रझिया सुलतान मराठी माहिती Razia Sultan History in Marathi

razia sultan history in marathi – razia sultan information in marathi रझिया सुलतान इतिहास, आज आपण या लेखामध्ये दिल्ली सल्तनतच्या पहिल्या महिला शासन म्हणून संपूर्ण भारतामध्ये ओळख असणाऱ्या रझिया सुलतान यांच्या विषयी काही माहिती आणि इतिहास जाणून घेणार आहोत. रझिया सुलतान हि दिल्ली सल्तनतची पहिली महिला शासक होती आणि तिने १२३६ ते १२४० पर्यंत दिल्लीवर राज्य केले होते. रझिया सुलतान हिच्या आईचे नाव कुतुब बेगम असे होते आणि तिच्या वडिलांचे नाव इल्तुतमिश असे होते आणि तिला लहानपणी पासूनच व्यवसायिक युध्दाचे प्रशिक्षण देण्यात आले होते तसेच तिला लष्करी कौशल्ये देखील शिकवण्यात आले होते आणि तिला राज्य शासन कसे काम करते या बद्दल देखील चांगली माहिती होती.

१० नोव्हेंबर १२३६ मध्ये जलात उद-दिन रझिया हि सिंहासनावर विराजमान झाली आणि तिने ४ ते ५ वर्ष दिल्लीवर राज्य केले. ज्यावेळी रझिया सुलतान सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर ती आघाडीवर लढली आणि तिने अनेक प्रदेश हे आपल्या ताब्यात घेतले. तिने प्रशासनामध्ये प्रभुत्व मिळवले आणि दिल्लीवर राज्य केलेल्या उत्तम सुलतानांच्या खांद्याला खांदा लावण्यास आणि अनेक प्रदेश घेण्यास तिला यश मिळाले.

ज्यावेळी तिच्या वर्चस्वा खाली दिल्ली सल्तनत होती त्यावेळी तिने अनेक संशोधन केंद्रे, शाळा, अकादमी आणि सार्वजनिक ग्रंथालये स्थापन केली. रझिया सुलतान हि दिल्ली सल्तनतची पहिली आणि शेवटची महिला शासक होती आणि तिने धैर्याने पुराणमतवादी परंपरांचा तिरस्कार केला. चला तर आता आपण रझिया सुलतान हिच्या विषयी अनाखील माहिती खाली जाणून घेवूया.

razia sultan history in marathi
razia sultan history in marathi

रझिया सुलतान मराठी माहिती – Razia Sultan History in Marathi

 नावजलात उद-दिन रझिया
वडिलांचे नावइल्तुतमिश
आईचे नावकुतुब बेगम
पदवीरझिया सुलतान
ओळखदिल्ली सल्तनतची पहिली आणि शेवटची महिला शासक
कार्यकाळ१२३६ ते १२४०

रझिया सुलतान कोण होती ?

रझिया सुलतान हि दिल्ली सल्तनतची पहिली महिला शासक होती आणि तिने १२३६ ते १२४० पर्यंत दिल्लीवर राज्य केले होते आणि तिने दिल्ली तिच्या वर्चस्वाखाली असताना अनेक संशोधन केंद्रे, शाळा, अकादमी आणि सार्वजनिक ग्रंथालये स्थापन केली.

रझिया सुलतानचा इतिहास – information about razia sultan in marathi

शम्स उद-दिन इल्तुतमिश म्हणजेच रझिया सुलतान यांच्या वडिलांचे ३० एप्रिल १२३६ मध्ये निधन झाल्यानंतर जरी तिने वडील असल्यापासून कारभार पहिला असला तरी ती १० नोव्हेंबर १२३६ मध्ये ती दिल्ली सल्तनतच्या सिंहासनावर  विराजमान झाली. पण विद्यमान मुस्लीम अभिजात वर्गाला स्त्री सुलतान बनणे मान्य नव्हते आणि म्हणून तिला सुलतान म्हणून स्वीकारण्यासाठी विरोध केला आणि तिचा भाऊ रुकन उद्दीन याला सुलतान बनवण्याची मागणी केली आणि त्या मागणी वरून रुकन अद्दिन हा सुलतान झाला पण नोव्हेंबर मध्ये त्याची हत्या केली आणि रझिया सुलतान हि १० नोव्हेंबर १२३६ मध्ये दिल्ली सल्तनतची पहिली महिला शासक झाली.

ती दिल्ली सल्तनतची शासक झाल्यानंतर तिने पारंपारिक मुस्लीम महिलांचा पोशाख सोडला आणि तिने लिंग तटस्थ पोशाख स्वीकारला जो तिच्या आधीच्या पुरुष शासकांनी स्वीकारला होता. पण तिने असे केल्यामुळे पुराणमतवादी मुस्लीम लोकांना ते आवडले नाही. तिने अगदी सहजतेने आणि तिच्या आत्मविश्वासाचा अधिकाराचा वापर केला आणि पिलर ऑफ वूमन, सुलतान रझिया, क्वीन ऑफ द टाइम्स अश्या अनेक पदव्या तिने आपल्या नावावर करून घेतल्या.

एक चांगला शासक म्हणून तिने तिच्या बालपणापासून घेतलेले प्रशिक्षण आणि वडिलांचे पालनपोषण हे तिच्यासाठी खूप उपयुक्त ठरले. ती निर्भीडपणे आणि शुरतेने लढली आणि तिने आपल्या सैन्याचे नेतृत्व युध्दामध्ये केले तसेच तसेच अनेक प्रदेश जिंकण्यासाठी देखील तिला यश मिळाले. ती एक धर्मनिरपेक्ष सुलतान होती तसेच तिला सामाजिक जाणीव देखील होती आणि म्हणून तिने अनेक शैक्षणिक संस्था, संशोधन केंद्रे, शाळा आणि ग्रंथालये स्थापन केली.

तिचे शासक बनणे हे तुर्की सरदारांना मान्य नव्हते कारण त्यांना असे वाटायचे कि स्त्री सुलतान बनणे हा सर्व पुरुष योध्दा आणि श्रेष्ठांचा अपमान होता आणि राझीयाला सिंहासनावरून खाली उतवाण्यासाठी एका सरदाराने कट रचला होता आणि त्याने तिच्या विरुध्द बंड पुकारल. पण तिने त्याच्या विरूद्ध आपल्या सैन्याचे धैर्याने नेतृत्व केले परंतु त्यामध्ये तिला अपयश मिळाले आणि त्यानंतर तिचा भाऊ मुइझुद्दीन बहराम शहा याने गाडी बळकावली.

रझिया सुलतान विषयी माहिती – information about razia sultan in marathi

  • रझिया सुलतान हि भारतातील पहिली आणि शेवटची दिल्ली सल्तनतची महिला शासक होती आणि तिने दिल्लीवर ४ ते ५ वर्ष म्हणजेच १२३६ ते १२४० पर्यंत राज्य केले आणि तिने सिंहासनावर असताना अनेक प्रदेश जिंकले.
  • रझिया सुलतान हिची ओळख दिल्ली सल्तनतची पहिली आणि शेवटची महिला शासक म्हणून ओळख आहे.
  • रझिया हि त्या महिलांच्यापैकी एक होती आणि फार कमी महिला शासक आहेत ज्यांनी समोरून सिंहासन घेतले. ती मामलुक राजवंशातील पाचवी शासक होती.
  • मुस्लीम संस्कृतीनुसार, रझीयाला रझिया सुलतान असे संबोधले जावे परंतु रझीयाला सुलतान म्हणून संबोधण्यास नकार दिला. मुसलीम संस्कृतीमध्ये सुलतान म्हणजे सुलतान शासकाची पत्नी किंवा शिक्षिका. परंतु तिने स्वताला सुलतान शासक म्हणून घोषित केले.
  • तिचे वडील इल्तुतमिश यांनी कुतुब सर्व ऐबकच्या कारकिर्दीत एक गुलाम म्हणून दिल्लीमध्ये प्रवेश केला आणि ऐबकने नंतर मामलुक राजघराण्याचा पाया घातला.
  • स्वता रझिया सुलतानने आपल्याला सुलतान असे नामांकन दिले तरी देखील दरबारातील अनेक श्रेष्ठींनी तिला सुलतान म्हणून दर्जा देण्यास नकार दिला.
  • ती दिल्ली सल्तनतची शासक झाल्यानंतर तिने पारंपारिक मुस्लीम महिलांचा पोशाख सोडला आणि तिने लिंग तटस्थ पोशाख स्वीकारला जो तिच्या आधीच्या पुरुष शासकांनी स्वीकारला होता.
  • तिच्या वर्चस्वा खाली दिल्ली सल्तनत होती त्यावेळी तिने अनेक संशोधन केंद्रे, शाळा, अकादमी आणि सार्वजनिक ग्रंथालये स्थापन केली.
  • रझिया सुलतान ह्या त्यांचे वडील असताना देखील राज्यकारभार पाहत होती आणि नंतर तिने शम्स उद-दिन इल्तुतमिश म्हणाजेच तिच्या वडिलांच्या निधनानंतर ती दिल्लीच्या सिंहासनावर बसली आणि तिने १२३६ ते १२४० पर्यंत राज्य सांभाळले.
  • रझिया सुलतान हिचे पूर्ण नाव जलात उद-दिन रझिया असे होते.

आम्ही दिलेल्या razia sultan history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रझिया सुलतान मराठी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या razia sultan information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about razia sultan in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!