अख्खा मसूर रेसिपी मराठी Akkha Masoor Recipe in Marathi

Akkha Masoor Recipe in Marathi अख्खा मसूर रेसिपी मराठी अख्खा मसूर हि एक प्रकारची भाजी आहे जी मसूर या कडधन्यापासून बनवला जातो. अख्खा मसूर हि एक चमचमीत आणि मसालेदार महाराष्ट्रीयन पदार्थ आहे जो आपल्याला महाराष्ट्रातील रस्त्यावर असणाऱ्या ढाब्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या डिशपैकी एक डिश आहे जी खूप लोक ऑर्डर करून आवडीने खातात. अख्खा मसूर हि रेसिपी महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली, कऱ्हाड, सातारा, पुणे या भागांमध्ये असणाऱ्या ढाब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनवला जातो कारण तेथील लोक हा पदार्थ खूप आवडीने खातात आणि ढाब्यांमध्ये या पदार्थाला खूप मागणी आहे.

महाराष्ट्रासोबत भारतातील इतर ठिकाणी देखील हा पदार्थ बनवला जातो आणि आवडीने खाल्ला देखील जातो. अख्खा मसून बनवण्यासाठी आपल्याला मसूर, कांदा, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि मीठ इतके जरी साहित्य असले तरी पुरेसे आहे कारण अख्खा मसूर बनवण्यासाठी आपल्याला विशेष असे काही साहित्य आणावे लागत नाही. चला तर आज आपण या लेखामध्ये ढाब्यासारखा अख्खा मसूर कसा बनवायचा ते पाहूयात.

Akkha Masoor Recipe in Marathi
Akkha Masoor Recipe in Marathi

अख्खा मसूर रेसिपी मराठी – Akkha Masoor Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ मिनिटे
पाककलाकोल्हापुरी (महाराष्ट्रीयन)
बनवण्याची पध्दतसोपी

अख्खा मसूर बनवण्यासाठी लागणारे महत्वाचे साहित्य – key ingredinents 

  • मसूर : मसूर हे एक प्रकारचे कडधान्य आहे जे अख्खा मसूर बनवण्यासाठी लागतो आणि हा मसूर स्वच्छ धुवून तो कुकरमध्ये उकडला जातो आणि त्याला मसालेदार अशी फोडणी दिली जाते.
  • टोमॅटो : जर आपण अख्खा मसूर मध्ये टोमॅटो वापरला तर त्यामुळे भाजीला थोडी आंबट चव येते त्यामुळे अख्खा मसूर खूप छान लागतो. त्यामुळे अख्खा मसूरमध्ये बारीक चिरलेला टोमॅटो वापरला तर खूप चांगले.

अख्खा मसूर रेसिपी – akkha masoor bhaji in marathi

अख्खा मसूर हि एक महाराष्ट्रीयन डिश आहे जी महाराष्ट्रामध्ये अनेक स्वयंपाक घरामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ढाब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनवली जाते. अख्खा मसूर हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर मग पाहूयात अख्खा मसूर कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ मिनिटे
पाककलाकोल्हापुरी ( महाराष्ट्रीयन )
बनवण्याची पध्दतसोपी

अख्खा मसूर बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make akkha masoor 

अख्खा मसूर बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे घरामध्ये उपलब्ध असते आपल्याला बाजारातून काही विकत आणावे लागत नाही. चला तर मग अख्खा मसूर बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ वाटी मसूर.
  • १ मोठा कांदा बारीक चिरलेला.
  • ७ ते ८ पाकळ्या लसून ( ठेचलेला ).
  • २ चमचे लाल मिरची पावडर.
  • १/२ चमचा हळद.
  • १ चमचा गरम मसाला.
  • १/२ चमचा मोहरी.
  • दीड मोठे चमचे तेल.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).

अख्खा मसूर बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make akkha masoor 

  • सर्वप्रथम मसूर चांगले निवडून स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्या आणि मग ते कोमट पाण्यामध्ये ३ ते ४ तास भिजत घाला आणि मग ते मसूर कुकरमध्ये घालून त्यामध्ये पाणी घालून कुकरला झाकण लावून ते गॅसवर ठेवा आणि त्याला ३ ते ४ शिट्या येवू द्या आणि ३ ते चार शिट्या दिल्यामुळे मसूर चांगले शिजतील. मग गॅस बंद करा आणि कुकर थंड होईपर्यंत वाट पहा.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर एक कढई ठेवा आणि ती गरम झाली कि त्यामध्ये तेल घाला आणि तेल गरम झाले कि तेलामध्ये मोहरी टाका आणि ती तडतडली कि त्यामध्ये लसून आणि कांदा घाला आणि कांद्याला लालसर रंग येईपर्यंत तो चांगला भाजून घ्या. मग त्यामध्ये टोमॅटो घाला आणि तो मिक्स करून तो तेलामध्ये ४ ते ५ मिनिटे शिजवा.
  • मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला घाला आणि हे सर्व मिश्रण एकत्र करा आणि थोडा वेळ भाजा. आता यामध्ये आपण शिजवलेला मसूरा घाला चवीनुसार मीठ घाला आणि थोड्या पाण्याची गरज असेल तर थोडे पाणी घाला आणि ते मिक्स करा ( टीप : अख्खा मसूर आपल्याला जास्त पातळ बनवायचा नसतो तो रबरबित बनवायचा असतो ) त्यामुळे त्यामध्ये पाणी हे आवश्यकतेनुसार घाला.
  • अख्खा मसूर थोडा वेळ शिजू द्या आणि शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि गरमागर सर्व्ह करा.

अख्खा मसूर कश्यासोबत खातात – serving suggestions 

अख्खा मसूर हा एक भाजीचा प्रकार आहे जो आपण चपाती, रोटी, नान किंवा पांढऱ्या भातासोबत देखील खावू शकतो.

अख्खा मसूर बनवण्यासाठी दिलेल्या काही टिप्स – tips to make akkha masoor

  • अख्खा मसूर बनवताना आपण जर फोडणीमध्ये तमाल पत्रीची पाने वापरली तरी चालतात कारण त्या मुळे रेसिपीला खमंग वास येतो.
  • अख्खा मसुराला जर आपण वरून तडका दिला तरी तो उत्तम आणि चमचमीत लागतो त्यामुळे आपण त्याला वरून गरम तेलामध्ये लाला मिरची पावडर आणि हळद घालून तडका देवू शकतो.
  • अख्खा मसूर रेसिपी हि थोडी झणझणीत असल्यामुळे त्यामध्येवरती रेसिपी मध्ये दिलेल्या प्रमाणापेक्षा थोडे जास्त तिखट वापरले तरी चालेल.
  • मसूर हे एक कडधान्य आहे आणि ते दोन प्रकारामध्ये असते लहान आकाराचे मसूर आणि मोठ्या आकाराचे मसूर यामधील मोठ्या आकाराचे मसूर जर आपण वापरले तर तर आपली रेसिपी उत्कृष्ठ बनते.
  • अख्खा मसूर आपण ४ तास भिजवण्याऐवजी ६ ते ७ तास भिजवला तर ते अति उत्कृष्ठ कारण मसूर चांगला भिजल्यामुळे तो चांगला शिजण्यास मदत होते.
  • अख्खा मसूर हि रेसिपी पातळ आमटी सारखी नसते ती रबरबित भाजी सारखी बनवली जाते त्यामुळे त्यामध्ये पाणी घालताना अगदी काळजीपूर्वक घाला.

आम्ही दिलेल्या akkha masoor recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अख्खा मसूर रेसिपी मराठी masoor bhaji बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kolhapuri akkha masoor recipe in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि masoor chi bhaji माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये akkha masoor recipe in marathi by madhura Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!