Shakespeare Information in Marathi – Shakespeare Meaning in Marathi विल्यम शेक्सपिअर यांची माहिती जगभरामध्ये अनेक कवी आणि कवियित्री होऊन गेल्या आणि त्यांच्या सुंदर अश्या कवितांच्या रचनांची जगाला वेढ लावले त्यामधील एक ज्यांनी आपल्या कवितांनी आणि नाटकांनी जगाला वेढ लावले ते म्हणजे विल्यम शेक्सपियर. विल्यम शेक्सपियर हे प्रसिद्ध कवी, अभिनेता आणि नाटककार होते ज्यांनी आपल्या कवितांनी आणि आपल्या कामाने जगातील अनेक लोकांची मने जिंकली. विल्यम शेक्सपियर यांचा जन्म २३ एप्रिल १५६४ मध्ये स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हॉन या ठिकाणी झाला.
शेक्सपियर हा ब्रिटीश मध्ये एलिझाबेथन आणि जेकबियन या युगांदरम्यान खूप वेगाने प्रसिध्द झाला म्हणजेच त्याच्या कविता लोकांना खूप आवडू लागल्या. विल्यम शेक्सपियर यांच्या कुटुंबांबद्दल सांगायचे म्हंटले तर त्यांच्या वडिलांचे नाव जॉन शेक्सपियर असे होते आणि त्यांच्या आईचे नाव मेरी आर्डेन असे होते आणि त्यांना एकूण ८ मुले होती त्यामधील एक विल्यम शेक्सपियर होते.
आणि हे त्यांच्या भावंडामध्ये सर्वात मोठे होते. १८ व्या वर्षी विल्यम शेक्सपियर यांनी २६ वर्षाच्या अने हॅथवेशी लग्न केले आणि त्यांना ३ होती. विल्यम शेक्सपियर यांचा मृत्यू इ.स १६१६ मध्ये झाला होता.
विल्यम शेक्सपिअर यांची माहिती – Shakespeare Information in Marathi
नाव | विल्यम शेक्सपियर |
जन्म | २३ एप्रिल १५६४ |
जन्म ठिकाण | स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हॉन ( इंग्लंड ) |
वडिलांचे नाव | जॉन शेक्सपियर |
आईचे नाव | मेरी आर्डेन |
पत्नीचे नाव | अने हॅथवे |
मृत्यू | इ.स १६१६ |
विल्यम शेक्सपियर कोण होता ?
जगभरामध्ये अनेक कवी होवून गेले त्यांच्या सुंदर अश्या कवितांच्या रचनांची जगाला वेढ लावले त्यामधील एक ज्यांनी आपल्या कवितांनी आणि नाटकांनी जगाला वेढ लावले ते म्हणजे विल्यम शेक्सपियर. विल्यम शेक्सपियर हे एक इंग्रजी कवी, नाटककार आणि पुनर्जागरण काळातील अभिनेते होते.
इ. स १५९४ विल्यम शेक्सपियर हे अभिनेत्यांची कंपनी द लॉर्ड चेंबरलेन्स मेनचे संस्थापक सदस्यही बनले. जगभरामध्ये एक चांगले कवी म्हणून लोकप्रिय असणारे शेक्सपियर यांनी ज्या कविता लिहिल्या त्या मानवी भावना आणि संघर्षाच्या संबधित होत्या आणि त्यांच्या ४०० हून अधिक काळा पूर्वीच्या या कविता आजही खूप प्रसिध्द आहेत. त्याच्या काही कविता आणि नाटके जगप्रसिध्द आहेत.
- नक्की वाचा: पु ल देशपांडे यांची माहिती
कामाची कारकीर्द
शेक्सपियर या कवीच्या कामाची कारकीर्द लंडन शहरापासून झाली. लंडनमध्ये असताना शेक्सपियरची पहिली छापील कामे प्रकाशित झाली त्यामध्ये ‘व्हीनस आणि अॅडोनिस’ हे इ. स १५९३ मध्ये प्रकाशित झाले आणि ‘द रेप ऑफ लुक्रेस’ हे इ. स १५९४ मध्ये प्रकाशित झाले आणि या दोन्ही दीर्घ कविता होत्या.
त्याचबरोबर विल्यम शेक्सपियर हे अभिनेत्यांची कंपनी द लॉर्ड चेंबरलेन्स मेनचे संस्थापक सदस्यही बनले. शेक्सपियर कंपनीमध्ये काम करत असताना शेक्सपियरने ‘किंग लीअर’ आणि ‘मॅकबेथ’ सारख्या अनेक प्रसिद्ध शोकांतिका लिहिल्या.
विल्यम शेक्सपियर याने अनेक रोमांटिक नाटके लिहिली होती पण त्यामधील लोकप्रिय झालेले नाटक जे आजही खूप प्रसिध्द आहे ते म्हणजे “रोमियो जुलियट” हे होते आणि त्यांनी लिहिलेले हे रोमांटिक नाटक आजही खूप आवडीने शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये आणि वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये हे नाटक सादर केले जाते.
विल्यम शेक्सपियर विषयी काही अनोखी आणि मनोरंजक तथ्ये
- शेक्सपियरचे पालक जॉन आणि मेरी शेक्सपियर हे होते.
- शेक्सपियरला एकूण सात भावंडे होती आणि त्यामधील एक जोआन याचा जन्म इ. स १५५८ मध्ये झाला पण तो फक्त २ महिने जगाला आणि त्यानंतर मार्गारेट, गिल्बर्ट, जोन, अॅनी, रिचर्ड आणि एडमंड हि शेक्सपियरच्या इतर भावंडांची नावे आहेत.
- विल्यम शेक्सपियर या वयाच्या १८ व्या वर्षी २६ वर्षाच्या गर्भवती मुलीशी लग्न केले जिचे नाव अने हॅथवे असे होते. ती लग्नाच्या अगोदर तीन महिन्याची गरोदर होती.
- विल्यम शेक्सपियर यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले नाही.
- शेक्सपियरला इंग्लंडचे राष्ट्रीय कवी म्हणून ओळखले जात होते आणि त्यांना बार्ड ऑफ एव्हन या टोपण नावाने देखील ओळखले जात होते.
- शेक्सपियरने स्ट्रॅटफोर्ड एव्हॉन इ.स १५८० मध्ये सोडले आणि तो लंडनला गेला आणि त्याच्या कामाची कारकीर्द लंडन मधूनच सुरु झाली.
- विल्यम शेक्सपियर हॅम्लेट’ आणि ‘अॅड अॅड यू लाईक इट’ मध्ये भुताची भूमिका केल्याचे पुरावे आहेत.
- शेक्सपियर याला आपले नाटक रंगमचावर सादर करायला आवडत होते त्यामुळे त्याने लिहिलेली नाटके प्रकाशित करायला आवडत नव्हती.
- शेक्सपियरने सुमारे १७०० इंग्रजी शब्द तयार केले आणि त्यातील काही खूप लोकप्रिय देखील होते.
- विल्यम शेक्सपियरच्या यांनी आपल्या जीवन काळात १५४ काव्य रचना केल्या आहेत आणि ३५ हून अधिक नाटके लिहिली आहेत.
- विल्यम शेक्सपियरच्या काळामध्ये नाटकामध्ये स्त्रिया काम करू शकत नव्हत्या कारण त्या काळी स्त्रियांना नाटकामध्ये काम करण्यासाठी स्त्रियांना परवानगी नव्हती म्हणून नाटकामध्ये असणाऱ्या स्त्रियांच्या भूमिका देखील पुरुषच करत होते.
विल्यम शेक्सपियर यांना मिळालेले सन्मान
विल्यम शेक्सपियर यांच्या स्ट्रॅटफोर्ड या जन्म ठिकाणाला तीर्थ असा दर्जा दिला आणि तेथे त्यांचे इ.स १८४७ मध्ये राष्ट्रीय स्मारक देखील बनवले आहे तसेच यांना इंग्लंडचे राष्ट्रीय कवी म्हणून ओळखले जात होते आणि त्यांना बार्ड ऑफ एव्हन या टोपण नावाने देखील ओळखले जात होते. इ. स १९३२ मध्ये शेक्सपियर थेटर ची स्थापना करण्यात आली.
- नक्की वाचा: कुसुमाग्रज यांची माहिती
पुस्तके – Shakespeare Books in Marathi
मृत्यू आणि वारसा
विल्यम शेक्सपियर या जगप्रसिद्ध कवीचा मृत्यू २३ एप्रिल १६१६ रोजी त्यांच्या वयाच्या ५२ व्या वर्षी अज्ञात कारणांमुळे झाला आणि त्याच्या संपत्तीचा बराचसा भाग त्याची मुलगी सुझानाकडे गेला.
विल्यम शेक्सपियर यांच्या काही अमूल्य, प्रेरित आणि लोकप्रिय वाक्य रचना
अ. क्र. | वाक्य रचना |
१. | ‘मूर्ख समजतो की तो शहाणा आहे, पण शहाण्याला माहित असते की तो मूर्ख आहे’. |
२. | ‘काहीही चांगले किंवा वाईट नसते, पण चांगला किंवा वाईट विचार केल्याने ते घडते’ |
३. | ‘ज्यांना तुमचे कौतुक नाही त्यांच्यावर तुमचे प्रेम वाया घालवू नका’. |
४. | ‘आपले नशीब ताऱ्यांमध्ये नाही तर स्वतःमध्ये आहे’. |
आम्ही दिलेल्या shakespeare information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर विल्यम शेक्सपिअर यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about william shakespeare in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of shakespeare in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये william shakespeare information about teacher in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट