पंडिता रमाबाई माहिती मराठी Pandita Ramabai Information in Marathi

Pandita Ramabai Information in Marathi पंडिता रमाबाई यांची माहिती भारत भूमीला थोर क्रांतिकारक, वीर जवान, समाज प्रबोधक, विचारवंत, समाज सुधारक लाभले आहेत. त्यातीलच एक म्हणजे पंडिता रमाबाई होय. पंडिता रमाबाई यांनी त्यांच आयुष्य महिलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी अर्पण केलं. स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा ही दोन त्यांची मुख्य उद्दिष्ट होती. पंडिता रमाबाई यांनी स्त्री शिक्षणामध्ये लावलेला हातभार नेहमीच श्रेष्ठ राहील. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ब्रिटिश राजवट द्वारे पुरस्कार देखील जाहीर करण्यात आला होता.

त्यांनी स्त्री शिक्षण ही मोहीम फक्त भारतातच आहे तर भारताबाहेर देखील सुरु ठेवली. शेवटच्या अगदी श्‍वासापर्यंत त्यांनी गरजू आणि पीडित स्त्री यांचा विचार केला. आजच्या लेखामध्ये आपण पंडिता रमाबाई यांच्या संघर्षमय जीवनाची ‌कथा आणि त्यांनी स्त्री शिक्षण आणि समाज सेवेसाठी घेतलेले अतोनात प्रयत्न या लेखाद्वारे बघणार आहोत.

pandita ramabai information in marathi
pandita ramabai information in marathi

पंडिता रमाबाई माहिती मराठी – Pandita Ramabai Information in Marathi

नाव(Name)पंडिता रमाबाई
जन्म (Birthday)१८५८ रोजी २३ एप्रिलला
जन्मस्थान (Birthplace)कर्नाटक येथील गंगामूळ
वडील (Father Name)अनंतशास्त्री डोंगरे
पती (Husband Name)बिपिन बिहारीदास मेधावी
आईचे नावलक्ष्मीबाई डोंगरे
मुलेमनोरमा
मृत्यू (Death)५ एप्रिल १९२२
लोकांनी दिलेली पदवीपंडिता

पंडिता रमाबाई यांचा विवाह कोणाबरोबर झाला ?

पंडिता रमाबाई यांचा मुळ नाव रमाबाई सरस्वती असं होतं. रमाबाई सरस्वती यांचा जन्म कर्नाटक येथील गंगामूळ येथे इसवी सन १८५८ रोजी २३ एप्रिलला झाला. पंडिता रमाबाई यांचे आई वडील अनंतशास्त्री डोंगरे आणि लक्ष्मीबाई डोंगरे हे अतिशय उच्च विचारसरणीचे व्यक्ती होते. पंडिता रमाबाई यांच्या वडिलांना बालविवाह मान्य नव्हता तसेच त्यांना स्त्रियादेखील शिक्षण घेऊ शकतात असं वाटायचं त्यामुळे त्यांनी पंडिता रमाबाई यांच्या वर कधीच जबरदस्ती केली नाही.

त्यांना वेद शास्त्राचे शिक्षण दिले. रमाबाईंच वय नऊ वर्ष होऊन गेलं असून सुद्धा त्यांनी रमाबाईच लग्न लावून दिलं नाही आणि याच कारणामुळे काही समाजातील लोकांनी त्यांचा अतोनात छळ केला. त्यामुळे रमाबाई यांच्या कुटुंबियांना नेहमीच स्थलांतर करावं लागायचं. जेव्हा रमाबाई सतरा-अठरा वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या आई-वडिलांचा निधन झालं.

त्या वेळी पुढे जाऊन रमाबाई त्यांच्या मोठ्या भावासोबत कोलकत्त्याला पोहोचल्या आणि तिकडे त्यांनी‌ बिपिन बिहारीदास मेधावी वकिलांशी इसवी सन १८८० मध्ये विवाह केला.

पंडिता रमाबाई यांच्या मुलीचे नाव काय होते ?

रमाबाई यांनी बिपिन बिहारी दास मेधावी या नावाच्या वकिलाशी कोलकत्यात लग्न केले. त्यानंतर त्यांना एक अपत्य देखील झाले. पंडिता रमाबाई यांच्या मुलीचे नाव मनोरमा असे होते.

आर्य महिला समाज स्थापना कोणी केली ?

पंडिता रमाबाई यांच्या वर लहानपणापासून त्यांच्या आईवडिलांनी अतिशय चांगले संस्कार केले. पंडिता रमाबाई यांचे वडील अनंतशास्त्री हे खुल्या विचारांचे होते त्यांच्या मते एका स्त्रीच शिक्षण घेणे हे अतिशय गरजेचे आहे. तसेच त्यांचा बालविवाहाला देखील विरोध होता त्यामुळे आनंद शास्त्री यांनी पंडिता रमाबाई यांना संस्कृत भाषेचे शिक्षण दिले त्यावेळी मुलींना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई होती.

त्या काळात समाजात मुली फक्त चूल आणि मूल इतक्याच गोष्टीसाठी मर्यादित असतात असा विचार होता. परंतु रमाबाई यांच्या वडिलांनी रमाबाई आणि त्यांच्या आईंना शिक्षण दिले. तसेच त्यांनी रमाबाई यांच्यावर बाल विवाह करण्यास जबरदस्ती देखील केली नाही परंतु पंडिता रमाबाई यांना प्रोत्साहित करणारे त्यांचे वडील आणि त्यांची आई यांचे निधन झालं.

त्यानंतर पंडिता रमाबाई त्यांच्या मोठ्या भावासोबत कोलकत्ता येथे निघून गेल्या पंडिता रमाबाई यांना संस्कृत विषयाचा दांडगा अनुभव होता त्यामुळे कोलकत्ता येथे काही पंडितांनी बोलावून त्यांचा कोलकत्ता येथील सिनेट हॉलमध्ये “पंडिता” आणि “सरस्वती” अशा पदव्या देऊन सत्कार केला.

पुढे पंडिता रमाबाई यांच १८८० मध्ये लग्न झालं परंतु त्यांच्या लग्नाच्या काही वेळाने म्हणजे दोन वर्षानंतर त्यांच्या पतीचं निधन झालं. आधी आई – वडील आणि आता पती तरीही पंडिता रमाबाई या खचल्या नाहीत तर त्यांनी कंबर कसली आणि आपल्या एकुलत्या मुलीला घेऊन त्यांनी पुणे येथे स्थलांतर केलं. पुण्यामध्ये जाऊन पंडिता रमाबाई यांनी पुण्यामध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली.

आर्य महिला समाजाची स्थापना कधी झाली ?

पंडिता रमाबाई यांचा जीवन अतिशय संघर्षमय होतं. बालपणी त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची समाजातील लोकांनी ओढाताण केली. म्हणजेच रमाबाई यांचे वडील उच्च विचाराचे होते त्यांनी रमाबाई यांना शिक्षण दिलं तसेच त्या नऊ वर्षांच्या झाल्या तरी त्यांचे लग्न करून दिले नाही या गोष्टींमुळे समाजातील लोकांनी रमाबाई आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास दिला त्यांना पिढलं त्यामुळे प्रत्येक वेळी रमाबाई व त्यांच्या कुटुंबियांना वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थलांतर करावं लागलं.

रमाबाई लहानपणापासूनच त्यांच्या वडिलांचा सारख्या हुशार होत्या. त्यांना त्यांच्या आई आणि वडीलांन पासून साहित्य लेखनाचा अतिशय ज्ञान मिळालं होतं. त्या संस्कृत भाषेमध्ये पारंगत होत्या त्याशिवाय त्या मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्लिश, हिब्रू या भाषादेखील त्यांना ज्ञात होत्या रमाबाई पंडित यांच्या तारुण्यामध्ये त्यांच्या आईवडिलांचे निधन झालं आणि त्यानंतर त्या आपल्या मोठ्या भावासोबत कोलकत्ता येथे स्थलांतरित झाल्या.

तिथून पुढे त्यांचा विवाह झाला परंतु विवाह नंतर त्यांच्या पतीचे देखील निधन झालं. पंडिता रमाबाई या स्वतः एक विधवा होत्या त्यामुळे त्यांना विधवा महिलेची व्यथा चांगलीच ठाऊक होती. त्या काळामध्ये महिलांना अपेक्षित असं अशी वागणूक मिळत नव्हती त्यामुळे पंडिता रमाबाई यांनी महिलांसाठी महिलांच्या हक्कासाठी लढा देण्याचा ठरवलं त्यांनी महिलांना शिक्षण देणे गरजेचे आहे, तसेच बालविवाह ही प्रथा मोडीत काढली नंतर पुनर्विवाहासाठी बंदी असणार्या अशा सगळ्या बुरसटलेल्या रूढी-परंपरा त्यांना मोडून काढायच्या होत्या.

समाजात स्त्रीला देखील चांगली वागणूक मिळाली पाहिजे असं त्यांचं मत होतं त्यासाठी त्यांनी इसवी सन १८८२ मध्ये पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना केली. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, बार्शी, पंढरपूर अशा शहरांमध्ये आर्य समाजाची स्थापना केली.

इसवीसन १८८३ मध्ये त्यांनी इंग्लंड गाठलं तिकडे त्या आर्य महिला समाजाच्या साठी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेल्या होत्या. तिकडे जाऊन त्यांनी चेल्टन हाॅम लेडीज कॉलेज या महिला विद्यालयांमध्ये संस्कृत भाषेचे प्रशिक्षण दिलं. इतकच नव्हे तर त्या इसवी सन १८८६ मध्ये अमेरिकेत जाऊन पोहोचल्या.

तिकडे त्या आपल्या स्त्री शिक्षण या योजनेसाठी कोणाकडून काही मदत मिळते का ह्या आशेवर गेल्या होत्या. तिकडे जाऊन त्यांनी हिंदू बाल विधवा महिलांना मिळणारी वागणूक याच्यावर एक पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचे नाव “द हिंदू हायकास्ट वुमन” असं होतं. अमेरिकेमध्ये राहून त्यांनी भारतात महिलांना मिळणारी वागणूक याच्यावर अनेक भाषणे दिली भारतामध्ये महिलांना शिक्षणास परवानगी नाही आहे.

तसेच बालविवाहाची परंपरा तसेच बालविधवा यांना मिळणारी वागणूक या सर्व महिला संबंधित प्रश्न त्यांनी अमेरिकेसमोर मांडले. रमाबाईंची ही चळवळ यशस्वी ठरली अमेरिकेतील काही लोकांनी बालविधवा या समस्या मध्ये रमाबाई यांना मदत करण्यासाठी एक असोसिएशन स्थापन केलं. बोस्टन येथे हे असोसिएशन स्थापन करण्यात आलं.

या असोसिएशनचे नाव “रमाबाई असोसिएशन” असं ठेवण्यात आलं. इंग्लंडमध्ये त्या वाॅटिंज गावच्या सेंट मेरी मठामध्ये राहत होत्या. तिथे येशू ख्रिस्तांचा द्वारे दिली जाणारी शिकवण पाहून त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला.

शारदा सदन ची स्थापना कोणी केली ?

मुंबईमध्ये पंडिता रमाबाई यांनी विधवा महिलांसाठी ११ मार्च १८८९ मध्ये “शारदा सदन” या नावाने एक संस्था स्थापन केली. ही संस्था स्थापन करण्याचे उद्दिष्ट म्हणजे त्यांना विधवा महिलांनी वर लावण्यात येणारे अनावश्यक नियम, चालीरिती मोडून काढायच्या होत्या. ही संस्था त्यांनी पुढे पुण्यामध्ये स्थापन केली.

स्त्री शिक्षण आणि स्त्रीचे महत्व समाजाला पटवून देण्याचा त्यांचा प्रवास पुढे चालूच राहिला. इसवीसन १८९८ मध्ये पंडिता रमाबाई यांनी “मुक्तीसदना” नावाची एक संस्था स्थापन केली. या संस्थेचा आश्रम केडगाव येथे होतं या संस्थे मध्ये गुजरात मध्ये आणि मध्यप्रदेश मध्ये इसवी सन १९९७ ते इसवी सन १९०० याकाळात पडलेल्या दुष्काळामध्ये अनेक स्त्रिया निराश्रित झाल्या त्यामुळे केडगाव येथील आश्रमामध्ये यांची सोय करण्यात आली होती.

इतकच नव्हे तर पंडिता रमाबाई यांनी प्रतीसदन या नावाची संस्था देखील स्थापन केली होती. या आश्रमात दुबळ्या व अपंग महिलांना आश्रय देण्यात आला होता. पंडित रमाबाई यांच्यामते महिलांनी त्यांच्या पायावर उभं राहावं आणि समाजाला दाखवून द्यावं की त्या देखील प्रत्येक क्षेत्रांमध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवू शकतात.

त्यामुळे पंडिता रमाबाई यांनी आतोनात प्रयत्न केले त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था स्थापन केलेल्या या संस्थांद्वारे त्या गरजू आणि ज्या स्त्रियांना म्हणजेच महिलांना घरदार नसेल अशा स्त्रियांना आश्रमात थारा दिला. या आश्रमामध्ये त्या स्त्रियांना शिवणकाम, विणकाम, शेतीवाडी त्यासोबतच त्यांनी स्त्रियांना शैक्षणिक शिक्षण देण्याचा देखील प्रयत्न केला. पंडिता रमाबाई यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य स्त्रीशिक्षण आणि स्त्रियांच्या हितासाठी समर्पित केलं.

ब्रिटिश सरकारने पंडिता रमाबाई यांना कैसर-ए-हिंद ही पदवी कोणत्या वर्षी प्रदान केली

पंडिता रमाबाई एक स्त्रीवादी होत्या. लहानपणापासूनच त्या त्यांच्या वडिलांच्या उच्च विचारांच्या सानिध्यामध्ये राहिल्या होत्या. त्यांच्या वडिलांच्या विचारातून प्रभावित झालेल्या पंडिता रमाबाई लहानपणापासूनच त्यांच जीवन संघर्षमय होतं आधीच या काळामध्ये म्हणजेच अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकामध्ये स्त्रियांचं घराबाहेर पडणं चुकीचं मानलं जायचं.

अशा काळामध्ये पंडिता रमाबाई यांच्या वडिलांनी पंडिता रमाबाई यांना शिक्षण दिलं त्यांचं चांगलं संगोपन केलं त्यांच्यावर चांगले संस्कार केले. पुढे जाऊन पंडिता रमाबाई देखील त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवू लागल्या त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर पंडिता रमाबाई यांच कोलकत्ता येथील एका वकिलाशी विवाह झाला.

परंतु पंडिता रमाबाई यांचे जीवन संघर्षमय राहील असल्यामुळे त्यांच्या पतीचं लग्नाच्या अगदी दोन वर्षानंतर निधन झालं. तेव्हा पंडिता रमाबाई अगदी एकट्या पडल्या होत्या आणि त्यांची एकुलती एक मुलगी. त्यांची एकुलती एक मुलगी ला घेऊन पुणे येथे त्यांनी स्थलांतर केलं. तिथून खरी पंडिता रमाबाई यांच्या समाजसुधारणा चळवळ आणि स्त्री शिक्षण चळवळीला सुरुवात झाली.

तिथून पंडिता रमाबाई यांनी पुढे आर्य समाजाची स्थापना केली. त्यासोबतच त्यांनी स्त्री शिक्षण या विषयावर जोर दिला आणि जागोजागी स्त्री शिक्षणाचा नारा लावला. स्त्री शिक्षण नव्हे तर स्त्रियांचे हक्क स्त्रियांना देखील स्वतःचे निर्णय घेण्याचे हक्क आहे हे त्यांनी समाजाला दाखवून दिलं.

तिथून पुढे त्यांनी लंडन, इंग्लंड, अमेरिका अशा वाऱ्या केल्या. तिकडे परदेशात जाऊन देखील त्यांनी इतर देशांमध्ये भारतीय स्त्रीचे होणारे हाल किंवा भारतीय स्त्रीवर लादले जाणारे निर्णय लादले जाणारे नियम ह्याच्यावर त्यांनी परदेशांमध्ये भाषण केलं. तिकडच्या लोकांना त्यांनी स्त्रीच महत्त्व समजावून दिलं.

तिकडील काही लोकांनी एकत्र येऊन रमाबाई यांच्या नावे असोसिएशन तयार करून या चळवळींमध्ये आपले योगदान दिलं. पंडिता रमाबाई यांनी अनेक प्रकारच्या संस्था स्थापन केल्या या संस्थांमध्ये त्या गरजू आणि पीडित स्त्रियांना आश्रय देण्याच काम करायच्या. इतकंच नव्हे तर त्यांनी प्रत्येक स्त्रीला आपल्या स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं हे देखील शिकवलं.

त्या स्वतः एक विधवा असल्यामुळे त्यांना देखील एका विधवेचे दुःख नक्कीच माहीत होतं, त्यामुळे त्या विधवा महिलांसाठी देखील लढत राहिल्या पंडिता रमाबाई यांचे सामाजिक कार्य आणि स्त्रीवादीपण बघून १९९९ सली ब्रिटिश राजवटीत ब्रिटिश राज्य व्यवस्थेतील सर्वात श्रेष्ठ मानला जाणारा पुरस्कार म्हणजेच कैसर-ए-हिंद हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला.

इतकी मोठी पदवी त्यांना ब्रिटिश सरकारकडून मिळाली. हा पुरस्कार त्यांना अगदी आदराने देण्यात आला होता. कैसर ए हिंद हे एक सुवर्णपदक होतं. पंडिता रमाबाई यांचा समाज सुधारणे मध्ये मोठा वाटा आहे. एखाद्या घरात स्त्रीचा जन्म होणं किती मोठी गोष्ट आहे हे त्यांनी प्रत्येकाला दाखवून दिलं.

तेही अशा काळामध्ये जिथे स्त्रियांचे घराबाहेर पडणं देखील मुश्कील होतं. त्यांनी स्त्रियांच्या हक्कांसाठीचा लढा फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर देखील चालू ठेवला. अशा थोर व्यक्तिमत्त्वाचं केडगाव येथे इसवी सन १९२२ मध्ये निधन झालं. पंडिता रमाबाई यांनी त्यांच्या विचार लोकांपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे पोहोचवले.

आम्ही दिलेल्या pandita ramabai information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पंडिता रमाबाई यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about pandita ramabai in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि pandita ramabai माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये pandita ramabai information in marathi essay Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!