मिल्खा सिंग यांची माहिती Milkha Singh Information in Marathi

Milkha Singh Information in Marathi मिल्खा सिंग मराठी माहिती “भाग मिल्खा भाग” हा प्रसिद्ध हिंदी चित्रपट आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. आजच्या लेखामध्ये आपण “द फ्लाईंग सिख” या नावाने सुप्रसिद्ध असणारे मिल्खा सिंग या धावपटू च्या संघर्षाची गाथा जाणून घेणार आहोत. प्रत्येक प्रसिद्ध माणसाच्या यशामागे संघर्ष असतो. हाच संघर्ष मिल्खासिंग यांना देखील करावा लागला होता. मिल्खा सिंग हे भारतीय धावपटू होते व १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावलं होतं. जे स्वतंत्र भारताचं पहिलं सुवर्णपदक होतं. राष्ट्रीय, आशियाई, राष्ट्रकुल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे नेतृत्व करून या खेळामध्ये आपली खूप मोठी कारकीर्द रचली.

milkha singh information in marathi
milkha singh information in marathi

मिल्खा सिंग यांची माहिती – Milkha Singh Information in Marathi

पूर्ण नाव मिल्खा सिंग
जन्म२० नोव्हेंबर १९२९
जन्म गावभारताच्या फाळणी पूर्वीचा लायपुर
राष्ट्रीयत्व भारतीय
ओळख धावपटू
पुरस्कारस्वतंत्र भारताचं पहिलं सुवर्णपदक
मृत्यू१८ जून २०२१

जन्म

मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ मधला आहे. म्हणजेच भारताच्या फाळणी पूर्वीचा लायपुर (भारताच्या फाळणीनंतर हे शहर पाकिस्तानमध्ये मिळालं) या ठिकाणी मिल्खा सिंग यांचा जन्म झाला. मिल्खा सिंग यांचा संपूर्ण नाव मिल्खा‌ सिंग लाटीयान असं होतं. पंजाब मधील राठोड कुटुंबामध्ये मिल्का यांचा जन्म झाला.

मिल्खा सिंग शीख समाजाचे होते. मिल्खा यांना बरीच भावंड होती ज्यांचे लहानपणीच निधन झाले. भारताची फाळणी झाल्यावर काही दंगली झाल्या त्यामध्ये मिल्खासिंग यांच्या आई-वडिलांसह भाऊ बहिणींचा मृत्यू झाला.

मिल्खा यांनी त्यांच्या आई-वडिलांना मरताना स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं या दंगलीमध्ये त्यांचे वडील त्यांना ओरडून ओरडून सांगत होते “भाग मिल्खा भाग” घाबरलेला लहान मिल्खा दंगलीतून पळत जाऊन लाहोर मार्गे दिल्लीला येणारी रेल्वे पकडून दिल्लीमध्ये आपल्या बहिणीच्या घरी गेला.

घडलेला सगळा प्रकार मिल्खासिंग यांच्या साठी अत्यंत चित्तथरारक होता. लहानपणी आई वडील गेल्याचे दुःख शिवाय स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेला इतका अवघड प्रसंग अशा काही वैयक्तिक गोष्टींमुळे मिल्खासिंग यांचे शिक्षण अपूर्ण राहिलं. भावाच्या सांगण्यावरून मिल्खा यांनी सैन्यामध्ये भरती होण्याचा निर्णय घेतला.

१९५१ साली त्यांना सैन्यात भरती मिळाली. सैन्यात गेल्यावर त्यांची क्रीडाक्षेत्रातील आवड निर्माण झाली. लहानपणी घरातून शाळेपर्यंत धावत जायचे शिवाय भरतीच्या वेळी क्रॉस कंट्री रेस मध्ये येथे सहाव्या क्रमांकावर होते. म्हणून सैन्या तर्फे त्यांना खेळाच्या विशेष प्रशिक्षणासाठी निवडण्यात आलं.

वैयक्तिक आयुष्य

इसवी सन १९५५ मध्ये श्रीलंकेत असताना मिल्खा सिंग यांचा परिचय पूर्व भारतीय महिला हॉलीबॉल कॅप्टन निर्मल कौर यांच्याशी झाला‌. इसवी सन १९६२ मध्ये मिल्खासिंग यांनी निर्मला कौर यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर या दाम्पत्यांना तीन मुली आणि एक मुलगा देखील झाला. मिल्खा सिंग यांचा मुलगा जीव सिंग हे प्रसिद्ध गोल्फ खिलाडी आहेत. १९९९ मध्ये मिल्खासिंग यांनी एका शहीद हवालदार विक्रम सिंग चा सात वर्षाचा मुलगा दत्तक घेतला होता.

क्रीडा क्षेत्रातील कारकीर्द

मिल्खा सिंग यांना लहान वयातच अवघड प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. त्या प्रसंगाचा मानसिक धक्का बसला होता. भावाच्या सांगण्यावरून ते सैन्यात भरती झाले आणि तिथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं एक नवं पर्व सुरू झालं. मिल्खा सिंग यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला.

एक धावपटू म्हणून त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला जिल्हास्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होऊन उत्तम कामगिरी बजावून ते राष्ट्रीय स्तरावर आले. १९५६ साली पतियाळा येथे झालेल्या २०० मीटर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये मिल्खासिंग यांनी सुवर्णपदक मिळवलं. पुढे ४०० मीटर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्यपदक मिळवलं. १९५८ मध्ये झालेल्या २०० मीटर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये विक्रम करून सुवर्णपदक पटकावलं.

४०० मीटर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा मध्ये विक्रम करून सुवर्ण पदक मिळवलं. इसवी सन १९५६ मध्ये पतियाळा येथील २०० मीटर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासह सुवर्णपदक पटकावलं. १९५६ ते १९६१ मध्ये झालेल्या २०० मीटर ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये सातत्याने सुवर्णपदक पटकावलं. १९५७ ते १९६१ पर्यंत झालेल्या ४०० मीटर राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावलं.

इतक्या सर्व राष्ट्रीय स्पर्धा पार करून त्यांच्यामध्ये आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याचा आत्मविश्वास तयार झाला होता. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ते बहिणीकडे वाढले बहिणीने त्यांच्या पाठीशी मायेचा हात ठेवला. मिल्खा सिंग यांच्यावर त्यांच्या बहिणीचा फार विश्वास होता. बहिणीचा आशीर्वाद घेऊन मिल्खासिंग आशियाई स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास तयार झाले.

जपान येथील टोकियोमध्ये १९५८ साली आयोजित केलेल्या २०० मीटर स्पर्धेमध्ये मिल्खा सिंह यांना सुवर्णपदक मिळालं. १९५८ मध्ये टोकियो येथे झालेल्या चारशे मीटर स्पर्धेमध्ये विक्रम करून त्यांनी सुवर्णपदक पटकावलं. १९६२ साली इंडोनेशिया मधील जकार्ता येथे आयोजित केलेल्या ४०० मीटर स्पर्धेत पुन्हा सुवर्णपदक पटकावलं.

१०६२ साली जकार्ता येथे झालेल्या ०४ बाय ४०० मीटर रिले स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलं. मिल्खा सिंग एकावर एक रेकॉर्ड तोडत होते. त्याशिवाय आपल्या भारताचे नाव देखील त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये एका वरच्या पातळीवर नेऊन ठेवलं. भारतातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून त्यांची ओळख होती. धावताना त्यांचा वेग इतका फास्ट होता की त्यांना “द फ्लाइंग शिक” अशी उपमा देण्यात आली.

आंतरराष्ट्रीय पातळीवर १९५६ साली दिल्ली येथे आयोजित केलेल्या ४०० मीटर रिले भारत-पाक स्पर्धे मिल्खासिंग यांनी सुवर्णपदक मिळवलं तर १९६६ साली आयोजित केलेल्या ४०० मीटर भारत-पाक मैत्री रिले स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलं. मिल्खा सिंग यांचं क्रीडा क्षेत्रातील योगदान इतकं मोठं आहे की त्याची यादी कधीही न संपणारी आहे.

क्रीडा क्षेत्रामध्ये भारताला उच्चशिखरावर नेऊन बसवण्या मध्ये मिल्खासिंग यांचा खूप मोठा सहभाग आहे. मिल्खा सिंग यांच्या संघर्षाची कथा संपूर्ण जगभरात पसरावी म्हणून प्रसिद्ध निर्माता, निर्देशक,‌‌ लेखक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी मिल्खासिंग यांच्या जीवनावर आधारित भाग मिल्खा भाग हा हिंदी चित्रपट २०१३ मध्ये प्रकाशित केला.

इतकच नव्हे तर २०१७ मध्ये मिल्खासिंग यांचा लंडन येथील प्रसिद्ध MADAME TUSSAUDE येथे मेणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. मिल्खासिंग यांच प्रसिद्ध आत्मचरित्र “द रीसे ऑफ माय लाईफ” आज सर्वत्र उपलब्ध आहे. क्रीडा क्षेत्रातील मिल्खासिंग यांचा सक्रीय योगदान बघता इसवी सन १९५९ मध्ये भारत सरकार तर्फे दिला जाणारा सर्वोच्च श्रेष्ठ पुरस्कार म्हणजे “पद्मश्री” पुरस्कार देऊन मिल्खासिंग यांचा सन्मान करण्यात आला.

फ्लाईंग सिख ही उपमा कशी मिळाली

मिल्खासिंग यांचा जन्म अविभाजित भारतातील असला तरी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताची फाळणी करण्यात आली. ज्यातील भारतातील पाकिस्तान हा भाग भारतापासून वेगळा करण्यात आला. मिल्खासिंग यांनी भारताला भारताचे पहिले स्वतंत्र सुवर्णपदक १९५८ साली घडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धे मधून मिळवून दिलं.

त्यानंतर पुढे १९६० च्या रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा यांच पदक काही अंतरामुळे हुकलं. ते निराश झाले होते परंतु हार न मानता त्यांनी पुन्हा एकदा जोरदार तयारी सुरू करून १९६० साली मिल्खा यांना पाकिस्तान तर्फे अंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आमंत्रण दिलं गेलं. मिल्खासिंग यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तान मधील लायपूर भागातला होता. त्यामुळे फाळणीचे दुःख त्यांना नक्कीच होतं.

या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन पाकिस्तानचा अब्दुल खालिक या स्पर्धकाचा पराभव करून मिल्खासिंग यांनी सुवर्णपदक पटकावलं. आणि त्यामुळे पाकिस्तानचे तेव्हाचे तत्कालीन राष्ट्रपती फील्ड मार्शल अयुब खान यांनी मिल्खासिंग यांना द फ्लाइंग शीख अशी उपमा दिली.

मृत्यू

मिल्खा सिंग हे प्रसिद्ध भारतीय धावपटू. मिल्खासिंग यांनी खेळण्या-बागडण्याच्या वयामध्ये दंगली बघितल्या स्वतःच्या आई वडिलांचा मृत्यू बघितला. मिल्खासिंग यांनी क्रीडा क्षेत्रात गाजवलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारत देशाला त्यांचा फारच अभिमान आहे. गरीब कौटुंबिक व कठोर पार्श्वभूमी असणारे मिल्खा सिंग हे संपूर्ण जगभरात एक प्रसिद्ध धावपटू म्हणून नावाजले जातात.

अगदी वयाच्या ९१ व्या वर्षापर्यंत मिल्खासिंग दररोज व्यायाम करायचे. २०२० साला पासून संपूर्ण जगभरात कोवीड नावाच्या महा रोगाने थैमान घातला आहे. नेमकी याच रोगाने मिल्खा सिंग यांना पछाडलं १८ जून २०२१ रोजी मिल्खासिंग यांचा येथे covid-19 या आजारामुळे दुःखद निधन झालं. मिल्खा सिंग यांच्या निधनाने सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला.

अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी आपलं दुःख व्यक्त केलं. मिल्खासिंग यांनी अनेक तरुणांना त्यांच्या खेळातून प्रेरित केलं. मिल्खा सिंग यांची संघर्षमय जीवन गाथा जर बघायची असेल तर भाग मिल्खा भाग हा हिंदी चित्रपट नक्की बघा.

आम्ही दिलेल्या milkha singh information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मिल्खा सिंग मराठी माहिती information of milkha singh in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about milkha singh in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about milkha singh in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये milkha singh wikipedia in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!