पाण्याची बचत कशी करावी Save Water Tips in Marathi

save water tips in marathi – pani bachat in marathi पाणी बचतीसाठी टिप्स, आज आपण या लेखामध्ये पाणी वाचवण्यासाठी आपण कोणकोणत्या टिप्स वापरू शकतो ते पाहूयात. पाणी हि आपली एक महत्वाच्या गरजेमधील एक गरज आहे आणि पाणी हे अनेक कारणांच्या साठी वापरले जाते परंतु सध्या पाण्याचा खूप अपव्यय होत आहे आणि अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा देखील भासत आहे. पाणी हे एक नैसर्गिक स्तोत्र आहे आणि याचा वापर आपण जपून केला तर आपल्या पुढच्या पिढीला पाण्याचा पुरवठा चांगला होण्यास मदत होईल. आपल्या माहितीप्रमाणे पृथ्वीवर ९७ टक्के हा भाग खाऱ्या पाण्याने व्यापला आहे आणि राहिलेला ३ टक्के भाग हा गोड्या पाण्याचा आहे आणि आपण गोडे पाणी हे पिण्यासाठी आणि आपल्या इतर वापरासाठी वापरले जाते.

आपण खारे पाणी पिण्यासाठी किंवा कोणत्याही इतर वापरासाठी वापरू शकत नाही आणि म्हणानुनच पृथ्वीवर असणाऱ्या ३ टक्के पाण्याचा साठा हा आपण जपून वापरला पाहिजे. आपल्या दैनंदिन गरजांसाठी पाणी आवश्यक आहे जरी आपण पाण्याशिवाय जगण्याची कल्पना करू शकत नाही. स्वयंपाक करणे, आंघोळ करणे, साफसफाई करणे इत्यादी सर्व गोष्टींसाठी आपल्याला पाण्याची गरज आहे, सजीवांसाठी पाणी आवश्यक आहे.

कृषी उत्पादन कंपन्या, रासायनिक उद्योग, वीज प्रकल्प आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये देखील याची आवश्यकता आहे. पण आपल्याला पाण्याची इतकी गरज असून देखील सध्या लोक पाण्याचा खूप अपव्यय करत आहेत आणि पाण्याचा कसाही वापर करत आहेत पण पृथ्वीवरील गोड्या पाण्याची कमतरता पाहून आपण पाण्याची बचत केली पाहिजे नाहीतर आपल्याला काही दिवसामध्ये आणि भविष्यामध्ये पाण्याची कमतरता भासू लागेल.

save water tips in marathi
save water tips in marathi

पाण्याची बचत कशी करावी – Save Water Tips in Marathi

पाणी व्यवस्थापन किंवा बचत म्हणजे काय ?

जल किंवा पाणी व्यवस्थापन म्हणजे जल स्तोत्राच्या वापराचे नियोजन, वितरण, विकन आणि व्यवस्थापन करणे. किंवा जल व्यवस्थापन म्हणजे मालमत्ता आणि जीवनाचे नुकसान कमी करण्यासाठी नैसर्गिक तसेच कृत्रिम जलस्तोत्रांचे नियोजन करणे.

पाण्याचा वापर – use of water 

  • घरगुती वापरासाठी पाण्याचा वापर केला जातो.
  • शेतीमध्ये चांगल्याप्रकारे पिक आणण्यासाठी देखील पाण्याचा पुरेपूर वापर केला जातो.
  • औद्योगिकरणामध्ये देखील पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

पाणी बचतीच्या टिप्स – how to save water in marathi

आपल्या दैनंदिन गरजांसाठी पाणी आवश्यक आहे जरी आपण पाण्याशिवाय जगण्याची कल्पना करू शकत नाही. स्वयंपाक करणे, आंघोळ करणे, साफसफाई करणे इत्यादी सर्व गोष्टींसाठी आपल्याला पाण्याची गरज आहे, सजीवांसाठी पाणी आवशक आहे. कृषी उत्पादन कंपन्या, रासायनिक उद्योग, वीज प्रकल्प आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये देखील याची आवश्यकता आहे. पण आपल्याला पाण्याची इतकी गरज असून देखील सध्या लोक पाण्याचा खूप अपव्यय करत आहेत परंतु आपण पाण्याची बचत केली पाहिजे आणि पाणी बचत करण्यासाठी आपण खालील टिप्स वापरू शकतो.

  • तुमच्या घरातील नळ जर ना दुरुस्त असेल तर तुम्ही ते नळ दुरुस्त करून घ्या त्यामुळे घरातील पाणी विनाकारण पाणी वाया जाणार नाही.
  • जर आपण घरगुती सांडपाणी आणि औद्योगिक सांडपाण्याचा पुनर्वापर करून म्हणजेच त्याच्यावर प्रक्रिया करून जर ते पाणी आपण घरगुती स्वच्छतेसाठी वापरले तर ते खूप चांगले होईल आणि त्यामुळे पाण्याचा वापर हा ५० टक्क्यांनी कमी होतो.
  • त्याचबरोबर सांडपाणी आपण कपडे धुण्यासाठी, घरातील स्वच्छतेसाठी वापरू शकतो आणि औद्योगीकरनामध्ये वापरले जाणारे पाणी हे प्रक्रिया करून त्याचा देखील औद्योगीकरनामध्ये पुनर्वापर करू शकतो.
  • आपल्याला रोजच्या वापरासाठी पाणी हे खूप गरजेचे असते आणि परंतु असे अनेक लोक असतात जे पाण्याचा अपव्यय करतात परंतु आपण रोजच्या वापरला देखील पुरेसे पाणी वापरले पाहिजे.
  • जगामध्ये गोड्या पाण्याचा वापर हा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्यामुळे पाण्याचा तुटवडा भासतो. काही ठिकाणी पिकांना पाणी देण्याची पध्दत अशी असते कि पिकला गरजेपेक्षा जास्त पाणी मिळते ( उदाहरणार्थ : शेतामध्ये असणाऱ्या पाठातून पाणी सोडले तर ते पिकला गरजेपेक्षा जास्त होऊ शकते ) त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी सिंचन किंवा ठीबकचा वापर केला तर पाणी वाया जाणार नाही आणि पिकला जितके पाणी पाहिजे आहे तितके पाणी मिळेल आणि शेतीमधील पाणी वापराचे प्रमाण देखील थोड्या प्रमाणत कमी होईल.
  • घरामध्ये पाण्याचा वापर हा अनेक कारणांच्यासाठी पाण्याचा नळ सुरु करून ते संबधित काम करतो परंतु आपण जर आपल्या कामाला जितके पाणी हवे आहे तितके पाणी बादली मध्ये काढून घेतले तर ते फायद्याचे ठरेल.
  • विविध देशांमध्ये जलसंधारणासाठी विविध नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या तंत्रांचा वापर करून पाण्याची बचत करता येते आणि समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवता येते.
  • आपण पाण्याचे व्यवस्थापन पाणलोट विकास आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग यासारख्या संकल्पनांना जर आपण चालना दिली तर मोठ्या प्रमाणात पाण्यचे नियोजन आणि व्यवस्थापन होऊ शकते.
  • तसेच तलाव, नद्या, समुद्र,ओढे, नाले, विहिरी आणि इतर यासारख्या नैसर्गिक पाणी पुरवठ्याची काळजी घेतली पाहिजे.
  • तसेच आपल्या सर्वांना माहित आहे कि गोड्या पाण्याची स्त्रोत्र म्हणजे नद्या, विहिरी, तलाव, नाले ओढे हे आहेत आणि जर यामधील पाणी स्वच्छ असेल तर आपण हे पाणी पिण्यासाठी किंवा इतर वापरासाठी म्हणजे अंघोळीसाठी, स्वच्छतेसाठी किंवा जेवणासाठी वापरू शकतो त्यामुळे नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये कचरा टाकू नका किंवा जनावरे किंवा कपडे धुवू नका त्यामुळे पाणी दुषित होते.
  • पाणलोट विकास आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग गळती थांबवून गोड्या पाण्याचे संवर्धन करणे हे महत्वाचे आहे आणि लोकांनी त्यालाच प्राधान्य दिले पाहिजे.
  • पाऊस हा दरवर्षी पडतो त्यामुळे आपण पावसाचे पाणी जे आपल्या घराच्या पन्हाळी वरून पडते ते साठवून ठेवू शकतो किंवा पावसाच्या पाण्याचे संवर्धन करू शकतो.
  • जगामध्ये सध्या औद्योगीकरण हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि औद्योगिकरणासाठी पाणी हे हे लागतेच आणि जरी पाणी औद्योगिकरणासाठी लागत असले तर ते पुरेसे म्हणजेच लागेल तेवढेच वापरले पाहिजे त्याचा अपव्यय करू नये.
  • त्याचबरोबर शहरामध्ये महापालिका संस्थांना मार्गदर्शन करूनही आपण पाण्याची बचत करू शकतो.

आम्ही दिलेल्या save water tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पाण्याची बचत कशी करावी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या how to save water in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि pani bachat in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!