Sugran Bird Information in Marathi सुगरण पक्षी Sugran Pakshi माहिती आपल्या सर्वाना माहित आहे कि हा पक्षी खूप चांगल्या प्रकारे आपल्या घरट्याचे विणकाम करतात आणि हे पक्षी घरटी बांधण्याच्या कलेसाठी खूप लोकप्रिय आहे आणि या पक्ष्याचे घरटे बघण्यासारखे असते. हा पक्षी उत्तम आणि सुबक घरटे बनवते म्हणून या पक्ष्याला सुगरण Sugran in Marathi हे नाव पडले आहे. सुगरण हा आकाराने चिमणीसारखा असतो आणि या पक्ष्याची लांबी १४ ते १५ सेंटी मीटर असते.
Sugran Bird पक्षी पिवळ्या रंगाचा असतो आणि या पक्ष्याची चोच चिमणी पेक्षा मजबूत, थोडी लांब आणि सरळ असते. सुगरण पक्षी आपले घरटे मे पासून सप्टेंबर या महिन्यामध्ये विणतात. पावसाळ्या मध्ये या पक्ष्यांचा प्रजनन काळ असतो. हे पक्षी भारत, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार आणि पाकिस्तान या देशांमध्ये आढळतात.
सुगरण पक्षाची माहिती – Sugran Bird Information in Marathi
नाव | सुगरण, विणकर |
प्रकार | पक्षी |
शास्त्रीय नाव | प्लो बेघॅलेन्सीस |
लांबी | १४ ते १५ सेंटी मीटर |
वजन | २७ ते २८ ग्रॅम |
रंग | पिवळा, काळा आणि पांढरा |
आयुष्य | ५ वर्ष |
सुगरण पक्ष्याचा आहार
सुगरण हे पक्षी सर्वभक्षी आहेत आणि हे बहुतेकदा किडे आणि बिया खातात त्याबरोबर हे पक्षी मुंग्या, अळ्या आणि धान्य या प्रकारचे अन्न सुध्दा खातात.
- नक्की वाचा: बुलबुल पक्षाची माहिती
4 सुगरण पक्ष्याचे प्रकार ( types of weaver bird )
प्रकार | वर्णन |
साउथ मास्कड सुगरण पक्षी | रंग- काळ्या रंगाचा चेहरा, घसा आणि चोच, लाल डोळे, पिवळसर हिरव्या रंगाची पाठ आणि गडद पिवळ्या रंगाचे डोके आणि अंडरपार्ट्स. लांबी – ११ ते १४ सेंटी मीटर. |
व्हिलेज सुगरण पक्षी | रंग- काळ्या रंगाचा चेहरा, डोके आणि चोच, डोळे लाल, पंख काळा आणि पिवळा शेड, अंडरपार्ट्स पिवळ्या रंगाचे, पाय साधारण गुलाबी रंगाचे असतात. लांबी – १४ ते १७ सेंटी मीटर. |
बाय सुगरण पक्षी | रंग – पिवळ्या रंगाचा मुकुट , गडद तपकिरी रंगाचा चेहरा, पंखावर पांढऱ्या आणि तपकिरी रंगाचे शेड, साधारण गुलाबी रंगाचे पाय असतात. लांबी – १४ ते १५ सेंटी मीटर |
स्ट्रीक्ड सुगरण पक्षी | रंग – सोनेरी पिवळ्या रंगाचे मुकुट किवा टोपी सारखा आकार, काळ्या रंगाचा चेहरा आणि घसा, पंखावर काळ्या आणि पांढर्या रंगाचे शेड आणि पोट पांढऱ्या रंगाचे, लांब फिकट गुलाबी पाय आणि चोच काळ्या रंगाची असते. |
सुगरण पक्ष्याच्या घरट्या विषयी माहिती – sugran bird nest information in marathi
सुगरण हा पक्षी घरटे बांधण्याच्या कलेसाठी प्रसिध्द आहे हे आपल्या सर्वाना माहीतच आहे या पक्ष्याचे घरटे म्हणजे एक उत्तम कारागिरीचे एक चांगले उदाहरणच आहे. हे पक्षी आपले घरटे. हे पक्षी आपले घरटे जवळ पाणी असलेल्या ठिकाणी तसेच जेथे उंच झाड आहेत आणि जेथे त्यांना त्यांचे घरटे बनवण्यासाठी आवश्यक असणारी सामग्री ज्या ठिकाणी अगदी सहजपणे उपलब्ध होते अशा ठिकाणी आपले घरटे बनवतात.
सुगरण हा पक्षी आसपास मिळणाऱ्या वाळलेले गवत, काटक्या, कड्या, कापूस, पाणे आणि दोऱ्याच्या गुंतवळीने घरटे बनवतात. हे पक्षी शक्यतो आपले घरटे विहिरीच्या बाजूला असणाऱ्या झाडांवर बनवतात. या पक्ष्यांचे घरटे झाडाच्या फांदीला टांगलेले असते आणि प्रत्येक सुगरण पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे घरटे बनवतात काही ठिकाणी हे घरटे वरून अरुंद आणि खाली येईल तसा गोलाकार असते आणि खालचा भाग झाकलेला असतो.
गोलाकार भागामध्ये एका बाजूला प्रवेश दार असते त्याचबरोबर काही ठिकाणी खालच्या बाजूने प्रवेश दार असते आणि खालून नमुळते आणि त्या घरट्यामध्ये २ किवा त्यापेक्षा जास्त कप्पे असतात. हे घरटे बनवण्याचे काम नर पक्ष्याचे असते आणि हे घरटे बनवण्यासाठी या पक्ष्याला १४ ते १६ दिवस लागतात.
- नक्की वाचा: घार पक्षाची माहिती
सुगरण पक्ष्याविषयी तथ्ये ( facts of weaver bird )
- मादा सुगरण पक्षी एका वेळी दोन ते चार अंडी देते आणि हि अंडी पांढऱ्या शुभ्र रंगाची असतात.
- सुगरण हा पक्षी प्लोसिईडी कुळातील पक्षी आहे.
- नर सुगरण पक्षी ३ ते ४ मादी सुगरणींच्या बरोबर जोड्या बनवतो.
- हे पक्षी आपले घरटे माडाच्या किवा काटेरी झुडुपावर आपले घरटे बनवतो.
- सुगरण हा पक्षी आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये आढळतो आणि हे पक्षी विशेषतः शेतामध्ये किवा जंगलामध्ये आढळतात.
- सुगरण हा पक्षी एक छोटे आणि सुंदर घरटे बनवतो आणि ते झाडाला लटकवलेले असते आणि हे घरटे नर पक्ष्याने मादीला आकर्षित करण्यासाठी बनवलेले असते.
- हे पक्षी आपले घरटे प्रत्येक वर्षी बदलतो म्हणजे नवीन घरटे बनवतो पण ज्या झाडावर त्याचे आधिचे घरटे असते त्याच झाडावर तो आपले नवीन घरटे बनवतो.
- सुगरण पक्ष्याच्या घरट्याचे प्रवेश दार अरुंद ट्यूब सारखे असते त्यामुळे शिकाऱ्याला त्या घरट्यामध्ये जाता येत नाही.
- नर आणि मादी दिसायला वेगवेगळे असतात, नर पिवळ्या आणि काळ्या रंगाचा असतो आणि मादी तपकिरी रंगाची असते.
- सुगरण या पक्ष्यांना पावसाळा सुरु होण्याचा अचूक अंदाज लागतो त्यामुळे हे पक्षी पावसाला सुरु होण्याच्या अगोदरच आपले घरटे बनवतात.
- या पक्ष्याचे. घरटे दुधी भोपळ्यासारखे दिसते वरच्या भागात बारीक आणि खाली मोठे गोलाकार असते.
- या पक्ष्यांनी आपले घरटे इतके मजबूत बनवलेले असते कि वादळ, वारा आणि पावसामध्येहि काही नुकसान होत नाही.
- मोठ्या घरट्याच्या मध्यभागी असलेल्या खोल्या उष्णता टिकवून ठेवतात.
- या पक्ष्याला शेतकऱ्यांचा दुश्मन म्हंटले जाते करा हा पक्षी शेतामधील पिक खातात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.
- सुगरण हे पक्षी थव्यामध्ये राहतात.
- काही सुगरण पक्षी आपली घरटी टेलीफोनच्या खांबावर लटकवतात.
- सुगरण/ विणकर पक्ष्याला एक मजबूत शंकूच्या आकाराची चोच असते आणि ह्याचा उपयोग या पक्ष्यांना घरटे बांधताना गवत कापण्यासाठी करतात तसेच हे पक्षी चोच आणि पायाच्या सहाय्याने गवताच्या गाठी मारतात आणि घरटे अधिक सुरक्षित करतात
भाषा | नाव |
मराठी (Sugran in Marathi) | सुगरण, विणकर |
संस्कृत | सुगृह्कर्ता |
हिंदी | बाया किवा सोन चिडी |
इंग्रजी (Sugran Brd in English) | Weaver |
गुजराती | सुघारी |
कन्नड | गिजुगा |
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा सुगरण पक्षी sugran bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. sugran pakshi information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच sugran bird in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही सुगरण पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या sugran in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट