रस्ता सुरक्षा निबंध मराठी Road Safety Essay in Marathi

Road Safety Essay in Marathi – Essay on Road Safety in Marathi रस्ता सुरक्षा निबंध मराठी सध्या भारतामध्ये रस्ता सुरक्षा हि काळाची गरज आहे कारण भारतीय लोकांच्या दगदगीच्या जीवनामध्ये भारतीय रस्त्यांवर खूप गर्दी पाहायला मिळते. जसे कि काहीजन सकाळी लवकर आवरून ऑफिसला जाता असतात तसेच सकाळी कॉलेजला जाणारी मुले, शाळेला जाणारी मुले यांची देखील गर्दी असते त्याचबरोबर काही लोक कोठे तरी फिरायला जात असतात आणि अश्या प्रकारे रस्त्यावर भरपूर लोकांची गर्दी असते आणि त्यामुळे रस्त्यावर सध्या खूप गाड्यांची गर्दी असते. या गर्दीमध्ये काहीजणांना आपल्या कामासाठी लवकर जायचे असते.

त्यामुळे ते वेगाने गाडी चालवत असतात आणि या वेगामध्ये काही चुकीमुळे अपघात होतात तसेच काहीजण मोबाईल वर बोलत गाडी चालवत असतात आणि या कारणामुळे एखील बरेचसे अपघात झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपण गाडी चालवताना सर्व नियमांचे पालन करून, तसेच आपले सर्व लक्ष गाडी चालवण्याकडे केंद्रित करून आणि थोडा वेग कमी करून गाडी चालवली तर ते खूप फायद्याचे ठरेल आणि रस्ता अपघात होणे खूप कमी होतील.

Road Safety Essay in Marathi
Road Safety Essay in Marathi

रस्ता सुरक्षा निबंध मराठी – Road Safety Essay in Marathi

Essay on Road Safety in Marathi

सध्या आपण अश्या जगामध्ये वावरत आहोत जेथे बहुतुक हि मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि वाहतुकीच्या साधनांचा देखील मोठ्या प्रमाणत उपयोग होत आहे म्हणजेच वाहतुकीसाठी गाड्यांचे प्रमाण खूप वाढले आहे आणि त्यामुळे रस्त्यावर गाड्यांची गर्दी तर होतच आहे परंतु गाड्यांच्या धुरावाटे बाहेर पडणारा कार्बनडाय ऑक्साईड देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

आणि हवेचे प्रदूषण देखील होत आहे. रस्त्यावरू काही लोक, तरुण किंवा काही तरुणी खूप वेगाने जात असतात आणि काहीजन तर १०० च्या वेगाने जातात आणि ह्या वेगाने रस्त्यावरून जात असताना जर काही चूक झाली, तर कीत्येक लोकांना आपला जीव गमवावा लागतो, तसेच अपघातामध्ये काही जणांचे पाय जातात तर काही जणांचे हात जातात.

अश्या प्रकारे अपघातामध्ये वेगवेगळ्या दुखापती होतात म्हणून मी असे म्हणावेसे वाटते कि ‘आवारा वेगाला आणि सावरा जीवाला’. भारतामध्ये अपघातापासून होणारे मृत्यूचे प्रमाण हे जास्त आहे आणि भारतामध्ये सर्वात जास्त रस्ता अपघाताचे प्रमाण हे उत्तर प्रदेश मध्ये आहे आणि हे प्रमाण जास्त असण्याचे कारण त्या ठिकाणी जे सरकारने जे रस्ता सुरक्षेसाठी नियम घालून दिले आहेत ते पाळले जात नाहीत.

परंतु भारतामध्ये तामिळनाडू या राज्यामध्ये अपघाताचे प्रमाण खूप कमी आहे कारण तेथे काटेकोरपणे रस्ता सुरक्षा नियम पाळले जातात आणि तसेच सरकारची रस्ता सुरक्षेबद्दलची पावले देखील खूप कडक आहेत. आपल्या भारतामध्येच अपघात होतात असे नाही परंतु जगामध्ये सर्व ठिकाणी अपघात होतात.

पण भारताच्या तुलनेने जगामध्ये इतर देशामध्ये होणारे अपघाताचे प्रमाण हे खूप कमी आहे आणि जगामध्ये होणाऱ्या १.३ दशलक्ष अपघातापैकी १ लाखापेक्षा अधिक लोक भारतामध्ये अपघाताने मरण पावतात आणि त्यामध्ये तरुणांची संख्या जास्त असते कारण ते खूप वेगाने गाडी मारतात.

अपघाताचे प्रमाण वाढण्यासाठी अनेक गोष्टी जबाबदार आहेत आणि जर लोकांनी गाडी चालवताना जर रस्ता सुरक्षेचे पालन नाही केले तर असेच अपघाताचे प्रमाण वाढत जाणार. अपघात होण्याची अशी अनेक करणे आहेत आणि त्यामधील एक म्हणजे गाडी खूप वेगाने चालवणे. सध्या बाजारामध्ये अशी वाहने देखील आली आहेत जी वेगाने पाळतात आणि तरुण पिढीला त्याचे कौतुकाच वाटते आणि असे इत्येक तरुण वेगाने धावणाऱ्या गाड्या विकत घेतात.

आणि रस्त्यावरून जात असताना १०० च्या वेगाने जात असतात आणि काही जणांना अडचणीच्या वेळी वेगावर नियंत्रण करता न आल्यामुळे अपघात होतात आणि म्हणून म्हतात कि ‘अति घाई संकटात नेई.’ आणि म्हणूनच रात्यावरून जाताना अडचणीच्या वेळी अगदी सहजपणे नियंत्रित करता येणाऱ्या वेगाचे गाडी चालावा. तसेच काही लोक स्वताला इतरांच्या पेक्षा वेगळे दाखवण्यासाठी गाडी मारताना वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट करत असतात आणि हे करत असताना जर काही चूक झाली तर अपघात होण्याची शक्यता असते.

सध्या तरुणांच्यामध्ये ड्रिंक करणे हा प्रकार वाढला आहे आणि काही वेळा ते नशेमध्ये असतानाच गाडी मारत असतात आणि त्यामुळे देखील अपघात होतात तसेच ओव्हरटेक, रस्त्याच्या चुकीच्या बाजूला गाडी चालवणे, गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर, रहदारीचे नियम मोडणे, गाडी मारताना सोबत मित्र असतील तर मी पुढे कि तू पुढे अशी रेस लावणे. अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे रस्ता अपघात होतात आणि लोकांना आपला जीव गमवावा लागतो.

पण हे अपघात होऊ नयेत म्हणून सरकारने काही नियम घालून दिले आहेत तसेच गाडी चालवताना कोणाच्याही जीवाची हानी होऊ नये म्हणून सरकारने काही उपाय बनवले आहेत आणि त्यालाच आपण रस्ता सुरक्षा उपाय म्हणू शकतो. रस्ता सुरक्षा उपायांमध्ये काही सरकारने चालू केलेले उपाय म्हणजे ट्रॅफिक पोलीस यंत्रणा, तसेच अरुण आणि नागमोडी वळणावर दिशा दर्शवणारे किंवा पुढच्या धोक्याबद्दल माहिती देणारे बोर्ड, ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा, एकाच वेळी अगदी सहजपाने दोन वाहने जातील.

असा लांब रस्ता तसेच रस्ता उंच असेल तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला कठडे असावे. रस्ता सुरक्षा हि सध्या सर्वात महत्वाची आणि सामान्य गोष्ट आहे आणि हि तरुण पिढीमध्ये आणि लोकांच्यामध्ये जागृत करणे महत्वाचे ठरेल आणि रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने रस्ता सुरक्षा नियम पाळले तर आपल्या देशातील अपघाताचे प्रमाण कमी होयील आणि कोणाला अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागणार नाही.

रस्त्यावरून गाडी मारत असताना गाडी चालकांनी किंवा चालत जाणाऱ्या व्यक्तीने काही नियम पाळले पाहिजेत जसे कि रस्त्यावरून जाणाऱ्या चालकाने रस्त्याच्या डाव्या बाजूने गेले पाहिजे. तसेच जास्त गर्दीच्या रस्त्यावर जाताना अतिरिक्त काळजी घ्या तसेच अवघड वळणावर गाडीचा वेग कमी करून वळण घेणे.

जे लोक दुचाकीवर प्रवास करतात त्यांनी उत्तम दर्जाचे हेल्मेट वापरले पाहिजे आणि जर कोणत्याही दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट घातले नसेल तर त्याच्याकडून दंड आकारण्यात यावा. प्रत्येक चालकाने आपले वाहन हे मर्यादित वेगावर चालवावे आणि ज्या भामध्ये रुग्णालये, शाळा, कॉलेज आहेत त्या ठिकाणी वाहने सावकाश चालवावी.

रस्त्यावर गाडी चालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रस्त्यावर असणाऱ्या चिन्हाची माहिती असावी तसेच रस्त्यावर गाडी मारत असताना दोन गाड्यांच्या मध्ये सुरक्षित अंतर असणे खूप गरजेचे असते. जास्तीत जास्त अपघात हे रहदारीचे नियम न पाळल्यामुळे होतात आणि म्हणून गाडी चालवताना सर्व रहदारीचे नियम किंवा रस्ता सुरक्षा नियम लक्षात घेतले पाहिजेत.

तसेच ग्रीन लाईट लागली कि गाडी चालू केली पाहिजे तसेच रस्त्यावर जे वाहतूक पोलीस असतात त्यांच्या सर्व सूचना पाळल्या पाहिजेत. तसेच कार चालवताना सीट बेल्ट लावला पाहिजे आणि आपल्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला देखील सीट बेल्ट लावण्यास सांगितले पाहिजे. अश्या प्रकारे जर आपण वाहने चालवताना रस्ता सुरक्षेचे सर्व नियमाचे पालन केले तर आपल्या देशातील अपघाताचे प्रमाण कमी होईल. म्हणून शेवटी या निबंधामध्ये असे म्हणावेसे वाट आहे कि, ‘रस्ता सुरक्षेचे नियम पाळा आणि उठसुठ होणारे अपघात टाळा.”

आम्ही दिलेल्या road safety essay in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रस्ता सुरक्षा निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या road safety essay in marathi pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि road safety essay in marathi ppt माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये essay on road safety in 500 words in marathi करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!