कृष्णभक्त संत मीराबाई चरित्र Sant Mirabai Information In Marathi

sant mirabai information in marathi मध्ययुगीन भारतातील एक श्रेष्ठ कृष्णभक्त संत कवयित्री, राजघराण्यात जन्माला येऊनही विरक्त भावाने कृष्णभक्तीत रमलेली आणि अतोनात छळ आनंदाने सोसून कृष्णातच विलीन झालेली थोर संत म्हणजे संत मीराबाई...संत मीराबाई ही राजस्थान मधील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती.(meera bai wikipedia)

संत मीराबाईंचा जन्म १४९८ ला राजस्थान मधील नागौर जिल्ह्यातील कुडकी या गावात रजपूत कुटुंबात झाला. राव दुदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दुदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते. लहान वयातच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दुदाजी या तिच्या आजोबांच्या छत्रछायेखालीच मीरेचे बालपण व्यतीत झाले.

संत गाडगेबाबा माहिती 

sant-mirabai-information-in-marathi
sant mirabai information in marathi

संत मीराबाई माहिती (Sant Mirabai Information In Marathi)

नावमिराबाई
जन्म सुमारे 1498
गाव राजस्थान मधील नागौर जिल्ह्यातील कुडकी
पतीचित्तोड चे राणा सांगा यांचे पुत्र भोजराज
वडीलरतनसिंह
मृत्यूसुमारे १५४७

एका आख्यायिकेनुसार बालपणी एका लग्नाची वरात घरासमोरून जाताना पाहून “माझा विवाह कोणाशी होणार ?” असे मीरेने आईस विचारले असता, आईने श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे बोट दाखवून “हा तुझा पती” असे सांगितले. छोट्याश्या मीरावर या गोष्टीचा एवढा प्रभाव पडला कि तिचे जीवनच कृष्णमय झाले. अजाणत्या वयातच ती कृष्ण्प्रेमात बुडून गेली. जळी स्थळी काष्ठी पाषाणी तिला गोवर्धन गिरिधारी दिसू लागला. तिच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती मीराला खूप आवडली. तिच्या हट्टाने तिने ती मूर्ती स्वतःकडे ठेवून घेतली. मीरा ‘मूर्तीप्रेमी’ बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते. सदैव पाण्यात राहूनही कोरडे राहणाऱ्या कमलदलासारखी निर्लेप वृत्ती घेवूनच ती जगली. एकच ध्यास आयुष्यभर होता. एकच आस कायम मनात होती, त्या गिरिधर गोपाळाच्या चरणकमळाची. तिला मोहात पाडणारी एकच गोष्ट होती या जगात…

            “मेरे तो गिरधर गोपाल, दुसरा न कोय

            जाके सिर मोरमुकुट मेरो पति सोई”  

लहान वयातच चित्तोडचा राजा राणा संग यांचा राजपुत्र भोज यांच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असलेल्या मीराला हा विवाह पसंद नव्हता. ई.स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराजा मारला गेला. त्यावेळीपासून क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे लक्ष देण्यास मीराने सुरुवात केली. आणि दुःखाचे रुपांतर निस्सीम अध्यात्मिक भक्तीत केले. ती रात्रंदिवस श्रीकृष्णाच्या चिंतनात निमग्न राहत असे. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.

संत ज्ञानेश्वरांची माहिती 

ही धरती आणि आकाश यांच्यामध्ये जे काही आहे ते नश्वर आहे. मंग त्याचा मोह कशाला हवा? केवळ संन्यास घेवून मोक्ष मिळत नाही. मोक्षासाठी आवश्यक असते ते परमात्म्याशी मिलन, ते समर्पण. म्हणूनच शेवटी हरीलाच मीराबाई विनंती करते कि “हे परमेश्वरा मला या भावचक्राच्या फेऱ्यात अडकवू नकोस, मला तुझ्या पायाशी जागा दे. अन्य काही नको !”

सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. भोज राजाच्या मृत्युनंतर त्यांचा लहान भाऊ विक्रमादित्य सिंहासनी विराजमान झाला. अंतःपुरवासिनी राजपत्नीने असे वागणे तत्कालीन लोकांना रुचले नाही. त्यामुळे राजाने मीरेला विषबादा करविण्याचे अनेक प्रयत्न केले असे म्हटले जाते. मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मनाने केली होती. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते.

आख्यायिका

  • फुलांच्या टोपलीतून एक विषारी साप लपवून ईश्वराने दिलेली भेट आहे मीरेला सांगितले. मीराबाईने टोपली उघडून तो साप हसत हसत स्वतःच्या गळ्यात घातला. त्याच क्षणी श्रीकृष्णाच्या कृपेने त्या सापाचे पुष्पहारात रुपांतर झाले.
  • विषबाधीत केलेला नैवैद्य ज्यावेळी मीराबाईने श्रीकृष्णाला दाखवला आणि प्रसाद म्हणून तो ग्रहण केला तेव्हा श्रीकृष्णाची मूर्ती विषामुळे हिरवी झाली परंतु मीराबाईला काहीही बाधा झाली नाही. हे पाहून मीराबाईला खूप वाईट वाटले आणि तिने पूर्ववत होण्यासाठी प्रार्थना केली, भगवान पूर्ववत मूर्ती रुपात प्रकट झाले.
  • मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो, ‘शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरा सुलाय | सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फुल बिछाय’.

रैदास यांना मीराबाईनी आपले गुरु मानले होते (‘गुरु मिलिया रेदासजी’) आणि वृंदावन सोडले. रैदास, वल्लभासम्प्रदायी विठ्ठलनाथ, तुलसीदास, जीवगोस्वामी इ. नावे मीरेचे दीक्षागुरु म्हणून घेतली जातात. कृष्ण्प्रेमापोटी वेडी झालेली ललिता या गोपिकेचा आपण पुनर्जन्म आहोत असं मिराबाईला वाटू लागले होते. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी अध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रम्हचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर “श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे” असं उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात संत मीराबाई फिरल्या.

मिराबाई च्या जन्मस्थळावर आपोआप उगवतात तुळशी

कुडकी या मीराबाईच्या जन्म स्थळावर  एक चमत्कार पाहायला मिळतो. येथील गडावर तुळस लावली नाही तरी आपोआप उगवते. जिथे बसून मीरेने कृष्णाची आराधना केली होती तिथेही तुळस बहरली आहे.  

काव्यरचना

श्रीकृष्णांची परमभक्त मीराबाईने १६ व्या शतकात १३०० भजन/अभंग लिहून ठेवले आहेत. 

पदावली मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. राजस्थानी आणि ब्रज भाषेत मिरेच्या रचना आढळतात. मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे. तिची पदे आजही गायली जातात.

मीराबाईने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यराचानेवर आधारित टीका लिहीली.

मीराबाईने राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.   

संत एकनाथांची माहिती

मृत्यू

गुजरातमधील द्वारका इथे मीराबाईने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. संत मीराबाईचा मृत्यू सुमारे १५४७ ला झाल्याचा अभ्यासिकांचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे. 

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

संत नामदेवांची माहिती 

मित्रानो तुमच्याकडे जर कृष्णभक्त संत मीराबाई यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant mirabai information in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि meera bai wikipedia माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर sant mirabai information in marathi language असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!