sahyadri farms information in marathi सह्याद्री फार्म माहिती, सह्याद्री फार्म म्हटल्यानंतर अनेकांना प्रश्न पडतो कि हे काय आहे, त्यामध्ये कोन्त्यः प्रकारचे पिक घेतले जाते आणि याचे नाव सह्याद्री फार्म असे का आहे आणि म्हणून आज आपण या लेखामध्ये सह्याद्री फार्म विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. सह्याद्री फार्म हे एक प्रकारचे फळे आणि भाज्यांसाठी भारतातील सर्वात मोठे एकात्मिक व्यासपीठ आहे. भारतामधील अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा आणि श्रामाचा योग्य मोबदला मिळावी यासाठी सह्याद्री फर्मची सुरुवात झाली आहे.
सह्याद्री फार्म मध्ये १८ हजार पेक्षा अधिक नोंदणीकृत शेतकरी आहेत, तसेच यामध्ये २५० पेक्षा अधिक गावे समाविष्ट आहेत आणि ३० हजार पेक्षा जास्त जमीन या संकल्पनेमध्ये समाविष्ट आहे.
सह्याद्री फार्म याच्या व्हिजनची सुरुवात हि एका आव्हानाने झाली आणि यामध्ये ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न उपलब्ध करून देतानाच ते त्यांच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेतीचे शास्वत मॉडेल सुनिश्चित करू शकतात.
सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड हि भारतातीत सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार, सर्वात मोठी टोमॅटो प्रोसेसर आणि एकमात्र इपीसी कंपनी आहे.
सह्याद्री फार्म्सला फळे आणि भाजीपाला आधारित उत्पादनांची प्रक्रिया करण्याची वाढवणे तसेच कचऱ्यापासून वीज निर्माण करण्यासाठी बायोमास प्लांट उभारणे हे या कंपनीचे मुख्य उदिष्ट आहे. सह्याद्री फार्म हि संकल्पना शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांना व्यावसायिक उद्योजकांच्याप्रमाणे विचार करायला लावणारी आहे.
सह्याद्री फार्म माहिती – Sahyadri Farms Information in Marathi
सह्याद्री फार्म म्हणजे काय ?
सह्याद्री फार्म हे एक प्रकारचे फळे आणि भाज्यांसाठी भारतातील सर्वात मोठे एकात्मिक व्यासपीठ आहे आणि यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा आणि श्रामाचा योग्य मोबदला दिला जातो
सह्याद्री फार्मची स्थापन केंव्हा झाली ?
सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड हे २००१ या साली महसूल मॉडेल म्हणून अस्तित्वात आले आणि ज्यामध्ये शेतकऱ्यांना वाजवी परतावा आणि ग्राहकांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्न मिळवण्याची हमी दिली गेली.
सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड हि ५२ कोटीच्या भांडवल पायासह ८००० शेतकरी सदस्यांच्यासह काम करणारी अग्रगण्य शेतकरी उत्पादक कंपनी आहे.
सह्याद्री फार्म मध्ये किती कर्मचारी काम करतात ?
अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा आणि श्रामाचा योग्य मोबदला मिळावा या उद्देशाने सुरु झालेल्या सह्याद्री फार्म्सने आता त्यांच्या कल्याणकारी दृष्टीचा विस्तार कर्मचाऱ्यांच्यापर्यंत केला आहे. सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड अंतर्गत समाविष्ट कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ४६१ इतकी आहे तर निहित कालावधी हा चार वर्षाचा आहे.
सह्याद्री फार्मचे संचालक मंडळ – board of directors
क्र | संचालकाचे नाव | पद |
1 | विलास शिंदे | अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक |
2 | प्रशांत धीरेंद्र जयकृष्निया | संचालक |
3 | राहुल राय | नामनिर्देशक संचालक |
4 | अझहर तंबूवाला | संचालक |
5 | मदन शिंदे | संचालक |
6 | राजेश सिन्हा | स्वतंत्र्य संचालक |
7 | वंदना चामरीया | स्वतंत्र्य संचालक |
सह्याद्री फार्म कंपनीची आर्थिक माहिती
सह्याद्री फार्म हि फळे आणि भाज्या या सारखे चांगल्या प्रतीचे पिक घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत करते आणि ती मदत आर्थिक स्वरूपातील असते आणि म्हणून खाली आपण सह्याद्री फार्मची थोडीशी आर्थिक माहिती घेवूया.
- सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचा महसूल किंवा उलाढाल १ कोटी ते १०० कोटी इतका आहे.
- २०२२ मध्ये कंपनीच्या एकूण मालमत्तेमध्ये -६१ टक्के ने घट झालेली आहे परंतु कंपनीच्या नेट वर्थमध्ये ११ टक्केने वाढ झालेली आहे.
- त्याचबरोबर सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या दायित्वामध्ये -८२ टक्केने घट झाली आहे.
सह्याद्री फार्म विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- सह्याद्री फार्म मध्ये १८ हजार पेक्षा अधिक नोंदणीकृत शेतकरी आहेत आणि ३० हजार पेक्षा जास्त जमीन हि या संकल्पनेमध्ये समाविष्ट आहे.
- सह्याद्री फार्म या संकल्पनेमध्ये एकूण ९ पिकांचा समावेश आहे.
- सह्याद्री फार्म याची सुरुवात २०१०-२०११ या काळामध्ये सुरु झाली होती आणि हि विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १० द्राक्ष उत्पादकांच्या गटासोबत सुरु झाली होती.
- सह्याद्री फार्मचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे हे आहेत.
- सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक मध्ये आहे.
- अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा आणि श्रामाचा योग्य मोबदला मिळावा हे उदिष्ट डोळ्यासमोर ठेऊन हि कंपनी सुरु झालेली आहे.
- या कंपनीच्या स्थापनेच्या अवघ्या १२ वर्षात, सह्याद्री फार्म हे देशातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यात करणारी कंपनी ठरली आहे.
- सह्याद्री फार्म हि एक अनोखी कंपनी आहे जी मोठ्या शेतकऱ्यांच्या मालकीची कंपनी आहे.
- सह्याद्री फार्म या कंपनीचे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्यातील नाशिक मधील आडगाव या ठिकाणी आहे.
- सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ४६१ एवढी आहे.
- सह्याद्री फार्म या कंपनीची सुरुवातीची गुंतवणूक हि ५२ कोटी इतकी होती.
- हि कंपनी द्राक्षे, भाजीपाला यासारखी ताजी फळे आणि अँटीसेप्टीक पल्प आणि फ्रोझन फ्रुट पल्प या सारख्या प्रक्रिया केलेले पदार्थासह लहान आणि मोठ्या शेतकऱ्यांच्या नेटवर्कमधून फळे आणि भाज्यांची खरेदी, प्रक्रिया आणि मार्केटिंग करते ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने भारताबाहेर निर्यात करतात.
- सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडमध्ये एकूण १८००० पेक्षा अधिक शेतकरी हे नोंदणीकृत आहेत जे यामध्ये ९ प्रकारचे पिक घेतात.
आम्ही दिलेल्या sahyadri farms information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर सह्याद्री फार्म माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Sahyadri farms information in marathi wikipedia या sahyadri farms history in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about sahyadri farms in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Sahyadri farms information in marathi pdf download Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट