मेरी कोम यांची माहिती Mary Kom Information in Marathi

Mary Kom Information in Marathi मेरी कोम या महिला बॉक्सर खेळाडू विषयी माहिती मेरी कोम हि एक लोकप्रिय भारतीय ऑलिम्पिक बॉक्सर आहे जिचा जन्म २४ नोव्हेंबर १९८२ मध्ये मणिपूर मधील कांगाथेई गावामध्ये एका गरीब कुटुंबामध्ये झाला आणि तिचे पूर्ण नाव मांगटे चुंगनीजंग मेरी कॉम असे होते. तिच्या पालकांचे नाव मांगटे टोन्पा कोम आणि मांगटे अखम कोम असे होते. तिचा जन्म अगदी गरीब कुटुंबामध्ये झाल्यामुळे ती अगदी गरिबीमध्ये आणि दुष्काळ परिस्थिती मध्ये वाढली. मेरी कोम हिने आपले शिक्षण मोईरंग येथील लोकटक ख्रिश्चन मॉडेल हायस्कूल आणि सेंट झेवियर कॅथोलिक शाळेमध्ये घेतले.

ती शिक्षण घेत असतानाचा ती वेगवेगळे खेळ खेळण्यात तिला रस वाटू लागला त्यामुळे तिने सर्वप्रथम थाळी फेक आणि गोळा फेक या ऑलिम्पिक खेळामध्ये तिने सहभाग घेतला. त्यानंतर तिला बॉक्सिंग खेळामध्ये खूप रस वाटू लागला त्यामुळे तिने डिंगको सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली बोक्सिंगचे प्रशिक्षण घेतले परंतु हे तिचे वडील टोन्पा कोम यांना आवडले नाही.

कारण त्यांना असे वाटले कि बॉक्सिंग हा खेळ पुरुष खेळ आहे. त्यामुळे मेरी कोम ला या प्रवासामध्ये तिच्या वडिलांचा हवा तसा पाठींबा मिळाला नाही. अश्या सर्व संकटाचा सामना करत ती जिद्दीने पुढे आली आणि आता ती भारतातील एक लोकप्रिय महिला ऑलिम्पिक बॉक्सर आहे.

mary kom information in marathi
mary kom information in marathi

मेरी कोम या महिला बॉक्सर खेळाडू विषयी माहिती – Mary Kom Information in Marathi

पूर्ण नावमांगटे चुंगनीजंग मेरी कॉम
जन्म२४ नोव्हेंबर १९८२
जन्म ठिकाणकांगाथेई गाव, मणिपूर, भारत
उंची१.५८ मीटर (५ फूट २ इंच)
वजन४७ ते ४८ किलो
पालकमांगटे टोन्पा कोम आणि मांगटे अखम कोम
जोडीदारके ऑनलर कॉम
प्रशिक्षकछोटे लाल यादव
ओळखमहिला बॉक्सर किंवा भारतीय ऑलिम्पिक महिला बॉक्सर

मेरी कोम कोण होती ? 

मेरी कोम हि एक लोकप्रिय आणि प्रसिध्द बॉक्सर आणि क्रीडा महिला खेळाडू होती जिने तिच्या महत्वपूर्ण कामिगीरीमुळे भारताचे नाव उंचावले. २०१२ मध्ये झालेल्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पात्रता मिळवून तिने त्यामध्ये कांस्य पदक हि पटकावले आणि हे कांस्यपदक मिळवणारी हि एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे.

त्याचबरोबर मेरी कोम हि पाच वेळा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन बनली आणि सहा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवणारी एकमेव महिला बॉक्सर आहे. तसेच तिने खेळाच्या व्यावसायिक जगामध्ये प्रवेश केल्यानंतर तिने आपले नाव मेरी असे निवडले आणि उच्चारण्यास देखील सोपे होते.

अश्या प्रकारे ती बॉक्सिंग खेळामध्ये यशस्वी कामगिरी करत लोकप्रिय होऊ लागली. तसेच २०१४ मध्ये हिच्या जीवनावर आधारित एक चित्रपट देखील आला आहे त्याचे नाव देखील मेरी कोम (mary kom) असे आहे ज्यामध्ये प्रियांका चोप्रा हिने मेरी कोम हिची भूमिका बजावली आहे.

बालपण आणि प्रारंभिक जीवन 

मेरी कोम जन्म २४ नोव्हेंबर १९८२ मध्ये मणिपूर मधील कांगाथेई गावामध्ये एका गरीब कुटुंबामध्ये झाला आणि तिचे पूर्ण नाव मांगटे चुंगनीजंग मेरी कॉम असे होते. तिच्या पालकांचे नाव मांगटे टोन्पा कोम आणि मांगटे अखम कोम असे होते. मणिपूर हा भाग सात दुष्काळी भागांमधील एक असून मेरी कोम हिचे कांगाथेई गाव देखील मणिपूर भागामध्येच येत होते.

त्यामुळे मेरी कोम हिचे लहान पण दुष्काळी भागामध्ये गेले तसेच ती गरिबीमध्ये वाढली आणि तिचे आई वडील शेतकरी होते म्हणजेच ती शेतकरी कुटुंबातील होती. मेरी कोम हिला चार भावड होती पण हि त्यांच्यामध्ये सर्वात मोठी होती त्यामुळे तिच्यावर अगदी लहानपणीच कुटुंबाची जबाबदारी आली.

लहानपणीच कुटुंबाची आणि भावडांची जबाबदारी आल्यामुळे तिला आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही. तिने आपले शालेय शिक्षण मोईरंग येथील लोकटक ख्रिश्चन मॉडेल हायस्कूल आणि सेंट झेवियर कॅथोलिक शाळेमध्ये घेतले पण तिने मधेच आपले शिक्षण सोडले. ज्यावेळी ती विद्यार्थिनी होती त्यावेळी तिने अॅथलेटिक्समध्ये उत्सुकता दाखवली आणि फुटबॉल सारख्या खेळांमध्ये भाग घेतला पण ती विद्यार्थिनी असताना ते बॉक्सिंग मध्ये कधीच भाग घेतला नव्हता.

इ. स १९९८ मध्ये बॉक्सर डिंगको सिंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंग मध्ये सुवर्ण पदक जिंकले आणि डिंगको सिंग हे मणिपूर भागातील होते. या घटनेमुळे मेरी कोन ला प्रेरणा मिळाली आणि त्यामुळे तिने निश्चय केला कि आपणही बॉक्सिंग शिकायचे आणि त्यामध्ये आपले भविष्य घडवायचे.

त्यानंतर तिला बॉक्सिंग खेळामध्ये खूप रस वाटू लागला त्यामुळे तिने डिंगको सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली बोक्सिंगचे प्रशिक्षण घेतले परंतु हे तिचे वडील टोन्पा कोम यांना आवडले नाही कारण त्यांना असे वाटले कि बॉक्सिंग हा खेळ पुरुष खेळ आहे.

त्यामुळे मेरी कोम ला या प्रवासामध्ये तिच्या वडिलांचा हवा तसा पाठींबा मिळाला नाही. अश्या सर्व संकटाचा सामना करत ती जिद्दीने पुढे आली आणि आता ती भारतातील एक लोकप्रिय महिला ऑलिम्पिक बॉक्सर आहे.

मेरी कोम हिची बॉक्सिंग मधील कामगिरी 

  • कोरियाच्या इंचियोन येथे २०१४ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॉक्सर होती.
  • तसेच तिने सामायिक राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकून ती हे जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली.
  • २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये भाग घेताना उन्हाळी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी एकमेव भारतीय महिला बॉक्सर बनली.
  • आशियाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सहा वेळा विक्रमी विजय मिळवून आशियाई बॉक्सिंग चॅम्पियन बनणारी ती एकमेव महिला बॉक्सर आहे.
  • त्याचबरोबर मेरी कोम हि पाच वेळा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन बनली आणि सहा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवणारी एकमेव महिला बॉक्सर आहे.
  • मेरी कोम हि आशियाई क्रीडा स्पर्धा २०१४ मध्ये दक्षिण कोरिया मध्ये आणि २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा मध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर आहे.
  • २०१८ मध्ये ४५ ते ४८ किलो महिलांच्या गटामध्ये रशियाच्या पल्टसेवा एकटेरिनासह ५०० गुणांसोबत एक नंबर क्रमांकावर आली.
  • तसेच मेरी कोम हिने ५१ किलो फ्लायवेट या प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे.

मेरी कोमला बॉक्सिंगसाठी मिळालेले पुरस्कार 

वर्षपुरस्कार
२००३अर्जुन पुरस्कार (बॉक्सिंग)
२००६पद्मश्री (क्रीडा)
२००९राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार
२०१३पद्म भूषण (क्रीडा)
२०२०पद्म विभूषण (क्रीडा)

मेरी कोम हिच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना 

  • मेरी कोम हिने शालेय शिक्षण मोईरंग येथील लोकटक ख्रिश्चन मॉडेल हायस्कूल आणि सेंट झेवियर कॅथोलिक शाळेमध्ये घेतले पण तिने मधेच आपले शिक्षण सोडले तिने नंतर शालेय शिक्षण पर्यायी मार्गाने पूर्ण केले आणि पदवी देखील पूर्ण केली.
  • इ. स १९९८ मध्ये बॉक्सर डिंगको सिंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंग मध्ये सुवर्ण पदक जिंकले आणि डिंगको सिंग हे मणिपूर भागातील होते आणि या घटनेमुळे मेरी कोम ला बॉक्सिंग मध्ये रस वाटू लागला.
  • मुलगी म्हणून तिला तिच्या पालकांकडून बॉक्सिंगच्या करिअर मध्ये तीव्र विरोध झाला कारण त्यांना असे वाटले कि बॉक्सिंग हा खेळ पुरुष खेळ आहे आणि तो खेळ मुली खेळू शकत नाहीत.
  • आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बॉक्सर आहे.
  • २०१२ मध्ये झालेल्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पात्रता मिळवून तिने त्यामध्ये कांस्य पदक हि पटकावले आणि हे कांस्यपदक मिळवणारी हि एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे.
  • मेरी कोम हि पद्म भूषण पुरस्कार पटकवनारी पाहिली भारतीय बॉक्सर खेळाडू आहे.
  • सध्या ती प्राण्याच्या हक्काची समर्थक म्हणून काम करते.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये mary kom information in marathi 2018 काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर information of mary kom in marathi म्हणजेच “महिला बॉक्सर मेरी कोम यांची माहिती” mary kom information in marathi pdf यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या महिला बॉक्सर मेरी कोम या  article मध्ये upadate करू. मित्रांनो हि mary kom boxer information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!