“तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ, तारिले पतित तेणे किती”
sant chokhamela information in marathi जगद्गुरू तुकोबारायांनी ज्यांच्याबद्दल असे गोरावोद्गर काढले ते पतितांना तारणारे आणि कित्येक उपेक्षितांची कैफियत परमेश्वरापुडे मांडणारे संत चोखामेळा हे १३ व्या शतकातील एक महान संत होते. संत चोखामेळा हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावाळीतले संत.चोखामेळा – मेळा (अपवित्र) असणारा माणूसही भगवंताच्या दारी चोख (पवित्र) होतो.
संत चोखामेळा मराठी माहिती Sant Chokhamela Information In Marathi
मूळ नाव | संत चोखामेळा महार |
जन्म | नोंद नाही |
गाव | विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा किवा मेहुणपुरी |
पत्नी | सोयराबाई |
बहिण | निर्मळा |
मुले | कर्ममेळा |
मृत्यू | ई.स. 1338 मंगळवेढा |
संत चोखामेळा यांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा किवा मेहुणपुरी या गावी झाला. चोखोबांचा जन्म पंढरपूरला झाल्याचे संत महिपती म्हणतात. चोखोबा मुल वऱ्हाडातील आहेत असेही म्हंटले जाते. त्यांची पत्नी सोयरा, बहिण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाडकष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते. संत चोखामेळांचे कुटुंब हे जातीने महार होते. चोखामेळा जन्माला आले तो समाज भक्तीसंप्रदायापासून अतिशय दूर होता. पशुगत जीवन या लोकांच्या वाट्याला आले होते.
हीन याती माझी देवा | कैसी घडे तुझी सेवा ||
मज दूर-दूर हो म्हणती | तुज भेटू कवण्यारीती ||
असा उपरोधिक प्रश्न ते देवालाच विचारतात. असे असले तरी चोखोबा हे शुद्ध आचरणाने ब्रम्ह जाणणारे संत होते. म्हणूनच त्यांच्या विषयी संत बांका महार म्हणतात,
चोख चोखट निर्मळ | तया अंगी नाही मळ ||
चोखा सुखाचा सागर | चोखा भक्तीचा आगर ||
संत चोखामेळा यांचे जीवन
संत चोखोबा हे तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे होरपळून निघाले. ते शुद्र-अतिशूद्र, गावावाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले. संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिविच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्र्य, वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंत लाभला. त्यांना मंदिरात प्रवेश न्हवता. त्यांना सावळे, गोजिरे रूप महाद्वारातून पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती.
‘उभा राहुनी महाद्वारी | चोखामेळा दंडवत करी ||
संत शिरोमणी नामदेव हे चोखोबांचे गुरु होत. नामदेवांकडून नामभक्तीची दीक्षा मिळाल्याने चोखोबांना व त्यांच्या समाजबांधवांना आत्मोन्नतीचा मार्ग मिळाला. त्यांचे आयुष्य कृतार्थ झाले. सर्वांना भागवत पंथाच्या ध्वजाखाली अतिशय निर्भयपणे उभे राहता आले.
धन्य धन्य नामदेवा | केला उपकार जीवा ||
माझा निरसिला भेवो | दाखविला पंढरीरावो ||
विठ्ठलाच्या दर्शनाने आपला शिणभाग नाहीसा होऊन त्यातून वेगळेच समाधान लाभेल या ओढीने चोखोबा चंद्रभागेच्या वाळवंटाकडे ओढले गेले. आपल्या रुक्ष जीवनाला हरीभक्तिचा जिव्हाळा निर्माण झाल्याने त्यांना आपल्या प्रपंचाचे ओझे सुसह्य वाटू लागले. याच ओढीने चोखोबा पंढरपूरला राहू लागले.
तत्कालीन समाजाकडून मिळालेल्या हीन वागणुकी पश्चात देखील चोखोबा स्वच्छ आणि निर्मळ होते. त्यांच्या अभंगांचे वलोकन केल्यास लक्षात येत कि त्यांची वाणी, व्याकरण,शब्दरचना, विवेचन अत्यंत चोख आणि स्पष्ट आहे.
“वाणी नाही शुद्ध धड न ये वचन”
असं एका अभंगात संत चोखामेळा म्हणतात, पण ही त्यांच्यातील विनम्रता आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात अध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३ व्या शतकात उदयाला आली म्हणून संत चोखोबा म्हणतात,
‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे | दवंडी पिटीभावे डोळा ||’
असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळागाळातील लोकांनाही मिळावी असे सर्वच संताना वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबानी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला.
संत चोखामेळा अभंग Sant Chokhamela Ahang in marathi
संत चोखामेलांच्या अभंगरचना हृदयाला भिडणाऱ्या आहेत, त्यापैकी काही लोकप्रिय रचना आहेत,
‘धाव घाली विठू आता | चालू नको मंद | बडवे मज मारिती | ऐसा काही तरी अपराध ||’
‘जोहार मायबाप जोहार | तुमच्या महाराचा मी महार | बहु भुकेला जाहलो | तुमच्या उष्ट्यासाठी आलो ||’
‘आमुची केली हीन याती | तुज कां ण कळें श्रीपती | जन्म गेला उष्टे खाता | लाज न ये तुमचे चित्ता ||’
‘ऊस डोंगा परि | रस नोहे डोंगा | काय भुललासी वरलीया रंगा || चोखा डोंगा परि | भाव नोहे डोंगा ||’
‘विठ्ठल विठ्ठल गजरी | अवघी दुमदुमली पंढरी |’
हे त्याचे अभंग जनमानसांमध्ये आजही लोकप्रिय आहेत.
संत चोखामेळा मृत्यू
ई.स १३३८ साली मंगळवेढा येथे किल्ल्याच्या बांधकामावेळी पूर्व दिशेकडील वेशीचे काम सुरु होते.
‘मंगळवेढ्या भोवती कुसू बांधावया महाराशी बोलवण्या दूत आले
महारा समागमे चोखामेळा आला काम ही लागला करावया’
संत चोखामेळा समाधी कोठे आहे?
संत चोखामेळा यांच्या अभंगात या प्रसंगाचा पुरावा देखील आढळतो. त्यावेळी ते बांधकाम अचानक कोसळले आणि त्या खाली संत चोखोबा आणि अनेक मजूर गाडल्या गेले. काही काळानंतर संत नामदेव महाराज मंगळवेढा येथे आले, बांधकाम कोसळलेल्या ठिकाणी जाऊन त्यांनी ज्या अस्थीमधून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा ध्वनी ऐकू येत होता त्या अस्थी संत चोकोबांच्या आहेत हे ओळखलं आणि त्या अस्थी घेऊन ते पंढरपूरला आले. विठ्ठल मंदिराच्या बाहेर संत नामदेवांच्या पायरीसमोर संत चोखामेळा यांचे समाधीस्थान बांधण्यात आले आहे.
संत नामदेव महाराज म्हणतात,
“चोखा माझा जीव चोखा माझा भाव, कुलधर्म देव चोखा माझा
काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती मोहि आलो व्यक्ती तयासाठी
माझ्या चोखीयाचे करिती जे ध्यान तया कधी विघ्न पडो नदी
नामदेवे अस्थी आणिल्या पारखोनी घेत चक्रपाणी पितांबर”
आम्ही दिलेल्या sant chokhamela information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर संत चोखामेळा यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant chokhamela information in marathi in short या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about sant chokhamela in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर sant chokhamela full information in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
अतिशय उपयुक्त माहिती. मी असे वाचले आहे की बारा-तेराव्या शतकात भारतात धर्मभाव लयाला गेला होता. अश्या वेळी ईश्वराने त्याच्या पुनरुज्जीवनासाठी सिद्धलोकातील अनेक सिद्धांना भारतात एकाच वेळी पाठवले. या सिद्धांनी देशाच्या वेगवेगळ्या भागांत व वेगवेगळ्या जातींत जन्म घेतले आणि धर्मभावना जागृत केली. संत कबीरांनी काशीला जन्म घेतला. असे म्हणतात की जन्माने हिंदू ब्राह्मण पण पालनपोषण मुसलमान कोष्ट्याच्या घरात. त्यांनी मुसलमान आणि हिंदू दोघांनाही प्रेमभावाचा उपदेश केला. संत रविदास (रइदास) यांनीही काशीत चांभाराच्या घरात जन्म घेतला. महाराष्ट्रात तर निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई, गोरा कुंभार, सावता माळी, नामदेव शिंपी, चोखामेळा महार, वगैरे सिद्धलोकातूनच आले व समाजाचा उद्धार केला. सर्व समाज, जातींत समभाव निर्माण केला.
तोच प्रकार सोळा-सतराव्या शतकांत पुन्हा झाला. एकनाथ, समर्थ रामदास, तुकाराम, वगैरे या काळात झाले. तुकोबांनी तर म्हटलेच आहे — आम्ही वैकुंठवासी। आलो याच कारणासी। बोलिले जे ऋषि। साच भावे वर्ताया।। (ऋषींनी जो उपदेश केला तो प्रत्यक्षात जगून दाखवण्यासाठी.)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!
अशाच नवनवीन माहिती करिता आवश्य भेट देत राहा ..