संत सोयराबाई यांची माहिती Sant Soyarabai Information In Marathi

Sant Soyarabai Information In Marathi संत सोयराबाई माहिती महाराष्ट्र हि संतांची पुण्यभूमी आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक जाती धर्माचे संत होऊन गेले, ज्यांनी आपल्या कार्यातून जनतेला समतेचा संदेश दिला आहे. यामध्ये अनेक स्त्री संत हि होऊन गेल्या. आपल्या अभंगातून जगण्याचे वास्तव रोखठोख पणे सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजे ‘संत सोयराबाई’. साक्षात विठोबाला आपल्या घरी जेवनाच निमंत्रण देणाऱ्या संत सोयराबाई या मराठी संत कवयित्री होत्या. त्यांचे अभंग वाचले किंवा ऐकले तरी आपले जीवन धन्य झाल्याचा अनुभव येतो.

sant soyarabai information in marathi
sant soyarabai information in marathi

संत सोयराबाई यांची माहिती – Sant Soyarabai Information In Marathi

संत सोयराबाई जीवन परिचय

नावसंत सोयराबाई महार
जन्मसुमारे १४ वे शतक, महाराष्ट्र
जातमहार
पतीसंत चोखामेळा
अपत्येकर्ममेळा
मृत्यूनोंद नाही
साहित्यअभंगरचना
भाषामराठी

संत सोयराबाई या तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे होरपळून निघालेल्या, शुद्र-अतिशूद्र, गाववाडा समाजजीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकलेल्या प्रसिद्ध विठ्ठलभक्त संत चोखामेळा यांच्या पत्नी होत्या. त्यांचे कुटुंब महाराष्ट्रातील  मंगळवेढ्याचे. संत सोयराबाई या निरक्षर, अठराविश्व दारिद्र्य झेलत, गावकुसाबाहेरचं उपेक्षित जीवन जगत होत्या. त्या आपल्या अभंगातून अभिमानाने ‘चोख्याची महारी’, ‘सोयरा’ असा स्वतःचा उल्लेख करीत असत. परंतु त्यांनी आपल्या अभंग रचनेतून स्वतःच वेगळपण सिद्ध केलं आहे.

“सोंगाचे ते सोंग | डावी रंग कथेचा ||

परधनी सदा मन | वरी दावीतसे डोलून ||

ऐसा नर तो दुराचारी | म्हणे ‘चोखयाची महारी ||”

संत सोयराबाईं आपल्या संसारासाठी खूप काबाडकष्ट करीत होत्या. त्याचबरोबर त्या अतिशय पारमार्थिक वृत्तीच्या होत्या. त्यांच पूर्ण कुटुंब हे उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत पण ते विठ्ठल नामामध्ये सतत दंग असत. त्यांच्या कुटुंबाला मंदिरात प्रवेश नव्हता. त्यांना विठ्ठलाचे सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे. पण प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले होते. संत सोयराबाई आपल्या पतीच्या संत चोखामेळा यांच्या सेवेत अतिशय दक्ष असत.

संत सोयाराबाईना मुलबाळ नव्हतं या गोष्टीची त्यांना खंत होती. अपत्यप्राप्तीच्या आशेन कासावीस झालेल्या सोयराबाई आपल्या अभंगातून म्हणतात,

“आमच्या कुळी नाही वो संतान

तेणे वाटे शीण माझ्या मना..”

कालांतराने विठ्ठल कृपेन तिच्या पोटी कर्ममेळ्याचा जन्म झाला. लहानपणापासूनच झालेल्या नितळ भक्तीसंस्कारण तोही विठ्ठल भक्त झाला. असा सांगितला जात कि प्रत्यक्ष पांडुरंगाने सोयरबाइंची नणंद निर्मळाच्या रूपाने सोयराबाईचे बाळंतपण केला. पुत्रप्राप्तीमुळे आनंदाने फुलून गेलेल्या सोयराबाईने मुलाच्या बारश्यासाठी विठ्ठल रुक्मिणीलाच निमंत्रण दिले. त्याप्रमाणे विठोबा – रखुमाईन बारस केल्याच ती आपल्या अभंगातून सांगते.

“उपजता कर्ममेळा | वाचे विठ्ठल सावळा |

करी साहित्य सामग्री | म्हणे चोख्याची महारी”

संत चोखोबांच्या प्रेरणेतून एक शुद्र आणि निरक्षर स्त्री ज्ञानाची आस बाळगते. स्वतःच त्या ज्ञानाचा शोध घेते. स्वतःला पारखते. समाजाशी झगडते. स्वतःशी, देवाशी वाद घालते आणि त्यातून गवसलेले लख्ख कण जनतेसाठी मागे ठेवत भागवत धर्माच्या मांदियाळीत अढळ स्थान मिळवते.

तत्कालीन समाजात शुद्र लोकांची सावली सुध्दा विटाळ मानली जायची. संत सोयराबाईं जातीने महार असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा समाजाने खूप छळ केला. त्यांना आयुष्यभर खालच्या जातीचे म्हणून हिणवल गेले. काहीवेळा त्यांना मारही खायला लागला, सोयराबाईंच्या अभंगातून त्यांच्या या वेदना प्रत्येक शब्दातून कळतात,

“हीन हीन म्हणोनी का गं मोकलिले

परी म्या धरिले पदरी तुमच्या

आता मोकलिता नव्हे नित बरी

थोरा साजे थोरी थोरपणे”

संत सोयारबाइंच्या जीवनातील अमृत शुद्धीकरणाचा अतिशय अभूतपूर्व प्रसंग संत एकनाथ रचित संत चोखामेळाचरित्रात चितारला आहे. ज्यामध्ये असे सांगितले आहे कि, संत चोखोबांच्या अंगणी संतांच्या, देवांच्या, पंगती बसल्या असताना साक्षात इंद्राने स्वर्गातून अमृतकलश तिथे आणला आणि त्यातील अमृताच शुद्धीकरण चोखामेळा आणि सोयराबाई यांच्या हातून करून घेतलं. त्यावरून संत सोयाराबाईच संतत्व स्वयंभू होते हे ध्यानात येते.

“’चोख्याचे अंगणी बैसल्या पंगती | स्त्री ते वाढिती चोखियाची ||

अमृताचे ताट इंद्रे पुढे केले | शुद्ध पाहिजे केले नारायणा ||

चोखियाची स्त्री चोखा दोघे जण | शुद्ध अमृत तेणे केले देखा ||

चोखीयाच्या घरी शुद्ध होय अमृत | एका जनार्दनी मात काय सांगू ||”

संत सोयराबाईंचे प्रसिद्ध अभंग

संत सोयराबाईचे ९२ अभंग उपलब्ध आहेत.

“येई येई गरुडध्वजा |

विटेसहित करीन पूजा|”

हा त्यांचा विशेष ख्याती पावलेला अभंग आहे.

“सुखाचे नाम आवडीने गावे

वाचे आळवावे विठोबासी” 

हि प्रसिद्ध अभंगरचनाही सोयराबाईंनीच लिहिली आहे. संत सोयराबाई या आत्मा आणि परमात्म्याच नात उलगडणारी  विदुषी रांधणारी, घर- संसार सांभाळणारी गृहिणी आहे.

संत सोयराबाईंच्या अभंगातून डोकावणारं तत्वज्ञान हे सामान्य लोकांना सहज समजण्यासारख सुलभ आहे. साधी, सोपी आणि रसाळ अशा भाषेत त्यांनी अभंग रचना केली आहे. अभंग आधी स्वतःसाठी आणि मग जनांसाठी, आत्मशुद्धी ते परमात्मा असा त्यांचा प्रवास आहे.

“अवघा रंग एक झाला | रंगी रंगला श्रीरंग ||

मी-तू पण गेले वाया | पाहता पंढरीच्या रामा ||

नाही भेदाचे ते काम | पळोनी गेले क्रोध काम ||

देही असुनी तू विदेही | सदा समाधिस्त पाही ||

पाहते पाहणे गेले दुरी | म्हणतसे महारी चोखियाची ||”

सोयराबाईंनी देहाच्या विटाळ म्हणणाऱ्या कर्मठांवर अत्यंत कठोर टीका केली आहे. तत्कालीन समाजात सवर्ण लोक शूद्रांच्या सावलीलाही विटाळ मानीत असताना, संत सोयराबाई थेट देवाशी वाद घालतात आणि त्याला प्रश्न विचारतात, देहात जर विटाळ वसतो तर मग देह कोण निर्माण केला?

“देहासी विटाळ म्हणती सकळ

आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध

देहीचा विटाळ देहीच जन्मला

सोवळा तो झाला कवण धर्म”

असं साक्षात विठ्ठलाशी किती बोलू न किती नको असं मोकळेपणाने म्हणणारी त्याच्याशी गुजगोष्टी करू इच्छिणाऱ्या सोयराबाई अंतर्बाह्य किती स्वच्छ आणि निर्मळ आहेत हे त्यांच्या खालील अभंगातून लक्षात येते.

“बैसुनी एकांती बोलू गुजगोष्टी | केधवा भेटसी बाई मज ||

हि नीत नव्हे बरी | म्हणे चोखियाची महारी ||”

सुखात हजार वाटेकरी असतात पण दुःख तुमच्या एकट्याच असतं, हे त्यांनी आपल्या अभंगातून फार सुंदर शब्दात सांगीतले आहे.

“अवघे दुःखाचे सांगाती दुःख होता पळती आपोआप

आर्या पुत्र भगिनी माता आणि पिता हे अवघे सर्वथा सूखाचेचि”

विठ्ठलभेटीसाठी आतुर झालेली त्यांची मनःस्थिती त्यांच्या “उदारा पंढरिराया नको अंत पाहू | कोठवरि  मी पाहू वाट तुझी |” या अभंगातून व्यक्त झाली आहे.

विठ्ठलदर्शनाने झालेला आनंद व्यक्त करताना आपल्या संतृप्त भावस्थितीचा अविष्कार “अनंता जन्मांचे फिटले साकडें | कोंदाटले पुढे रूप त्याचें |” या अभंगातून सांगतात.

“चोखा मेळविला रुपी | आता माझी कोण गती |” हा अभंग, आणि चोखामेळा यांच्या समाधीसोह्ळ्याचे वर्णन करणारा अभंग यावरून सोयराबाईंचा मृत्यू हा चोखामेळा नंतर झाल्याचे अनुमान काढले जाते.

आम्ही दिलेल्या sant soyarabai information in marathi short माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर  संत कान्होपात्रा  यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about sant soyarabai in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sant soyarabai information in marathi wikipedia माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर sant soyarabai in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!