sant kanhopatra information in marathi महाराष्ट्राच्या भूमीला प्रतिभावंत संतांची समृद्ध परंपरा लाभल्यामुळे इथल्या लोकसंस्कृतीला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, अध्यात्मिक विचारांचा वसा-वारसा मिळाला. भागवत संप्रदायाची पताका फडकवणारे आणि त्यांच्या तत्वप्रणालीची रुजवणूक करताना आपले आयुष्य पणाला लावणारे अनेक संत महाराष्ट्राच्या भूमीला लाभले. त्याच परंपरेची एक महत्वाची कवयित्री संत कान्होपात्रा. ईश्वराने निर्माण केलेल्या अनेक सुंदर रत्नांपैकी एक रत्न अचानकपणे भूलोकावरील गणिकेच्या घरात पडले होते, ते रत्न म्हणजे संत कान्होपात्रा.

संत कान्होपात्रा जीवन परिचय sant kanhopatra information in marathi
नाव | संत कान्होपात्रा |
जन्म | शके १३९० (१५ वे शतक ) |
जन्मस्थळ | मंगळवेढा, महाराष्ट्र |
निर्वाण | ई.स. १५ वे शतक, पंढरपूर, महाराष्ट्र |
संप्रदाय | वारकरी संप्रदाय |
साहित्यरचना | अभंग |
भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर पासून अवघ्या २२ कि.मी. अंतरावर असणाऱ्या मंगळवेढा या गावी शके १३९० (१५ वे शतक ) साली श्यामा नायकिणीच्या पोटी ‘कान्होपात्रा’ चा जन्म झाला. शामा या नाचगाण करणाऱ्या गणिकेकडे अनेक प्रतिष्ठितांचे येणे जाणे होते. गणिकेच्या कुळात जन्माला येऊन, विठ्ठलभक्तीची आस मनात बाळगणाऱ्या संत कान्होपात्रा या रूपाने अत्यंत सुंदर व लावण्यवती होत्या. त्यांना पाहणाऱ्या प्रत्येकाला असे वाटत होते कि, जणू स्वर्गातील कोणी देवताच भूतलावर अवतरली आहे.
अभंगांची गोडी
संत कान्होपात्रा यांचे ३३ अभंग ‘सकल संत गाथा’ या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत.
कान्होपात्रा थोड्या मोठ्या झाल्यावर त्यांना त्यांच्या आईने नृत्य आणि गायनाचे शिक्षण दिले. कान्होपात्राना आईने अनेक गाणी व भजने शिकवली. आईने शिकवलेल्या सर्व गाण्यांमध्ये कान्होपात्राना परमेश्वराच्या भक्तीने पुरेपूर भरलेली भजने खूप आवडायची. अशी भजने म्हणत असताना त्या भान हरपून जायच्या.
जेव्हा त्या श्रीकृष्णांनी केलेल्या लीला आपल्या काव्यातून व्यक्त करायच्या, तेव्हा त्यांना एका वेगळ्याच अलौकिक सुखाची अनुभूती व्हायची. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेले अभंग, विरहीण्या, त्यांना आवडायच्या. संत नामदेव महाराजांनी कृष्णाच्या बालक्रीडेवर रचलेले अभंग गात असल्यामुळे त्यांचे अंतःकरण हे कृष्णमय होऊन गेले होते. कृष्णाचे सावळे रूप कान्होपात्रांच्या मनीं- मानसीं विराजमान झाले होते. नामदेव महाराजांनी रचलेल्या कृष्णाच्या सावळ्या रूपाचे वर्णन केलेले अभंग गात असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागत असत. जणू ते अश्रू कान्होपात्रांच्या भावनाच व्यक्त करीत आहेत असे वाटायचे. त्या गहिवरलेल्या आवाजात म्हणायच्या,
“मल्हार माहुडे गगनी दाटलें | बिजू खळे गर्जिन्नले गे माय ||
गोविंद पहाया लौकरी | कैसे वरुशताहे मधू धारी गे माय ||
आनंदे मयूरें नाचती आपैसे | प्रेम नीलकंठ झाले ते कैसे ||
नाम्या स्वामी दृष्टी सोज्ज्वळ | जीव लागला गोपाळ गे माय ||”
लहान वयातच कान्होपात्रांचे भावविश्व कृष्मुरारीने आणि नामदेव महाराजांच्या अभंगाने व्यापून गेले होते. त्यांना जणू जगाचा तसेच स्वतःचा विसर पडला होता. त्यांच्या अंतःकरणात कृष्णमुरारी शिवाय कोणालाच स्थान नव्हते.
संत कान्होपात्राची कथा sant kanhopatra story in marathi
ऐन तारुण्यात ऐहिक जीवनाच्या दृष्टीने त्या उदास झाल्या होत्या. त्यांना या स्वार्थी आणि वासनाधीन मानवी जगाची भीती वाटू लागली होती. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विसर पडावा म्हणून कान्होपात्रांनी कृष्णाची भक्ती करण्यात स्वतःला मनापासून गुंतवून घेतले होते. त्यांना माहित होते कि, या जगात ‘मी’ म्हणणाऱ्या माणसाचा नेहमीच नाश होतो.
“विषयाचे संगती | नाश पावले निश्चित ||
भगे पडली इंद्राला | भस्मासुर भस्म झाला ||
चंद्रा लागला कलंक | गुरुपत्नी रतला देख ||
रावण मुकला प्राणासी | कान्होपात्रा म्हणे दासी || ”
कान्होपात्रा च्या सौंदर्यामुळे तिच्यावर संकटे आली पण दरवेळी विठ्ठल कृपेमुळे ती बचावली. त्यांच्या सौंदर्याच्या लालसेतून आक्रमक होत जाणाऱ्या मनोवृत्तीमुळे तिचे निर्मळ मन गढूळ होण्याच्या भीतीने धास्तावून जाते.
‘पुरविली पाठ न सोडी खळ,
अढळ चांडाळ पापराशी’
या अस्वस्थ मनोवस्थेतून ती पांडुरंगाला वारंवार साकडे घालते तर कधी उद्विग्न होऊन अभंगातून त्याच्याशी भांडत राहते.
‘वायाच म्यां देवा धरिली आवडी, न पावे थोडी काही केल्या’
पण कान्होपात्राचा ओढा ईश्वरभक्तीकडे होता. पुर्वपुण्यायी मुळे कान्होपात्रा लहानपणापासून विठ्ठल भक्तीमध्ये रममाण झाल्या होत्या. विठ्ठल भजनात त्या रंगून जात असत. गावातील वारकऱ्यांच्या समवेत त्या पंढरपूरला जात असे त्यामुळे आईचा व्यवसाय पुढे नेण्याचा विचार त्यांच्या मनाला कधी शिवला देखील नाही.
या वारीत त्यांना संतसंग लाभला प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माउलींची भेट झाली आणि त्यांचा सहवास लाभला. या संगतीमुळे त्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडला. सतत हरिनामात दंग राहणे आणि कीर्तन करणे या तिच्या अत्यंत आवडीच्या गोष्टी झाल्या. त्यांनी रचलेले अभंग आजही प्रसिद्ध आहेत.
“योगिया माजी मुगुट मणी | त्रिंबक पाहावा नयनी ||
माझी पुरवावी वासना | तु तो उद्धराच राणा ||
करुनिया गंगा स्नान | घ्यावे ब्रम्हगिरीचे दर्शन ||
कान्होपात्रा म्हणे पंढरीराव | विठ्ठल चरणी मागे ठाव ||”
संत कान्होपात्रा याचे निर्वाण
बिदरच्या बादशहा ला कान्होपात्रा च्या सौंदर्याची ख्याती पोहोचली तेव्हा तिला पकडून आणण्यासाठी त्याने आपले सरदार मंगळवेढास पाठविले. स्वतःच्या शिलाचे रक्षण करण्याकरता कान्होपात्रा वेश बदलून वारीत सहभागी झाल्या आणि पंढरपुरी पोहोचल्या आणि विठ्ठलाच्या चरणी डोके ठेवून आपले रक्षण करण्याची आर्त विनवणी त्यांनी केली.

संत कान्होपात्रा यांची ही रचना प्रसिद्ध आणि सर्वश्रुत आहे. बादशहा च्या सरदारांनी त्यांचा पंढरपूर पर्यंत पाठलाग केला. परंतु संत कान्होपात्रानी विठ्ठलाच्या चरणी डोके ठेवून आपली इहलोकाची यात्रा संपवली.
मंदिराच्या दक्षिण दरवाज्याजवळ त्यांना पुरण्यात आले. त्या ठिकाणी एक तरटी वृक्ष उगवला तो वृक्ष आजही अक्षय हिरवा असून संत कान्होपात्रांच्या भक्तीची ग्वाही देत उभा आहे.
आम्ही दिलेल्या sant kanhopatra information in marathi short माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर संत कान्होपात्रा यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant kanhopatra story in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sant kanhopatra full information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर sant kanhopatra information in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट