फ्राईड राईस रेसिपी Fried Rice Recipe in Marathi

Fried Rice Recipe in Marathi फ्राईड राईस रेसिपी फ्राईड राईस हा एक चायनीज प्रकार आला तरी हा पदार्थ भारतामध्ये देखिली वेगवेगळ्या ठिकाणी खूप लोकप्रिय आहे आणि हा पदार्थ भारतामध्ये रेस्टॉरंट, हॉटेल वारंवार मागवला जाणारा पदार्थ आहे तसेच भारतीय स्वयंपाक घरामध्ये देखील या प्रकारचा राईस आवडीने बनवला जातो आणि खाल्ला देखील जातो. हा चायनीज असल्यामुळे हा पदार्थ चायनीज गाड्यांच्यावर आपल्यला पाहायला मिळतो किंवा आपल्याला खावू वाटल्यास आपण चायनीज गाड्यांच्यावर देखील खावू शकतो. भारतामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे भातांचे प्रकार बनवलेले असतात जसे कि मसाले भात, व्हेज पुलाव, व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, नारळी भात या सारखे अनेक पदार्थ बनवतात.

परंतु हा फ्राईड राईस वेगळ्या पध्दतीने बनवला जातो. भात हा प्रकार अनेक जणांच्या आवडीचा पदार्थ असतो आणि ते लोक वेगवेगळ्या प्रकारच्या भातांच्या दिशेस बनवून खात असतात आणि फ्राईड राईस देखील एक चांगला पर्याय आहे. फ्राईड राईस हि रेसिपी वेगवेगळ्या पध्दतीने बनवू शकतो जसे कि व्हेज फ्राईड राईस, शेजवान फ्राईड, एग्ग फ्राईड राईस, चिकन फ्राईड राईस या सारखे अनेक प्रकार बनवले जातात.

आता आपण खूप सोपा असणारा आणि खूप कमी वेळेमध्ये बनणारे वेगवेगळ्या प्रकारचे फ्राईड राईस कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर आता आपण या लेखामध्ये फ्राईड राईस कसा बनवायचा ते पाहूयात.

fried rice recipe in marathi
fried rice recipe in marathi
अनुक्रमणिका hide
1 फ्राईड राईस रेसिपी – Fried Rice Recipe in Marathi

फ्राईड राईस रेसिपी – Fried Rice Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे
पाककलाचायनीज
बनवण्याची पध्दतसोपी

फ्राईड राईस रेसिपी – how to make fried rice recipe in marathi

फ्राईड राईस हि एक चायनीज रेसिपी आहे जी खूप सुंदर लागते आणि बनवण्यास खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनते. हि एक अशी रेसिपी आहे जी आपण केंव्हाही म्हणजेच सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या जेवणामध्ये किंवा विशेषता रात्रीच्या जेवण्याच्या वेळी बनवू शकतो.

फ्राईड राईस हि एक अशी रेसिपी आहे जी आपल्या घरामध्ये सर्व साहित्य उपलब्ध असेल तर ती गडबडीच्या वेळी आपण सहज बनवू शकतो आणि  जेवण म्हणून खावू शकतो. फ्राईड राईस हि रेसिपी वेगवेगळ्या पध्दतीने बनवू शकतो जसे कि व्हेज फ्राईड राईस, शेजवान फ्राईड, एग्ग फ्राईड राईस, चिकन फ्राईड राईस या सारखे अनेक प्रकार बनवले जातात.

आता आपण यामधील काही प्रकार कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर मग फ्राईड राईस कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे
पाककलाचायनीज
बनवण्याची पध्दतसोपी

व्हेज फ्राईड राईस रेसिपी – veg fried rice recipe in marathi

व्हेज फ्राईड राईस हा फ्राईड राईस या प्रकारातील एक लोकप्रिय प्रकार आहे जो अनेक लोक आवडीने बनवतात आणि खातात देखील. व्हेज फ्राईड राईस बनवण्यासाठी काही भाज्यांचा वापर केला जातो आणि हा फ्राईड राईसचा प्रकार खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनतो. चला तर मग व्हेज फ्राईड राईस कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.

व्हेज फ्राईड राईस बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make veg fried rice recipe 

व्हेज फ्राईड राईस बनवण्यासाठी वेगवेगळ्या भाज्या, तांदूळ, सोया सॉस यासारखे काही साहित्य लागते आणि यामधील काही साहित्य घरामध्ये उपलब्ध असते आणि काही साहित्य घरामध्ये उपलब्ध नसते ते आपल्याला बाजारातून आणावे लागते. चला त आता आपण व्हेज फ्राईड राईस बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ वाटी बासमती तांदूळ.
  • २ वाटी पाणी ( भात शिजवण्यासाठी ).
  • १ मोठा कांदा ( बारीक उभा चिरलेला ).
  • १ लांबट चिरलेले गाजर.
  • ३ ते ४ चमचे मटार.
  • १ शिमला मिरची ( लांबट चिरलेली ).
  • १ वाटी कोबी ( बारीक चिरलेला ).
  • १ मोठा चमचा फरसबी / फ्रेंच बिन्स ( चिरलेले ).
  • १ चमचा ग्रीन चिली सॉस.
  • १ चमचा आले लसून पेस्ट.
  • २ चमचे सोया सॉस.
  • १/४ चमचा काळी मिरी पावडर.
  • १/२ मोठा चमचा तेल.
  • मीठ ( चवीनुसार ).

व्हेज फ्राईड राईस बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make veg fried rice recipe 

आता आपण वर दिलेले साहित्य वापरून व्हेज फ्राईड राईस कसा बनवायचा ते पाहूयात.

  • सर्वप्रथम तांदूळ चांगले निवडून, पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • मग ते एका भांड्यामध्ये घालून त्यामध्ये दोन वाटी पाणी आणि थोडे चवीनुसार मीठ घाला आणि ते मध्यम आचेवर गॅसवर ठेवून तो भात ९० ते ९५ टक्के शिजवून घ्या आणि थोडा वेळ गार होऊ द्या. किंवा एक ताटामध्ये काढा त्यामुळे तो लवकर गार होईल.
  • भात गार झाला कि तो हाताने चांगला मोकळा करून घ्या.
  • आता आपल्याला व्हेज फ्राईड राईस बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या स्वच्छ धुवून, चिरून बाजूला ठेवा.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर पॅन ठेवा आणि पॅनमध्ये अर्धा मोठा चमचा तेल घाला आणि ते तेल गरम करा. ते गरम झाले कि त्यामध्ये आले लसून पेस्ट घाला आणि काही सेकंद भाजा मग त्यामध्ये लगेच कांदा घाला आणि तो तेलामध्ये चांगला मिक्स करून २ ते ३ मिनिटे तेलामध्ये भाजा.
  • आता कांदा लालसर रंगाचा झाला कि त्यामध्ये सर्व भाज्या घाला आणि त्या भाज्या एकत्र मिक्स करून त्या भाज्या ४ ते ५ मिनिटे भाजा. मग त्यामध्ये ग्रीन चिली सॉस, काळी मिरी पावडर, सोया सॉस आणि थोडेसे चवीनुसार मीठ ( मीठ घालताना काळजी पूर्वक घाला कारण आपण भात शिजवताना देखील मीठ घातले आहे ) घाला आणि ते मिक्स करा.
  • आता या मिश्रणामध्ये शिजवलेला भात घाला आणि तो चमच्याने एकत्र करून घ्या आणि भाताला झाकण लावून तो ५ ते ७ मिनिटे मंद आचेवर वाफवून घ्या म्हणजे राहिलेले १० ते ५ टक्के भात शिजला जाईल.
  • भाताला चांगली वाफ आली गॅस बंद करा आणि व्हेज फ्राईड राईस सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून तो गरमागरम टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.

शेजवान फ्राईड राईस – veg schezwan fried rice recipe in marathi

शेजवान फ्राईड राईस हा देखील एक लोकप्रिय फ्राईड राईसचा प्रकार आहे जो आपण नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवून खावू शकतो. शेजवान राईस मध्ये काही भाज्या तसेच शेजवान चटणी वापरली जाते आणि शेजवान चटणीमुळे हा फ्राईड राईस खूप स्वादिष्ट बनतो. शेजवान फ्राईड राईस हा बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये बनतो. चला तर मग शेजवान फ्राईड राईस कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

शेजवान फ्राईड राईस बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make schezwan fried rice 

शेजवान फ्राईड राईस हा तांदूळ, वेगवेगळ्या भाज्या, सोया सॉस आणि शेजवान चटणी हे मुख्य साहित्य लागते आणि ते आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करू शकतो. शेजवान चटणी आपण बाजारातून विकत अनु शकतो किंवा घरी देखील बनवू शकतो. चला तर आता आपण शेजवान फ्राईड राईस बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ वाटी तांदूळ ( लांब बासमती तांदूळ )
  • २ वाटी पाणी ( तांदूळ शिजवण्यासाठी ).
  • १ मोठा कांदा ( उभा चिरलेला ).
  • १ चमचा आले लसून पेस्ट.
  • २ गाजर मध्य आकाराचे ( लांबट चिरलेले ).
  • १ शिमला मिरची ( लांबट चिरलेली ).
  • अर्धी वाटी कोबी ( बारीक चिरलेला ).
  • २ चमचे मटार.
  • १ चमचा सोया सॉस.
  • १/२ चमचा व्हिनेगर ( पर्यायी ).
  • २ चमचे शेजवान चटणी.
  • तेल ( आवश्यकतेनुसार ).
  • मीठ ( चवीनुसार ).

शेजवान फ्राईड राईस बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make schezwan fried rice recipe 

  • सर्वप्रथम तांदूळ चांगले निवडून, पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • मग ते एका भांड्यामध्ये घालून त्यामध्ये दोन वाटी पाणी आणि थोडे ( १ चमचा ) तेल चवीनुसार मीठ घाला आणि ते मध्यम आचेवर गॅसवर ठेवून तो भात ९० ते ९५ टक्के शिजवून घ्या आणि थोडा वेळ गार होऊ द्या. किंवा एक ताटामध्ये काढा त्यामुळे तो लवकर गार होईल.
  • भात गार झाला कि तो हाताने चांगला मोकळा करून घ्या.
  • आता आपल्याला शेजवान फ्राईड राईस बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या स्वच्छ धुवून, चिरून बाजूला ठेवा.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर पॅन ठेवा आणि पॅनमध्ये अर्धा मोठा चमचा तेल घाला आणि ते तेल गरम करा. ते गरम झाले कि त्यामध्ये आले लसून पेस्ट घाला आणि काही सेकंद भाजा मग त्यामध्ये लगेच कांदा घाला आणि तो तेलामध्ये चांगला मिक्स करून २ ते ३ मिनिटे तेलामध्ये भाजा.
  • आता त्यामध्ये भाज्या घाला आणि त्या देखील चांगल्या मिक्स करून भाजून घ्या.
  • मग आता त्या भाज्यांच्यामध्ये सोया सॉस, व्हिनेगर, शेजवान चटणी आणि आवश्यक असल्यास थोडे मीठ घाला आणि ते मिक्स करा.
  • आता त्यामध्ये मोकळा केलेला भात घाला आणि ते मिश्रण चांगले मिक्स करा आणि झाकण लावून ५ मिनिटे वाफवून घ्या.
  • तुमचा शेजवान फ्राईड राईस तयार झाला.

एग्ग फ्राईड राईस रेसिपी – egg fried rice recipe in marathi

आता आपण खूप सोपा आणि खूप कमी वेळेमध्ये बनणारा एग्ग फ्राईड राईस कसा बनवायचा ते पाहूयात. आता आपण तो बनवण्यासाठी केली जाणारी कृती आणि त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात.

एग्ग फ्राईड राईस बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make egg fried recipe 

एग्ग फ्राईड राईस बनवण्यासाठी लागणारे काही साहित्य घरामध्ये उपलब्ध असते आणि काही साहित्य आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चला तर मग एग्ग फ्राईड राईस बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यची यादी पाहूयात.

  • १ वाटी बासमती तांदूळ.
  • २ वाटी पाणी ( शिजवण्यासाठी ).
  • १ कांदा ( बारीक चिरलेला ).
  • १ चमचा आले लसून पेस्ट.
  • अर्धी वाटी मटार.
  • २ मध्य आकाराचे गाजर ( चिरलेले ).
  • अर्धी वाटी कोबी ( बारीक चिरलेला ).
  • २ ते ३ हिरव्या मिरच्या ( बारीक चिरलेल्या ).
  • २ अंडी.
  • १/४ चमचा काळी मिरी पावडर.
  • दीड चमचा सोय सॉस.
  • १ चमचा बिर्याणी मसाला.
  • तेल ( आवश्यकतेनुसार ).
  • मीठ ( चवीनुसार ).

एग्ग फ्राईड राईस बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make egg fried rice recipe 

आता आपण वरील साहित्य वापरून एग्ग फ्राईड राईस कसा बनवायचा ते पाहूयात.

  • सर्वप्रथम गॅसवर मध्यम आचेवर पॅन गरम करा आणि मग त्यामध्ये अंडी फोडून घाला आणि आणि मग त्यामध्ये काळी मिरी पावडर आणि अगदी थोडेसे मीठ घाला आणि ते सतत हलवत रहा आणि ते बुरजी सारखे बनवा आणि मग ते बाजूला काढून घ्या.
  • आता तांदूळ चांगले निवडून, पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • मग ते एका भांड्यामध्ये घालून त्यामध्ये दोन वाटी पाणी आणि थोडे ( १ चमचा ) तेल चवीनुसार मीठ घाला आणि ते मध्यम आचेवर गॅसवर ठेवून तो भात ९० ते ९५ टक्के शिजवून घ्या आणि थोडा वेळ गार होऊ द्या. किंवा एक ताटामध्ये काढा त्यामुळे तो लवकर गार होईल.
  • भात गार झाला कि तो हाताने चांगला मोकळा करून घ्या.
  • आता आपल्याला एग्ग फ्राईड राईस बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या स्वच्छ धुवून, चिरून बाजूला ठेवा.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर पॅन ठेवा आणि पॅनमध्ये अर्धा मोठा चमचा तेल घाला आणि ते तेल गरम करा. ते गरम झाले कि त्यामध्ये आले लसून पेस्ट आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला आणि काही सेकंद भाजा मग त्यामध्ये लगेच कांदा घाला आणि तो तेलामध्ये चांगला मिक्स करून २ ते ३ मिनिटे तेलामध्ये भाजा.
  • आता त्यामध्ये गाजर, कोबी, मटार घाला आणि ते चांगले भाजा.
  • मग यामध्ये सोय सॉस, बिर्याणी मसाला, थोडेसे चवीनुसार मीठ आणि आपण फ्राय करून ठेवलेले अंडे घाला आणि ते मिक्स करा.
  • शेवटी त्यामध्ये आपण ९० ते ९५ टक्के शिजवून मोकळा करून ते मिक्स केलेला भात घालून तो मिक्स करा आणि आणि त्यावर झाकण लावून तो भात ७ ते ८ मिनिटे मंद आचेवर वाफवून घ्या म्हणजे राहिलेला १० ते ५ टक्के देखील शिजून जाईल. शिजल्यानंतर गॅस बंद करा.
  • आता हा एग्ग फ्राईड राईस प्लेटमध्ये काढून त्यावर बारीक चिरलेली कांद्याची पात घालून तो टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.

टिप्स (Tips) 

  • आपण कोणत्याही प्रकारच्या फ्राईड राईस मध्ये व्हिनेगर वापरू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर.
  • फ्राईड राईस रेसिपी हि वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते आणि हे वेगवेगळे प्रकार बनवण्याची पध्दत एकच असते परंतु त्यामध्ये वापरलेले मुख्य साहित्य असते त्यामध्ये थोडा फरक असतो जसे कि शेजवान राईस मध्ये शेजवान चटणी तसेच एग्ग फ्राईड राईस मध्ये एग्ग वापरले जाते परंतु दुसरे साहित्य एकाच असते आणि पध्दत देखील सारखीच असते.

आम्ही दिलेल्या fried rice recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर फ्राईड राईस रेसिपी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या veg fried rice recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि egg fried rice recipe in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये paneer fried rice recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!