शतावरी चे फायदे मराठी Shatavari Plant Information in Marathi

Shatavari Plant Information in Marathi – Asparagus in Marathi – Shatavari Kalpa Benefits in Marathi शतावरीची माहिती व शतावरी चे फायदे मराठी मित्रहो, शतावरी वनस्पतीला शास्त्रीय परिभाषेमध्ये ‘Asparagus racemosus’ अशा नावाने ओळखले जाते. मुख्यतः शतावरी वनस्पती Liliaceae या कुटुंबामध्ये वर्णिली जाते. शतावरी ही मूळची भारतातली वनस्पती प्रजाती असून उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंध असलेल्या वातावरणात ती समुद्रसपाटीपासून साधारणतः ४००० फूट उंचीपर्यंत संपूर्ण भारत देशभर वाढलेली आपल्याला दिसून येते.

मित्रहो, आपल्या भारत देशामध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये, सातपुडा पर्वताच्या रांगांमध्ये आणि विशेष म्हणजे कोकणाकडील भागांमध्ये शतावरीच्या वेली या खडकाळ जमिनीवर, डोंगराच्या उतारावर आणि दाट जंगलातही आढळून येतात.

खरंतर, सर्व ठिकाणी शोभेचे झाड म्हणून शतावरी वनस्पती सगळ्यांच्या घरोघरी लावलेली आपल्याला दिसून येते. शतावरी वनस्पतीला संस्कृत भाषेमध्ये नारायणी असे म्हटले जाते तर, या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘ॲस्पॅरेगस रेसिमोसस’ असे आहे.

shatavari plant information in marathi
shatavari plant information in marathi

शतावरीची माहिती व शतावरी चे फायदे मराठी – Shatavari Plant Information in Marathi

वर्णन

शतावरी ही एक लांबट, पर्णहीन, काटेरी आणि बहुवार्षिक अशी आरोहिणी वेल आहे. मित्रहो, आपल्याला माहीत आहे की झाडाच्या खोडावर वाढणाऱ्या लांबट आणि मोठ्या फांद्यांना भरपूर पेर असतात. तसेच या प्रत्येक पेरावर छोट्याश्या, हिरव्यागार आणि एकामागोमाग एक अशा पद्धतीने उपफांद्या देखील असतात. या उपफांद्यांना दुसऱ्या शब्दात ‘पर्णकांडे’ असे म्हणतात.

दुरून पाहिल्यावर या पर्णकांड्या अगदी पानांप्रमाणे असल्यासारख्या दिसतात. त्याचबरोबर, शतावरीची ‘पाने’ आकाराने बारीक असून ती काहीशी सुरूच्या पानासारखी दिसून येतात. शतावरी वनस्पतीच्या फांद्यांवर साधारणपणे एक सेमी इतक्या लांबीचे टोकदार आणि बाकदार काटे असून ते खालच्या बाजूच्या दिशेने वाकलेले आपल्याला दिसून येतात.

याशिवाय, शतावरीची ही ‘पाने’ सामान्यतः दोन ते सहा या संख्येच्या गुच्छात उगवणारी जवळजवळ दोन ते तीन सेमिपर्यंत इतकी लांबट असतात.

शतावरीच्या लांब फांद्यांवर आणि फांद्यांवरील पेरावर टोकदार आकाराचे वाकडे काटे असतात. शतावरी वनस्पती स्वतःच्या आधारासाठी गुंडाळून घेते आणि वरच्या दिशेने चढते. यानंतर, या वनस्पतीवर अनेक फांद्या तयार होतात आणि काही कालावधीनंतर शतावरी वनस्पतीचे रूपांतर एका लहान काटेरी झुडूपामध्ये झालेले आपल्याला पहावयास मिळते.

आपल्या भारत देशामध्ये शतावरीचा आणखी एक प्रकार आढळून येतो आणि शतावरीच्या या प्रकाराला ‘भाजीची शतावरी’ असे म्हटले जाते तसेच, तिचे शास्त्रीय नाव ‘Asparagus officinalis’ असे ठेवण्यात आले आहे.

भारत सोडून अन्य देशांमध्ये देखील शतावरी वनस्पतीच्या अनेक प्रजाती आढळतात. अमेरिकेतील कॅलिफोर्निया, फ्रान्स देशामधील मिलील फोर्ट, चीनमधील तैवान आणि जपान व अन्य देशांमध्ये शतावरी वनस्पती ॲस्परेगसची भाजी म्हणून जेवणामध्ये खाल्ली देखील जाते.

ॲस्परेगस भाजीची लागवड फार पूर्वीच्या काळापासून काश्मीर, भूतान यांसारख्या थंड हवामानाच्या प्रदेशात करण्यात येते. मित्रहो, या भाजीचे कोवळे कोंब चवदार, आपल्यासाठी आरोग्यवर्धक तर असतातच, याखेरीज या वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए व सी, पोटॅशियम, रिबोफ्लेव्हिन आणि थायमिन अशी औषधी तत्त्वे देखील असतात.

या वनस्पतीच्या कोंबांपासून अत्यंत चविष्ट अशा प्रकारचे सूप बनवले जाते. शतावरीच्या या प्रकाराखेरिज आपल्या भारत देशामध्ये मेरी वॉशिंग्टन ह्या जातीच्या ॲस्परेगसची सुध्दा शिफारस केली जाते.

शिवाय, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी शतावरीला ‘ससूर अथवा सुसर मुळी’ असेदेखील म्हटले जाते. महाराष्ट्रात अनेक भागांत ससूरची चविष्ट भाजी करून खाल्ली जाते. साधारणत: राना-वनांत अथवा शेतांमध्ये मृग नक्षत्रातील पहिल्या पावसानंतर ही वनस्पती आपोआप कोणत्याही प्रकारची लागवड न करता जमिनीतून वर उगवते.

या वनस्पतीचे कोवळे कोवळे कोंब खूडून आणले जातात आणि त्यानंतर स्वच्छ धुवून याची भाजी बनविली जाते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये एक रानभाजी म्हणून शेतकरी बांधव ही भाजी खूप आवडीने खातात. मित्रहो, ससूरची भाजी खूप चविष्ट, रूचकर, आपल्या आरोग्यासाठी पोषक, जीवनसत्वयुक्त आणि अनेक खनिजद्रव्यांनी भरलेली असते.

शतावरी वनस्पतीची लागवड केल्यानंतर ही वनस्पती सातत्याने साधारणतः १४ ते १५ वर्षे मातीमध्ये टिकून राहते शिवाय, ही वनस्पती बागायती प्रकारची असल्याने शेतकऱ्यांसाठी उत्पन्न येणे देखील चालू राहते. या वनस्पतीच्या लागवडीनंतर एका वर्षाने कोवळे कोंब तयार होतात. मित्रहो, भारतातील सगळ्या फार्मसी शतावरी वनस्पतीच्या मुळ्या विकत घेतात.

याशिवाय, आपल्या भारताबाहेरही या वनस्पतीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच अ‍ॅलोपथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी या तिन्ही औषधशास्त्रांत शतावरी वनस्पतीच्या मुळ्या औषध बनवण्यासाठी उपयोगात आणल्या जातात.

शतावरीचे अवयव

आपल्या देशात आढळणाऱ्या शतावरी वनस्पतीची फुले सफेद किंवा गुलाबी रंगाची असून त्यांचा उपयोग गुच्छ तयार करण्यासाठी केला जातो. याशिवाय, शतावरी वनस्पतीची फळे भाजीमधल्या वाटाण्याच्या आकाराप्रमाणे दिसतात. या फळांमध्ये जास्तीत जास्त एक किंवा दोन एवढ्याच संख्येच्या मिरीएवढ्या बिया असतात.

या वनस्पतीची मुळे सहसा जाड, लांबट आणि वर्तुळाकार असून दोन्ही टोकांकडे ही मुळे निमुळती होत जातात. खरंतर, या मुळांना दुसऱ्या शब्दात कंद असे म्हणतात. मित्रहो, हे कंद सगळीकडे पांढऱ्या रंगाचे असतात आणि ते एका झाडाला जवळपास १०० इतक्या संख्येएवढे असू शकतात.

खरंतर, कंदांच्या या संख्येवरूनच या वनस्पतीला शतावरी असे नाव पडले आहे, हे मात्र खरे! साधारणतः शतावरीची मुळे ही जमिनीच्या खालच्या बाजूला बुंध्याजवळ एकत्रितपणे झुपक्याने वाढतात.

शतावरीच्या एका वेलीला भरपूर प्रमाणात मुळ्या फुटतात. त्यामुळे, साधारणतः शंभर मुळ्या एकाच वेळी फुटल्यामुळे या वनस्पतीला शतमुळा असेदेखील म्हटले जाते. शतावरीच्या मुळांच्या वरच्या बाजूला पातळ करड्या रंगाचा एक पापुद्रा असतो, तसेच मुळाचा मधला भाग हा पिवळसर अशा रंगाचा मजबूत आणि टणक असतो.

मित्रहो, या मुळांचा औषध बनवण्यासाठी उपयोग करताना हा भाग पहिल्यांदा काढून टाकावा लागतो. याशिवाय, शतावरी वनस्पतीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही वनस्पती मधुर रसाची असते.

शतावरी चे फायदे मराठी – Shatavari Kalpa Benefits in Marathi

मित्रहो, वरील माहितीवरून आपल्या लक्षात आलं असेल की शतावरी ही वनस्पती किती औषधीयुक्त आहे. विशेषतः जास्तीत जास्त ठिकाणी  शतावरीच्या मुळ्या आणि अंकुर या भागांपासून औषधी रसायने बनवली जातात. खरंतर, शतावरीच्या वनस्पतीची चव गोड आणि कडू असते. त्यामुळे, तिचा उपयोग छातीत भरलेला कफ आणि पित्त कमी करण्यासाठी केला जातो.

शिवाय, शतावरीपासून शतावरी घृत, विष्णू तेल, शतावरी कल्प आणि प्रमेह मिशतेल जास्त प्रमाणावर बनवले जाते. शतावरी वनस्पती आपल्या शरीरातील स्नायूंची शक्ती जास्त वाढवण्यासाठी देखील वापरली जाते.

शतावरीचे नारायण तेल हे अर्धांगवायू झालेल्या व्यक्तींसाठी आणि संधिवातासाठी भरपूर उपयुक्त आहे. याखेरीज, शतावरीच्या कंदामध्ये सॅपोनिन, फॉस्फरस, पोटॅशियम, ग्लायकोसाइड्‌स, रिबोफ्लेव्हिन, थायमाईन आणि   कॅल्शियम व इतरही रासायनिक द्रव्ये भरभरून असतात.

शतावरीच्या कंदाचा वापर पित्तप्रदर, ज्वर, धातुवृद्धी, मुतखडा, अपस्मार आणि रक्तशुद्धीसाठी सगळीकडे केला जातो. याशिवाय, या कंदाचा उपयोग जनावरांमध्ये अथवा पशुंमध्ये विशेषतः गायी आणि म्हशींमध्ये भरपूर दूध मिळवण्यासाठी केला जातो. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की शतावरी कल्प हा शतावरीच्या कंदापासून बनविला जातो.

पहिल्यांदा नव्याने मासिक पाळी येणाऱ्या तरुण मुलींसाठी व मासिक पाळी जाण्याच्या मेनोपॉझच्या काळातील तक्रारींमध्ये स्त्रियांना शतावरी वनस्पतीची खूप मदत होते. त्याचबरोबर, स्त्रियांच्या सुलभ प्रसूतीसाठी देखील या वनस्पतीचा उपयोग केला जातो. असे म्हटले जाते की शतावरी या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘शंभर पती असणारी स्त्री’ असा होतो. शतावरी ही औषधी आणि गुणकारी वनस्पती फार पुर्वीपासून नारीच्या शरीरात पुनरूत्पादनासाठी वापरली जाते.

अनेक भागांमध्ये शतावरी वनस्पती शतमूली, शकाकूल अथवा इंग्रजीमध्ये वाइल्ड अस्पॅरॅगस या नावांनीही ज्ञात आहे. शतावरी वनस्पती प्रामुख्याने भारत देश आणि श्रीलंका या देशांत बघायला मिळते. हिचे नाव जरी ‘वाइल्ड अस्पॅगॅरस’ असे असले तरी सामान्यपणे भाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या अस्पॅगॅरसपेक्षा मूळची शतावरी वनस्पती ही वेगळी असते.

शतावरीच्या कंदामध्ये स्त्रियांसाठी उपयोगी असणारे अनेक औषधी घटक असतात. याशिवाय, आयुर्वेदामध्ये तर शतावरीला स्त्रियांसाठी ‘शक्तीवर्धक औषध’ मानलेले आहे. कारण, शतावरीमुळे स्त्रियांच्या प्रजननक्षमतेवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतो. स्तनपान देणाऱ्या मातांचे दूध वाढवण्यासाठी शतावरी वनस्पती भरपूर उपयुक्त आहे.

परंतू, आपण जर शतावरीच्या दुष्परिणामांकडे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की शतावरीचे सेवन केल्याने अनेक व्यक्तींच्या वजनात वाढ झाली आहे. शिवाय, अस्पॅरॅगसची अॅलर्जी असणाऱ्या व्यक्तींना शतावरीचे सेवन केल्याने अजुन जास्त अॅलर्जी होऊ शकते.  त्यामुळे, अशा लोकांनी सहसा शतावरी वनस्पतीचे सेवन करणे टाळले पाहिजेत.

                    तेजल तानाजी पाटील

                       बागिलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या Shatavari Plant Information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर शतावरीची माहिती व शतावरी चे फायदे मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या asparagus meaning in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि shatavari benefits in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये shatavari uses in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!