पाऊस पडला नाही तर मराठी निबंध Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh

Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh – Paus Padla Nahi Tar Nibandh in Marathi पाऊस पडला नाही तर..सामान्यतः पावसाळा हा ऋतू उन्हाळा ऋतू संपला की येतो. पावसाळ्यात सगळ्यात जास्त आणि सर्वांत पहिल्यांदा आनंद हा शेतकऱ्यांना होतो. पावसाळा जूनच्या मध्यापासून सुरू होतो आणि सप्टेंबरमध्ये संपतो. या काळात आकाश ढगाळ दिसते. यावेळी शेतकरी त्यांच्या शेतीच्या कामात खूप व्यस्त असतात. ते कठोर परिश्रम करतात आणि राष्ट्रासाठी धान्य पिकवतात. कधीकधी सतत दिवस – रात्र देखील पाऊस पडतो. अशावेळी नद्यांना खूप मोठे पूर आणि काही वेळा महापूर देखील येतात.

या काळात नद्या, तलाव, विहिरी इत्यादी पाण्याने भरलेल्या दिसतात. या ऋतुमध्ये नद्या त्यांच्या काठावरुन वाहून जातात आणि पूर येतो. या काळात गणेश पूजा, रक्षाबंधन, रथयात्रा, बेंदुर आणि नागपंचमी असे खूप सारे सण साजरे केले जातात. पावसाळी हवामान आपल्यासाठी खूप अनुकूल आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पडणारा पाऊस देखील आपल्याला पावसाळ्यात अनुभवता येतो.

पण, मुसळधार पाऊस पडला की नद्या – नाल्यांना पूर येतो त्यामुळे, शेतांची मोठ्या प्रमाणात नुकसानी होते, रस्त्यांवर चिखल होतो, सर्वत्र ओलावा पसरतो.

paus padla nahi tar marathi nibandh
paus padla nahi tar marathi nibandh

पाऊस पडला नाही तर मराठी निबंध – Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh

पाऊस थांबला नाही तर काय होईल ?

पावसाळ्यामध्ये शेतकरी आपल्या शेतात कष्ट करतात आणि नवीन रोपांची लागवड करतात. झाडे आणि वेल चांगली वाढतात. झाडांना नवीन पाने आणि फळे येतात. पावसाळा ऋतू शेतकऱ्यांसाठी आणि पाण्यातील जलजीवनासाठी वरदानाचे काम करतो. यावेळी कमळ व पाण्यातील अन्य अनेक प्रकारची फुले तलावांमध्ये बहरतात.

पाण्यातील प्राणी नद्या व तलावांमध्ये आनंदाने खेळतात. सर्व ठिकाणी  पावसाळ्यामध्ये हवा थंड होते आणि सर्वांना उष्णतेपासून सुटका मिळते. सर्वत्र चहुबाजूंनी हिरवळ पसरते. पावसाळा ऋतू हा भारतातील सहा ऋतूंपैकी एक ऋतू आहे. उन्हाळ्याच्या कडाक्याच्या दिवसानंतर, पावसाळा सर्व लोकांचे स्वागत करतो. 

जर वर्षभर पाऊस पडला नाही तर त्यामुळे लोकांचे मोठे हाल होतात. विहिरी, टाक्या आणि नद्या कोरडी पडतात. शेतंही कोरडी पडतात आणि पिकं पिकत नाहीत. या सर्व परिणामांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते .

जर पाऊस वेळच्या वेळी पडला नाही तर शेतकरी वर्गाचे खूप नुकसान होते. त्यांचा उदनिर्वाह पुर्णपणे शेतीवर अवलंबून असतो आणि शेती ही पावसावर अवलंबून असते. त्यामुळे, ते पावसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. पण, जर पाऊस पडला नाही तर संपूर्ण देशात दुष्काळ पडेल.

अशा परिस्थितीत सगळीकडे हाहाकार माजेल. शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी येईल. काही भागांत शेतकरी दुष्काळाला कंटाळून आत्महत्या करतील. आपल्या सरकारवर आर्थिक संकट येईल. पाऊस पडला नाही तर फक्त शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजेत की शेतकरी शेतात काम करतो आणि पीक काढतो म्हणून आपण सर्वजण अन्न मिळवू शकतो.

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाची वाहतूक शहरी भागात तसेच, भारतभर केली जाते. त्यामुळे सर्व ठिकाणी अन्नाचा पुरवठा होऊन लोक आपला उदरनिर्वाह करू शकतात. त्यामुळे, पाऊस पडला नाही तर उद्भवणाऱ्या दुष्परिणामांना आपणा सर्वांनाच सामोरे जावे लागेल हे खरे!

माझ्या आयुष्यातील एक प्रसंग मला चांगलाच आठवतो. मी दहावीत असताना, जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नव्हता. त्यावेळी हवामान खात्याने सांगितलेले पाऊस येण्याविषयीचे अंदाज देखील खोटे ठरले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर काळजी दिसतं होती. कारण पाऊस येणार या खात्रीने खूप शेतकऱ्यांनी पावसाळी रोपांची लागवड केली होती.

परंतू, पाऊस न आल्याने त्यांची निराशा झाली. त्यांनी केलेली पिकांची लागवड पावसाअभावी निर्जीवी झाली. त्यावेळी, माझ्या मनात वाटून गेलं की पाऊस पडलाच नाही तर! अशी शंका मनात तयार होताच माझ्या अंगावर शहारे आले. खरोखरच, जर पाऊस पडला नाही तर सर्व प्राण्यांचे, पक्ष्यांचे, मानवांचे खूप हाल होतील.

तस पाहिलं तर अन्न, हवा आणि पाणी या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. मानवाला पाण्यासाठी पावसावर अवलंबून रहावे लागते. एकवेळ मानव जातीला हवा तयार करून वापरता येईल पण, पाण्याचं काय? आपल्याला पाणी तयार करता येईल का? आणि जरी केलं तरी सगळ्यांना त्याचा पुरवठा करन सहजासहजी शक्य होणार नाही.

पावसामुळे नद्यांमध्ये, विहिरींमध्ये, ओढ्यात तलावामध्ये पाणी साठून राहते. त्यामुळे, आपण गरजेनुसार अनेक गोष्टींसाठी पाण्याचा वापर करू शकतो. तसेच, पावसामुळे भूजल पातळीत वाढ होते. अशा प्रकारे आपण पाणी साठवण्यासाठी अनेक स्त्रोत वापरू शकतो आणि वर्षभर पाण्याचा पुरवठा सगळ्यांसाठी करू शकतो.

पण, हे चक्र पुर्णपणे पावसावर अवलंबून आहे. पाऊस वेळच्या वेळी पडला तरच पाण्याची साठवण व्यवस्थित करता येईल. अशा पद्धतीने आपणा सर्वांची पाण्याची गरज भागवता येईल. पावसावरच माणसांचे जीवन अवलंबून आहे. तहान भागवायला, स्नानासाठी तसेच, कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, वैयक्तिक स्वच्छतेसाठी आपल्याला पाण्याची गरज भासते.

शेती करण्यासाठी पाऊस हा मूलभूत स्त्रोत आहे. जर पाऊस पडला नाही तर शेती कशी फुलणार? धान्य कसे पिकणार? पाऊस पडला नाही तर माणसांचीच काय कोणत्याही अन्य प्राण्यांची आणि पक्ष्यांची देखील भूक भागणार नाही. सर्व नदीनाले कोरडे पडतील, विहिरी आटून जातील, झाडे सुकून जातील आणि शेवटी सगळीकडे रोगराई देखील पसरेल.

पावसाअभावी सगळीकडे वाळवंट निर्माण होईल. सारी सजीव सृष्टी कोलमडून पडेल आणि संकटात येईल. लहानपणी आपणा सर्वांना इंद्रधनुष्याचे विशेष कौतुक असायचे.  इंद्रधनुष्य पाहण्यासाठी आपण किती उत्सुकलेले असायचो. ऊन आणि पाऊस यांचे मनमोहक मिलन आपल्याला पावसाळ्यातच पहायला मिळते.

त्यांच्या मिलनातून सुदंर अशा इंद्रधनुष्याची निर्मिती होते. पण, जर पाऊस पडला नाही तर आपल्याला इंद्रधनुष्याचे सुंदर आणि उठावदार साैंदर्य पाहता येणार नाही. रानावनांमध्ये हिरवेगार गालिचे दिसणार नाहीत. आपल्याला प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गोष्टीत सगळीकडे दुष्काळ भासेल.

पावसाळा ऋतू आला की सर्वजण भीमाशंकर, महाबळेश्वर, आंबोली यांसारख्या ठिकाणी थंड हवेचा आस्वाद घेण्यासाठी फिरायला जातात. डोंगरावरून कोसळणारे उंच उंच धबधबे पाहून आपणाला मिळणारा आनंद आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. पण, जर पाऊस पडला नाही तर डोंगरावरून कोसळणारे धबधबे नसतील.

सुसाट वाहणारी नदी आपल्याला दिसणार नाही. पावसासोबत आपल्या जीवनातील सारे चैतन्यच हरवून जाईल. छे ! छे ! पाऊस पडला नाही तर, यापुढची कल्पनाच मला करू वाटत नाही. निसर्गातील अनेक गोष्टी या एकमेकांवर अवलंबून असतात. निसर्ग चक्रातील एकजरी गोष्ट नाहीशी झाली तर, निसर्ग साखळीतील अन्य गोष्टी देखील नाहीशा होतील.

खरंच, जर खऱ्याखुऱ्या आयुष्यात दुष्काळ पडला तर काय होईल ? मानवाला याच्यातून मार्ग काढता येईल का ? पाऊसच जर पडला नाही तर निसर्गाचे साैंदर्य कोरडे पडेल. निसर्ग मातेने नेसलेला हिरवागार शालू वेगळा रंग धारण करेल. निसर्गाच्या अदभुत साैंदर्याचा कायापालट होईल.

पाऊस पडला नाही तर कविता

जलधारा या धरणीवरती बरसत राही सरसर,

हिरवा शालू नेसून धरणी माता ही अंगावर.”

पाऊस म्हणजे आपले जीवनच आहे. पावसाविना जगण्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. आपल्या सगळ्या दैनंदिन गरजांसाठी आपल्याला पाण्याची गरज लागतेच. पण, जर पाऊस पडला नाही तर सगळीकडे होणारी पाण्याची टंचाई मात्र आपल्याला भरून काढता येणार नाही.

याशिवाय पाण्याअभावी पडणारा दुष्काळ आपल्यासाठी खूप असह्य असणार आहे. पाण्याच्या दुष्काळामुळे आपल्याला प्यायलादेखील पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही. आपल्या दिवसाची सुरुवातच पाण्याचा वापर करण्यापासून होते पण, जर पाऊसच पडला नाही तर आपण आपल्या सगळ्या गोष्टी, स्वच्छता कशी काय करू शकणार?

उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. जर पाणीच मिळाले नाही तर सर्व उद्योगधंदे बंद पडतील. त्यामुळे, उद्योग कंपनीतील अनेक कामगार बेरोजगार होतील. त्यांच्या उदरनिर्वाहाचे स्त्रोत देखील बंद पडतील.

सगळीकडे बेरोजगारीची नवीन समस्या निर्माण होईल. मुक्या प्राणिमात्रांवर उपासमारीची वेळ येईल. या सगळ्यामुळे पृथ्वीचा समतोल बिघडेल. यापेक्षा, आपण सर्वांनी एक निश्चय करूया, चला तर पाण्याची आपल्या आयुष्यातील जागा आणि त्याचे महत्त्व लक्षात घेऊन पाण्याचा योग्य तिथे आपल्या गरजेनुसार काटकसरीने वापर करूयात.

पाण्याचा होणारा गैरवापर थांबवून आपण पाण्याची बचत करुया. पावसाळा ऋतू त्याच्या हंगामानुसार येण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करूयात. ‘झाडे लावा, झाडे जगवा, पावसाचे चक्र वाचवा’ या वचनानुसार आपण सर्वांनी झाडे लावुयात. अशा प्रकारे जर आपण या मुल्यांच पालन केलं तर, जर पाऊस पडला नाही अशा भीतीदायक कल्पना करण्याची गरज पडणार नाही हे मात्र खरे!

              –  तेजल तानाजी पाटील

                    बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या paus padla nahi tar marathi nibandh माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “पाऊस पडला नाही तर मराठी निबंध” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या paus padla nahi tar nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on paus padla nahi tar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण paus padla nahi tar या लेखाचा वापर paus padla nahi tar essay in marathi language असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!