पेशवा वंशावळ इतिहास Peshwa Family Tree in Marathi

history of peshwa family in marathi – history of peshwa family in marathi, पेशवा वंशावळ इतिहास, आज आपण या लेखामध्ये पेशवा घराण्याविषयी काही माहिती आणि या घराण्याचा संपूर्ण इतिहास पाहणार आहोत. मराठा हे भारतातील सर्वात हिंसक आणि स्वाभिमानी लोक ज्यांनी दख्खन प्रदेशांमध्ये आपले एक मजबूत संघराज्य बनवले होते आणि पेशवे हे मराठा राज्याचे एकनिष्ठ मंत्री होते. ज्यांना वेगवेगळ्या प्रशासकीय तसेच राजकीय गोष्टींच्यामध्ये राजाला मदत करण्यासाठी नेमले होते. मराठा साम्राज्यमध्ये सर्वप्रथम बाळाजी विश्वनाथ भट पेशवे यांनी काम केले आणि आपल्या घराण्याचे नाव देखील उंचावले आणि यांच्यानंतर या घराण्याचा देखील विस्तार वाढला आणि घराणे देखील लोकप्रिय होऊ लागले.

पेशव्यांची राजधानी हि पुणे हि होती आणि शनिवार वाडा हि पुण्यातील पेशव्यांची ऐतिहासिक इमारत आहे. पेशवे घराण्यातील पहिले पेशवे हे बाळाजी विश्वनाथ भट पेशवे हे होते आणि त्यांचा कार्यकाळ हा १७१३ ते १७२० पर्यंत होता तसेच घराण्याचे दुसरे पेशवे म्हणजे थोरले बाजीराव पेशवे आणि हे पेशवे घराण्यातील एक लोकप्रिय पेशवे आहेत आणि यांचा कार्यकाळ १७२० ते १७४० पर्यंत होता.

तिसरे पेशवे नानासाहेब पेशवे यांचा कार्यकाळ हा १७४० ते १७६१ हा होता आणि असे अनेक पेशवे होऊन गेले त्यांच्याविषयी सविस्तर माहिती खाली आपण जाणून घेणार आहोत. चला तर आता आपण पेशवे घराण्याविषयी आणखीन माहिती घेवूया.

peshwa family tree in marathi
peshwa family tree in marathi

पेशवा वंशावळ इतिहास – Peshwa Family Tree in Marathi

Peshwa Family Tree Diagram in Marathi

पेशवे कोण होते ?

आणि पेशवे हे मराठा राज्याचे एकनिष्ठ मंत्री होते ज्यांना वेगवेगळ्या प्रशासकीय तसेच राजकीय गोष्टींच्यामध्ये राजाला मदत करण्यासाठी नेमले होते आणि त्यांची राजधानी पुणे होती आणि पुण्यामध्ये त्यांची ऐतिहासिक इमारत देखील आहे ती म्हणजे शनिवार वाडा.

पेशवे घराण्याचा इतिहास – history of peshwa family in marathi

पहिली पिढी

बाळाजी विश्वनाथ भट पेशवे हे पेशवे घराण्यातील पहिले पेशवे होते आणि यांचा कार्यकाल १७१३ ते १७२० पर्यंतचा होता. ते मराठा साम्राज्याचे पंतप्रधान होते आणि त्यांनी १८ व्या शतकामध्ये मराठी साम्राज्यावर प्रभावी नियंत्रण मिळवले होते. मुघलांच्या युध्दामुळे आणि त्यांच्या सततच्या हल्ल्यामुळे त्रस्त झालेल्या राज्यावर आपली पकड मजबूत करण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांचे नातू प्रथम शाहू यांना मदत केली होती. त्यांनी युध्द जिंकत आणि मसलती करत शाहूंचा पक्ष प्रबळ केला.

दुसरी पिढी 

दुसऱ्या पिढीमध्ये थोरले बाजीराव किंवा बाजीराव पहिला, चिमाजी अप्पा, भिऊबाई आणि अनुबाई हे होते.

 • बाजीराव पहिला : बाजीराव पहिला हे पेशवे घराण्यातील दुसरे पेशवे आहेत आणि यांचा कार्यकाल हा १७२० ते १७४० पर्यंतचा आहे. बाजीराव पेशवे हे प्रख्यात सेनापती होते ज्यांची निवड मराठा सेनापती म्हणून प्रथम शाहू महाराजांनी १७२० मध्ये नियुक्त केले होते. बाजीराव पहिले यांना थोरले बाजीराव म्हणून देखील ओळखले जाते आणि त्यांनी त्याच्या कार्यकाळामध्ये एकूण ३६ लढाया जिंकल्या आणि त्यांच्या कारकिर्दीत पुणे हि पेशव्यांची राजधानी बनली आणि शनिवारवाडा देखील त्यांनीच बांधला.
 • चिमाजी अप्पा : चिमाजी अप्पा हे थोरल्या बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ आणि बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र होते. चिमाजी अप्पा हे एक उत्तम लष्करी सेनापती होते ज्यांनी १७३९ मध्ये वसईचा किल्ला पोर्तुगीजांच्यापासून मुक्त केला.
 • भिऊबाई आणि अनुबाई ह्या दोघी बाळाजी विश्वनाथ भट पेशवे यांच्या मुली होत्या आणि थोरले बाजीराव आणि चिमाजी अप्पा यांच्या बहिणी होत्या.

तिसरी पिढी 

थोरले बाजीराव आणि काशीबाई यांना नानासाहेब आणि रघुनाथराव हि मुले होती आणि चिमाजी अप्पा आणि रखमाबाई यांना सदाशिवराव हा मुलगा होता.

 • नानासाहेब पेशवे : नानासाहेब पेशवे हे थोरले बाजीराव आणि काशीबाई यांचे थोरले पुत्र होते आणि त्यांचा कार्यकाळ हा १७२० ते १७६१ होता. शाहूंच्या मृत्युच्या वेळी नानासाहेब पेशवे यांना मराठा साम्राज्यासाठी नियुक्त केले होते. पुणे शहराच्या विकासासाठी त्यांना श्रेय दिले जाते.
 • रघुनाथराव पेशवे : रघुनाथराव पेशवे हे थोरले बाजीराव आणि काशीबाई यांचे धाकटे पुत्र आहेत आणि हे १७७३ ते १७७४ या काळामध्ये मराठा साम्राज्याचे पेशवे होते. आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या काळामध्ये मराठ्यांचे सेनापती म्हणून काम केले होते आणि त्यांना मराठा साम्राज्याचे विस्तार करण्याचे श्रेय जाते.
 • सदाशिवराव पेशवा : सदाशिवराव पेशवा हे चिमाजी अप्पा आणि रखमाबाई यांचे एकुलते एक पुत्र होते आणि हे थोरले बाजीराव यांचे पुतणे होते. पानिपतच्या तिसऱ्या लढाई मध्ये ते सरसेनापती होते आणि ते पानिपतच्या तिसऱ्या लढाई मध्ये मरण पावले होते.

चौथी पिढी 

 • विश्वासराव पेशवे : विश्वासराव पेशवे हे नानासाहेब यांचे जेष्ठ पुत्र होते आणि ते पेशवे पदाचे वारसदार देखील होते. ते पानिपतच्या तिसऱ्या लढाई मध्ये लढताना मरण पावले.
 • माधवराव पहिला : माधवराव पेशवे यांना श्रीमंत माधवराव पेशवे किंवा थोरले माधवराव पेशवे म्हणून ओळखले जाते आणि हे मराठा साम्राज्याचे चौथे पेशवे होते. त्यांनी काका रघुनाथ रावांच्या त्रासाला तोंड देत निजाम, हैदर आली आणि इंग्रजांना मर्यादेत ठेवले.
 • नारायण राव : नारायण राव हे मराठा साम्राज्याचे पाचेवे पेशवे होते आणि त्यांची हत्या हि रक्षकांनी केली आहे.

पाचवी पिढी 

 • माधवराव दुसरा : माधवराव दुसरा हे नारायणराव यांचे पुत्र होते आणि ते लहनपणीपासूनच ते मराठा साम्राज्याचे पेशवे होते म्हणजेच ते ४० दिवसाचे असल्यापासून त्यांना पेशवे बनवण्यात आले होते आणि म्हणून त्यांना सर्वात तरुण पेशवा म्हणून ओळखले जाते.

पेशवे घराण्याविषयी महत्वाची माहिती

 • पेशवे घराण्यामध्ये बाळाजी विश्वनाथ भट पेशवे, थोरले बाजीराव पेशवे, चिमाजी अप्पा, नानासाहेब पेशवे, सदाशिवराव पेशवे, रघुनाथराव पेशवे, विश्वनाथराव पेशवे, माधवराव पेशवे, नारायण राव पेशवे आणि माधवराव दुसरा हे पेशवे होते.
 • पेशवे हे मराठी साम्राज्यासाठी काम करत होते आणि त्यांनी पानिपतच्या लढाई मध्ये मोलाचे काम केले आहे.
 • पेशव्यांची राजधानी पुणे हि आहे आणि तेथे पेशव्यांचा शनिवारवाडा देखील आहे. जी सध्या पेशव्यांची ऐतिहासिक इमारत म्हणून अनेक पर्यटक पाहण्यास येतात.
 • बाजीराव पेशव्यांनी शनिवार वाडा बांधला आणि पुणे हि आपली राजधानी देखील करून घेतली.
 • तिसऱ्या पानिपतच्या लढाई मध्ये सदाशिवराव आणि नारायणराव हे मरण पावले होते.

आम्ही दिलेल्या peshwa family tree in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पेशवा वंशावळ इतिहास माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या history of peshwa family in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि peshwa family history in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “पेशवा वंशावळ इतिहास Peshwa Family Tree in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!