राजमा रेसिपी मराठी Rajma Recipe in Marathi

Rajma recipe in marathi राजमा रेसिपी मराठी राजमा रेसिपी रोज किंवा आठवड्यातून एकदा तरी आपण कडधान्यापासून बनवलेले भाजी खाते जसे कि वाळलेल्या मुगापासून बनवलेले मुगाचे उसळे, मटकी पासून बनवलेले मटकीचे उसळे आणि आमटी किंवा मसूर पासून अख्खा मसूर, मसूर आमटी किंवा मसूर भाजी. तसेच राजमा हे देखील एक कडधान्य आहे जे पौष्टिक आहे आणि ते आपल्या आरोग्य फायद्यासाठी चांगले आहे. कारण त्यामध्ये फायबर आणि प्रोटीन्स यासारखे अनेक पोषक घटक असतात. राजमा हि एक मसालेदार भाजी आहे ज्यामध्ये राजमा एक मसालेदार ग्रेविमध्ये मिक्स केला जातो.

राजमा मसाला किंवा राजमा हा एक पंजाबी पदार्थ आहे जो आपण पांढऱ्या भातासोबत खावू शकतो आणि त्याला राजमा – चावल म्हणून ओळखले जाते. राजमा हि रेसिपी जरी पंजाबी रेसिपी असली तरी हि रेसिपी भारतामध्ये देखील अनेक ठिकाणी बनवली जाते.

राजमा हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि मोजक्याच साहित्यामध्ये अगदी उत्तम बनते. चला तर मग आज आपण या लेखामध्ये राजमा किंवा राजमा मसाला कसा बनवायचा.

rajma recipe in marathi
rajma recipe in marathi

राजमा रेसिपी मराठी – Rajma Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० ते ३० मिनिटे
पाककलापंजाबी ( भारतीय )
बनवण्याची पध्दतसोपी

राजमा बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients 

  • राजमा : राजमा हे एक कडधान्य आहे जे उकडले जाते आणि त्याला फोडणी दिली जाते. राजमा हे एक राजमा मसाला बनवण्यासाठी लागणारे महत्वाचे साहित्य आहे.
  • टोमॅटो : या भाजीमध्ये जर आपण बारीक चिरलेला टोमॅटो वापरला तर भाजी थोडी घट्ट होते तसेच भाजीला थोडी आंबटसर चव येते.
  • आले आणि लसून : आले आणि लसून वापरल्यामुळे भाजीला चांगला फ्लेवर येतो तसेच भाजीला खमंग वास देखील येतो.

राजमा रेसिपी – how to make rajma recipe in marathi

राजमा हा एक पंजाबी भाजीचा प्रकार आहे जो पांढऱ्या भातासोबत लोक खाणे पसंत करतात. राजमा हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे कारण आपण जसे वेगवेगळ्या प्रकारची कडधान्यांची उसळे बनवली जातात तशीच राजमा देखील बनवला जातो आणि हि रेसिपी खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्या मध्ये बनतो. चला तर मग राजमा कसा बनवायचा आणि तो बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० ते ३० मिनिटे
पाककलापंजाबी ( भारतीय )
बनवण्याची पध्दतसोपी

राजमा रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make rajma recipe 

राजमा बनवण्यासाठी आपल्याला काही मसाले, कांदा, टोमॅटो, राजमा आणि काही इतर साहित्य देखील लागते आणि त्यामधील काही साहित्य घरामध्ये उपलब्ध असते तर काही साहित्य घरामध्ये उपलब्ध नसते ते आपण बाजारातून विकत अनु शकतो. चला तर आता आपण राजमा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ वाटी राजमा.
  • २ मध्यम आकाराचे टोमॅटो ( बारीक चिरलेले ).
  • १ कांदा ( बारीक चिरलेला ).
  • १ हिरवी मिरची ( लांब कात केलेली ).
  • १ ते दीड चमचा आले लसून पेस्ट.
  • १ वेलदोडा.
  • १/२ चमचा जीरा.
  • २ छोटे दालचिन तुकडे.
  • १ चमचा लाल मिरची पावडर.
  • १/२ चमचा गरम मसाला पावडर.
  • १/४ चमचा हळद.
  • २ चमचे फ्रेश क्रीम ( गार्निशिंगसाठी ).
  • १/२ मोठा चमचा कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
  • मीठ ( चवीनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).
  • २ मोठे चमचे तेल.

राजमा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make rajma recipe 

आता आपण वरील साहित्य वापरून राजमा कसा बनवायचा ते पाहूयात.

  • राजमा बनवताना सर्व प्रथम राजमा चांगला निवडून तो स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्या आणि त्यामधील पाणी काढा.
  • आता राजमा कुकरमध्ये घाला आणि त्यामध्ये पाणी घाला आणि कुकरला झाकण लावून कुकर मोठ्या आचेवर ठेवून तीन शिट्या आणून राजमा चांगले मऊ शिजवून घ्या आणि कुकर थोडा वेळ गार होण्यची वाट पहा.
  • आता कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची चिरून घ्या आणि आले लसून पेस्ट देखील करून घ्या आणि ते बाजूला ठेवा.
  • मग गॅसवर मध्यम आचेवर एक कढई ठेवा आणि कढईमध्ये तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये सर्वप्रथम जिरे, दालचिन तुकडे आणि वेलदोडा घाला आणि ते ते सेकंदासाठी भाजा. आता त्यामध्ये कांदा आणि आले लसून पेस्ट घालून कांदा थोडा लालसर होईपर्यंत भाजा.
  • मग त्यामध्ये हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला टोमॅटो घाला आणि टोमॅटो तेलामध्ये ते वेगळे होईपर्यंत भाजा किंवा शिजवा.
  • आता यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि हळद घाला आणि ते चांगले मिक्स करून त्यामध्ये उकडलेले राजमा घाला आणि ते मिक्स करा आता त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी घालण्याची गरज असेल तर त्यामध्ये थोडे पाणी घाला आणि ते मिक्स करा.
  • आणि हि हे गॅसवर परत १० मिनिटे चांगले शिजवून घ्या आणि त्याला एक उकळी येवू द्या.
  • आता गॅस बंद करा आणि त्यावर कोथिंबीर आणि थोडी फ्रेश क्रीम घालून ती रेसिपी भातासोबत सर्व्ह करा.

राजमा कश्यासोबत सर्व्ह केला जातो – serving suggestion

राजमा आपण राजमा – चावल आहे कॉम्बिनेशन खावू शकतो किंवा मग जीरा राईस सोबत देखील खावू शकतो. त्याचबरोबर आपण राजमा रोटी, साधा नान, बटर नान या सोबत देखील खावू शकतो.

टिप्स ( Tips ) 

  • राजमा रेसिपी बनवताना जर तुम्ही राजमा बनवण्यासाठी लाल रंगाचे राजमा वापरले तर ते एकदम उत्तम होईल.
  • चिरलेल्या टोमॅटो ऐवजी आपण टोमॅटोची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून देखील राजमा मध्ये वापरू शकतो.
  • राजमा चांगला मऊ उकडून घेतला तरच तो चांगला लागतो त्यामुळे राजमा शिजवतेवेळी काळजीपूर्वक शिजवा.

आम्ही दिलेल्या rajma recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर राजमा रेसिपी मराठी माहिती rajma bhaji बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rajma maharashtrian recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि rajma masala recipe in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये rajma in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!