संत समर्थ रामदास स्वामी चरित्र Sant Ramdas Information In Marathi

sant ramdas information in marathi रामाला व हनुमंताला उपास्य मानून परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम याची शिकवण अधिकार वाणीने देणारे संत म्हणजे “समर्थ रामदास स्वामी”. सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य या दोन्हींचे महत्त्व पटवून देणारे समर्थ रामदास महाराष्ट्रातील एकमेव संत होते, असे सांगितले जाते. रामदास स्वामींनी भक्तीसोबत शक्तीची उपासना करणारे शिष्य घडवले.(samarth ramdas in marathi)

sant-ramdas-information-in-marathi
sant ramdas information in marathi/ramdas swami information in marathi

संत रामदास स्वामींचे बालपण (Childhood)(sant ramdas information in marathi)

नाव समर्थ रामदास स्वामी (नारायण सूर्याजीपंत ठोस)
जन्म चैत्र शु. 9, शके 1530 [24 मार्च 1608]
गाव श्रीक्षेत्र जांब, जालना जिल्हा, महाराष्ट्र
आईराणूबाई सूर्याजीपंत ठोसर
वडीलसूर्याजीपंत ठोसर
मृत्यूमाघ वद्य नवमीला शके १६०३ (१३ जानेवारी १६८१)

संत रामदासांचा जन्म २४ मार्च १६०८ (चैत्र शुद्ध ९, शके १५३०) मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र जांब ह्या लहानश्या गावी रामनवमीच्या म्हणजेच रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर झाला. त्यांचे मूळ नाव ‘नारायण सूर्याजी ठोसर.’  त्यांच्या आईचे नाव ‘राणूबाई. नारायण ७ वर्षाचे असतानाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. एक थोर सिद्धपुरूष म्हणून लोक त्यांना आदरपूर्वक ‘समर्थ’ किंवा ‘समर्थ रामदास’ असे म्हणतात.

संत गाडगेबाबा यांची माहिती

लहानपणापासूनच नारायण विरक्त होते. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकर होते. लहानपणापासूनच झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत ते तरबेज होते. त्यांचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा, तर दुसरा गवंड्याचा. एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला होता. एकदा लपून बसला असतांना काही केल्या सापडेना, शेवटी फडताळात आईने शोधल्यावर सापडला. आईनी विचारलं काय करीत होतास त्यावर नारायणाने “आई, चिंता करितो विश्वाची” असं उत्तर दिलं.

आईला वाटायचं की लग्न करून दिल्यावर त्याचं मन संसारात रमेल, वयाच्या १२ व्या वर्षी नारायणाच्या लग्नाचा घाट घालण्यात आला, बोहल्यावर असताना ब्राम्हणाच्या तोंडून ‘सावधान’ हा शब्द ऐकताच ते नेसल्या वस्त्रानिशी बोहल्यावरून पळून गेले.

समाजकार्य(Social Work)(ramdas swami information in marathi)

महाराष्ट्राच्या भूमीत संत तुकारामांच्या समकालीन समर्थ रामदासांनी अज्ञान-कुकर्म-कुविचार-कुसंग यांचा अंतकरण-मन-बुद्धी-चित्त यावरचा पगडा झुगारून रंजल्या गांजलेल्यांना जवळ करण्याचे, त्यांना धीर देण्याचे, त्यांचा कमकुवत झालेला आत्मविश्वास उभा करण्याचे कार्य निष्काम भूमिकेतून अखंडपणे केले त्यांच्या या परिश्रमामुळे आज सत्कर्म-सद्विचार-सुख-समाधान घरोघरी नांदत आहे.

इस्लामी राजवटीत, भयापोटी लोकांनी डोहात व नद्यात बुडविलेल्या अनेक देवतामूर्ती बाहेर काढून रामदासांनी त्याची पुन्हा प्रतिस्थापना केली. धर्मप्रचारासाठी देवळे बांधली. देवांचे सार्वजनिक उत्सव सुरु केले. सामाजिक जीवनाची नैतिक परिशुद्धी करणे हे रामदासांच्या राजकारणाचे मर्म होय. परमार्थाचा अधिकार पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही आहे, असे ते मानीत असत.

ब्रिटीश सत्तेच्या अमानुष जुलमाखाली भरडली जाणाऱ्या जनतेची हृदयद्रावक अवस्था पाहून अत्यंत अस्वस्थ आणि उद्विग्न झालेल्या रामदासांना समाजाचा लुप्त झालेला आत्मविश्वास पुनः जागृत केला पाहिजे अशी त्यांची खात्री झाली. तेव्हा श्री समर्थांनी आपले बाहू उभारून खणखणीत वाणीने लोकांना सांगितले –

धिर्धरा धिर्धरा तकवा | हडबडू गडबडू नका |

केल्याने होत आहे रें | आधी केलेचि पाहिजे ||

त्यांची उपदेशाची भाषा अत्यंत सोपी होती. समर्थ रामदास यांनी देशभरात ११०० मठ  आणि अकरा मारुती मंदिरांची स्थापना केली.

तपश्चर्या आणि साधना

नाशिक च्या पंचवटी भागात त्यांनी वास्तव्य केलं, कुणी ओळखू नये म्हणून रामदास हे नाव त्यांनी धारण केले. नाशिक येथे टाकळी ला त्यांनी गोमयाची(शेण) मारुतीची मूर्ती तयार करून हनुमान जयंतीच्या दिवशी त्या मूर्तीची स्थापना केली. वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ रामदास १२ वर्षे तपश्चर्या करीत होते. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेतच करवून घेतला. गोदावरीच्या पात्रात “श्रीराम जयराम जय जय राम” या त्रयोदशाक्षरी नामाचा १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभू श्रीराम हेच त्याचे सद्गुरू झाले.

गायत्री मंत्राचा जप, रोज १२०० सूर्यनमस्कार करून समर्थांच्या शारीरिक आणि मानसिक शक्तीचा विकास झाला. सूर्योदयापासून ते माध्यानापर्यंत नदीच्या डोहात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास राम मंत्राचा जप ते करीत. दररोज पाच घरी भिक्षा मागून समर्थ त्याचा नैवैद्य रामाला दाखवीत, त्यातील काही भाग पशुपक्षांना देऊन उरलेले अन्न स्वतः ग्रहण करीत असत. समर्थ रामदास दुपारी २ तास मंदिरात साधना करीत आणि नंतर २ तास ग्रंथांचा अभ्यास करीत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, रामायणाची रचना केली.(sant ramdas information in marathi)

समर्थ रामदास यांनी १२ वर्षे कठोर तपश्चर्या केली आणि त्यानंतर १२ वर्षे भारतभ्रमण केले. संपूर्ण भारताचे आणि लोकपरिस्थितीचे निरीक्षण केले. त्याठिकाणी त्यांना प्रभू रामचंद्राचे दर्शन घडले, आणि तिथे त्यांची आपल्या देहाबद्दलची आसक्ती नाहीशी झाली. त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. भारतभ्रमण करत असतांना समर्थ रामदास स्वामी आणि शिखांचे सहावे गुरु हरगोविंद यांची भेट झाली.

संत रामदास साहित्य व काव्यनिर्मिती

समर्थ रामदास हे निसर्गप्रेमी होते. त्यांनी साहित्य निर्मितीसाठी तारळेघळ, मोरघळ, रामघळ, शिवथरघळ, हेळवाक घळ अशा ठिकाणी वास्तव्य केले.

“जय जय रघुवीर समर्थ”

हा नामघोष करत मनुष्याच्या अंतकरणात सद्विचारांची बीजं पेरणारे समर्थ रामदास त्यांच्या श्रीमद दासबोध, मनाचे श्लोक या आणि इतर ग्रंथ रूपांनी या जगात निरंतर वास करीत आहेत. करुणाष्टके आणि भीमरूपी स्त्रोत ह्यांची रचनाही समर्थांनी केली. दासबोध या ग्रंथाचे लेखन रायगडजवळ असणाऱ्या शिवथरघळीत बसून केले. यामध्ये त्यांनी प्रपंच, राजकारण, संघटन, व्यवस्थापन, व्यवहारचातुर्य, व्यक्तिमत्त्व विकास, सभ्यता, शिष्टाचार या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे.(sant ramdas information in marathi)

संत कबीर यांची माहिती 

‘सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची’ ही श्री गणेशाची, ‘लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा’ ही शंकराची, ‘दुर्गे दुर्घट भरी तुजवीण संसारी’ ही त्यांची कुलस्वामिनी म्हणजे तुळजापूरची भवानी मातेची, ‘सत्राने उड्डाणे हुंकार वदनी’ ही मारुतीची, ह्या आरत्या रामदासांच्या प्रसिध्द रचना आहे. त्यांनी खंडेराया, दत्तात्रय, विठ्ठल, श्रीकृष्ण दशावतार अशा विविध देवांच्या आरत्या केल्या. याशिवाय रामायणातील किष्किंधा, सुंदर व युद्ध ही कांडे, कित्येक अभंग, भूपाळ्या, पदे, स्त्रोते, राज-धर्म, क्षात्र-धर्म, शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज यांस पत्रे, इत्यादी विषयांवरील विपुल लेखन समर्थांनी केले आहे.   

संत रामदास स्वामींचे “मनाचे श्लोक” हे मनुष्याच्या मनाला उद्देशून केले असून त्याचा सूक्ष्म विचार केल्यास मन्युष्य स्वतःला अंतर्बाह्य बदलू शकतो.

“नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे                                                      

अति स्वार्थबुद्धी ण रे पाप सांचे                                   

घडे भोगणे पाप ते कर्म खोटे                                    

न होता मनासारिखे दुःख मोठे”

रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य होते. स्वराज्य रक्षणासाठी रामदासांनी त्यांना मार्गदर्शन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ३१ नोव्हेंबर १६७८ मध्ये समर्थ रामदास स्वामींना एक सनद लिहून काही गावे इनाम म्हणून दिली होती. त्यांच्या विनंतीवरून ते सज्जनगड इथे राहू लागले.

समर्थ रामदास स्वामी यांचा मृत्यू

समर्थांनी सज्जन गडावर देह ठेवण्यापूर्वी पंधरा दिवस आधी आपल्या शिष्यांना पूर्वकल्पना दिली होती. माघ वद्य नवमीला शके १६०३ (१३ जानेवारी १६८१) ला समर्थ रामदास स्वामींनी तीनदा मोठ्याने रामनामाचा उच्चार केला आणि देह ठेवला. तेव्हापासून माघ वद्य नवमी ‘दासनवमी’ म्हणून ओळखली जाते.

आम्ही दिलेल्या ramdas swami information in marathi  माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर  संत श्री समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant ramdas information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि samarth ramdas in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर samarth ramdas information in marathi wikipedia असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “संत समर्थ रामदास स्वामी चरित्र Sant Ramdas Information In Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!