भानगड किल्ल्याची माहिती Bhangarh Fort Story in Marathi

Bhangarh Fort Story in Marathi भानगढ़ किल्ला माहिती मराठी भानगड हा किल्ला राजस्थान राज्यामधील जयपूर जिल्ह्यापासून ८० किलो मीटर अंतरावर वसलेला आहे आणि हा किल्ला अलवार जिल्ह्यामध्ये आहे. भानगड हा किल्ला बहुतेक १५ व्या शतकामध्ये अंबरच्या राजा भगवान दास यांनी बांधला होता. भानगड ही राजा मानसिंगचा भाऊ माधो सिंग यांची राजधानी होती.

मान सिंह अकबराच्या अगदी जवळचे मानले जात असे कारण भानगडपासून पाच किलोमीटर अंतरावर सोमसागर तलाव आहे आणि त्या तलावाच्या काठावर एक दगड म्हणजेच शिलालेख सापडला आणि या दगडावरून हे उघड झाले की माधो सिंह अकबरच्या दरबारात दिवाण होते.

Bhangarh Fort information in Marathi भानगड या किल्ल्याला भारतातील सर्वात पछाडलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते कारण तेथील स्थानीक लोक सांगतात कि हा किल्ला भुताटकी किल्ला आहे आणि तेथे काही ना काही भयानक घटना होत असतात.

या किल्ल्यामध्ये मोठ्या संख्येने लोक फिरायला येतात पण रात्र होण्यापूर्वी परत जातात कारण असे म्हंटले जाते कि या किल्ल्यावर रात्री जाणारे लोक परत येत नाहीत. जवळपासचे लोक म्हणतात की रात्रीच्या वेळी येथे वेगवेगळे आवाज ऐकू येतात त्याचबरोबर येथे घुंगरूंचे प्रतिध्वनी देखील ऐकू येतात.

bhangarh fort story in marathi
bhangarh fort story in marathi

भानगड किल्ल्याची माहिती मराठी – Bhangarh Fort Story in Marathi

किल्ल्याचे नावभानगड किल्ला, भानगढ़
राज्यराजस्थान
जिल्हाअलवार
स्थापनाइ. स. १५७३ मध्ये बांधला आहे.
संस्थापकअंबरच्या (आमेर) राजा भगवान दास

अंबर या राज्याने या किल्ल्याची बांधणी अतिशय सुंदर आणि सुरेख केली होते आणि त्यानंतर हा किल्ला मदहो राजाची राजधानी झाली आणि त्यावेळी माधो राजाला कोणीतरी शाप दिला आणि त्यावेळी हा किल्ला उद्वस्त झाला असे म्हटले जाते. भानगड या किल्ल्यामध्ये गोपीनाथ मंदिर, सोमेश्वर मंदिर आणि इतर सुरेख, सुंदर आणि कोरीव कामे केलेली होती पण एका शापाने सर्व काही उद्वस्त करून टाकले. भानगड या किल्ल्यामध्ये भुताटकी आहे आणि हि भुताटकी कसा झाला याबद्दल बर्‍याच कथा सांगितल्या जातात त्या या लेखामध्ये खाली दिलेल्या आहेत.

नक्की वाचा: सुवर्णदुर्ग किल्ला माहिती 

भानगड हा किल्ला खरोखर भुताटकी आहे का ? 

हा असा एक प्रश आहे कि ज्याचे उत्तर कोणीच देवू शकत नाही पण तेथे राहणारे आसपासचे लोक सांगतात कि हा किल्ला भुताटकी आहे, त्या किल्ल्यामध्ये रात्री गेलेला व्यक्ती कधी परत येत नाही, रात्रीच्या वेळी येथे वेगवेगळे आवाज ऐकू येतात, घुंगरूंचे प्रतिध्वनी देखील ऐकू येतात असे सांगतात पण खरे कि खोटे कोणालाही माहित नाही.

जे लोक अश्या प्रकारच्या भुताटकीच्या गोष्टींवर विश्वास आहे त्यांना या गोष्टी पटतात पण काही लोकांचा असल्या गोष्टींवर विश्वास नाही ते लोक ह्या गोष्टी काल्पनिक मानतात. तेथील दंतकथा असे सांगतात कि भानगड हा किल्ला शापित झाला होता आणि त्या शापामुळे तो काही काळातच उद्वस्त झाला होता आणि असे देखील म्हणतात कि या ठिकाणे आत्मा राहतात.

भानगड किल्ल्याचा इतिहास – bhangarh fort history in mararthi

भानगड हा किल्ला इ. स. १५७३ मध्ये अंबरच्या राजा भगवान दास यांनी बांधला होता. भानगड हा किल्ला राजा भगवान दास यांनी बांधल्यानंतर पुढील ३०० खूप चांगल्या परिस्थिती मध्ये आणि सुस्थितीत होता. पण ज्यावेळी १६ व्या किवा १५ व्या शतकामध्ये हा किल्ला भानगड ही राजा मानसिंगचा भाऊ माधो सिंग यांची राजधानी बनली आणि माधो सिंग याने आपले वास्तव्य या किल्ल्यामध्ये केले पण ह्या किल्ल्याला एका साधूने आणि जादुगाराने शाप दिल्यामुळे हा किल्ला एका लढाई मध्ये उद्वस्त झाला आणि तेथे भुताटकी देखील आहे असे म्हंटले जाते.

नक्की वाचा: जैसलमैर किल्ला माहिती 

भानगड या किल्ल्याबद्दल सांगितल्या जाणाऱ्या दंतकथा  

  • पहिली दंतकथा :

इतिहासामध्ये या किल्ल्याबद्दल असे म्हणतात की भानगडची राजकन्या रत्नावती दिसायला खूप देखणी होती आणि एक तांत्रिक (जादुगार)  देखील या राणीच्या सौंदर्याने प्रभावित झाला होता आणि त्याने एके दिवशी काय केले कि राजकुमारीसाठी ज्या दुकानातून अत्तर आणले जाते त्या अंतराच्या बाटलीवर जादू केली आणि ती बाटली राजकुमारी कडे पाठवण्यात आली.

राजकुमारीला बाटली मिळाली पण ती बाटली दगडावर पडल्यानंतर ती तुटली. जादूगारानं अशी जादू केली की या बाटलीतील अत्तर जे कोणी लावेल ते जादूगाराच्या च्या प्रेमात पडेल. पण हे अत्तर राजकुमारीने न लावता ते दगडावर पडले. तेव्हा तो दगड जादूगारच्या प्रेमात पडला आणि त्याच्याकडे गेला. पण दगडाने त्या जादूगारला चिरडले त्यावेळी जादुगाराने मरण्यापूर्वी एक शाप दिला तो शाप असा होता कि भानगड पूर्णपणे उद्वस्त होईल. काही काळानंतर येथे झालेल्या युध्दा मुले भानगड नष्ट झाले आणि येथे राहणारे सर्व लोक मरण पावले.

  • दुसरी दंतकथा :

दुसर्‍या कथेनुसार एक भिक्षू येथे राहात होता आणि राजवाडा बांधण्याच्या वेळी त्याने सावधगिरी बाळगू नये म्हणून राजवाडाची उंची कमी ठेवावी असा इशारा दिला होता. परंतु तेथील काम करणाऱ्या कामगारांनी याची काळजी घेतली नाही आणि स्वत: च्या इच्छेप्रमाणे राजवाडा बांधला. त्यावेळी साधूने रागाने शाप दिला ज्यामुळे भानगड उद्ध्वस्त झाला.

  • तिसरी दंतकथा

तिसर्‍या कथेनुसार पाण्याचे कमतरता असल्याने भानगड इ. स. १७२० मध्ये भानगड तसा पाण्याकडून खूप अडचणीत आला होता आणि इ.स. १७८३ मध्ये दुष्काळ पडला आणि त्यामुळे तेथील निवासस्थाने संपली आणि भानगड पूर्णपणे नष्ट झाला.

भानगड किल्ला फोटो:

bhangarh fort story in marathi
bhangarh fort story in marathi

भानगड किल्ल्यावर कसे जायचे ? 

जर तुम्हाला हा किल्ला पाहायला विमानाने जायचे असेल तर या किल्ल्याचे सर्वात जवळचे विमानतळ जयपूर मधील संतेदर विमानतळ आहे. जे भानगड या किल्ल्यापासून ५६ किलो मीटर अंतरावर आहे आणि तेथून तुम्हाला भानगडला जाणारी स्थानिक बस मिळू शकेल किवा तुम्ही टॅक्सीने देखील जावू शकता. जर तुम्ही रेल्वेच्या सहाय्याने भानगड किल्ल्यावर जाण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला भानगडपासून २२ कि.मी.

अंतरावर असलेल्या दौसा रेल्वे स्थानकावर उतरावे लागेल आणि तेथून अगदी सहजपणे तुम्हाला स्थानिक बस मिळू शकेल किवा तुम्ही टॅक्सीने देखील जावू शकता.

नक्की वाचा: झांसी किल्ला माहिती 

भानगड हा किल्ला पर्यटकांच्यासाठी केंव्हा खुला असतो ?

भानगड किल्ला पहाटे ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुला राहतो. सूर्यास्तानंतर कोणालाही इथे जाण्याची परवानगी नाही.

प्रवेश शुल्क : भानगड हा किल्ला पाहण्यासाठी भारतीय पर्यटकांच्या कडून २५ रुपये प्रवेश शुल्क घेतला जातो आणि विदेशी पर्यटकांच्या कडून २०० रुपये प्रवेश शुल्क घेतला जातो. जर तुम्हाला या किल्ल्यावर व्हिडिओ किवा फोटो काढायचे असतील तर २०० रुपये व्हिडिओ कॅमेरा शुल्क घेतला जातो.

सूर्यास्तानंतर या किल्ल्यावर प्रवेश करण्यास मनाई आहे

भानगड हा किल्ला सध्या भारत सरकारच्या ताब्यात आहे आणि या किल्ल्याच्या चारही बाजूला अर्कियोलॉजीकल सर्वे ऑफ इंडिया ( एएसआयइ ) ची एक टीम असते आणि अर्कियोलॉजीकल सर्वे ऑफ इंडिया टीमने सूर्यास्तानंतर या किल्ल्यावर कोणालाही येण्यास मनाई केली आहे.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, भानगड किल्ला bhangarh fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. bhangarh fort story in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about bhangarh fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही भानगड किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या bhangarh fort chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!