श्री स्वामी समर्थ चरित्र मराठी Shree Swami Samarth in Marathi

Shree Swami Samarth in Marathi – Swami Samarth Information in Marathi स्वामी समर्थ चरित्र मराठी आजच्या लेखामध्ये आपण अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ हे एकोणिसाव्या शतकामध्ये उद्भवलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दंत पंथाचे महान संत होते. श्री स्वामी समर्थ हे श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे श्री भगवान दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्ण अवतार आहेत. श्री स्वामी समर्थ यांनी आपल्या वेगवेगळ्या चमत्कारांनी व गोड संदेशांनी भक्तजनांच्या मनामध्ये घर केले आहे. आज लाखोहून अधिक भक्त दरवर्षी अक्कलकोट येथे जाऊन स्वामी समर्थांची भेट घेतात. “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे स्वामी समर्थ यांचे घोषवाक्य आहे.

shree swami samarth in marathi
shree swami samarth in marathi

श्री स्वामी समर्थ चरित्र मराठी – Shree Swami Samarth in Marathi

Shri Swami Samarth in Marathi

जन्म

श्री स्वामी समर्थ यांच्या जन्मा बद्दल काही माहिती उपलब्ध नाही आहे. परंतु काही पुस्तकांमध्ये व ग्रंथांमध्ये लिहिल्या गेल्याप्रमाणे स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्र प्रदेशातील श्री शैल्यम क्षेत्राजवळील कर्दळीवनातून प्रकट झाले होत. या वनांमध्ये स्वामी समर्थ महाराज तीनशे वर्षे प्रगाढ समाधी अवस्थेत मध्ये होते. त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांनी भलंमोठं वारूळ निर्माण केलं होतं.

एकदा या जंगलातून जाताना एका लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव त्या वारूळावर पडला आणि त्यातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. स्वामी समर्थ प्रथम काशीस प्रगट झाले त्यानंतर पुढे कोलकत्ता येथे जाऊन त्यांनी कालीमातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. आणि मग तिथून पुढे गंगा नदीच्या किनाऱ्यावर अनेक ठिकाणी भ्रमंती करून पुढे गोदावरी नदीच्या किनाऱ्याशी आले.

पुढे स्वामी समर्थ हैदराबादला गेले आणि तिथुन मंगळवेढ्यास आले. मंगळवेढा मध्ये स्वामी समर्थांनी बारा वर्षे काढली. आणि मग अखेरीस पंढरपूर, मोहोळ मार्गे ते सोलापूर मध्ये आले आणि अक्कलकोट येथे प्रकट झाले. अक्कलकोट येथे स्वामी समर्थ यांनी अठराशे शके पर्यंत वास्तव्य केलं या संपूर्ण भ्रमंतीमध्ये स्वामी समर्थ यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे वापरली. पण आता ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणूनच ओळखले जातात.

श्री स्वामी समर्थांची कथा – Swami Samarth Katha 

गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच श्री स्वामी समर्थ यांच्या रूपाने प्रकट झाले आहेत. हे स्वतः स्वामींनी सांगितले होते. मी नृसिंह भान असून श्रीशैलम जवळच्या कर्दळीवनातून आलो आहे. असे स्वामी महाराज यांच्या मुखात निघालेले बोल होते. स्वामी समर्थांचे या उद्गारातून ते नृसिंह सरस्वती चे अवतार असल्याचं समजतं. इसवीसन १८५६ मध्ये स्वामी समर्थ अक्कलकोटेस आले.

अक्कलकोट मध्ये आल्यावर सर्वात प्रथम त्यांनी तेथील खंडोबाच्या मंदिरामध्ये मुक्काम केला. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी समर्थ त्यांच्या भक्तांना सांगू इच्छितात. या वाक्याप्रमाणे स्वामी समर्थ म्हणतात की भक्तजनहो तुम्ही कुठल्याही प्रसंगांमध्ये अडकला असाल तरी माझा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे.

त्यामुळे कुठल्याही प्रसंगाला न घाबरता त्याला सामोरे जा मी नेहमी तुम्हाला मार्गदर्शन करेन. स्वामी समर्थांनी लोकांना चांगल्या मार्गी लावण्यासाठी अनेक चमत्कार दाखवले. ते क्षणातच अंतर्धान पावत व क्षणातच प्रकट व्हायचे. एकदा श्री स्वामी समर्थांनी भक्तांना भला मोठा चमत्कार करून दाखवला ते गिरनार पर्वतावर गुप्त झाले आणि दुसर्‍या क्षणाला आंबेजोगाई येथे प्रगट झाले.

त्यामुळे त्यांची लीला सर्वत्र पसरली गेली. हरिद्वारहून काठेवाडी तील जैविक क्षेत्रांमधील नारायण सरोवराच्या बरोबर मध्यभागी स्वामी समर्थ सहाजण घालून बसलेले दिसले. नंतर भक्तजनांनी त्यांना पंढरपूरमधील भीमा नदीच्या भर पुरातून चालत जाताना पाहिले. स्वामींनी मंगळवेढा येथील बसपाचे दारिद्र्य नष्ट करून दाखवले.

इतकेच नव्हे तर स्वामिनी बाबाजी भट नावाच्या ब्राह्मणाला त्याच्या कोरड्या आड्या मध्ये पाणी आणून दाखविले. एका आंधळ्या ब्राह्मणास डोळे दिले. स्वामी समर्थ हे जनकल्याणासाठी प्रकट झाले होते. त्यांनी लोकांच्या मनातून पाप दुःख वाईट विचार या सगळ्या गोष्टींचा नाश केला. समाजामध्ये संत विचारांची स्थापना केली.

संकटांच्या वेळेस भक्तांच्या हाकेला धावून जाणारे स्वामी समर्थक अतिशय साधे होते. आपल्या पीडित भक्तांना त्यांनी आशीर्वाद दिला. गोरगरिबांना मदत केली. त्यांच्यासाठी श्रीमंत व गरीब असा भेदभाव कधीच नव्हता. सगळ्या भक्तांवर त्यांनी सारखंच प्रेम केले आणि सगळ्यांना सारखीच वागणूक दिली. काही दृष्ट वृत्तीच्या लोकांना आपल्या चमत्कार दाखवून त्यांचे डोळे उघडले.

स्वामी समर्थ यांनी करुन दाखवलेला चमत्कारांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक कथा म्हणजे, तात्या भोसले नावाचे गृहस्थ अक्कलकोटच्या संस्थानातील मानकरी सरदार होते. त्यांचा संसार चांगला चालू होता परंतु संसारांमध्ये त्यांचे मन रमत नव्हते. म्हणून त्यांनी श्री स्वामी समर्थांची सेवा करण्याचा निर्णय घेतला ते अगदी मन लावून श्री स्वामी समर्थांची सेवा करत होते.

एकदा स्वामी समर्थांच्या चरणी तात्या भोसले बसले होते. तेव्हा श्री स्वामी समर्थ त्यांना म्हणाले तुझ्या नावाची चिठ्ठी आली आहे याचा अर्थ तुला यमदूताने आता बोलावलं आहे. तात्या भोसले यमदूताला पाहून घाबरून गेले होते त्यांनी स्वामी जवळ प्रार्थना केली की त्यांना स्वामींची सेवा करण्यासाठी अजून वेळ हवा आहे.

तेव्हा स्वामीजी त्याला म्हणाले हा माझा भक्त आहे याला स्पर्श करू नकोस तुला कोणाला घेऊन जायचं असेल तर त्या समोरच्या बैलाला घेऊन जा आणि क्षणातच तो समोरचा बैल धर्तीवर कोसळला त्याचे प्राण गेले. एकदा स्वामी मोर्बा कुलकर्णी या स्वामी भक्ताच्या घरी काही काळासाठी मुक्कामास गेले. तेव्हा रात्री अंगणामध्ये स्वामी त्यांच्या सेवकांसह झोपले होते, तेव्हा मोर्बा कुलकर्णी यांच्या पत्नीच्या पोटामध्ये असह्य वेदना होऊ लागल्या.

या वेदना इतक्‍या असह्य होत्या कि त्या विहिरीमध्ये जीव द्यायला निघाल्या तेव्हा, स्वामी त्यांच्या एका सेवकाला म्हणाले जा तिला माझ्यासमोर घेऊन ये ज्या क्षणाला मोर्बा कुलकर्ण्यांची पत्नी स्वामींसमोर आली त्या क्षणी तिच्या पोटामध्ये दुखायचं बंद झालं. स्वामींनी त्यांच्या कृपादृष्टीने तिच्या वेदना पळवून घालवल्या. द्वारकापुरी मध्ये सूरदास नावाचा एक महान श्रीकृष्ण भक्त राहत होते.

परंतु ते जन्मापासून आंधळे होते पण श्री कृष्णाला बघायची त्याची फार मोठी इच्छा होती. एकदा स्वामी समर्थ द्वारकापुरी मध्ये आले आणि सूरदासाच्या आश्रमामध्ये येऊन उभे राहिले. त्यांनी सूरदासाला हाक मारली आणि म्हणाले “तू ज्याच्या नावाने हाक मारीत आहेस तो मी बघ इथे तुझ्या दारात येऊन उभा आहे”.

इतकं कानावर पडता सूरदासाने मागे वळून पाहिले स्वामींनी त्याच्या डोळ्याला आपल्या हातांचा स्पर्श करून त्याला दिव्य दृष्टी प्राप्त करून दिली. सूरदास आला त्याच्या डोळ्यासमोर शंख चक्र गदाधारी असे श्रीकृष्णाचं सुंदर रूप दिसू लागलं. श्रीकृष्णाचं मनमोहक रूप पाहून कृष्णभक्त सूरदास सद्गदित झाला. थोड्या वेळाने भानावर आल्यावर स्वामी समर्थांच्या खऱ्या रूपाचं त्याला दर्शन झालं.

इतिहासात नोंदल्या गेल्या प्रमाणे श्री स्वामी समर्थांचा कार्यकाळ अठराशे शके मध्ये संपन्न झाला होता परंतु तीन महिन्यांनी स्वामी समर्थ वाराणसी येथे प्रकट झाले.

मंदिराची रचना

श्री स्वामी समर्थांचे मंदिर वडाच्या झाडाभोवती बांधलं गेलं आहे. याच वडाच्या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ ध्यान करायचे आणि आपल्या भक्तांना उपदेश द्यायचे. मंदिराचा भला मोठा परिसर आहे आणि मुख्य परिसरामध्ये सभामंडप, मुख्य मंदिर आणि भक्तांना राहण्यासाठी व्यवस्था देखील केली आहे. स्वामी समर्थांची पुण्यतिथी दरवर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला साजरी केली जाते. मंदिर समिती तर्फे भक्त जनांसाठी रोज दुपारी व रात्री मोफत जेवणाचा प्रसाद दिला जातो.

अक्कलकोट कोठे आहे? व कसे जायचे?

अक्कलकोट प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणून अक्कलकोट प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भक्त अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जातात. अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. सोलापूर जिल्ह्यात ते ३८ किलो मीटर अंतरावर अक्कलकोट वसलेला आहे.

विमानाने प्रवास करायचा असेल तर अक्कलकोटला जाण्यासाठी पुणे विमानतळ सर्वात जवळचे विमानतळ ठरेल. रेल्वे मार्गात द्वारे अक्कलकोट शहर रेल्वेपासून ११ किलोमीटर अंतरावर आहे. अक्कलकोट रोड हे जवळचे रेल्वे स्थानक आहे. इथून अक्कलकोट ला जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध असतात.

बस मार्गे सोलापूर चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. स्वामी समर्थांची समाधी त्यांचे शिष्य श्री चोळाप्पा यांच्या घरामध्ये आहे. चोळाप्पा यांचे घर समाधी मठ म्हणून ओळखलं जातं.

आम्ही दिलेल्या swami samarth information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर श्री स्वामी समर्थ चरित्र मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या akkalkot swami samarth temple information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि shree swami samarth in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये shri swami samarth in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “श्री स्वामी समर्थ चरित्र मराठी Shree Swami Samarth in Marathi”

  1. ,जय श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट कोटि कोटि नमन करता हूं
    मुझ पर दया करो स्वामी

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!