shrivardhan rajmachi fort information in marathi श्रीवर्धन राजमाची किल्ला माहिती, आज आपण या लेखामध्ये खंडाळा परिसरातील प्रसिध्द असणारा किल्ला म्हणजेच श्रीवर्धन राजमाची किल्ला या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. श्रीवर्धन किल्ला हा प्रसिध्द राजमाची किल्ला बनवणाऱ्या दोन किल्ल्यांपैकी आहे. श्रीवर्धन हा किल्ला राजमाची या गावाजवळ वसलेला आहे आणि हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगेमध्ये सुमारे ९०० मीटर उंचीवर वसलेला आहे. श्रीवर्धन राजमाची हा किल्ला लोणावळा-खंडाळा परिसरातील एक मुख्य आकर्षण आहे आणि हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील कर्जत या गावाजवळ आहे.
हा किल्ला भारतातील वैदिक काळापासून ओळखला जाणारा किल्ला आहे आणि त्या काळी हा किल्ला सह्याद्री प्रदेशातील टेहळणी बुरुज म्हणून वापरला जात होता आणि या किल्ल्यावर मराठी शैलीतील बौध्द काळातील लेणी आहे. सध्या हा किल्ला पुण्यातील संरक्षित स्मारक आणि प्राचीन वारसा असलेले ठिकाण आहे आणि हा किल्ला आजही चांगल्या स्थितीमध्ये आहे.
श्रीवर्धन राजमाची किल्ला माहिती – Shrivardhan Rajmachi Fort Information in Marathi
किल्ल्याचे नाव | श्रीवर्धन राजमाची किल्ला |
केंव्हा बांधला | ११ व्या शतकामध्ये |
काळ | सातवाहनांचा काळ |
ठिकाण | महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील कर्जत या गावाजवळ आहे |
उंची | ९०० मीटर |
वापर | टेहळणी बुरुज |
श्रीवर्धन राजमाची किल्ल्याची महत्वाची माहिती – information about shrivardhan rajmachi fort in marathi language
श्रीवर्धन राजमाची हा किल्ला पायथ्याच्या गावापासून ९०० मीटर उंच आहे तर या किल्ल्याची समुद्र सपाटी पासुअनाची उंची २७१० फुट इतकी आहे आणि हा किल्ला लोणावळा या शहरापासून जवळ आहे. श्रीवर्धन राजमाची हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगा तसेच शिरोटा धरणाच्या मागील पाण्याचे सुंदर दृश्य देते आणि लोणावळा या शहरापासून हा किल्ला फक्त १५ किलो मीटर अंतरावर आहे. श्रीवर्धन राजमाची हा किल्ला ट्रेकिंगसाठी खूप प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे आणि या किल्ल्यावर ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी अबेक पर्यटक येतात.
श्रीवर्धन राजमाची किल्ल्याचा इतिहास – history
श्रीवर्धन राजमाची हा किल्ला भारतातील वैदिक काळापासून ओळखला जाणारा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याचा वापर हा टेहळणी बुरुज म्हणून पूर्वी केला जात होता. या किल्ल्याचा उल्लेख हा ११ व्या शतकापासून आहे आणि श्रीवर्धन राजमाची हा किल्ला सातवाहनांच्या काळामध्ये बांधला असे म्हटले जाते.
श्रीवर्धन राजमाची हा किल्ला मध्ययुगीन काळामध्ये खूप प्रसिध्द होता जेव्हा स्थानी राज्यकर्त्यांनी त्यांच्या प्रदेश विस्ताराच्या हेतूने हा किल्ला ताब्यात घेतला होता. हा किल्ला परिसर पश्चिमेकडे किंवा अरबी समुद्राकडील बंदराकडे जाणारा एक मुख्य मार्ग आहे आणि म्हणूनच या किल्ल्याने अनेक आक्रमणे झेलली आहेत. या किल्ल्यावर अनेक इस्लामी आक्रमनकर्ते व्यापारी आणि समुद्रमार्गे भारतात आले.
श्रीवर्धन राजमाची हे क्षेत्र हे सिध्दी, विजापूर राज्य आणि शाही शासकांच्या ताब्यात होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांनी विजापूर शासकांचा परभा करून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि त्यावेळी शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा वापर हा टेहळणी बुरुज म्हणून केला.
श्रीवर्धन किल्ल्याविषयी माहिती आणि बांधकाम – information about shrivardhan rajmachi fort in marathi language
श्रीवर्धन राजमाची हा किल्ला ११ व्या शतकामध्ये सातवाहनांच्या काळामध्ये बांधला आहे आणि हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगेवर ९०० मीटर उंचीवर बांधला आहे. या किल्ल्याला सीमेभोवती एक अत्यंत मजबूत भिंत आहे आणि हि भिंड चांगल्या स्थितीमध्ये आहे तसेच या किल्ल्यावर मराठी शैलीतील बौध्द काळातील लेणी आहे.
या किल्ल्यावर पूर्वीच्या काळी चिखलाच्या संरचनेच्या खुणा आढळून आल्या होत्या ज्या नैसर्गिकरित्या वाहून गेल्या होत्या नंतर कालांतराने हा किल्ला अनेक राज्यकर्त्यांच्या ताब्यात गेला आणि त्यांनी काही किरकोळ सुधारणा केल्या आणि याचा वापर राजकर्ते टेहळणी बुरुज म्हणून करत होते. या किल्ल्यावर बारमाही पाण्याचे स्त्रोत दोन ठिकाणी आहे.
तसेच पायथ्याच्या गावापासून ते किल्ल्याच्या माथ्यापर्यंत अनेक गुहा आपल्याला पहायला मिळतात तसेच आणि या गुहा मोठ्या दगडांच्यामध्ये कोरलेल्या आहेत आणि या गुहेमध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साचते आणि त्यावेळी या छोट्याश्या गुहा पाण्याच्या टाक्यासारखे दिसतात. या गुहा बौध्द लोकांनी केल्या आहेत कारण ते त्यांच्या काळामध्ये या गुहांच्यामध्ये ध्यान करत होते आणि या ठिकाणी अनेक शतके बौद्धांचे वास्तव्य होते असे म्हटले जाते.
तसेच या किल्ल्याजवळ एक हिंदू मंदिर आहे आणि हे कालभैरव चे मंदिर आहे. आज आपण जर किल्ल्याचे प्रवेशद्वाराचे अवशेष पहिले तर ते मराठा साम्राज्य काळामध्ये बांधले असल्याचे आपल्याला दिसून येते. किल्ल्यावर पूर्वीच्या काळी बांधलेली प्रवेशद्वार, तटबंदी, प्रशासकीय कार्यालये, पाण्याच्या साठवणुकीच्या टाक्या, दगडांच्या मध्ये कोरलेल्या गुहा, गुप्त निर्गमन दरवाजे, निवासी घरे, देवतांच्या मुर्त्या आणि जलाशय असा परिसर पहायला मिळतो.
श्रीवर्धन राजमाची किल्ल्याला भेट देण्याची उत्तम वेळ – best time to visit
श्रीवर्धन राजमाची या किल्ल्याला बहुतेक वर्षभर पर्यटक भेट देत असतात आणि अनेक निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेत असतात तरीही या किल्ल्याला भेट देण्याचा उत्तम काळ हा नोव्हेंबर ते एप्रिल हा आहे कारण या काळामध्ये राजमाची किल्ला हा हिरवळीने नटलेला असतो आणि या काळामध्ये निसर्गरम्य वातावरण या किल्ल्यावर असते त्यामुळे पर्यटक या ठिकाणी अनेक मनमोहक आनंद घेऊ शकतात.
टिप्स – tips
- या किल्ल्याला सकाळी ६.३० ते संध्याकाळी ६.३० पर्यंत पर्यटक भेट देऊ शकतात.
- श्रीवर्धन राजमाची या किल्ल्याला भेट देण्यासाठी कोणताही प्रवेश शुल्क आकाराला जात नाही.
- हा किल्ला ट्रेकिंगसाठी खूप प्रसिध्द आहे आणि या किल्ल्याचे ट्रेकिंग करणे खूप सोपे आहे.
- आपण या किल्ल्याला वर्षामध्ये कोणत्याही वेळी भेट देऊ शकतो.
- या ठिकाणी पार्किंग शुल्क हे पायथ्याच्या गावांच्या ठिकाणावर बदलत असते.
कसे पोहचायचे – how to reach
श्रीवर्धन राजमाची हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि हा किल्ला लोणावळा या शहरापासून फक्त १५ किलो मीटर अंतरावर आहे आणि आपण या किल्ल्याला भेट देण्यासाठी पुणे किंवा मुंबई या शहरातून बस किंवा रेल्वेने लोणावळा शहरामध्ये येऊ शकतो आणि मग तेथून आपण श्रीवर्धन किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गावाजवळ भाड्याने टॅक्सी घेऊन पोहचू शकतो किंवा आपण हा किल्ला पाहण्यासाठी स्वताची कारण देखील घेऊन येऊ शकतो आणि पायथ्याच्या गावामध्ये कार पार्क करून आपण किल्ल्याच्या ट्रेकला सुरुवात करू शकतो.
आम्ही दिलेल्या shrivardhan rajmachi fort information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर श्रीवर्धन राजमाची किल्ला माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या shrivardhan rajmachi fort raigad information in Marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि shrivardhan rajmachi fort information in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट