाता येणारा एक पदार्थ आहे. नुडल्स हा पदार्थ बनवताना आपण सर्व प्रथम शिजवलेले किंवा उकडलेले नुडल्सला आले लसून, काही भाज्या, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस आणि सोया सॉस आणि काही मसाले घालून आपण नुडल्स बनवतो किंवा या सर्व साहित्यामध्ये नुडल्स फ्राय करतो आणि मग ते गर्मार्म सर्व्ह करतो.

नुडल्स हि अशी रेसिपी आहे जी लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत बहुतेक लोकांना आवडू शकते आणि हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेत म्हणजेच २५ ते ३० मिनिटामध्ये हि रेसिपी कमी साहित्यामध्ये तयार होते.

नुडल्स बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ते म्हणजे व्हेज नुडल्स, साधे नुडल्स, हक्का नुडल्स, शेजवान नुडल्स, मंचुरियन नुडल्स अश्या अनेक प्रकारे नुडल्स रेसिपी बनवली जाते त्यामधील काही प्रकार आता आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात नुडल्स रेसिपी कशी बनवायची.

 hakka noodles recipe in marathi
hakka noodles recipe in marathi
अनुक्रमणिका hide
1 नूडल्स रेसिपी मराठी – Noodles Recipe in Marathi

नूडल्स रेसिपी मराठी – Noodles Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ८ ते १० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
पाककलाचायनीज
बनवण्याची पध्दतसोपी

नुडल्स महणजे काय ?

नुडल्स हा पदार्थ बनवताना आपण सर्व प्रथम शिजवलेले किंवा उकडलेले नुडल्सला आले लसून, काही भाज्या, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस आणि सोया सॉस आणि काही मसाले घालून आपण नुडल्स बनवतो किंवा या सर्व साहित्यामध्ये नुडल्स फ्राय करतो.

नुडल्स रेसिपी – how to make hakka noodles recipe in marathi

नुडल्स रेसिपी हि अशी रेसिपी आहे जी सर्वांना आवडते आणि हि बनवण्यासाठी देखील खूप सोपी आहे. हि रेसिपी आंबट, गोड आणि तिखट अशी चव असणारा एक टेस्टी पदार्थ आहे जो वेगवेगळ्या प्रकारचे सॉस आणि काही मसाले वापरून बनवला जातो. नुडल्स बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ते म्हणजे व्हेज नुडल्स, साधे नुडल्स, हक्का नुडल्स, शेजवान नुडल्स, मंचुरियन नुडल्स अश्या अनेक प्रकारे नुडल्स रेसिपी बनवली जाते त्यामधील काही प्रकार आता आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण आता नुडल्स रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

व्हेज नुडल्स रेसिपी – veg noodles recipe in marathi 

व्हेज नुडल्स हा नुडल्सचा प्रकार खूप लोकांच्याकडून आवडीने खाल्ला जाणारा एक प्रकार आहे. व्हेज नुडल्स हे बनवण्यास खूप सोपे आहेत आणि या प्रकारचे नुडल्स हे त्यामध्ये भाज्या घालून बनवले जातात. या प्रकारचे नुडल्स बनवण्यासाठी खूप सोपे आहेत आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनतात.

तयारीसाठी लागणारा वेळ८ ते १० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
पाककलाचायनीज
बनवण्याची पध्दतसोपी

व्हेज नुडल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make veg noodles 

व्हेज नुडल्स बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या, सॉस आणि इतर साहित्य लागते आणि ते सर्वच साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते असे नाही. ते आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चला तर आता आपण व्हेज नुडल्स बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते त्याची यादी पाहूयात.

  • ३ वाटी साधे नुडल्स.
  • १ कांदा ( बारीक चिरलेला ).
  • अर्धी वाटी कोबी ( बारीक लांबट चिरलेला ).
  • अर्धी वाटी गाजर ( बारीक लांबट चिरलेला ).
  • २ ते ३ शिमला मिरची ( बारीक लांबट चिरलेली ).
  • अर्धी वाटी मटार.
  • ५ ते ६ पाकळ्या लसून ( बारीक चिरलेला ).
  • १ चमचा आले ( बारीक चिरलेले ).
  • १ चमचा
  • ३ चमचे सोय सॉस.
  • दीड चमचे रेड चिली सॉस.
  • टोमॅटो सॉस.
  • १/४ चमचा काळी मिरी पावडर.
  • २ चमचे तेल

व्हेज नुडल्स बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make veg noodles 

आता आपण वरील साहित्य वापरून व्हेज नुडल्स कसे बनवायचे ते पाहूयात.

  • सर्वप्रथम नुडल्स थोडे हाताने तोडून घ्या आणि मग गॅसवर मध्यम आचेवर एक भांडे ठेवा आणि त्यामध्ये उकळण्यासाठी पाणी ठेवा तसेच त्या पाण्यामध्ये एक चमचा तेल घाला आणि ते पाणी उकळायला चालू झाले कि त्यामध्ये नुडल्स टाका आणि ते नुडल्स ४ ते ५ मिनिटे त्या पाण्यामध्ये शिजवून घ्या.
  • आता नुडल्स ४ ते ५ मिनिटे चांगले शिजले कि गॅस बंद करा आणि मग त्यामधील पाणी गाळून ते परत गरम पाण्याने धुवा आणि नुडल्समधील पाणी पूर्णपणे काढून टाका आणि हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.
  • त्यानंतर गॅसवर मध्यम आचेवर एक पॅन ठेवा आणि मग त्या पॅन मध्ये १ चमचा तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये बारीक चिरलेले आले लसून घाला तसेच बारीक चिरलेला कांदा घाला आणि ते थोडा वेळ भाजा.
  • आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून, चिरून घेतलेल्या भाज्या घाला आणि त्या देखील मध्यम आचेवर ६ ते ७ मिनिटे चांगल्या भाजून घ्या.
  • आता यामध्ये अडीच ते ३ चमचे सोया सॉस, दीड किंवा २ तुमच्या आवडीनुसार रेड चिली सॉस आणि १ चमचा टोमॅटो सॉस घाला आणि हे सर्व मिश्रण चांगले २ मिनिटे मिक्स करा. आता या मिश्रणाला थोडी वाफ यायला लागली कि त्यामध्ये आपण शिजवून घेतलेले नुडल्स घाला आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर घालून ते चांगले मिक्स करून घ्या आणि त्याला २ ते ३ मिनिटे चांगली वाफ येवू द्या.
  • व्हेज नुडल्स सर्व्ह करण्यासाठी तयार झाले.

हक्का नुडल्स रेसिपी – hakka noodles recipe in marathi

हक्का नुडल्स हि रेसिपी एक झटपट बनण्री रेसिपी असून हि आपण छोट्या छोट्या पार्टीसाठी किंवा कधीही आपल्याला खावू वाटल्यास बनवला जाणारा एक पदार्थ आहे जो आपण २५ ते ३० मिनिटामध्ये खावू शकतो. या प्रकारचे नुडल्स बनवण्यासाठी हक्का नुडल्स वापरतात. चला तर मग आता आपण हक्का नुडल्स कसे बनवायचे आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१५ मिनिटेमिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
पाककलाचायनीज
बनवण्याची पध्दतसोपी

हक्का नुडल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make hakka noodles recipe 

हक्का नुडल्स बनवण्यासाठी लागणारे काही साहित्य घरामध्ये उपलब्ध असते आणि काही साहित्य आपल्याला बाजारातून आणावे लागते. चला तर मग पाहूयात हक्का नुडल्स बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

  • १ हक्का नुडल्स पॅकेट.
  • अर्धी वाटी कोबी ( बारीक लांबट चिरलेला ).
  • अर्धी वाटी गाजर ( बारीक लांबट चिरलेला ).
  • २ ते ३ शिमला मिरची ( बारीक लांबट चिरलेली ).
  • १ वाटी पातीचा कांदा ( बारीक चिरलेला ).
  • २ चमचे आले – लसून पेस्ट.
  • १ चमचा टोमॅटो सॉस.
  • १ चमचा मसाला चिली सॉस.
  • १/२ चमचा सोया सॉस.
  • १/२ चमचा व्हिनेगर.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).
  • तेल.

हक्का नुडल्स बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make hakka noodles 

आता आपण वर दिलेले साहित्य वापरून हक्का नुडल्स कसे बनवायचे ते पाहूयात. हक्का नुडल्स बनवताना देखील आपण व्हेज नुडल्स साठी जी प्रक्रिया वापरतो तशीच प्रक्रिया आपण हक्का नुडल्सला वापरतो फक्त यामध्ये काही साहित्याचा फक्त बदल असतो.

  • सर्वप्रथम नुडल्स थोडे हाताने तोडून घ्या आणि मग गॅसवर मध्यम आचेवर एक भांडे ठेवा आणि त्यामध्ये उकळण्यासाठी पाणी ठेवा तसेच त्या पाण्यामध्ये एक चमचा तेल घाला आणि ते पाणी उकळायला चालू झाले कि त्यामध्ये नुडल्स टाका आणि ते नुडल्स ४ ते ५ मिनिटे त्या पाण्यामध्ये शिजवून घ्या.
  • आता नुडल्स ४ ते ५ मिनिटे चांगले शिजले कि गॅस बंद करा आणि मग त्यामधील पाणी गाळून ते परत गरम पाण्याने धुवा आणि नुडल्समधील पाणी पूर्णपणे काढून टाका आणि हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा,
  • हक्का नुडल्स शिजत असताना भाज्या स्वच्छ धुवून त्या चिरून घ्या आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.
  • त्यानंतर गॅसवर मध्यम आचेवर एक पॅन ठेवा आणि मग त्या पॅन मध्ये १ चमचा तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये आले लसून पेस्ट घाला आणि ती २ ते ३ सेकंद भाजून घ्या मग त्यामध्ये मसाला चिली सॉस आणि टोमॅटो सॉस घाला आणि ते मिक्स करा त्यामुळे त्यामधील तिखट पणा तेलामध्ये उतरेल आणि नुडल्स थोडे तिखट होतील.
  • आता यामध्ये गाजर, कोबी, शिमला मिरची आणि पातीचा कांदा घाला आणि भाज्या २ ते ३ मिनिटे मध्यम आचेवर फ्राय करा.
  • आता यामध्ये सोय सॉस आणि व्हेनेगर घाला आणि ते चांगले मिक्स करून घ्या.
  • मग त्यामध्ये नुडल्स आणि चवीनुसार मीठ घालून ते चांगले मिक्स करा आणि नुडल्स थोडे गार होऊ द्या.
  • नुडल्स थोडे गरम झाले कि गॅस बंद करा आणि ते नुडल्स गरमागरम सर्व्हिग बाऊमध्ये काढून त्यावर थोडी कांद्याची बारीक चिरलेली पात टाकून सर्व्ह करा.

शेजवान नुडल्स रेसिपी – schezwan noodles recipe in marathi

नुडल्स हा प्रकार जरी सर्वांना आवडत असला तरी शेजवान नुडल्स हा प्रकार अनेक लोकांना खूप आवडतो आणि हा नुडल्सच्या प्रकारातील सर्वात जास्त मागणी केलेला नुडल्सचा प्रकार आहे. शेजवान नुडल्स हा प्रकार खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनतो. चला तर आता आपण शेजवान नुडल्स कसे बनवायचे आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३०  मिनिटे
पाककलाचायनीज
बनवण्याची पध्दतसोपी

शेजवान नुडल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make schezwan noodles recipe 

शेजवान नुडल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते कारण त्यामधील बहुतेक साहित्य आपल्या घरामध्ये आधीपासून उपलब्ध नसते. चला तर आता शेजवान नुडल्स बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • ३ वाटी साधे नुडल्स.
  • कांदा ( उभा चिरलेला ).
  • अर्धी वाटी कोबी ( बारीक लांबट चिरलेला ).
  • अर्धी वाटी गाजर ( बारीक लांबट चिरलेला ).
  • २ ते ३ शिमला मिरची ( बारीक लांबट चिरलेली ).
  • ५ ते ६ पाकळ्या लसून ( बारीक चिरलेला ).
  • १ चमचा आले ( बारीक चिरलेले ).
  • २ हिरव्या मिरच्या ( बारीक चिरलेल्या ).
  • २ चमचा टोमॅटो सॉस.
  • १/२ चमचा सोया सॉस.
  • दीड चमचा शेजवान सॉस.
  • १/४ चमचा काळी मिरी पावडर.
  • मीठ ( चीविनुसार ).
  • २ ते ३ चमचे तेल.
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).

शेजवान नुडल्स बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make schezwan noodles recipe 

  • सर्वप्रथम नुडल्स थोडे हाताने तोडून घ्या आणि मग गॅसवर मध्यम आचेवर एक भांडे ठेवा आणि त्यामध्ये उकळण्यासाठी पाणी ठेवा तसेच त्या पाण्यामध्ये एक चमचा तेल घाला आणि ते पाणी उकळायला चालू झाले कि त्यामध्ये नुडल्स टाका आणि ते नुडल्स ४ ते ५ मिनिटे त्या पाण्यामध्ये शिजवून घ्या.
  • आता नुडल्स ४ ते ५ मिनिटे चांगले शिजले कि गॅस बंद करा आणि मग त्यामधील पाणी गाळून ते परत गरम पाण्याने धुवा आणि नुडल्समधील पाणी पूर्णपणे काढून टाका आणि हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा,
  • हक्का नुडल्स शिजत असताना भाज्या स्वच्छ धुवून त्या चिरून घ्या आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.
  • त्यानंतर गॅसवर मध्यम आचेवर एक पॅन ठेवा आणि मग त्या पॅन मध्ये १ ते २ चमचे तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये कांदा घाला आणि कांदा लालसर रंग येईपर्यंत भाजा आणि मग त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तसेच आले आणि लसून घाला आणि आणि ते थोडा वेळ भाजा.
  • आता यामध्ये सर्व भाज्या घाला आणि त्या देखील भाजा आणि मग त्यामध्ये सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि शेजवान सॉस घाला आणि मिक्स करा.
  • आता यामध्ये शिजवलेले नुडल्स आणि काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घाला आणि ते सर्व चांगले एकत्र करा आणि त्याला २ मिनिटे वाफवा आणि गॅस बंद करा.
  • शेजवान नुडल्स गरमागरम सर्व्ह करा.

टिप्स (Tips) 

  • नुडल्स हे जास्त तिखट बनवले जातात पण जर तुम्ही हे नुडल्स लहान मुलांच्यासाठी वापरत असाल तर रेड चिली सॉस थोड्या कमी प्रमाणात वापरा. किंवा तुम्हाला तिखट जितक्या प्रमाणात आवडते त्यानुसार तुम्ही त्यामध्ये रेड चिली वापरू शकता.
  • रेड चिली सॉस वापरण्याऐवजी तुम्ही ग्रीन चिली सॉस देखील वापरू शकता.

आम्ही दिलेल्या hakka noodles recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नूडल्स रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या noodles frankie recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chings hakka noodles recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये chicken hakka noodles recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!