“परलोकीचे तारू | म्हणे माझा ज्ञानेश्वरु |”
sant janabai information in marathi असे संत ज्ञानेश्वर माउलींचे गुणगान करणाऱ्या वारकरी संप्रदायातील महान संत कवयित्री, महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना ज्यांच्या ओव्या गातात त्या म्हणजे ‘संत जनाबाई’. अतिशय सामन्यातली सामान्य, अशी ओळख, पण आयुष्यभर मोलकरणीच कान करणाऱ्या एका दासीनं एक असामान्य काम केले ते म्हणजे, तिनं काळजाचा ठाव घेणारे अभंग लिहिले. ‘दास्यभावाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संत जनाबाई’. शेकडो वर्षे महाराष्ट्राच्या मुखात दोन संतांचे अभंग खडीसाखरेप्रमाने घोलातायेत. आणि ते म्हणजे संत तुकोबाराय आणि संत जनाबाईचे गोड अभंग. संत कवयित्री म्हणून संत जनाबाई या जनमानसात लोकप्रिय आहेत.(sant janabai in marathi)
संत जनाबाई यांची माहिती (Sant Janabai Information In Marathi)
नाव | जनाबाई |
जन्म | अंदाजे सुमारे ई.स. 1258 |
गाव | परभणी येथील गंगाखेड |
आई | करुंड |
वडील | दमा |
मृत्यू | ई.स. 1350 |
संत जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत कवयित्री होत्या. जनाबाईंचा जन्म अंदाजे ई.स. १२५८ रोजी परभणी येथील गंगाखेड येथील विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. त्यांचे वडील दमा आणि त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच जनाबाईंना परमात्म्याविषयी त्याच्या भक्तीविषयी गोडी निर्माण झाली होती.
“माझ्या वडिलांचे दैवत | तो हा पंढरीनाथ ||”
या जनाबाईंच्या ओळीवरून त्यांचे वडील देखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. जनाबाईंच्या वडिलांनी त्यांना संत नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. जनाबाईंच्या लाघवी आणि देवभक्त स्वभावामुळे त्या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वतःला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत. संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता.
“दळिता कांडिता तुज गाईन अनंता”
असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरु होते. संत नामदेवांच्या घरात वावरताना जनाबाईचे विश्व तरी केवढे असणार? अंगण, तुळशीवृंदावन, शेण गौऱ्या वेचायची जागा, कोठार, माजघर. या शब्दांचा उल्लेख जनाबाईंच्या ओव्यांमधून आपल्याला होताना दिसतो. या रोज गाठ पडणाऱ्या गोष्टींमध्ये तिला परमेश्वर दिसतो, भेटतो यातच ती भगवंताला शोधते. कोणतेही काम करत असताना त्या सतत परमेश्वराचं नामस्मरण करत असत, त्या विठ्ठलनामात एवढ्या तल्लीन होऊन जात असत कि ते कार्य त्यांच्याकरता देवाचं कार्य होऊन जात असे, प्रत्यक्ष विठ्ठल त्यांना कामात सहाय्य करत असे.
संत जनाबाई अभंग संकलन (sant janabai abhang in marathi)
“झाडलोट करी जनी | केर भरी चक्रपाणी ||
पाटी घेऊनियां शिरी | नेउनियां टाकी दुरी ||
ऐसा भक्तिशी भुलला | नीच कामें करू लागला ||
जनी म्हणे विठोबाला | काय उतराई होऊ तुला ||”
जनाबाई म्हणतात, मी झाडलोट केली तर श्रीहरी केर उचलतो, दूर जाऊन फेकून देतो. माझ्या भक्तीला माझा विठ्ठल असा भुलला कि माझी सगळी कामें तो करू लागला. याची परतफेड मी कशी आणि कोणत्या प्रकारे करणार आहे? विठ्ठला मी तुला कशी उतराई होऊ. पांडुरंगाच्या देवाळासमोरच झोपडीत राहणाऱ्या गरीब जनाबाईने देवाच्या गळ्यातले पदक चोरले, असा आरोप तिच्यावर होतो, मग आपण सोन्यानाण्याची नव्हे तर विठूरायाची चोरी केली आणि त्याला हृदयात बंदिस्त केल्याचे ‘धरिला पंढरीचा चोर’ या अभंगातून ती सांगते. ‘माझे अचडे बचडे छकुडे गं राधे रुपडे’ सारखे तिचे श्री विठ्ठलाच्या वास्तल्याचे ओतपोत भरलेले अभंग तर अप्रतिम ठरलेत.
“विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा ||”
संत जनाबाईना संत संग हा नामदेवांमुळे लाभला. श्री संत ज्ञानेश्वर… संत विसोबा खेचर… संत नामदेव… संत जनाबाई अशी ही गुरु परंपरा आपल्याला पाहायला मिळते.
जनाबाईला जातं ओढू लागणाऱ्या विठ्ठलाची मूर्ति, तिच्या सर्व घरकामात मदत करणारा विठूराया, दासी जनीचं संत कबीरांनी केलेलं कौतुक, असे प्रसंग हे संत जनाबाईंच्या जन्मस्थळी गंगाखेड येथे त्यांच्या समाधी स्थळी चितारण्यात आले आहेत.
संत जनाबाईंची साहित्यरचना (sant janabai in marathi)
संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा मध्ये मुद्रित केले आहेत. ह्या शिवाय कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा, हरीश्चंद्राख्यान अशा आख्यानरचना पण त्यांच्या नावावर आहेत. संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रोपदी स्वयंवर या भावमधुर आख्यानांनी संत एकनाथांचे नातू महाकवी मुक्तेश्वराना स्फूर्ती मिळाली.
संत जनाबाईची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतपोत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. त्यांच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांमधून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ती-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तीभाव त्यांच्या काव्यात ओतपोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. ‘वास्तल्य, कोमल ऋतुजा, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात,’ असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे हे जनाबाईंच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात. तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत सेना महाराज आदि सत्पुरुषांच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत. ‘नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे’ हा जनाबाईंचा अभंग गात वारकरी पंढरीची वात चालतात.
मृत्यू
जनाबाईंच्या मनातील श्रेष्ठ गुरुभाव ही तिची शक्ती होती. आयुष्यभर नामदेवांच्या भक्तिमार्गाच्या पाऊलखुणांवरून प्रवास करणारी जनाबाई अखेरच्या क्षणीदेखील गुरूची सावली बनून राहिली. ई.स. १३५० मध्ये आषाढ महिन्यात, कृष्ण त्रयोदशीला नामदेवांनी देह ठेवला. संत जनाबाई देखील श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ (ई. स. १३५०) या दिवशी समाधिस्त होऊन पाडुरंगात विलीन झाल्या.
आम्ही दिलेल्या information of sant janabai in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर संत जनाबाई यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant janabai information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sant janabai in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर sant janabai che abhang असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
EXCELLENT
प्रतिसादाबद्दल धन्यवाद