अजगर सापाची माहिती Python snake information in marathi

Python snake information in marathi अजगर सापाची माहिती, साप हा सरपटणारा प्राणी जंगलांमध्ये, गवताळ प्रदेश, दलदलीचा प्रदेश, वाळवंट, गोडे पाणी किंवा खारे पाणी या सारख्या सर्व ठिकाणी आढळतो आणि हा कशेरुका या सरपटणाऱ्या प्राणी वर्गातील आहे. साप हे लांब, दंडगोलाकार शरीर, खवलेयुक्त शरीर, काटेरी जीभ आणि आणि त्यांना त्यांच्या डोळ्याला झाकण नसते आणि हा सरपटणारा प्राणी आहे. जगभरामध्ये सापांच्या ३००० हून अधिक प्रजाती आहेत.

आणि त्यामधील बहुतेक ६०० प्रजाती ह्या विषारी आहेत आणि बिनविषारी प्रजातीमध्ये बसणारी सापाची एक प्रजात म्हणजे “अजगर” ज्याला इंग्रजी मध्ये पायथॉन (python) या नावाने ओळखले जाते आणि आज आपण या लेखामध्ये अजगर विषयी माहिती घेणार आहोत.

अजगर हा सरपटनाऱ्या प्राण्यांच्यामधील एक प्रजात असून हि प्रजात भारतामध्ये सामान्य आहे आणि भारतासोबत सापाची हि प्रजात इतर देशांच्यामध्ये देखील आढळते.

अजगर हि सापाची प्राजात विळखा घालण्यासाठी ओळखली जाते आणि हि बसताना झाडांना विळखा घालून बसते आणि हि प्रजात शिकार देखील विळखा घालून करते आणि यांच्याबद्दल विशेष म्हणजे हा साप हरीण, झेब्रा आणि बकरी या सारख्या प्राण्यांना देखील विळख्यात पकडून मारू शकतात.  

python snake information in marathi
python snake information in marathi

अजगर सापाची माहिती – Python snake information in marathi

सापाचे नावअजगर
वर्गसरपटणारा प्राणी
कुटुंबपायथोनीडी
लांबी९ ते १० मीटर
आयुष्य२५ ते ३० वर्ष

अजगर सापाविषयी महत्वाची महत्वाची माहिती – python snake in marathi

अजगर हा साप भारतीय उप महाद्विपामध्ये आढळणारी सर्वात मोठा बिन विषारी साप आहे. अजगर हे साप दलदलीच्या प्रदेशात, खडकाळ, गवताळ प्रदेश किंवा घनदाट जंगलांमध्ये आढळतात. अजगर ह्या प्रकारातील सामान्य सापाचा रंग फिकट पिवळसर रंगाचा असतो.

आणि त्यावर फिकट मातकट रंगाचे ठिपके असतात आणि या सापाची लांबी ९ ते १० मीटर पर्यंत असू शकते आणि  या सापाचा घेर २० ते २५ सेंटी मीटर इतका असतो. अजगर हा सरपटणाऱ्या प्राणी वर्गातील असून हा पायथोनीडी कुटुंबातील आहे आणि या सरपटनाऱ्या प्राण्याचे वैज्ञानिक नाव पायथॉन असे आहे.  

अजगर सापांचे निवासस्थान – habitat

अजगर हा प्राणी उपउष्ण कटिबंध किंवा उष्ण कटिबंधामध्ये राहणे पसंत करतो आणि हि सापांची प्रजात भारतामध्ये तर सामान्य आहेच, परंतु हि प्रजात श्रीलंका, नेपाळ, दक्षिण चीन, म्यानमार, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि बांगलादेशामध्ये देखील आढळतात. अजगर हे साप जास्त करून घनदाट जंगलांच्यामध्ये झाडांना विळखा घालून राहणे पसंत करतात त्याचबरोबर हे खडकाळ किंवा गवताळ प्रदेशामध्ये देखील आढळतात.

अजगर सापांचे अन्न – food

अजगर हा साप मांसाहारी प्राणी आहे आणि हे साप पक्षी आणि इतर छोट्या आकाराचे प्राणी (ससा) देखील खातात आणि या सापांच्याविषयी विशेष म्हणजे हे आपले भक्ष विळख्यात पकडून मारतात आणि मग ते पूर्णपणे गिळतात.

अजगर विषयी विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • अजगर हि सापाची प्रजात त्यांचे भक्ष हे विळख्यामध्ये पकडतात आणि त्यांना मारतात आणि मग ते भक्ष तसेच गिळतात आणि या सापांच्यामध्ये भक्ष प्राण्याची हाडे देखील पचवण्याची क्षमता असते.
  • अजगर ही सापांची जात २५ ते ३० वर्ष जगू शकतात.
  • भारतीय अजगर, दक्षिण आफ्रिकन रॉक पायथॉन, युरोपियन पायथॉन, सुमांत्रण अजगर आणि ब्लड पायथॉन हे अजगर या सापाचे काही प्रकार आहेत.
  • अजगर हा साप जरी विषारी नसला तरी ते त्यांच्या क्रूर शक्तीने भक्षकाला मारू शकतात आणि हे अँनाकोंडासारखे असतात.
  • अजगर हा साप आकाराने मोठा असतो.
  • जाळीदार अजगारांचा प्रकार हा पूर्णपणे वाढ झालेल्या मानवांना देखील खाऊ शकतो असे म्हटले जाते कारण २०१७ अजगराच्या शरीरामध्ये मृत इंडोनेशिया मनुष्याचा मृतदेह सापडला होता तसेच ते लहान मुलांना देखील खाल्याचे अगोदर उघडकीस आले आहे.
  • अजगर या सापांच्या संबधित जास्त प्रमाणात आक्रमक प्रजाती ह्या युएसए मध्ये आहेत आणि या देशामध्ये असणारे साप हे १५ ते २० फुट लांब आणि २०० पौंड पेक्षा अधिक वजनाचे आहेत.
  • भारतामध्ये असणारे इरुला अधिवासिंनी फ्लोरिडा मध्ये आठवड्यामध्ये २७ अजगर पकडले कारण ह्या प्रजाती फ्लोरिडा राज्यातील पर्यावरणाला हानी पोहोचवत होते.
  • २०१७ मध्ये फ्लोरिडामधील पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या बर्मी सापांना मारण्यासाठी साप शिकाऱ्यांना रोख बक्षीस मिळणार होते त्यावेळी त्या काळामध्ये साप शिकाऱ्यांकडून एक हजारहून अधिक असणाऱ्या सापांच्यापैकी १०६ सापांचा नाश करण्यात आला होता.
  • जाळीदार अजगर हे अजगर प्रजातीमधील सर्वात मोठी साप प्रजाती म्हणून ओळखली जाते.
  • अजगर या सापांच्या अनेक प्रजाती आहेत आणि यामधील बॉल पायथॉन हि प्रजाती सर्वात लोकप्रिय पाळीव प्रजाती आहे.
  • अजगर या सापाच्या ४० पेक्षा अधिक प्रजाती आहेत आणि ह्या प्रजाती अनेक वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आढळतात आणि यामध्ये जाळीदार अजगर हि या प्रजातीमधील लांब प्रजात आहे आणि याची लांबी साधारण २५ ते ३० फुट लांब असते.
  • अजगर ह्या सापांच्याविषयी मनोरंजक तथ्य म्हणजे हे साप पाण्यामध्ये जास्त काळ बुडून राहू शकतात म्हणजेच हे एक चांगले जलतरणपटू देखील आहेत.
  • अजगर हे अंडी घालतात आणि ती अंडी उबवतात पण उंडी उबवाल्यानंतर त्यामधील पडणारी पिल्ले हि जन्मानंतर स्वतंत्र्य बनतात.
  • काही अजगरांच्या प्रजाती ह्या धोक्यामध्ये आहेत म्हणजेच यांच्या काही प्रजाती धोक्यामध्ये येण्याच्या मार्गावर आहेत.

आम्ही दिलेल्या python snake information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अजगर सापाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Python snake information in marathi wikipedia या python snake information only in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about python snake in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sajjangad satara information in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!