संत सेना महाराज माहिती Sant Sena Maharaj Information in Marathi

Sant Sena Maharaj Information in Marathi महाराष्ट्राच्या भूमीला पवित्र भूमी म्हणतात कारण इथे अनेक संतांचा वारसा लाभला. संतांचा जन्म कोणत्याही जाती धर्मापुरता मर्यादित नसतो. जातीधर्माच्या सीमा त्यांना जखडून ठेवू शकत नाहीत. समुद्राचा जसा थांग लागत नाही, तसेच संतांचे अंतःकरण अथांग असते, जे कोणत्याही जातीधर्माच्या पलीकडे पोहचते. संतानी दाखवलेला समाज कल्याणाचा मार्ग, दिलेले ज्ञान, त्यांचे उपदेश, स्वतःच्या त्यागाने व आचरणाने घालून दिलेला आदर्श यामुळे त्यांची ख्याती जगभर पसरते. असेच थोर sant sena maharaj ‘संत सेना महाराज’. त्यांच्या अभंगातून संत सेना महाराज आपल्‍याला भगवंताच्या भक्‍तीचा महिमा सांगतात, पांडुरंगाशिवाय कोणीही आपला नाही.

sant sena maharaj information in marathi
sant sena maharaj 

संत सेना महाराज संपूर्ण माहिती Sant Sena Maharaj Information in Marathi

धन कोणा कामा आले | पहा विचारूनी भले ||

ऐसे सकळ जाणती | कळोनियां आंधळे होती ||

स्त्रिया पुत्र बंधू पाही | त्याचा तुझा संबंधु नाही ||

सखा पांडुरंगाविण | सेना म्हणे दुजा कोण ||

संत सेना महाराज हे बहुभाषापंडीत होते, त्यांचे अनेक भाषांवर विलक्षण प्रभुत्व होते. अध्यात्माची उपजत बैठक, संतांचा दिव्यसंग, साक्षात पांडुरंगाची अपार कृपा, लोककल्याणाची जन्मजात तळमळ या सर्व दुर्मिळ गुणवैशिष्ट्यांचा संगम म्हणजे सेना महाराज.

संत सेना महाराज जीवन कथा

संत सेना महाराज हे संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांचे समकालीन संत. संत सेना महाराज यांचा जन्म हा श्री देविदास आणि प्रेमकुंवर बाई यांच्या पोटी वैशाख वद्य द्वादशीस शके १३५७ या दिवशी मध्यप्रदेशमधील बांधवगड मध्ये झाला. आई वडील दोघेही सात्विक होते. घरच्या संस्कारामुळे सेना महाराज हे लहानपणापासूनच भक्तीमार्गातले होते. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. संत सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा (न्हावी) होता. सेना महाराज हे बांधवगडच्या राजाकडे नाभिक काम करत होते. रोज जाऊन राजाची दाढी करणे, केस कापणे इ. कामे करणे हा त्यांचा व्यवसाय होता.

ते आपले कर्तव्य पार पाडत असले तरी मन हे देवपूजा, नामस्मरण यामध्ये दंग असायचे. बादशाहाची हजामत करण्याचा मान त्यांच्या घराण्याला होता. अशी एक आख्यायिका सांगितली जाते कि, एकदा बादशाहाने सेनाजी ना हजामतीला बोलावले. सेना महाराज पूजेत रममाण झाले होते. तेव्हा बादशहाने चिडून सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने सेना महाराजांचे रूप घेऊन बादशाहाची हजामत करून आपल्या भक्ताला वाचविले. त्यावेळेस आरशामध्ये मधेच बादशाहाला भगवंताचे रूप दिसले. तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या बादशाहाला काही सुचेना. बादशाहाने मोहरा देऊन त्यांचा सत्कार केला. यामधून देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित होते. संत जनाबाईंनी या प्रसंगाचे वर्णन आपल्या अभंगातून केले आहे.

साहित्य

सेना महाराज आयुष्याच्या उत्तरार्धात उत्तर भारतामध्ये गेले. आणि संत नामदेवांप्रमाणेच संत सेना यांनी मराठी प्रदेशातून हिंदी प्रांतात जाऊन दोन्ही प्रांतातील भाषेंमध्ये साहित्य लिहिले आहे.

संत सेना महाराजाना स्वामी रामानंद यांचे शिष्यत्व लाभल्यामुळे ते धन्य झाले. पूर्वीपासूनच वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रीय संतांसामवेत संत सेना महाराज हे नाव घेतले जाते. त्यांची मराठी धाटणीची, वळणाची आणि संस्कारांची मराठी रचना आज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अनेक भाषांवर वर्चस्व असल्यामुळे उत्तर भारतातील पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश या प्रदेशातील भाषेत त्यांच्या रचनांचा उल्लेख आहे, पण मराठीच्या मानाने त्याचे प्रमाण कमी आहे.

सेना महाराजांच्या अभंगांमध्ये नामपर, पंढरी वर्णनपर, उपदेशपर, आत्मपर, राम नाम माहात्म्य, पाखंड खंडन पर आणि संत महिमा सांगणारे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव यांचे वर्णन करणारे अभंग उपलब्ध आहेत. काही रचना शिखांच्या धर्मग्रंथ ‘गुरुग्रंथसाहेब’ या ग्रंथात समाविष्ट आहेत.

संत सेना न्हावी यांचे सुमारे ११० अभंग, गवळणी, वासुदेव, सासवड माहात्म्य, आळंदी माहात्म्य, त्रिंबक माहात्म्य आदी रचना आहेत.

संत सेना महाराज यांचा प्रसिद्ध अभंग:

“आम्ही वारीक वारीक | करू हजामत बारीक ||

विवेक दर्पण आयना दाऊ | वैराग्य चिमटा हालऊ ||

उदक शांती डोई घोळू | अहंकाराची शेंडी पिळू ||

भावार्थाच्या बगला झाडू | काम क्रोध नखे काढू ||

चौवर्णा देऊनी हात | सेना राहिला निवांत ||”

निर्वाण

बऱ्याच दिवसानंतर संत सेना महाराज आपल्या मायभूमीमध्ये परतले तेव्हा बांधवगड ला पुनर्वैभव प्राप्त झालेल्या राजा बिरसिंहानी त्यांचे स्वागत केले. त्यांचे मन कशातच रमत नसे. येताना पंढरीनाथांचे रूप डोळ्यात साठवले होते. एकादशीला दिवसभर घरातच चिंतनात मग्न राहिले. श्रावण वद्य द्वादशीच्या दिवशी श्रीविठ्ठलाचे नामस्मरण करत करत समाधी लागली व

“जाता पंढरीसी सुख वाटे जीवा | आनंदे केशवा भेटतांचि ||

या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं | पाहिली शोधोनि अवघीं तीर्थे ||”

असे म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लीन झाला. हा दिवस सेना महाराज पुण्यतिथी म्हणून पाळला जातो.

आम्ही दिलेल्या sant sena maharaj information in marathi short माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर श्री संत सेना महाराज यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant sena maharaj information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर information about sant sena maharaj in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “संत सेना महाराज माहिती Sant Sena Maharaj Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!