संत बहिणाबाई माहिती Sant Bahinabai Information In Marathi

sant bahinabai information in marathi वारकरी संप्रदायातील मराठी स्त्री संत कवयित्री आणि संत तुकारामांच्या शिष्या म्हणजे संत बहिणाबाई. स्त्री संत मालिकेतील अग्रेसर मुक्ताबाई, कान्होपात्रा, जनाबाई, वेणाबाई, आक्काबाई, मीराबाई यांसह बहिनाबाईंचे स्थान आहे. संत बहिणाबाई sant bahinabai संत तुकाराम महाराजांच्या समकालीन पण पुढच्या पिढीतल्या होत्या.

sant-bahinabai-information-in-marathi
sant bahinabai information in marathi/sant bahinabai /sant bahinabai abhang

प्रपंच परमार्थ चालवी समान

तिनेच गगन झेलियले |

हे त्यांचेच उद्गार सार्थ करून दाखविणाऱ्या थोर कवी संत बहिणाबाई.

जीवन परिचय (Sant Bahinabai Information In Marathi)

नावसंत बहिणाबाई पाठक
जन्म  ई.स. 1628 (शके 1551)
गाव कन्नड तालुक्यातील वेळगंगा नदीच्या काठी वसलेल्या देवगाव
पती रत्नाकर पाठक
आईजानकी कुलकर्णी
वडीलआउजी कुलकर्णी
मृत्यू2 ऑक्टोबर 2700 (जळगाव जिल्ह्यातील कोथळी)

बहिनाबाईंचा जन्म, गोदावरीच्या उत्तरेस घृष्णेश्वराच्या पश्चिमेस, कन्नड तालुक्यातील वेळगंगा नदीच्या काठी वसलेल्या देवगाव येथे ई.स. १६२८ (शके १५५१) मध्ये कुलकर्णी दाम्पत्याच्या पोटी झाला. तिच्या आईचे नाव जानकी व पित्याचे नाव आऊजी. त्यांचा विवाह वयाच्या ५ व्या वर्षी ३० वर्षाच्या रत्नाकर पाठक नावाच्या बिजवराशी लावून दिला. त्यांना आधीची दोन मुले होती.

संत बहिणाबाईंना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. कथा-कीर्तने, पुराण-श्रवण आणि सत्पुरुषांची सेवा यात त्या रमल्या होत्या. त्यांची संसारावरील आसक्ती कमी होऊन पारमार्थिक वृत्ती वाढत गेली. घरची गरिबी, शिक्षणाचा अभाव, तरीही समाधानी वृत्ती व संतवृत्तीला साजेशी पांडुरंगाची ओढ मनात होती. कोणतेही काम करत असताना भक्तिभावाने सतत नामस्मरण सुरु असे. शेतात काम करत असताना त्यांचा भक्तीभाव अभंगाच्या रूपातून त्यांच्या मुखातून बाहेर पडत असत.  

संत बहिणाबाई कोल्हापूर येथे वास्तव्यात असताना जयराम स्वामींच्या कथा-कीर्तनाचा त्यांच्या मनावर प्रभाव पडला. त्या रोज तुकारामांचे अभंग म्हणू लागल्या व त्यांनी तुकारामांच्या दर्शनाचा ध्यास घेतला. तिला तुकोबारायांना सद्गुरू करून त्यांचे अनुग्रह व आशीर्वाद घ्यावयाचा होता. म्हणून रात्रंदिवस तुकोबाचे अभंग म्हणत त्या त्यांचे ध्यान करू लागल्या. भेटीपुर्वीच तुकोबारायांचे वैकुंठगमन झाल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. परंतु त्यांची निष्ठा पाहून तुकोबारायांनी कार्तिक वद्य ५ शके १५६९ रोजी स्वप्नात येऊन तिला साक्षात दर्शन व गुरुपदेश दिला.

बहिणी म्हणे तुका सद्गुरू सहोदर |

भेटता अपार सुख होय ||  

संत बहिणाबाईंचे सारे जीवन गुरुबोधामुळे बदलून गेले. त्यांनी आपले गुरु संत तुकाराम महाराज व त्यांचीही गुरुपरंपरा आपल्या अभंगांत वर्णन केली आहे. तुकोबारायांची प्रत्यक्ष माहिती असलेल्या बहिणाबाईंचे अभंग असल्यामुळे या अभंगांना फार आगळवेगळ महत्व आहे. बहिणाबाईंचे वर्णन करताना गेल्या शतकातील एक श्रेष्ठ संतकवी ‘दासगणू महाराज’ लिहितात ‘पहा केवढा अधिकार..ऋणी तिचा परमेश्वर..’

चमत्कार  (sant bahinabai information in marathi)

असे सांगितले जाते कि बहिणाबाईंना त्यांच्या पूर्वीच्या बारा जन्मांचे स्मरण होते. तेरावा जन्म स्त्रीचा म्हणजे बहिणाबाईचा होय. त्यांनी आपल्या बारा जन्माचे पस्तीस अभंग आपल्या मुलाला सांगितले.

बहिणाबाई कायम विठूरायाच्या भेटीकरता वारीत जात असत. एकदा एकादशीच्या वारीकरिता पंढरीला निघालेल्या बहिणाबाईंना अचानक थंडी वाजून ताप भरला. परंतु पांडुरंगाच्या भेटीची एवडी तळमळ कि त्यांनी अंगावरच्या फाटक्या घोंगडीला विनंती केली. “ही माझी हुडहुडी तात्पुरती तुझ्याजवळ ठेव. एवढी वारी करून येईन आणि मग माझा भोग भोगीन.” घोंगडी त्यांनी झाडावर ठेवली व त्या वरीस निघून गेल्या. त्या सुखरूप परत येईपर्यंत ते झाड हिंव भरल्यासारखे थडथड हालत होते.

एका दिवशी बहिणाबाई रामाच्या मंदिरात पूजा करत होत्या त्यावेळेस रामदास स्वामींनी बहिणाबाईंना दिलेल्या हनुमानाच्या मूर्तीने तोंड उघडले व बहिणाबाईंच्या हाताने तीर्थ पिले सध्या ती मूर्ति शिरूर गावातील त्यांच्या निवासस्थानी मंदिरात सुखरूप आहे.

 

संत बहिणाबाईंचे सुप्रसिद्ध अभंग / रचना (bahinabai abhang)

संत कृपा झाली इमारत फळा आली |                                        

ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया |                                        

नामा तयाचा किंकर तेणे विस्तरिले आवार |                              

जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत |                             

तुका झालासे कळस भजन करा सावकाश |                              

बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा ||

अभंग, ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी मिळून ७३२ कविता संत बहिणाबाईच्या नावावर आहेत. त्यांच्या या कविता भक्तीभावाचा उत्स्फूर्त अविष्कार आहे. वेदांताचे प्रतिपादनही त्यात आढळते. त्यांच्या अभंगातून तुकारामांच्या चारित्र्याचे अस्सल दर्शन घडते. बहिणाबाईंनी आपल्या अभंगातून ‘ब्राम्हण कोण’ हा विषय उपस्थित करून ब्राम्हण आणि ब्राम्हणी सनातनी वृत्तीवर स्वतः ब्राम्हण असून त्या काळात सडेतोड टीका केली. बहिणाबाईंची काव्यशैली साधी, सरळ परंतु हृदयस्पर्शी अशी आहे.

संत बहिणाबाईंचे कविता संग्रह  

‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहोरांचा हंडा आहे’, अश्या शब्दात आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता. बहिणाबाईंच्या कविता खानदेशातील त्यांच्या मातृबोलीत रचिलेल्या आहेत. त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार, आई;

अरे संसार संसार –जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके –तव्हा मीयते भाकर

“लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते”

“अरे खोप्यामधी खोपा”

“मन वढाळ वढाळ, उभ्या पिकातलं ढोर |”

तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्वज्ञान ही त्यांची कवितांची वैशिष्ट्ये होत.

आला सास गेला सास, जीवा तुझं रें तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर!

शेतीची साधने, कापणी, मळणी ईत्यादि कृषीजीवानातील विविध प्रसंग;

“असा राजा शेतकरी, चालला रें आलवानी | देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी ||”

“माझी माय सरसोती माले शिकवते बोली” या कवितेतून अशिक्षित स्त्रीची भावना मांडली आहे.

“माहेरची वाट” या कवितेमध्ये लग्न झालेली मुलगी माहेरी जाण्यासाठी किती व्याकूळ असते ते सांगितला आहे.

अक्षय्य तृतीया, पोळा, पाढवा इत्यादी सनसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत.

संत बहिणाबाई यांचा मृत्यू 

घट फुटलियावरी | नभ नभाचे अंतरी ||   

हा शेवटचा अभंग सांगितल्यावर २ ऑक्टोबर १७०० साली संत बहिणाबाई समाधिस्त झाल्या. या साध्वीची समाधी शिऊर येथे आहे.

आम्ही दिलेल्या sant bahinabai information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर  संत बहिणाबाई यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant bahinabai information in marathi in short या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sant bahinabai माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर bahinabai abhang असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!