शिवनेरी किल्ला माहिती Shivneri Fort Information in Marathi

Shivneri Fort Information in Marathi शिवनेरी किल्ल्याविषयी माहिती संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणारे राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला यामुळे या किल्ल्याला इतिहासामध्ये आणि आत्ताही खूप महत्त्वाचे स्थान आहे. या किल्ल्यावर १९ फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा साजरा केला जातो. शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर या शहरामध्ये आहे. या किल्ल्याचे बांधकाम १७ व्या शतकामध्ये यादवांनी नाणेघाट डोंगरावर सुमारे ३५०० फुट उंचीचा हा किल्ला बांधला होता. डोंगराच्या पोटामध्ये लेणी आणि त्याच्यावर किल्ला अशी या गडाची बांधणी केली होती. हा किल्ला ३०० मीटर उंच टेकडीवर बांधलेला आहे. शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वी पासून असणारा हा किल्ला नाणेघाटच्या व्यापारी मार्गावरील एक महत्वाचा किल्ला होता.

नाणेघाट हि एक मोठी बाजारपेठ असल्यामुळे आणि व्यापारही मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे तेथील राजकर्त्यांनी या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता.

shivneri fort information in marathi
shivneri fort information in marathi

शिवनेरी किल्ला माहिती – Shivneri Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावशिवनेरी
जिल्हापुणे
शहरजुन्नर ( शिवनेरी किल्ल्यापासून २ किलो मीटर अंतरावर )
किल्ल्याचा प्रकारगिरीदुर्ग
स्थापनाइ. स. ११७० मध्ये
किल्ल्याचे बांधणी कोणी केलीयादव वंशाने
किल्ल्यावर जाण्यासाठीचे मार्गकिल्ल्यावर जाण्यसाठी २ मार्ग आहे राजमार्ग आणि साकळी मार्ग.
डोंगररांगानाणेघाट
किल्ल्याची उंची३५०० फुट
सध्या या किल्ल्याची मालकी कोणाकडे आहे भारत सरकार

शिवनेरी किल्ल्याचा इतिहास – Shivneri Fort History in Marathi

११७० ते १३०८ मध्ये नाणेघाट येथे यादवांचे वर्चस्व होता आणि त्यांनीच त्यांच्या काळामध्ये नाणेघाट डोंगरावर शिवनेरी किल्ला बनवला त्यानंतर १४४३ मध्ये मलिक वंशाने यादवांना हरवून शिवनेरी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला पण दिल्ली सल्तनत कमकुवत झाल्यामुळे हा किल्ला बहामनिंच्या ताब्यात देण्यात आला त्यानंतर १६ व्या शतकामध्ये शिवनेरी हा किल्ला अहमद नगरच्या सुलतानांना देण्यात आला. त्यानंतर हा किल्ला अहमदनगरच्या सुलतानांनी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज्यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांना हा किल्ला भेट म्हनून देण्यात आला.

छत्रपती शिवाजी महारान्जांचा जन्म याच किल्ल्यावर झाला आणि त्यांनी त्यांचे बालपण देखील याच किल्ल्यावर घालवले. त्यानंतर हा किल्ला ब्रिटीशांच्या अधिकाराखाली १८२० मध्ये एंग्लो मराठा युध्दामध्येनंतर गेला.

शिवनेरी किल्ल्याविषयी माहिती – information about shivneri fort in marathi

शिवनेरी हा किल्ला ११७० मध्ये पुणे जिल्ह्यामधील जुन्नर शहरामध्ये नाणेघाट डोंगररांगामध्ये यादवांनी बांधला आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी २ मुख्य मार्ग आहेत ते म्हणजे राजमार्ग किवा ७ दरवाज्यांची मार्ग आणि साकळीची वाट ( chainroot ). या किल्ल्याला एकूण ७ दरवाजे आहेत आणि किल्ल्याचे प्रवेशद्वार दक्षिण पश्चिमेला आहे आणि या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला महाद्वार म्हणतात आणि या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाखेरीज या किल्ल्याला चारही बाजूंनी प्रवेशद्वार आहेत. या किल्ल्याचा आकार त्रिकोणी स्वरूपाचा असून किल्ल्याच्या भोवती मातीची भक्कम तटबंदी आहे त्यामुळे किल्ल्यावरील लोकांचे संरक्षण होत होते.

गडाच्या मध्यभागी एक पाण्याचा तलाव आहे या तलावाला बदामी तलाव असे नाव दिले आहे आणि तलावाच्या दक्षिणेकडे तरुण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची आई जिजाबाई या एक आकर्षक मूर्ती देखील आहे. त्याचबरोबर गडावर बालेकिल्ला संरक्षणासाठी अनेक दरवाजे बांधले आहेत पण त्यामधील एक विशेष आणि महत्वाचा दरवाजा म्हणजे माण दरवाजा.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी का ठेवले ? 

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० मध्ये शिवनेरी या किल्ल्यावर झाला होता आणि शिवनेरी किल्ल्यावर एक शिवाई देवीचे मंदिर आहे आणि या शिवाई देवी च्या नावावरूनच छत्रपती शिवाजी महारांजांचे नाव शिवाजी असे ठेवले होते.

शिवनेरी आणि शिवाजी महाराजांचा जन्म

१५९५ मध्ये नाणेघाट वरील शिवनेरी हा किल्ला निजामांच्याकडून तो मालोजीराजे भोसले ( शिवाजी महाराजांचे आजोबा ) यांना देण्यात आला होता आणि त्यावेळी या किल्ल्याचे किल्लेदार सिधोजीराव विश्वास राव हे होते. सिधोजीराव विश्वासराव यांच्या मुलीचा विवाह जिजाबाई आणि शहाजी महाराजांच्या थोरल्या मुलाशी झाला होता त्यामुळे त्यांचे खूप जवळचे संबध होते. शहाजी महाराजांची पत्नी जिजाबाई गरोदर असताना. जिजाबाईंच्या सुरक्षेसाठी त्यांना शिवनेरी गडावर ठेवण्यात आले होते. जिजाबाई शिवनेरी गडावर राहत असताना त्यांनी तेथील शिवाई देवीच्या मादिरामध्ये एक नवस मागितला तो नवस असा होता कि जर मला पुत्ररत्न झाले तर मी त्याचे नाव तुझ्या नावावरून ठेवीन आणि तसेच झाले त्यावेळी जिजाबाईंनि शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी ठेवले.

शिवनेरी गडावर जाण्यासाठीच्या वाटा 

शिवनेरी गडावर जाण्यासाठी मुख्यता दोन वाटा आहे त्या म्हणजे राजमार्ग किवा ७ दरवाज्यांचा मार्ग.

राजमार्ग :

या मार्गाने जाताना आपल्याला ७ दरवाजे लागतात आणि हे दरवाजे वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या राजवंशानी बनवले होते  त्यामधील पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजा ( प्रवेशद्वार ) जो पेशव्यांनी बांधला आहे आणि या दरवाजाला बुरुज आहे आणि त्यावर चढायला पायऱ्या आहेत असे म्हणतात कि या बुरुजावरती चढून पूर्वीच्या काळी शत्रूवर नजर राखली जायची. दुसरा दरवाजा गणेश दरवाजा आणि त्यांनतर आहे पीर दरवाजा हा दरवाजा बहामनिंच्या काळामध्ये बनवला होता मग येतो तो हत्ती दरवाजा हा दरवाजा यादवांच्या काळा मध्ये बांधला होता. पाचवा दरवाजा शिवाई देवी मंदिराचा दरवाजा हा दरवाजा पुण्यातील पेशव्यांनी बांधला त्यानंतर येतो तो मेणा दरवाजा आणि शेवटी येतो यो कुलाबकर दरवाजा आणि हा दरवाजा निजामांच्या काळामध्ये बनवला गेला आहे.

साकळीची वाट :

शिवनेरी किल्ल्यावर एक कातळभिंत आहे त्या कातळभिंतीपाशी आल्यानंतर भिंतीला लावलेल्या साकळ्या आहेत त्या साकळ्याच्या आणि कातळाच्या भिंतीला खोदलेल्या पायऱ्या आहेत. साकळीला धरून त्या पायऱ्यांवरून आपण वरती चढू शकतो. गडावर चढण्याचा हा मार्ग थोडा कठीण आहे.

शिवनेरी किल्ल्यावर काय पाहाल

  • शिवाई देवीचे मंदिर : या गडाला ७ दरवाजे आहेत त्यामधील पाचवा लागतो तो शिवाई देवीचा दरवाजा ज्याला शिपाई दरवाजा म्हणून देखील ओळखले जाते. या शिवाई देवीच्या दरवाज्यातून थोडे पुडे गेल्यानंतर उजव्या बाजूला शिवाई देवीचे मंदिर आहे. या मादिरामध्ये शिवाई देवीची सुंदर अशी मूर्ती आहे आणि मंदिराच्या मागील भागामध्ये गुहा आहेत त्याचबरोबर मंदिरापासून काही पुढे गेल्यानंतर आपल्याला दगडामध्ये कोरलेल्या काही लेण्या देखील पाहायला मिळतील.
  • प्रवेशद्वार : प्रवेशद्वार ज्याला आपण महादरवाजा म्हणून ओळखतो जो पुण्याच्या पेशव्यांनी बांधला आहे. या दरवाजाला बुरुज आहे आणि त्यावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. असे म्हटले जाते कि या बुरुजावरती चढून पूर्वीच्या काळी शत्रूवर नजर राखली जायची. आत्ता आपण त्या बुरुजावर चढून गडाच्या अवतीभवती असणाऱ्या नेसर्गिक सौंदर्याचा अन्नद घेवू शकतो.
  • तानाजी मालुसरे उद्यान : शिवनेरी गडावर गेल्यानंतर आपल्याला तानाजी मालुसरे उद्यान देखील पाहायला मिळते जे गडाच्या डाव्या बाजूला आहे.
  • शिवाजी महाराजांचे जन्म घर : शिवनेरी या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे आपल्या सर्वांना माहित आहे. तेथे गेल्यानंतर आपल्याला शिवाजी महाराजांचा जन्म ज्या इमारतीमध्ये झाला ती इमारत पाहायला मिळते. हि इमारत २ मजली आहे आणि खालच्या मजल्यामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
  • पाण्याचे झरे : गडाच्या आतमध्ये दोन झरे आहेत आणि या झऱ्यांना गंगा आणि यमुना या नावांनी ओळखले जाते. या झाऱ्यांची विशेषता म्हणजे या झऱ्यांना वर्षभर पाणी असते.
  • अंबरखाना : गडाचे सर्व दरवाजे पार केल्यानंतर लगेचच लागतो तो अंबरखाना या अंबरखाण्याचा वापर पूर्वीच्या काळी धन्य ठेवण्यासाठी केला जात होता पण आत्ता तो पडलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो.
  • पाण्याचा तलाव : किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला एक पाण्याचा तलाव पाहायला मिळतो ज्याला बदामी तलाव या नावाने ओळखले जाते.
  • शिवकुंज : या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे स्मारक आहे ज्याला शिवकुंज असे नाव दिले आहे आणि हे अलीकडच्या काळामध्ये बांधलेले आहे. या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि जीजीमाता यांची मूर्ती देखील पाहायला मिळते.
  • कडेलोट टोक : बदामी तलावाच्या थोडेसे पुढे गेले कि कडेलोट टोक आहे याची उंची जवळ जवळ जवळ १५०० फुट आहे. कडेलोट टोकाचा वापर गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी पूर्वीच्या काळी केला जात होता.
  • लेण्याद्रीची लेणी : शिवनेरी किल्ल्यापासून २ किलोमीटर अंतरावर लेण्याद्रीची लेणी आहे.

शिवनेरी किल्ला फोटो:

shivneri fort information in marathi
shivneri fort information in marathi

शिवनेरी किल्ल्यावर कसे जाल:

शिवनेरीवर जाण्यसाठी सर्वात जवळचे मुख्य शहर म्हणजे पुणे आणि आपण पुण्यातून बसने किवा रेल्वेने जावू शकतो. पुणे ते शिवनेरी किल्ल्याचे अंतर ९० किलो मीटर आहे आणि आपण पुण्यातून पिंपरी रेल्वे स्टेशन, शिवाजी नगर रेल्वे स्टेशन किवा पुणे जंक्शन हे जवळची रेल्वे स्थानक आहेत. याशिवाय मुंबई मधील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुणे आणि शिवनेरीचे सर्वात जवळचे विमान तळ आहे.

टीप :

  • शिवनेरी हा किल्ला पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
  • हा किल्ला पाहण्यासाठी २ तासापेक्षा जास्त वेळ लागतो.
  • हा किल्ला संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पर्यटकांना पाहण्यासाठी उघडा असतो.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, शिवनेरी किल्ला shivneri fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. shivneri killa information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about shivneri fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही शिवनेरी किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या shivneri killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही shivneri gad information in marathi त्यामध्ये नक्की बदल करू.  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!