सिंहगड उर्फ कोंढाणा किल्ला माहिती Sinhagad Fort Information in Marathi

Sinhagad Fort Information in Marathi सिंहगड उर्फ कोंढाणा किल्ल्याविषयी माहिती सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील डोणजे गावामध्ये आहे. सिंहगड हा किल्ला पुण्यापासून ३० ते ३५ किलो मीटर आहे आणि मुंबई पासून हा किल्ला १८० किलो मीटर आहे. सिंहगड हा किल्ला मध्यम चढाई श्रेणीचा असून हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे आणि हा सह्याद्रीच्या डोंगरावरील भुलेश्वर रांगेवर हा गड विस्तृत आहे. या गडाची उंची समुद्रसपाटी पासून ४४०० फुट उंच असून या किल्ल्यावरून लोहगड, राजगड, पुरंदरविसापूर हे भाग देखील दिसतात. सिंहगड या किल्ल्याला पूर्वीच्या काळी कोंढाणा या नावाने ओळखले जायचे आणि हा किल्ला महाराष्ट्र मधील यादव किवा शिलाहार यांनी बांधला असावा असे काही इतिहासकारांच्या मते म्हटले जाते.

sinhagad fort information in marathi
sinhagad fort information in marathi

सिंहगड किल्ला माहिती – Sinhagad Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावसिंहगड किल्ला (sinhagad fort pune)
जिल्हापुणे
तालुकाहवेली
गावडोणजे
समुद्रसपाटी पासूनची उंची४४०० फुट
प्रकारगिरिदुर्ग
पर्वत रांगासह्याद्रीच्या डोंगरावरील भुलेश्वर रांग
किल्ल्यावरील ठिकाणेतानाजी मालुसरे स्मारक, राजाराम स्मारक, कोंडानेश्वर मंदिर, अमृतेश्वर मंदिर, देवटाके, तानाजी कडा, कल्याण दरवाजा, उदयभानाचे स्मारक आणि टिळक बंगला.

सिंहगड उर्फ कोंढाणा किल्ल्याचा इतिहास – Sinhagad Fort History in Marathi

सिंहगड हा किल्ला मराठा साम्राज्याचा गौरव म्हणून ओळखला जाणारा किल्ला आहे. हा किल्ला महाराष्ट्र मधील यादव किवा शिलाहार यांनी बांधला असावा असे काही इतिहासकारांच्या मते म्हटले जाते. मुहम्मद तुघलक याच्या काळामध्ये हा किल्ला नागनायक राज्याच्या ताब्यात होता. त्यानंतर या किल्ल्यावर अहमदनगरचा संस्थापक मलिक अहमद आणि विजापुरचा सुलतान यांनी या किल्ल्यावर वर्चस्व मिळवले त्याचबरोबर ह्या किल्ल्यावर आदिलशाहीचे देखील वर्चस्व होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले जे मराठा नेते होते पहिला इब्राहीम आदिल शहाचे सेनापती होते आणि त्यांना पुणे हा प्रांत ताब्यात देण्यात आला होता पण छत्रपती संभाजी महाराजांना आपले वडील आदिल शहा समोर झुकतात आणि त्यांना नमन करतात हे आवडत न्हवते मह्नुम्न त्यांनी आपले एक स्वतंत्र स्वराज्य स्थापण्याचा विचार केला आणि त्यांनी आदिल सहाचा सरदार सिद्दी अंबर याला आपल्या मध्ये मिळवून घेवून कोंढाणा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये शामिल करून घेतला पण १६४९ मध्ये आदिल शहाणे शहाजी राजांना कैद केले.

त्याने अशी अट घातली किल्ला कोंढाणा किल्ला जर आमच्या ताब्यात दिला तर आम्ही शहाजी राजांना सोडू आणि म्हणूच छत्रपती शिवाजी महाराजांना कोंढाणा हा किल्ला आदिल शहाला परत द्यावा लागला. या किल्ल्यावर १६६२, १६३ आणि १६६५ मध्ये मुघलांनी हा किल्ला मिळवण्यासाठी हल्ले केले आणि हा किल्ला १६६५ मध्ये मुघल सेनेचे प्रमुख मार्जाराजे जयसिंग यांच्या हाती हा किल्ला गेला पण त्यावेळी शिवाजी महारांजाचे सरदार तानाजी मालुसरे आणि मावळ्यांनी मुघल सैनिकांशी लढाई करून हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केला.

तानाजी मालुसरे लढाई  

सिंहगड हा एक पहाडी किल्ला आहे जो महाराष्ट्रातील पुण्यापासून ३० ते ३५ किलो मीटर लांब आहे. पूर्वी असे म्हटले जायचे कि हा किल्ला ज्याच्या ताब्यात असेल त्याकडे पुणे शहरावर  वर्चस्व देखील असेल. सिंहगड या किल्ल्यावर खूप लढाया झाल्या त्यामधील विशेष म्हणजे १६७० मधील सिंहगड लढाई. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न होते कि हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करू घेण्याचे आणि त्यांनी यासाठी तानाजी मालुसरे या सरदाराला निवडले.

असे म्हणतात कि ज्यावेळी हा किल्ला फत्ते करण्याचा आदेश तानाजी मालुसरे यांना मिळाला त्यावेळी ते आपल्या मुलग्याच्या लग्नाच्या गडबडीत होते पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश मिळतात ते त्या मोहिमेवर जाण्यासाठी तयार झाले त्यावेळी त्यांनी एक वाक्य म्हंटले “आधी लगीन कोंढाण्याच मग माझ्या रायाबच”. तानाजी मालुसरे आपल्यासोबत सैनिक घेवून निघाले आणि ते ४ फेब्रुवारी १६७० या दिवशी ते सिंहगडाजवळ पोहचले.

त्यांनी लढाई साठी रात्रीची वेळ निवडली आणि ते किल्ल्याच्या खाली सर्व सैनिकांच्या सोबत गडाखाली आले. किल्ल्याची तटबंदी उंच असल्यामुळे गडावर चढणे सोपे नव्हते पण तानाजी मालुसरे यांनी आपल्या सोबत एक घोरपड आणली होती तिचे नाव यशवंती असे होते आणि हि छत्रपती शिवाजी महाराजांची आवडती खोरापड होती. त्यांनी या घोरपडीचा उपयोग गड चढण्यासाठी केला. त्या घोरपडीला एक मजबूत दोरी बांधली आणि तिच्या सहाय्याने ३०० सैनिकांनी गड चढला.

तानाजी मालुसरे यांच्या सोबत त्यांचे भाऊ सूर्याजी मालुसरे देखील होते ते कल्याण दरवाजापाशी आपले सैनिक घेवून उभे होते त्यावेळी किल्ल्याची रखवाली सेनापती उदयभान राठोड करत होते. उदयभान याच्या हे सर्व लक्षात आल्यानंतर त्यांच्यामध्ये युध्द सुरु झाले. पण त्यामधील काही मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला आणि सूर्याजी आणि सैनिक आता आले. तानाजी आणि उदयभान यांच्यामध्ये खूप भयाण युध्द झाले.

उदयभान याच्या वाराने तानाजी मालुसरे यांची ढाल तुटली तरीही ते लढत होते आणि ते लढता लढता खूप जखमी झाले आणि जमिनीवर पडले तितक्यात शेलार मामा यांनी उदयभानावर वार केला पण तानाजी मालुसरे जमिनीवर पडलेले पाहून सैनिक इकडे तिकडे पळू लागले त्यावेळी सूर्याजी मालुसरे यांनी सैनिकांनी स्वराज्यासाठी लढा असे सांगितले आणि त्यावेळी सैनिक आपली पूर्ण शक्ती लावून शत्रूवर आक्रमण केले आणि किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला पण या मध्ये तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. हि बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना समजताच ते म्हणाले “गड आला पण सिंह गेला”. त्यावेळी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ किल्ल्याचे कोंढाणा नाव बदलून सिंहगड असे ठेवले.

कोंढाणा किल्ला माहिती – Kondana Killa Information in Marathi

सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा होते. निक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकानुसार कौडण्य ऋषी यांनी येथे तपश्चर्य केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा ठेवण्यात आले होते. याच किल्याचे आताचे नाव सिंहगड हे आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपणीचे मित्र आणि स्वराज्यातील शिवाजी महाराजांचे सरदार म्हणजे तानाजी मालुसरे यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी या किल्ल्यावर वर्चस्व असणाऱ्या मुघल सत्तेशी युध्द झाले त्यावेळी त्यांनी किल्ला जिंकला पण त्यांना त्या लढाई मध्ये वीरमरण आले आणि हि बातमी शिवाजी महाराजांना समजताच ते म्हणाले “गड आला पण सिंह गेला” अश्याप्रकारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे कोंढाणा हे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.

सिंहगड किल्ला फोटो:

sinhagad fort information in marathi
sinhagad fort information in marathi

गडावर पाहण्यासारखी ठिकाणे 

  • कोंढानेश्वर मंदिर :

कोंढानेश्वर मंदिर हे शंकराचे मंदिर आहे जे यादवांच्या काळामध्ये बांधले होते कारण हे त्यांचे कुलदैवत होते आणि हे मंदिर आपल्याला आज देखील गडावर पाहायला मिळते.

  • तानाजी कडा :

तानाजी कडा जेथून तानाजी मालुसरे आपल्या सैनिकांना घेवून चढले होते. हा कडा आपल्याला गडाच्या पश्चिमेच्या भागामध्ये पाहायला मिळतो.

  • तानाजी स्मारक :

या किल्ल्यावर तानाजींची कीर्ती आणि स्मृती आखाड राहावी म्हणू एक स्मारक बांधले आहे. जे आपल्याला अमृतेश्वरच्या मागच्या बाजूने वरती गेल्यास डाव्या बाजूस दिसते.

  • देवटाके :

देवटाके हे एक पाण्याची टाकी आहे ज्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी होतो. देवटाके हे तानाजी स्मारकच्या मागच्या डाव्या बाजूस आपल्याला पाहायला मिळते.

  • अमृतेश्वर मंदिर :

कोंढानेश्वर मंदिर हे एक गडावरील प्राचीन मंदिर आहे जे कोंढानेश्वर मंदिराच्या पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूस आपल्याला पाहायला मिळते. भैरव आणि भैरवी अश्या दोन मुर्त्या या अमृतेश्वर मंदिरामध्ये पाहायला मिळतात.

  • राजाराम स्मारक :

या किल्ल्यावर राजाराम महाराजांचे निधन झाले होते आणि म्हणूनच या गडावर त्याचे स्मारक उभारण्यात आले.

  • इतर ठिकाणे :

टिळक बंगला, कल्याण दरवाजा, पुणे दरवाजा आणि उदयभानचे स्मारक देखील आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळते.

सिंहगड किल्ल्यावर कसे जायचे ?

सिंहगड ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात जवळचे मुख्य शहर म्हणजे पुणे. पुणे आणि सिंहगड किल्ल्याचे अंतर ३० ते ३५ किलो मीटर असल्यामुळे आपण किल्ल्यापर्यंत बस ने किवा टॅक्सी ने जावू शकतो.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, सिंहगड उर्फ कोंढाणा sinhagad fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत.
sinhagad information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information of sinhagad fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही सिंहगड उर्फ कोंढाणा विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या sinhgad killa माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही sinhagad fort pune information in marathi त्यामध्ये नक्की बदल करू.  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!