स्टॅच्यू ऑफ युनिटी माहिती Statue of Unity Information in Marathi

statue of unity information in marathi स्टॅच्यू ऑफ युनिटी माहिती, आज आपण या लेखामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी या विषयी माहिती घेणार आहोत. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा भारताच्या गुजरात राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे आणि हे स्वातंत्र्यवीर आणि भारताच्या राजकारणामध्ये चांगली कामगिरी केलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे आणि हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जातो आणि हा पुतळा गुजरात मधील नर्मदा नदीवर असणाऱ्या सरदार सरोवर धरणाच्या समोर उभारला गेला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरूष म्हणून ओळखले जाते आणि यांना श्रध्दांजली म्हणून हा जगातील सर्वात मोठा पुतळा हा गुजरातमध्ये उभा करण्यात आला. चला तर आता आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी या विषयी सविस्तर माहिती घेवूया.

statue of unity information in marathi
statue of unity information in marathi

स्टॅच्यू ऑफ युनिटी माहिती – Statue of Unity Information in Marathi

ठीकानाचे नावस्टॅच्यू ऑफ युनिटी
कोठे आहेगुजरात मधील नर्मदा नदीवर असणाऱ्या सरदार सरोवर धरणाच्या समोर
प्रकल्पाची घोषणा२०१० मध्ये केली
उंची१८२ मीटर
कोणाच्या स्मरणार्थ बांधलेसरदार वल्लभभाई पटेल
उद्घाटन कोणी केलेपंतप्रधान नरेंद्र मोदी
मुख्य शिल्पकारराम. व्ही. सुतार

स्टॅच्यू ऑफ युनिटी विषयी महत्वाची माहिती – information about statue of unity in marathi

स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ बांधलेला आहे आणि ह्या पुतळ्याची उंची हि १८२ मीटर इतकी आहे आणि एकाच वेळी २०० अभ्यगत्ताना सामावून घेण्याची रचना हि छातीच्या पातळीवर आहे आणि पुतळ्याची छातीपर्यंतची उंची हि १५३ मीटर इतकी आहे आणि तिथे जाण्यासाठी काचेच्या दोन लिफ्ट देखील आहेत त्या लिफ्टने लोक वर जाऊ शकतात आणि खाली येऊ शकतात आणि पुतळ्याच्या पायथ्याशी एक गार्डन देखील आहे.

हा पुतळा गुजरात मधील नर्मदा नदीवर असणाऱ्या सरदार सरोवर धरणाच्या समोर उभारला गेला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी या प्रकल्पाची घोषणा हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१० मध्ये केली आणि मग या पुतळ्याचे बांधकाम हे ऑक्टोबर २०१३ मध्ये लार्सन अँड टूब्रोन या कंपनीने सुरु केले आणि या बांधकामाचे मुख्य शिल्पकार हे राम. व्ही. सुतार हे होते आणि आणि हे संपूर्ण बांधलं करण्यासाठी २७ अब्ज इतका खर्च आला होता. या स्मारकाचे उद्घाटन हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर २०१८ मध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

स्टॅच्यू ऑफ युनिटी विषयी मनोरंजक आणि महत्वाची तथ्ये – facts 

 • गुजरात सरकारने हा पुतळा बांधण्यासाठी सुमारे १८५ कुटुंबाचे स्तलांर हे त्या जागेवरून दुसऱ्या जागेवर केले आणि गुजरात सरकारने त्यांना १२०० एकर नवीन जमीनिची भरपाई दिली.
 • गुजरात राज्याची राजधानी अहमदाबाद या शहरापासून १२५ मैल अंतरावर असलेले स्मारक हे दरवर्षी २.५ दशलक्ष अभ्यागतांसाठी राष्ट्रवादी तीर्थक्षेत्र बनेल असा अंदाज आहे.
 • या प्रकल्पाचे प्रमाण त्याच्या सामग्रीच्या आश्चर्यकारक आकार आणि वजनातून दिसून येते. या स्मारकाच्या बांधकामासाठी २५००००० घनफूट कॉंक्रीट लागले होते तसेच ५७०० घनफूट स्टील रचना आणि १८५०० टन प्रबालीत स्टील रॉड्स लागले होते.
 • स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा बांधण्यासाठी २७ अब्ज खर्च आला होता.
 • २०० हून अधिक भारतीय कामगार या ठिकाणी काम करत होते तसेच चीनमधील शेकडो मजुरांनी या बांधकामाला हातभार लावला होता.
 • स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा न्यूयॉर्क मध्ये असणाऱ्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी या पुतळ्यापेक्षा अंदाजे ४ पात उंच आहे.
 • या प्रकल्पाची घोषणा हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१० मध्ये केली आणि मग या पुतळ्याचे बांधकाम हे ऑक्टोबर २०१३ मध्ये लार्सन अँड टूब्रोन या कंपनीने सुरु केले आणि या बांधकामाचे मुख्य शिल्पकार हे राम. व्ही. सुतार हे होते.
 • सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरूष म्हणून ओळखले जाते आणि यांना श्रध्दांजली म्हणून हा जगातील सर्वात मोठा पुतळा हा गुजरातमध्ये उभा करण्यात आला.
 • एकाच वेळी २०० अभ्यगत्ताना सामावून घेण्याची रचना हि छातीच्या पातळीवर आहे आणि पुतळ्याची छातीपर्यंतची उंची हि १५३ मीटर इतकी आहे आणि तिथे जाण्यासाठी काचेच्या दोन लिफ्ट देखील आहेत.
 • या पुतळ्याची उंची हि १८२ मीटर इतकी आहे.
 • स्टॅच्यू ऑफ युनिटी हे स्मारक बांधताना मोठ्या संखेने अभियंते आणि कामगार काम करत होते यावेळी ३०० अभियंते आणि ३००० हून अधिक कामगार या स्मारकाच्या बांधकाम करत होते आणि हे बांधकाम ३ वर्ष चालले.
 • हे स्मारक बनवण्यापूर्वी इतिहासकार, कलाकार आणि अभ्यासकांच्या भारतभरातील टीमने सरदार वल्लभभाई पुतळ्याचा भरपूर अभ्यास केला आणि मग या पुतळ्याचा भ्यास केल्यानंतर त्यांनी भारतीय शिल्पकार राम व्ही सुतार यांनी बनवलेली पटेल यांची मूर्ती निवडली आणि हि मूर्ती सध्या उभ्या असलेल्या स्मारकाची छोटीशी प्रतिकृती होती.
 • सायंकाळी ७ वाजता स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये रात्रीचा शो सुरु होतो आणि हे रात्रीचे शो खरोखर खूप अप्रतिम असतात. रस्त्रीचे शो स्वताच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर तुम्हाला त्याची खासियत काय आहे ते समजेल. या रात्रीच्या शो मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी स्वता स्क्रीनच्या स्वरूपामध्ये काम करत असते आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची कथा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल माहिती देते.
 • या पुतळ्याला ब्राँझ क्लेडिंग हे चीनच्या जिआंगशी टोकाइन कंपनीने केले आहे आणि हा पुतळा तीन थरांचा आहे आणि सर्वात आतील थर हा प्रलंबित सिमेंट कॉंक्रीट, स्टील आणि ८ मिमी कास्य यांचा बनलेला आहे.
 • प्रकल्पाची घोषणा हि २०१० मध्ये केली आणि याचे बांधकाम हे २०१३ मध्ये सुरु झाले.

स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्याची वेळ आणि प्रवेश शुल्क – timings and entry fees 

 • स्टॅच्यू ऑफ युनिटी हे पर्यटकांच्यासाठी आठवड्याचे सातही दिवस खुले असते परंतु हे सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत खुले असते.
 • स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी प्रवेश शुल्क आकाराला जातो आणि हा प्रौढासाठी १२० रुपये प्रती व्यक्ती आहे आणि मुलांच्यासाठी हा पवेश शुल्क ६० रुपये प्रती बालक आहे.

आम्ही दिलेल्या statue of unity information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर स्टॅच्यू ऑफ युनिटी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या statue of unity information in marathi language या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about statue of unity in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!