पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध Small Essay On Jawaharlal Nehru in Marathi

Small Essay On Jawaharlal Nehru in Marathi – Pandit Jawaharlal Nehru Essay in Marathi पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध जवाहरलाल नेहरू यांचे जीवनमान मित्रांनो, जवाहरलाल नेहरू म्हटलं की आपल्या सर्वांच्या लक्षात येतं की आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान नेहरुजी होते. अशा प्रकारे, आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद याठिकाणी एका काश्मिरी पंडितांच्या घरी दिनांक १४ नोव्हेंबर १८८९ रोजी  झाला. जवाहरलाल नेहरूंच्या वडिलांचे नाव पंडित मोतिलाल नेहरू असे होते.

त्याकाळी, नेहरूंचे वडील एक प्रसिध्द बॅरिस्टर आणि निस्वार्थी समाजसेवक सुद्धा होते. नेहरूंच्या आईचे नाव श्रीमती स्वरूप राणी असे होते. नेहरूंच्या मातोश्री या एका काश्मिरी ब्राम्हण परिवारातील होत्या. याखेरीज, पंडित जवाहरलाल नेहरु यांना दोन बहिणी आणि एक भाऊ होता. पंडित नेहरूंच्या भावंडांमध्ये नेहरूजी हे सर्वांत मोठे होते.

शिवाय, नेहरूंच्या लागोपाठ मोठ्या असलेल्या त्यांच्या बहिणीचे नाव विजया लक्ष्मी असे होते. पुढील काळात विजया लक्ष्मी या संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या होत्या.

small essay on jawaharlal nehru in marathi
small essay on jawaharlal nehru in marathi

पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध – Small Essay On Jawaharlal Nehru in Marathi

Pandit Jawaharlal Nehru Essay in Marathi

याखेरीज, नेहरूंच्या लहान बहिणीचे नाव कृष्णा हठिसिंग असे होते. त्यांच्या लहान बहिणाबाई कृष्णा या एक उत्तम आणि विशेष प्रभावशाली अशा लेखिका होत्या. कृष्णा यांनी त्याकाळी आपला मोठा भाऊ पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी बरीच पुस्तकं लिहीली होती. खरंतर, जन्मतः पंडित नेहरूजी हे  कुशाग्र बुध्दीमत्तेचे आणि ओजस्वी व्यक्तिमत्वाचे महामानव होते.

कारण, नेहरुजी कोणत्याही व्यक्तीला भेटत ती संबंधित व्यक्ती नेहरूजींच्या व्यक्तिमत्वाने खूप प्रभावित होत असे. त्यामुळे, पंडित नेहरूंच्या अशा अनेक कारणांमुळेच मोठेपणी नेहरुजी एक कुशल राजकारणी, आदर्शवादी समाजसेवक, विद्वान व्यक्ती, उच्च विचारक आणि महान लेखक म्हणून प्रचलित झाले होते.

शिवाय, नेहरूंचे कौटुंबिक मुळ हे काश्मिरी पंडित या समुदायाशी आधीपासून जोडले गेलेले असल्याने, ते समाजामध्ये पंडित नेहरू या नावाने खासकरून ओळखले जायचे.

दिनांक ७ फेब्रुवारी १९१६ रोजी साधारणतः वयाच्या २६ व्या वर्षी पंडित नेहरूंचा विवाह कमला कौल यांच्याशी संपन्न झाला. यानंतर, इसवी सन १९१७ साली पंडित नेहरू आणि कमला कौल यांनी इंदिरा प्रियदर्शिनी ही कन्या झाली. जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू यांचे दिनांक ६ फेब्रुवारी १९३१ रोजी निधन झाले, तर नेहरूंच्या पत्‍नी कमला नेहरू यांचे दिनांक २८ फेब्रुवारी १९३६ रोजी निधन झाले.

मित्रांनो, पंडित  जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले नेते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्वांत लोकप्रिय नेते होते. भारतभर ते पंडित नेहरू या नावानेचं ओळखले जायचे.

शिवाय, पंडित नेहरूंना लहान मुले फार आवडत असतं, त्यामुळे ही लहान मुलेदेखील नेहरूंना चाचा नेहरू असे म्हणून बोलवत असतं. खरंतर, जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीच्या काळातील शिक्षण त्यांच्या घरीच खाजगी पद्धतीच्या  शिकवण्यांद्वारे पूर्ण झाले.

यानंतर, वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी नेहरुजी इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो याठिकाणी उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले. पंडित नेहरूंनी केंब्रिज या विद्यापीठातून सामान्य विज्ञान म्हणजेच ‘नॅचरल सायन्स’ या विषयामध्ये पदवी घेतली. पदवी प्राप्त केल्यावर नेहरुजी इसवी सन १९१२ साली आपल्या मायदेशी परतले आणि त्यानंतरच्या पुढील काळात ते पूर्णपणे राजकारणात उतरले.

मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू हे एक चांगले राजकारणी आणि प्रभावशाली वक्ता तर होतेच, परंतू याशिवाय ते एक उत्तम लेखक सुद्धा होते. अभिमानाची गोष्ट म्हणजे, नेहरूंचे लिखाण हे वाचकावर अगदी गडद प्रभाव पाडणारे असे होते.

त्यामुळे, वाचक नेहरूंची विविध प्रकारची पुस्तकं वाचण्यासाठी खूप उत्साही राहतं. त्याचबरोबर, इसवी सन १९३६ साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आदर्शवादी भूमिकेमुळे, त्यांचे आत्मचरित्र सगळीकडे प्रकाशित करण्यात आले होते.

नेहरू यांचे राजकीय जीवन

इसवी सन १९१२ मध्ये झालेल्या बंकीपुर काँग्रेस अधिवेशनाला पंडित जवाहरलाल नेहरू हे उपस्थित होते. शिवाय, इसवी सन १९१९ मध्ये  अलाहाबाद याठिकाणी झालेल्या होमरूल चळवळीचे ते अध्यक्ष देखील बनले. इसवी सन १९१६ मध्ये पंडित नेहरू पहिल्यांदाच महात्मा गांधीजींना भेटले आणि त्यांच्यापासून ते विलक्षण प्रेरित झाले.

यानंतर, इसवी सन १९२० साली पंडित नेहरूंनी उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यामध्ये पहिला किसान मोर्चा काढला. साधारणतः इसवी सन १९२० ते इसवी सन १९२२ च्या दरम्यान सुरू झालेल्या असहकार आंदोलनामुळे पंडित नेहरूंना दोनदा कारावास भोगावा लागला होता.

इसवी सन १९२३ मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले होते, तर इसवी सन १९२६ मध्ये त्यांनी इटली, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि रशिया इत्यादी देशांचा दौरा केला होता. इसवी सन १९२८ मध्ये सायमन कमिशन यांच्या विरोधात निदर्शने करताना, पंडित नेहरूंना लाठीच्या हल्ल्यांना देखील सामोरे जावे लागले होते.

याखेरीज, याचवर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस सभेला नेहरुजी उपस्थित राहिले होते. इसवी सन १९२८ मध्ये त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरू केली आणि इसवी सन  १९२९ साली पंडित नेहरू आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर येथे झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले.

महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव

इसवी सन १९१२ साली पंडित जवाहरलाल नेहरु भारतात परतले आणि त्यावेळी त्यांनी मायदेशात वकिली करण्यास प्रारंभ केला. वरील माहितीमध्ये आपण पाहिलं की इसवी सन १९१६ मध्ये पंडित नेहरूंनी कमला नेहरू यांच्याशी विवाह केला. परंतू, लग्नाआधी पंडित नेहरूजी इसवी सन १९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर काँग्रेस अधिवेशनाला उपस्थित राहिले होते.

यावरून, आपल्या लक्षात येतं की नेहरुजी महात्मा गांधीजींच्या विचारांचे समर्थक होते. खरंतर, इसवी सन १९१६ मध्ये नेहरूजी पहिल्यांदाच महात्मा गांधींना भेटले होते, त्यामुळे नंतरच्या काळात नेहरु त्यांच्यापासून विलक्षण प्रेरीत होत गेले. याखेरीज, पंडित जवाहरलाल नेहरू व त्यांच्या वडिलांनी आपल्या संपूर्ण संपत्तीचा आणि विदेशी वस्तूंचा सर्वत्याग केला.

अशा प्रकारे, त्यांनी मायदेशी स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करून स्वातंत्र्यचळवळीला प्रोत्साहन दिले. शिवाय, ते खादीचा देखील वापर करू लागले. इसवी सन १९२८ मध्ये त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरु केली.

शिवाय, इसवी सन १९२९ साली पंडित नेहरू आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर येथील अधिवेशनाचे अध्यक्ष देखील बनले. या अधिवेशनामध्ये भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याचे ध्येय्य निश्चित केले गेले.

त्यानुसार, दिनांक ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनामध्ये नेहरूंनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा दिली आणि या घोषणेच्या अगदी दुसऱ्याच दिवशी नेहरूंना पुन्हा एकदा अटक करण्यात आली. अशा प्रकारे, नेहरूंना अटक करून त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले.

मित्रहो, ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहमदनगर येथील किल्ल्यात लिहिला होता. कित्येक प्रकारच्या आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यात नेहरूंनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल इसवी सन १९५५ मध्ये पंडित नेहरूंना ‘भारतरत्न’ या उच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

खरंतर, असं म्हंटलं जातं की पंडित जवाहरलाल नेहरू हे महात्मा गांधीजींच्या फार जवळचे मित्र होते, शिवाय या दोघांचे कौटुंबिक संबंध देखील चांगले मजबुत होते. त्यामुळेच, महात्मा गांधींजींच्या सांगण्यानुसार पंडित नेहरूंना भारताचे प्रधानमंत्री करण्यात आले होते. याखेरीज, नेहरूजी देखील महात्मा गांधीजींच्या विचारांनी अगोदरपासूनच फार प्रभावित होते.

कारण, पंडित नेहरूंना गांधीजींच्या शांततापुर्ण आंदोलनांनी नवी शिकवण व नवी ऊर्जा मिळत असे. खरंतर, याच कारणामुळे जेंव्हा पंडित नेहरू हे महात्मा गांधीजींच्या संपर्कात आले, तेंव्हा गांधीजींच्या प्रत्येक आंदोलनात नेहरूंनी त्यांना मनापासून साथ दिली.

परंतू, ज्यावेळी नेहरूजी राजकारणात आले, तेंव्हा त्यांचा धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन हा गांधीजींच्या धार्मिक आणि पारंपारिक दृष्टीकोनापेक्षा थोडा वेगळा दिसू लागला. प्रत्यक्षात मात्र महात्मा गांधीजी हे प्राचीन भारताच्या गौरवावर जोर देत असतं आणि पंडित नेहरूजी आधुनिक विचारधारेची कास धरत असतं.

                     तेजल तानाजी पाटील

                        बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या small essay on jawaharlal nehru in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pandit jawaharlal nehru essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on pandit jawaharlal nehru in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये maza avadta neta jawaharlal nehru essay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!