परीक्षा नसती तर निबंध मराठी Pariksha Nasti Tar Essay in Marathi

Pariksha Nasti Tar Essay in Marathi – Pariksha Nastya Tar परीक्षा नसती तर निबंध मराठी भारतीय शिक्षण पध्दतीमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी तोंडी किंवा लेखी सहामाही किंवा वार्षिक घेवून त्याची गुणवत्ता ठरवली जाते. पण जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना पिरीक्षेचे काही वाटत नाही पण ज्यांना अभ्यास करण्याचा कंटाळा येतो, अभ्यास करण्यास आवडत नाही किंवा ज्यांना अभ्यास करायला बसल्यानंतर काही समाजात नाही. असे विद्यार्थी असे विचार करतात कि परीक्षा नसत्या तर किती बरे झाले असते आणि आपल्याला कोणताही अभ्यास करावा लागला नसता आणि मार्क कमी पडले म्हणून शिक्षकांचे बोलणे खावे लागले नसते.

किंवा घरामध्ये आई वडिलांचे बोलणे खावे लागले नसते कारण जर परीक्षाच झाल्या नसत्या तर आपल्या गुण कसे मिळाले असते आणि कमी गुण मिळाले म्हणून कोणाचे बोलणे देखील खावे लागले नसते. पण जे हुशार विद्यार्थी असतात त्यांना परीक्षा खूप आवडते आणि त्यांना परीक्षेमध्ये चांगले मार्क पाडून सगळ्यांच्या कडून कौतुक करून घ्यायला आवडते.

त्याचबरोबर बरोबर एक महत्वाचा आणि बचतीचा भाग म्हणजे परीक्षाच जर नसती तर मुलांच्या शिक्षणाला, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये भरमसाठ पैसे भरून प्रवेश घ्यावा लागला नसता. तसेच मुलांच्या एक्स्ट्रा क्लाससाठी पैसे भरावे लागले नसते, महागडी पुस्तके किंवा मार्गदर्शिका यासाठी खर्च करावा लागला नसता आणि त्यामुळे प्रत्येक मुलांच्या आई वडिलांचे पैसे वाचतील तसेच आई वडील आपल्या मुलांना अभ्यासाला बस म्हणून ओरडणार नाहीत.

pariksha nasti tar essay in marathi
pariksha nasti tar essay in marathi

परीक्षा नसती तर निबंध मराठी – Pariksha Nasti Tar Essay in Marathi

परीक्षा नसत्या तर मराठी निबंध लेखन – Pariksha Nastya Tar Nibandh

शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये परीक्षेचे वेळापत्रक लावले कि अनेक विद्यार्थ्याच्या मनामध्ये म्हणजेच ज्यांना अभ्यास करण्यास आवडत नाही किंवा ज्यांना अभ्यास करण्यासाठी बसल्यानंतर काही समजत नाही त्यांच्या मनामध्ये भीतीचे वातवर निर्माण होते आणि त्यांची नोट्स गोळा करण्यासाठी लगबग चालू होते आणि या भीतीने ते थोडासा तरी अभ्यास करतात आणि पुढच्या वर्गामध्ये जाण्यासाठी आणि परीक्षेमध्ये उतीर्ण होण्यासाठी तरी अभ्यास करतात परंतु परीक्षाच झाली नाहीत तर लोकांच्या समोर अनेक समस्या उभ्या राहतील.

कारण आपल्याला परीक्षा ह्या विद्यार्थ्याची गगुणवत्ता दर्शवतात तसेच विद्यार्थ्यांचा कमकुवत पणा देखील दाखवून देतात आणि त्यामुळे काही विद्यार्थ्यांना आपल्यातील कमी पणा भरून काढण्याची संधी मिळते पण जगामध्ये असे देखील विद्यार्थी आहेत ज्यांना ‘परीक्षा नसती तर’ या कल्पनेनेच खूप आनंद होतो. परीक्षा नसती तर काय झाले असते ते आपण खाली पाहूयात.

पण जर हि गोष्ट आपण गांभीर्याने पहिली तर खूप वाईट चित्र डोळ्यासमोर येते कारण जर परीक्षा झाल्या नाही तर मुले शाळेतील अभ्यासक्रम लक्ष देऊन शिकणार नाहीत किंवा विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व समजणार नाही तसेच विद्यार्थी अभ्यास करणार नाहीत त्यामुळे ते अशिक्षित राहतील आणि त्यांना आधुनिक जगामध्ये वावरणे देखील खूप अवघड जाईल तसेच विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टीचा व्यवहार कळणार नाही. आणि ते अडाणी राहतील आणि सहाजीकच देशातील अशिक्षित लोकांची संख्या वाढेल.

जर परीक्षा नसत्या तर आपण जे लक्ष देवून शिकतो ते कोणत्याही बाबतीतील असो किंवा मग कोणत्याही विषयावर असो ते लक्ष देवून शिकलो नसतो आणि आपल्याला कोणत्याही गोष्टी बद्दलचे ज्ञान मिळाले नसते. परीक्षा असते त्यावेळी विद्यार्थी नापास होण्याच्या भीतीने अभ्यासक्रमातील थोडे तरी मन लावून वाचतात आणि त्यामुळे त्यांना थोडेफार तरी ज्ञान मिळेल पण जर परीक्षाच झाली नसती तर करणारा थोडासा अभ्यास देखील त्यांनी केला नसता.

तसेच परीक्षा नसत्या तर त्यांना पुढील वर्गामध्ये कसे जायचे याची काळजी राहिली नसती, तसेच त्यांनी कोणत्याच विषयाचा तास केला नसता, शिक्षक शिकवत असताना लक्ष दिले नसते रोजचा अभ्यास केला नसता गृहपाठ केला नसता. परीक्षा झाल्या नसत्या तर त्यांना शिक्षणाचे महत्व समजले नसते आणि त्यांनी अभ्यास करून उच्च शिक्षण घेवून मोठ्या हुद्द्यावर काम करण्याचा विचार केला नसता तसेच त्यांची कुटुंबालेखी किंवा समाजालेखी काय कर्तव्ये आहेत ते समजले नसते कारण ते बहुतेक अशिक्षित लोकांना समजत नाही.

तसेच परीक्षा नसत्या तर विद्यार्थ्यांच्यामधील गुण आणि कलागुण समजले नसते तसेच महत्वाचा भाग म्हणजे कोणता विद्यार्थी संपूर्ण कला गुणांनी परिपूर्ण आहे हे समजले नसते. त्याच बरोबर परीक्षा आल्यानंतर विद्यार्थी जे परिश्रम किंवा कष्ट घेतात ते कष्ट घेणार नाहीत आणि त्यांना कष्टाची किमंत कळणार नाही.

ज्या मुलांना परीक्षेमध्ये जास्त मार्क पडतात त्यांनी जास्त मार्क पाडले म्हणून अनेक जन कौतुक करतात तसेच त्या संबधित विद्यार्थ्याला देखील असे वाटते कि आपण पुढे काहीतरी चांगले करू शकतो आणि अश्या प्रकारे त्यांचा आत्मविश्वास वाढतो पण जर परीक्षाच झाल्या नाहीत तर विद्यार्थ्याचा आत्मविश्वास कसा वाढणार आणि ते आपले नाव मोठे कसे करू शकतील. पण जर परीक्षाच झाल्या नाहीत तर गुणवान आणि हुशार विद्यार्थ्यांचे कौतुक कोणीच करणार नाहीत आणि त्यांचा आत्मविश्वास देखील वाढणार नाही.

परीक्षा नसत्या तर पालकांना आपला मुलगा काश्यामध्ये हुशार आहे किंवा त्याला कोणत्या गोष्टीमध्ये रस आहे आणि त्याने मोठे झाल्यावर काय बनले पाहिजे हे समजले नसते. त्याचबरोबर ज्या मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो किंवा ज्यांना अभ्यास करण्यास आवडत नाही असे विद्यार्थी परीक्षेच्या भीतीने किंवा परीक्षेमध्ये कमी मार्क पडले म्हणून आत्महत्या करतात आणि जर परीक्षा झाली नाही.

तर कोणतीच मुले मार्क कमी पडले म्हणून किंवा परीक्षेच्या भीतीने आत्महत्या करणार नाहीत. तसेच विद्यार्थ्यांना नोकरीवर घेताना कंपनीने त्यांच्या कोणत्या कलागुणांवर त्यांना नोकरी देणार हि एक मोठी समस्या आहे कारण त्याची ७० ते ८० टक्के गुणवत्ता त्यांच्या गुणपत्रिकेवरून समजते आणि ३० ते ८० टक्के गुणवत्ता हि त्यांच्या बोलण्यावरून आणि त्याच्या उत्तर देण्याच्या पद्धतीवरून ठरवली जाते आणि त्यामुळे जर परीक्षा झाली नाही तर विद्यार्थ्याचे गुणपत्रक मिळाले नाही तर नोकरी देणाऱ्या व्यक्तीला देखील नोकरी देण्यासाठी अवघड जाईल.

परीक्षा झाली नाही तर अनेक मुले अशिक्षित बनतील, त्यांना जबाबदारीची जाणीव हिणार नाही, कष्टाची किंमत कळणारा नाही, शिक्षणाचे महत्व कळणार नाही आणि यामुळे तरुण पिढी आणि समाज वाया जाईल आणि जगामध्ये अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागेल.

आम्ही दिलेल्या pariksha nasti tar essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर परीक्षा नसती तर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay writing in marathi jar pariksha nasti tar या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay in marathi language pariksha nastya tar माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये jar pariksha nasti tar essay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!