स्मृती मंधाना यांची माहिती Smriti Mandhana Information in Marathi

smriti mandhana information in marathi स्मृती मंधाना यांची माहिती, पूर्वी भारतीय क्रिकेट संघ हा फक्त पुरुषांच्या पर्यंत मर्यादित होता परंतु सध्या पुरुषांच्या क्रिकेट संघा सोबत आता महिलांचा देखील क्रिकेट संघ आहे आणि हा महिलांचा क्रिकेट संघ देखील राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतो आणि या संघामध्ये अश्या अनेक महिला क्रिकेट खेळाडू आहेत ज्यांनी या खेळामध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि त्यामधील एक म्हणजे स्मृती मंधाना जी महिला क्रिकेट संघाकडून खेळते आणि आज आपण या लेखामध्ये या महिला क्रिकेटपटू विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

स्मृती मंधाना या महिला क्रिकेटपटूचा जन्म हा महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहरामध्ये १८ जुलै १९९६ मध्ये झाला. तिच्या वडिलांचे नाव श्रीनिवास असे आहे आणि तिच्या आईचे नाव स्मिता असे आहे आणि तिला श्रावण नावाचा एक भाऊ देखील आहे जो अंडर १६ मध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळला होता.

स्मृती मंधाना हि २ वर्षाची असताना हिच्या कुटुंबाने सांगली शहरामध्ये स्थलांतर सांगली शहरामध्ये केले आणि मग तिने तिचे सर्व शिक्षण हे सांगली या शहरामधेच केले आणि तिने तिचे कॉलेजचे शिक्षण चिंतामण राव कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेज मधून केले आणि तिने वाणिज्य शाखेतील पदवी पूर्ण केली.

तिला क्रिकेट या खेळाची आवड किंवा हा खेळ खेळण्याची प्रेरणा हि तिच्या कुटुंबाकडून मिळाली म्हणजेच स्मृती मंधाना हिचा भाऊ महाराष्ट्र संघातून खेळत होता आणि त्याचबरोबर तिचे वडील देखील जिल्हा पातळीवर क्रिकेट खेळत होते आणि यामुळेच तिला क्रिकेट हा खेळ आवडायला लागला.

स्मृती मंधाना हि ९ वर्षाची असल्यापासून क्रिकेट खेळण्यासाठी सुरुवात केली आणि तिने अंडर १५ मध्ये महाराष्ट्र संघासाठी पहिल्यांदा खेळली. त्याचबरोबर बिग बॅश लीग मध्ये खेळण्यासाठी फक्त दोन भारतीय महिलांची निवड झाली होती आणि त्यामधील पहिली महिला हि स्मृती मंधाना हि होती.

smriti mandhana information in marathi
smriti mandhana information in marathi

स्मृती मंधाना यांची माहिती – Smriti Mandhana Information in Marathi

नावस्मृती मंधाना
जन्म१८ जुलै १९९६
जन्मठिकाणमुंबई (महाराष्ट्र)
वय२६ वर्ष
पालकश्रीनिवास मंधाना आणि स्मिता मंधाना
भाऊश्रावण मंधाना
सुरुवातीचे प्रशिक्षकअनंत तांबवेकर

स्मृती मंधाना हिची क्रिकेट क्षेत्रातील कामगिरी – career

  • जरी स्मृती मंधाना हिने क्रिकेट या खेळाची सुरुवात नवव्या वर्षापासून केली असली तरी तिला २०१३ मध्ये पहिले यश मिळवले कारण तिने एकदिवशीय सामन्यामध्ये द्वीशतक करणारी ती पहिली भारतीय महिला बनली आणि त्यावेळी तिने अंडर १९ या स्पर्धेमध्ये १५० चेंडूमध्ये २२० पेक्षा अधिक ध्व बनवल्या होत्या.
  • २०१४ मध्ये तिने वर्मस्ले पार्क या ठिकाणी इंग्लंड कसोटीमध्ये खेळून अंतरराष्ट्रीय संघामध्ये पदार्पण केले आणि या सामन्यामध्ये तिने ५५ धावा बनवून संघाला विजय मिळवून दिला. २०१४ च्या कसोटी सामान्यनंतरच्या डावामध्ये तिने १८२ धावांचा पाठलाग करताना थिरूश कामिनीसोबत ७३ धावांची सलामी विकेट भागीदारी केली.
  • त्याचबरोबर २०१६ मध्ये स्मृती मंधानाने महिला चॅलेंजर ट्रॉफीमध्ये इंडिया रेडरसाठी तीन अर्धशतके तिने बनवली होती आणि अश्या प्रकारे तिने १९२ धावा बनवून स्पर्धेतील सर्वाधिक धावा बनवणारी खेळाडू ठरली.
  • तिने इंडिया ब्लू विरुध्द असणाऱ्या अंतिम सामन्यामध्ये तिने ८२ चेंडूमध्ये तिने ६२ धावा बनवल्या आणि तिने आपल्या संघाला ट्रॉफी जिंकण्यास मदत केली.
  • त्याचबरोबर बिग बॅश लीग मध्ये खेळण्यासाठी फक्त दोन भारतीय महिलांची निवड झाली होती आणि त्यामधील पहिली महिला हि स्मृती मंधाना हि होती.
  • २०१८ मध्ये तिने किआ लीगमध्ये भाग घेतला आणि ती त्या लीगमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला ठरली.
  • तिला सप्टेंबर २०२१ मध्ये २०२१ – २०२२ महिला बिग बॅश लीगहंगामासाठी सिडनी थराच्या संघात स्थान मिळवून देण्यात आले आणि तिने या स्पर्धेमध्ये आतापर्यंतच्या सर्वोच्च धावसंखेच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
  • डर्बीमध्ये झालेल्या गट सामन्यामध्ये स्मुती मंधाना हिने ९० धावा बनवून विश्वचषकाला सुरुवात केली. त्यानंतर वेस्ट इंडीज विरुध्द झालेल्या एकदिवसीय सामन्यामध्ये तिने तिचे दुसरे शतक बनवले.
  • महिला टी२० साठी तिने फेब्रुवारी २०१९ मध्ये न्युझीलंड विरुध्द फक्त २४ चेंडूमध्ये भारतासाठी सर्वात जलद ५० धावा केल्या.
  • त्याचबरोबर तिने २०१७ – २०१८ मध्ये भारतीय महिला तिरंगी मालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुध्द पुन्हा एकदा अर्ध शतक बनवले आणि २०१८ मधेच महिला क्रिकेट सुपर लीगमध्ये खेळत असताना तिने ३ ऑगस्ट २०१८ मध्ये पहिले शतक बनवले.
  • तसेच २०१८ मध्ये वेस्ट इंडीज मध्ये होणाऱ्यामहिला विश्व टी २० स्पर्धेसाठी तिला पुन्हा एकदा भारताच्या संघामध्ये स्थान मिळाले आणि स्पर्धेमधील यशानंतर तिचे नाव संघातील स्टार म्हणून घेण्यात आले.
  • ती २०२१ मध्ये झालेल्या महिला टी २० विश्वचषक मध्ये भारतीय संघातून खेळली तसेच ती कसोटी सामन्यासाठी देखील भारतीय संघातून खेळली होती.
  • त्याचबरोबर २०२२ मध्ये तिची राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघाची उपकर्णधार म्हणून देखील निवड झाली.

स्मृती मंधाना हिला मिळालेले पुरस्कार – awards

  • स्मृती मंधाना हि २०१८ मध्ये आयसीसी ( ICC ) महिला वनडे खेळाडू ठरली आणि त्याचबरोबर तिला त्याच वर्षी म्हणजेच २०१८ मध्ये तिला वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूसाठी रॅचेल हेहो फ्लींट हा पुरस्कार देखील मिळाला होता.
  • त्याचबरोबर स्मृती मंधना हिला २०१८ मधेच तिच्या क्रिकेटमधील चांगल्या कामगीरीसाठी अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

आम्ही दिलेल्या smriti mandhana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर स्मृती मंधाना यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या smriti mandhana wikipedia in marathi या smriti mandhana biography in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about smriti mandhana in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!