प्लास्टिक प्रदूषणाची माहिती Plastic Pollution Information in Marathi

Plastic Pollution Information in Marathi – Plastic Pradushan Marathi प्लास्टिक प्रदूषणाची माहिती प्लास्टिकच्या वस्तूंच्या मुळे लोकांचे जीवन अगदी सोपे झाले कारण प्लास्टिक च्या पिशवीतून आपण कोणताही बाजार अनु शकतो तसेच प्लास्टिकच्या अनेक अश्या वस्तू आहेत ज्याचा घरगुती वापरासाठी रोजच्या जीवनामध्ये उपयोग होतो पण सध्या प्लास्टिकचा पृथ्वीवर इतका जमाव झाला आहे कि त्यामुळे माणसांच्या, जनावरांच्या आणि जंगली प्राण्यांच्या आयुष्यावर याचा वाईट परिणाम होत आहे तसेच यामुळे जमीन आणि पाण्याचे देखील प्रदूषण होत आहे.

प्लास्टिक प्रदूषण म्हणजे पृथ्वीच्या वातावारामध्ये म्हणजेच जमिनीवर (मातीत) किंवा पाण्यामध्ये जर प्लास्टिक वस्तू (प्लास्टिक पिशवी, प्लास्टिक बाटली किंवा कोणतीही दुसरी प्लास्टिक वस्तू) किंवा कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक मोठ्या प्रमाणत जमा झाले असेल तर त्याला प्लास्टिक प्रदूषण म्हणतात.

प्रदूषक म्हणून काम करणार्‍या प्लास्टिकचे आकारानुसार सूक्ष्म आणि मॅक्रो या दोन भागामध्ये वर्गीकरण केले जाते. प्लॅस्टिक स्वस्त आणि टिकाऊ असल्यामुळे ते वेगवेगळ्या वापरासाठी अतिशय अनुकूल बनते आणि त्यामुळे या प्लास्टिकच्या जास्त वापरामुळे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे उत्पादन देखील होते.

पण लोकांना समजले पाहिजे कि प्लास्टिक वापरणे आपल्या निरोगी आयुष्याला किती धोक्याचे आहे. आज या लेखामध्ये आपण प्लास्टिक प्रदूषण म्हणजे काय, प्लास्टिक प्रदूषण कशामुळे होते आणि ते कमी करण्यासाठी काय करावे या बद्दल माहिती घेणार आहोत.

plastic pollution information in marathi
plastic pollution information in marathi

प्लास्टिक प्रदूषणाची माहिती – Plastic Pollution Information in Marathi

प्लास्टिक प्रदूषण म्हणजे काय ?

plastic pollution marathi प्लास्टिक प्रदूषण म्हणजे पृथ्वीच्या वातावारामध्ये म्हणजेच जमिनीवर (मातीत) किंवा पाण्यामध्ये जर प्लास्टिक वस्तू किंवा कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक मोठ्या प्रमाणत जमा झाले असेल तर त्याला प्लास्टिक प्रदूषण म्हणतात.

प्लास्टीकचा वापर 

जीवाश्म इंधनापासून बनवलेले प्लास्टिक हे शतकाहून अधिक जुने आहे. दुसऱ्या विश्वयुद्धानंतर हजारोंच्या संखेने प्लास्टिकचे उत्पादन झाले आणि त्यामुळे प्लास्टिकचा वापर लोक जास्त प्रमाणात करू लागले आणि आजहि प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. सध्या प्लास्टीक पिशवी किंवा कोणतीही प्लास्टिक वस्तू वापरणे हि एक लोकांची गरज झालेली आहे.

त्यामुळे लोक रोजच्या वापरासाठी प्लास्टिकचा वापर करतात. प्लॅस्टिकने जीव वाचवणार्‍या उपकरणांसह औषधात क्रांती घडवून आणली, अंतराळ प्रवास शक्य केला, कार आणि जेट हलकी केली, इंधन आणि प्रदूषणाची बचत केली आणि हेल्मेट, इनक्यूबेटर आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपकरणे वापरून जीव वाचवले.

खालील काही प्लास्टिक वस्तूंची उदाहरणे आहेत जी लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात वापरतात 

  • प्लास्टिक पिशव्या, कचरा पिशव्या, प्रिस्क्रिप्शन बाटल्या, रिकामे अन्न कंटेनर, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि दुधाच्या बाटल्या ही सर्व प्लास्टिक वस्तूंची उदाहरणे आहेत.
  • प्लॅस्टिक टेप्स-फॅब्रिक्स, कपडे, पडदे, कार्पेट्स, कन्व्हेयर, मोल्डिंग, ताडपत्री इ.
  • पीईटी फॅब्रिक आणि पॉलिस्टर कंडेन्सर, एलसीडी आणि प्लॅस्टिक टेप्स-फॅब्रिक्स, कपडे, पडदे, कार्पेट्स, कन्व्हेयर, मोल्डिंग्स, पॉलीविनाइल क्लोराईडने बनवलेले फ्लोअर किंवा वॉल कॉर्सेट, ऑटोमोबाईल इन्स्ट्रुमेंट बोर्ड, इलेक्ट्रिकल वायरिंग शीथ, खिडकी कव्हर आणि इतर उच्च-घनतेचे पॉलिथिन बांधकाम साहित्य इत्यादी वस्तू ह्या प्लास्टिकच्या असू शकतात.

प्लास्टिक प्रदूषणाची कारणे 

  • बरेच असे लोक आहेत जे प्लास्टिक एकाच वेळी वापरून फेकून देतात आणि त्यामुळे प्लास्टिकचा जमाव पाण्यामध्ये तसेच जमिनीवर मोठ्या प्रमाणात वाढतो.
  • प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या किंवा प्लास्टिक खेळणी आणि इतर वस्तू टाकल्यास प्लास्टिकचे प्रदूषण वाढते.
  • प्लास्टिक हे स्वस्त असते आणि ते टाकाऊ देखील आहे त्यामुळे लोक प्लास्टिकचा वापर जास्त करतात आणि त्यामुळे प्लास्टिक प्रदूषण होते.

प्लास्टिक प्रदूषणाचे परिणाम – Plastic Che Dushparinam in Marathi

  • जर आपण प्लास्टिकच्या वस्तू जर पाण्याच्या स्तोत्राच्या आसपास टाकल्या तर त्या पाण्यामध्ये जावून त्याची घातक रसायने तयर होतात आणि त्यामुळे पाणी देखील दुषित होते किंवा पाण्याचे देखील प्रदूषण होते आणि त्यामुळे हे पाण्यातील प्राण्यांच्यासाठी घातक असतेच पण हे पाणी मनुष्यांना देखी पिण्यायोग्य नसते.
  • जर एकाद्या ठिकाणी जमिनीवर प्लास्टिकच्या वस्तूंचा जमाव झाला असेल तर त्या ठिकाणी डासांचे आणि इतर छोट्या कीटकांचे प्रमाण वाढते आणि ते कीटक आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
  • प्लास्टिक जर चुकून जनावरांनी खाल्ले तर जनावरांचा मृत्यू होऊ शकतो तसेच हे प्लास्टिक जलचर प्रण्यान्च्यावर देखील परिणाम करू शकते.
  • जेंव्हा आपण प्लास्टिकच्या वस्तू किंवा पिशव्या जळतो त्यावेळी ते जळत असताना वातावरणामध्ये विषारी रसायने मिसळतात आणि ते लोकांच्यासाठी आणि प्राण्यांच्यासाठी हानिकारक असते.
  • प्लास्टिक मुळे जमिनीवर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो.
  • पावसाळ्यामध्ये रस्त्यावरती पडलेला प्लास्टीकचा कचरा पाण्यामध्ये वाहून जातो आणि हे प्लास्टिक जर पाण्यामध्ये असणाऱ्या माश्यांनी खाल्ले तर त्यांना श्वास घेण्यासठी त्रास होतो आणि पाण्याचे देखील प्रदूषण होते.

प्लास्टिक प्रदूषणाचे प्रतीबंधात्मक उपाय – plastic bandi in marathi

प्लास्टीकचा वापर जरी सोयीस्कर असला तरी त्याचे बरेचसे दुष्परिणाम देखील आहेत जसे कि प्लास्टिक मुले मानवाच्या तसेच प्राण्यांच्या आरोग्यावर हानी होते त्यामुळे प्लास्टिकचा वापर जितका कमी करता येईल तितका कमी करावा.

पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या वापरण्या ऐवजी स्टीलच्या किंवा तांब्याच्या बाटल्या वापराव्यात तसेच जर आपण बाजारामध्ये जात असाल तर प्लास्टिक पिशव्यांच्या ऐवजी कागदी पिशव्या किंवा कापडी पिशवीचा  वापर करा. अनावश्यक आणि हानिकारक प्लास्टिक उत्पादने किंवा क्रियाकलापांसाठी सरकारी बंदी आणि निर्बंध घालणे.

प्लास्टिक प्रदूषणाची तथ्ये 

  • कॅनेडियन आर्क्टिकमध्ये ८७ टक्के पक्ष्यांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारचे प्लास्टिक खाल्लेले आहेच.
  • चीन, फिलीपिन्स, इंडोनेशिया, थायलंड आणि व्हिएतनाममधील नद्या आणि किनारपट्टीवर राहणारे लोक प्लास्टिक प्रदूषणाचा सर्वाधिक परिणामी घटक बनतात.
  • १९५० च्या दशकाच्या सुरुवातीपासून वार्षिक प्लास्टिकचे उत्पादन गगनाला भिडले होते ते २०१५ मध्ये ३२२ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले होते.
  • पेप्सी कंपनी सारख्या कंपन्यांकडून दरवर्षी कोट्यवधी चिप्सच्या पिशव्या विकल्या जातात.
  • १९५० पासून सुमारे ८.३ अब्ज टन प्लास्टिकचे उत्पादन झाले आहे. यापैकी फक्त ९ टक्के प्लास्टिक रिसायकल केले गेले जाते आणि १२ टक्के जाळले जाते.
  • दरवर्षी १२.७ दशलक्ष टन प्लास्टिक महासागरात प्रवेश करते.

आम्ही दिलेल्या plastic pollution information in marathi language download माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर प्लास्टिक प्रदूषण माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Plastic Che Dushparinam in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि plastic bandi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये plastic che fayde ani tote in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “प्लास्टिक प्रदूषणाची माहिती Plastic Pollution Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!