राही सरनोबत माहिती Rahi Sarnobat Information in Marathi

rahi sarnobat  information in marathi राही सरनोबत माहिती, नेमबाजी हा खेळ प्राचीन काळापासून खेळला जातो आणि हा खेळ जगभरातील प्रसिध्द खेळांपैकी एक आहे. नेमबाजी म्हणजे दूरदूरच्या ठिकाणी प्रक्षेपणासाठी नेम धरून मारणे किवा शूट करण्याची स्पर्धा. प्राचीन काळी नेमबाजी दगड किवा धनुष्य आणि बाण वापरून नेमबाजी करत होते. बंदूकांचा वापर करून नेमबाजी केली जाते आणि नेमबाजी हा खेळ ऑलम्पिक मध्ये देखील खेळला जातो आणि या खेळामध्ये अनेक खेळाडूंनी आपली चांगल्या प्रकारे कामगिरी बजावून नेमबाजी या खेळामध्ये आपले नाव कमावले आहे.

त्यामधील एक लोकप्रिय खेळाडू म्हणजे राही सरनोबत आणि आज आपण या लेखामध्ये राही सरनोबत यांच्या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. राही सरनोबत ह्या २५ मीटर पिस्तुल नेमबाजी मध्ये भाग घेणाऱ्या महिला खेळाडू आहेत आणि तिने सलग दोन वेळा ऑलम्पियन आयएसएसएफ (ISSF) विश्वचषक सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला पिस्तुल नेमबाजी खेळाडू होती.

राही सरनोबत यांचा जन्म हा महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर या शहरामध्ये ३० ऑक्टोबर १९९० मध्ये झाला आणि त्यांचे पूर्ण नाव राही जीवन सरनोबत असे आहे. चला तर खाली आपण राही सरनोबत यांच्याविषयी सविस्तर माहिती घेवूया.

rahi sarnobat information in marathi
rahi sarnobat information in marathi

राही सरनोबत माहिती – Rahi Sarnobat Information in Marathi

नावराही सरनोबत
जन्म३० ऑक्टोबर १९९०
जन्म ठिकाणकोल्हापूर (महाराष्ट्र)
ओळखपिस्तुल नेमबाज

नेमबाजी म्हणजे काय ?

नेमबाजी म्हणजे रेंज शस्त्राने ( रेंज शस्त्र म्हणजे बंदूक, धनुष्य, दगड, स्लिंगशॉट ) प्रक्षेपण सोडण्याची कृती किंवा प्रक्रिया याला आपण नेमबाजी म्हणतात. नेमबाजीचा वापर हा शिकार करण्यासाठी, शेतामध्ये, युध्दामध्ये तसेच नेमबाजीच्या खेळाच्या स्पर्धेमध्ये केला जातो. नेमबाजी करत असलेल्या व्यक्तीला नेमबाज ( shooter ) म्हणतात.

राही सरनोबत यांचे सुरवातीचे आयुष्य – early life

राही सरनोबत हि एक पिस्तुल नेमबाजीची खेळाडू होती आणि त्यांनी या खेळामध्ये महत्वपूर्ण कामगिरी करून आपले नाव भारतामध्ये मोठे केले आणि अश्या या खेळाडूचा जन्म हा महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ३० ऑक्टोबर १९९० मध्ये झाला आणि त्या सध्या ३३ वर्षाच्या आहेत.

त्यांच्या वडिलांचे नाव हे जीवन असे होते आणि आणि नेमबाजी करण्याची प्रेरणा हि त्यांना ५० मीटर रायफल मध्ये विश्वविजेती ठरलेली तेजस्विनी सावंत यांच्याकडून राही सरनोबत यांना नेमबाजी विषयी प्रेरणा मिळाली होती.

राही सरनोबत यांचा नेमबाजी मधील प्रवास कसा सुरु झाला ?

महाराष्ट्रमधील कोल्हापूर या शहरामध्ये जन्मलेली राही सरनोबत यांना खेळाची इच्छा हि तिच्या शाळेमधील मोठी आणि सहकारी मैत्रीण नेमबाज तेजस्विनी सावंत यांच्यामुळे झाली कारण त्या एक ५० मीटर रायफल मध्ये विश्वविजेत्या होत्या आणि सावंत यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच रायफल शुटींग सुरु केली होती आणि राही सरनोबत यांना देखील यांच्याकडूनच प्रेरणा मिळाली आणि त्यांनी देखील नेमबाजीचे प्रशिक्षण घेतले.

राही सरनोबत यांची नेमबाजीमधील कारकीर्द

राही सरनोबत हि एक भारताची लोकप्रिय २५ मीटर पिस्तुल नेमबाज खेळाडू आहे आणि तिने या क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे आणि तिने या स्पर्धेमध्ये अनेक पदके देखील मिळवली आहेत. राही सरनोबत यांना नेमबाजी करण्याची प्रेरणा हि विश्व वोजेती ठरलेली तेजस्विनी सावंत यांच्याकडून मिळाली आणि त्यांनी मग याचे प्रशिक्षण घेतले आणि त्यांनी २००७ मध्ये नेमबाजीमध्ये करिअर करण्याचे ठरवले.

त्यांनी या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर दोन वेळा ऑलम्पियन आयएसएसएफ (ISSF) विश्व चषक स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकले आणि नेमबाजीमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली महिला ठरली. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी बजावली आणि तेथे देखील सुवर्ण पदक पटकवनारी पहिली महिला ठरली.

त्याचबरोबर २०११ मध्ये झालेल्या फोर्ट बेनिंग मधील आयएसएसएफ (ISSF) विश्वचषक स्पर्धेमध्ये त्यांनी कास्यपदक जिंकले आणि त्यावेळीच राही सरनोबत ह्या २५ मीटर पिस्तुल नेमबाजी ऑलम्पिक स्पर्धेमध्ये पात्र ठरणारी पहिली महिला ठरली. तसेच २०१३ मध्ये दक्षिण कोरियामध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये २५ मीटर पिस्तुल स्पर्धा जिंकली.

ग्लासगो या ठिकाणी झालेल्या २०१४ च्या राष्ट्रकुट क्रीडा स्पर्धेमध्ये तिने महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकले आणि त्याच वर्षी म्हणजेच २०१४ मध्ये इचॉन या ठिकाणी झालेल्य आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये २५ मीटर पिस्तुल सांघिक स्पर्धेमध्ये कास्यपदक मिळविले.

तसेच २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये २५ मीटर पिस्तुल प्रकारामध्ये ३४ विक्रमी गुणांच्यासह वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली त्याचबरोबर तिने २०१९ मध्ये देखील विश्वचषक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

राही सरनोबत यांच्याविषयी विशेष तथ्ये – facts

  • राही सरनोबत ह्या २५ मीटर पिस्तुल नेमबाजी मध्ये भाग घेणाऱ्या महिला खेळाडू आहेत.
  • राही सरनोबत यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर मध्ये झाला आणि त्यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९९० मध्ये झाला आहे.
  • त्यांना त्यांच्या या क्षेत्रातील कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
  • आणि तिने सलग दोन वेळा ऑलम्पियन आयएसएसएफ ( ISSF ) विश्वचषक सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला पिस्तुल नेमबाजी खेळाडू होती.
  • त्यांनी विश्वचषक स्पर्धेमध्ये आणि खेळामध्ये अनेक वैयक्तिक रित्या आणि सांघिक रित्या सुवर्णपदके मिळवली आहेत

राही सरनोबत यांना मिळालेला पुरस्कार – awards

राही सरनोबत ह्यांनी नेमबाजी या क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे आणि म्हणून त्यांना राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडिया द्वारे देशातील प्रतिष्ठित म्हणून प्रसिध्द असणाऱ्या अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला. आणि हा पुरस्कार त्यांना २०१५ मध्ये मिळाला होता.

आम्ही दिलेल्या rahi sarnobat information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर राही सरनोबत माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rahi sarnobat biography in marathi या rahi sarnobat wikipedia in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about rahi sarnobat in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!