पी. टी. उषा माहिती मराठी PT Usha Information in Marathi

PT Usha Information in Marathi पी. टी. उषा माहिती मराठी पी. टी. उषा ह्या भारतीय अथलेटीक आहेत. एक धावपटू म्हणून त्यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे. भारतीय ट्रॅक आणि मैदानाची राणी सुवर्णकन्या आणि पायायोली एक्स्प्रेस अश्या अनेक नावांनी त्यांना संबोधलं जात. १९७९ पासून पी. टी. उषा यांनी भारतीय खेळात पदार्पण केलं. आज भारतातील एक उत्तम धावपटू मध्ये पी. टी. उषा यांची गणना केली जाते. आजच्या लेखा मध्ये आपण पी. टी. उषा यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या अवल्लनीय कामगिरी बद्द्धल व त्यांच्या जीवनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

pt usha information in marathi
pt usha information in marathi

पी. टी. उषा माहिती मराठी – PT Usha Information in Marathi

पूर्ण नाव (Name)पीलावूलकांडी ठेक्केपरंबिल उषा
जन्म (Birthday)२४ जून १९६४
जन्म गाव (Birth Place)पाययोली, कोझीकोड, केरल
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)अथलेटीक
टोपणनावपाययोली एक्सप्रेस, गोल्डन गर्ल

जन्म व वैयक्तिक आयुष्य

पी. टी उषा ही भारतीय महिला अथलेतिक आहे. त्यांचा जन्म केरळ च्या कोयोझोडोड जिल्हयातील पाययोळी या छोट्याश्या गावात झाला. पी.टी उषा यांचं संपूर्ण नाव पीलावूलकांडी ठेक्केपरंबिल उषा असं आहे. उषा यांचे बालपण फार हलाखीचे गेलं त्यांच्या घरची परिस्थिती तशी बेताची होती. वडिलांच्या छोट्याशा कापडाच्या व्यापारामध्ये त्यांच्या संपूर्ण घराचा डोलारा उभा होता.

कठोर परिस्थितीमध्ये देखील पी.टी उषा यांनी शिक्षणाची साथ सोडली नाही. शालेय जीवनात त्यांना खेळामध्ये आवड निर्माण होऊ लागली. मूलभूत गरजांचा तुटवडा पडल्यामुळे लहानपणी पी.टी उषा यांना बराऱ्याच आरोग्यविषयक समस्यांवर मात करावी लागली. शाळेमध्ये असताना पी. टी. उषा वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हायच्या ज्यामुळे त्यांना क्रीडा क्षेत्राची आवड निर्माण झाली

आणि त्यासोबतच क्रीडाक्षेत्रात असणारी शिस्त, व्यवस्थित आहार याची देखील सवय झाली आणि त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला. इसवी सन १९९१ मध्ये पी. टी. उषा या व्हि. श्रीनिवास यांच्या सोबत लग्न बंधनात अडकल्या. पुढे जाऊन या दोघांना एक पुत्रप्राप्ती देखील झाली.

क्रीडा क्षेत्रामध्ये पदार्पण

शाळेतून पी.टी उषा यांच क्रीडा क्षेत्राशी परिचय झाला. त्यानंतर शाळे अंतर्गत होणाऱ्या सर्व क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. बऱ्याच स्पर्धांमध्ये त्यांना यश देखील मिळायचं. इसवी सन १९७६ मध्ये केरळ येथे केरळ सरकारने राज्यांमध्ये महिलांसाठी क्रीडा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. या क्रीडा केंद्रांमधून पी.टी उषा यांनी जिल्हा स्तरावर खेळण्यास सुरुवात केली.

अवघ्या बारा वर्षांच्या होत्या पी. टी उषा जेव्हा त्यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलं.‌ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पी. टी उषा यांना प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली. राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवल्यानंतर पी. टी. उषा यांच्या मध्ये आत्मविश्वास जागा झाला आणि अतिशय परिश्रम करून त्या पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करण्यासाठी तयार झाल्या.

इसवी सन १९८० मध्ये पी.टी उषा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर पी.टी उषा यांची कारकीर्द‌ पाकिस्तान ओपन नॅशनल मीट ह्या कराची येथे झालेल्या स्पर्धेमधून झाली. एका अथलेटिक म्हणून तिने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. यास स्पर्धांमध्ये पी.टी उषा यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत चार सुवर्ण पदक प्राप्त केले.

त्यांच्यासाठी हे एक मोठे यश होत. ही सुवर्ण पदकं स्वीकारताना पी.टी उषा या फक्त सोळा वर्षाच्या होत्या. भारताचे नाव त्यांनी पाकिस्तान मध्ये खूप मोठं करून दाखवलं. आपल्या विजयाचे रोपटं पाकिस्तानमध्ये पेरून पुढच्या वाटचालीसाठी त्या तयार झाल्या. अगदी लहान वयामध्ये त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू केली आणि बघताच आपल्या कलागुणांनी आपले कौशल्य दाखवत चाहत्यांच्या मनावर राज्य केले.

इसवी सन १९८२ मध्ये वर्ल्ड कनिष्ठ आमंत्रण मेळावा भरवण्यात आला. यामध्ये पी.टी उषा यांचा देखील सहभाग होता. मेळाव्यात झालेल्या शंभर मीटर शर्यतीमध्ये कांस्यपदक मिळवलं तर २०० मीटर शर्यतीमध्ये पी.टी उषा यांना सुवर्णपदक मिळालं. त्यांच्या आयुष्यात येणारी प्रत्येक स्पर्धा त्यांना काहीनाकाही नवीन शिकवून जात होती.

शिवाय आत्मविश्वासही देत होती. कुवैत येथे झालेल्या एशियन ट्रॅक अँड फिल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ४०० मीटर शर्यतींमध्ये सहभागी होत पी.टी उषा यांनी सुवर्णपदक पटकावलं आणि क्रीडा क्षेत्रामध्ये एक नवीन विक्रम रचला. केरळ येथील एका छोट्याशा गावातून आलेली उषा पुढे जाऊन भारताचा सन्मान बनली.

पुढे जय्यत तयारी करून परिश्रम करून चिकट सराव करून पी.टी उषा ऑलिम्पिकसाठी सज्ज झाल्या. सन १९८४ मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये पी.टी उषा यांनी अत्यंत चांगली खेळी खेळली. परंतु ४०० मीटर शर्यतीत थोड्या गुणाने कांस्यपदक त्यांच्यापासून दुरावलं. परंतु निराश आणि हतबल न होता त्यापुढच्या सामन्यांसाठी तयार झाल्या.

अंतिम फेरीमध्ये पी.टी उषा यांनी ५५.४२ सेकंदामध्ये शर्यत पूर्ण केली. हा त्यांचा एक नवीन विक्रम आहे जो अजूनही कोणी मोडू शकला नाही आहे. इसवी सन १९८५ मध्ये इंडोनेशियातल्या जकार्ता येथे एशियन ट्रक अंड फिल्ड चॅम्पियन स्पर्धा भरवली गेली. ज्यामध्ये पी. टी उषा यांनी कमालीची कामगिरी करून दाखवली सहा पदक त्यांनी आपल्या पदरात घातले त्यातील पाच पदक सुवर्णपदक होते तर एक कांस्यपदक होतं.

१९८६ साली झालेल्या सोलो येथील दहाव्या आशियाई गेम्स मध्ये पी.टी उषा एक स्पर्धक म्हणून उतरल्या. २०० मीटर, ४०० मीटर, ४०० मीटर अडथळे, ४*४०० मीटर रिले या चारही स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पी.टी उषा यांनी सुवर्णपदक मिळवले. या चारही स्पर्धांमध्ये त्या विजेत्या झाल्या. भारताचं प्रतिनिधित्व करताना त्यांना आपल्या कौशल्यावर अभिमान वाटू लागला.

१९८८ साली झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पी.टी उषा यांचा सहभाग होता. परंतु स्पर्धेच्या आधी त्यांना पायाची दुखापत झाली यामुळे त्यांना स्पर्धेत भाग घेणे अशक्‍य होतं. परंतु त्यांनी न हारता आपलं लक्ष ध्येयावर ठेवत स्पर्धेमध्ये उतरल्या परंतु दुर्दैवाने त्यांना एकही विजय प्राप्त झाला नाही.

दिल्लीतील एशियन ट्रॅक फेडरेशन मीट या स्पर्धेमध्ये सहभागी होत पी.टी उषा यांनी चार सुवर्ण पदक आणि दोन रौप्य पदक जिंकले. पी.टी उषा एकाच स्पर्धेमध्ये इतके सर्व विजय प्राप्त करत होते याच्यावरून समजण्यात येतं की त्यांचा या क्षेत्रात असलेला सराव, परिश्रम, गुण, कौशल्य किती महान आहेत.

इसवी सन १९९० मध्ये झालेल्या बीजिंग एशियन गेम्स मध्ये पी. टी उषा यांना रौप्य पदक प्राप्त झाला. अथलेटिक्स म्हणून हा तिचा शेवटचा सामना होता. हा सामना खेळल्यावर तिने निवृत्ती घेतली. पुढील काळात त्यांनी त्यांचे लक्ष आपल्या वैयक्तिक आयुष्यावर केंद्रित केलं. ३४ वर्षांच्या होत्या पी.टी उषा जेव्हा त्यांनी ॲथलेटिक्स म्हणून वापसी केली.

जपान मधील फुकुओका या ठिकाणी झालेल्या एशियन फेडरेशन स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये झालेल्या २०० व ४०० मीटर शर्यतीमध्ये कांस्य पदक पटकावलं. वयाच्या चौतिसावा वर्षी पीटी उषा यांनी २०० मीटर शर्यतीत आपल्या वेळेत बदल करून एक नवीन राष्ट्रीय विक्रम रचला. इसवी सन २००० मध्ये पी. टी उषा यांनी ॲथलेटिक्स म्हणून कायमची निवृत्ती घेतली.

मनात इच्छा असली तर त्या इच्छे समोर वेळ, काळ, रंग, रूप, उंची, वय या सगळ्यांना मर्यादा नसते‌. हे पी. टी उषा यांनी त्यांच्या कारकिर्दी मधून दाखवून दिलं. भारतामध्ये पी.टी उषा यांचा क्रीडा क्षेत्रात असलेलं स्थान अव्वल आहे. प्रत्येक क्रीडा क्षेत्रातल्या तरुणांसाठी पी.टी उषा यांनी नवीन आदर्श निर्माण करून ठेवला आहे. आणि भारतामध्ये असं स्त्री रत्न प्राप्त झालं हे आपले भाग्यच म्हणावे. ओलम्पिक च्या अंतिम सामन्यात पोहोचणाऱ्या त्या पहिल्या ॲथलेटिक महिला होत्या.

पुरस्कार

क्रीडा क्षेत्रामध्ये पी.टी उषा यांनी दिलेले योगदान फार मोलाच आहे. भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करताना भारताला मिळवून दिलेला मान सन्मान या सगळ्यासाठी पी.टी उषा यांना इसवी सन १९८४ मध्ये अर्जुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. देशामध्ये सर्वोच्च पुरस्कारांपैकी मानला जाणारा पद्मश्री पुरस्कार पी.टी उषा यांना इसवी सन १९८५ मध्ये प्राप्त झाला.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन कडून पी.टी उषा यांना “स्पोर्ट्स पर्सन ऑफ द सेंचुरी” आणि “स्पोर्ट्स वुमन ऑफ द मिलेनियम” या दोन पदव्या दिल्या. इसवी सन १९८५ मध्ये पी.टी उषा यांनी जकार्ता येथील आशियाई अथलेतिक मेळा मध्ये उत्कृष्ट योगदान दिलं. त्यासाठी त्यांना ग्रेटेस्ट वुमन अथलेट्स या पदवीचे मानकरी पद मिळालं.

इसवी सन १९८५-१९८६ मध्ये पी. टी. उषा यांना ॲथलिट मधील सर्वोत्कृष्ट वर्ल्ड ट्रॉफी देण्यात आली. इसवी १९८६ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नंतर पी.टी उषा यांना सर्वोत्कृष्ट ॲथलेटिक्स म्हणून देण्यात येणारा एडिडास गोल्डन शु पुरस्कार ही पदवी स्वीकारण्याचा बहुमान त्यांना मिळाला.

आम्ही दिलेल्या pt usha information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पी. टी. उषा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pt usha full information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि pt usha biography in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये pt usha full form in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!