फुगडी खेळाची माहिती Phugadi Game Information in Marathi

Phugadi Game Information in Marathi भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पारंपारिक खेळ खेळले जातात आणि त्यामधील एक महत्वाचा आणि मनोरंजक खेळ म्हणजे फुगडी जो आपण गणपती या सणामध्ये महिलांच्या किंवा मुलींच्या मार्फत खेळताना पाहतो. फुगडी हा खेळ २, ४, ६ किंवा ८ महिलांच्या किंवा मुलींच्या मध्ये खेळला येतो आणि ८ पेक्षा जास्ती महिलांना किंवा मुलींना हा खेळ खेळता येत नाही. फुगडी खेळताना मुली किंवा महिला क्रॉस पध्दतीने एकमेकीचे हात पकडतात आणि गाणी, उखाणे, कोडी किंवा काही खेळासंबधित वाक्य रचना किंवा फु बाई फु फुगडी फु असे बोलून फुगडी खेळतात.

फुगडी हे महाराष्ट्र आणि गोव्याचे लोकनृत्य आहे जे कोकणातील महिलांनी गणेश चतुर्थी आणि व्रत या हिंदू धार्मिक सणांमध्ये सादर केले जाते. फुगडी या खेळल छत्तीसगड मध्ये अनन्य साधारण महत्व आहे आणि फुगडी हा शब्द छत्तीसगड मधूनच आला आहे.

फुगडी हा एक कलाप्रकार, खेळ किंवा एक पूर्वीच्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे जी महाराष्ट्र राज्य तसेच गोव्यामध्ये प्राचीन संकृतीचा एक भाग म्हणून खेळली जाते. फुगडी हि कला किंवा खेळ वेगवेगळ्या सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सादर केली जाते.

दोन महिला किंवा महिलांचा गट गाणी म्हणत किंवा फु बाई फु फुगडी फु असे बोलून असे म्हणत घिरक्या घेतात आणि या घीरक्यांचा वेग वाढवतात आणि त्या घिरक्या घेवून दमल्या किं फुगडी घालणे बंद करतात.

फुगडी हि सामान्यपणे भाद्रपद महिन्यात खेळली जाते कारण स्त्रियांना त्यांच्या सामान्य नीरस वेळापत्रकातून तात्पुरती विश्रांती किंवा त्यांचे मनोरंजन व्हावे या उद्देशाने पूर्वी फुगडी हा खेळ खेळला जात होता ज्यामध्ये स्त्रिया फुगडी घालण्यासाठी नऊवारी साड्या नेसून फुगडी घालत होत्या.

फुगडीची एक विशिष्ट शैली धनगर (मेंढपाळ) महिलांमध्ये पाहायला मिळते. त्या देवीला अर्पण केलेल्या व्रताच्या वेळी देवी महालक्ष्मीसमोर कलशी फुगडी घालतात आणि देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात.

phugadi game information in marathi
phugadi game information in marathi

फुगडी खेळाची माहिती – Phugadi Game Information in Marathi

फुगडी म्हणजे काय ?

फुगडी हा खेळ २, ४, ६ किंवा ८ महिलांच्या किंवा मुलींच्या मध्ये खेळला येतो आणि या खेळामध्ये स्त्रिया किंवा मुली एकमेकीचे हात पकडून उड्या मारत गोल फिरतात.

फुगडीचे प्रकार 

भारतामध्ये पारंपारिक खेळ म्हणून खेळली जाणारी फुगडी हि वेगवेगळ्या प्रकारे खेळली जाते. फुगडीचे प्रकार खाली दिलेली आहेत.

 • साधी फुगडी.
 • एक हात फुगडी.
 • नखुल्या फुगडी.
 • कासाव फुगडी.
 • बस फुगडी.
 • भुई फुगडी.
 • दंड फुगडी.

फुगडी कशी खेळली जाते – How to Play Phugadi in Marathi

फुगडी हा खेळ खेळताना महिला वर्तुळात किंवा पंक्तींमध्ये विविध प्रकारची रचना करताना गातात आणि नृत्य करतात. या खेळाची सुरुवात हि हिंदू देवतांची पूजा करून केली जाते आणि हा खेळ गणपती सणांमध्ये आणि मंगळागौरीच्या वेळी खेळला जातो.

फुगडी खेळताना मुली किंवा महिला क्रॉस पध्दतीने एकमेकीचे हात पकडतात आणि गाणी, उखाणे, कोडी किंवा काही खेळासंबधित वाक्य रचना किंवा फु बाई फु फुगडी फु असे बोलून फुगडी खेळतात. तसेच या खेळाविषयी असे म्हंटले जाते कि पूर्वीच्या काळी स्त्रिया फुगडी घालताना फु फु असा तोंडातून आवाज करत होत्या त्यामुळे या खेळाचे नाव फुगडी असे पडले.

फुगडी या खेळाविषयी अनोखी आणि मनोरंजक तथ्ये – facts about phugadi game

 • फुगडी हा खेळ २, ४, ६ किंवा ८ महिलांच्या किंवा मुलींच्या मध्ये खेळला येतो आणि ८ पेक्षा जास्ती महिलांना किंवा मुलींना हा खेळ खेळता येत नाही.
 • फुगडी हे महाराष्ट्र आणि गोव्याचे लोकनृत्य आहे.
 • फुगडी खेळताना मुली किंवा महिला क्रॉस पध्दतीने एकमेकीचे हात पकडतात आणि गाणी, उखाणे, कोडी किंवा काही खेळासंबधित वाक्य रचना किंवा फु बाई फु फुगडी फु असे बोलून फुगडी खेळतात.
 • पूर्वीच्या काळी नवीन लग्न झालेल्या मुली जेंव्हा माहेराला जात होत्या त्यावेळी त्या माहेरच्या लोकांच्याबरोबर म्हणजेच मैत्रिणींसोबत किंवा बहिणींसोबत फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त करत होत्या.
 • फुगडी या खेळाचे एकूण ७ प्रकार आहेत.
 • फुगडी हा खेळ महाराष्ट्रातील पारंपारिक खेळ आहे.
 • या खेळाविषयी असे म्हंटले जाते कि पूर्वीच्या काळी स्त्रिया फुगडी घालताना फु फु असा तोंडातून आवाज करत होत्या त्यामुळे या खेळाचे नाव फुगडी असे पडले.
 • फुगडी हा खेळ खूप पूर्वीच्या काळापासून खेळला जातो आणि या खेळला महाराष्ट्रामध्ये अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे या खेळामुळे महाराष्ट्रतील पारंपारिक लोकसंस्कृतीचे दर्शन घडण्यास मदत होते.
 • दंड फुगडी मध्ये दोन स्त्रिया एकमेकीचे दंड पकडतात आणि फुगडी घालतात तर एक हात फुगडी मध्ये दोन स्त्रिया एका हाताने फुगडी घालतात. तसेच बस फुगडी मध्ये फुगडी घालता घालता बसले जाते.
 • फुगडी या खेळला गणपती या सणामध्ये विशेष महत्व आहे कारण फुगडी गणपतीमध्ये गौरींचे आगमन झाल्यानंतर खेळली जाते.
 • या खेळामध्ये स्त्रिया किंवा मुली एकमेकीचे हात पकडून उड्या मारत गोल फिरतात.
 • फुगडी हि सामान्यपणे भाद्रपद महिन्यात खेळली जाते कारण स्त्रियांना त्यांच्या सामान्य नीरस वेळापत्रकातून तात्पुरती विश्रांती किंवा त्यांचे मनोरंजन व्हावे या उद्देशाने पूर्वी फुगडी हा खेळ खेळला जात होता.

आम्ही दिलेल्या phugadi game information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर फुगडी खेळाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या fugdi dance information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि fugdi information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये how to play phugadi in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!