Sunflower Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आजच्या या सदरात आपण ‘सूर्यफुल’ या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. पिवळ्या रंगाचे टपोरे गोलाकार आणि अगदी सूर्यासारखे दिसणारे सूर्यफूल आपण सर्वांनीच पाहिले असेल. हो ते हुबेहूब सूर्यासारखे दिसते म्हणून त्याला सूर्यफुल असे म्हटले जाते. यामध्ये आपण सूर्यफुलाचा इतिहास, त्याची रचना, त्याची वाढ आणि सूर्यफुलांचा उपयोग या बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.(sunflower in marathi)
सूर्यफुलाचा इतिहास!(Sunflower Information In Marathi)
तर सूर्यफुलाचा सर्वप्रथम उदय हा अमेरिकेमध्ये झाला असे मानण्यात येते. अमेरिकेतील मेक्सिको आणि दक्षिण संघराज्य या भागात सुर्यफुलाची सर्वप्रथम फक्त वादन घेण्यात आले. इसवी सन पूर्व २१०० मध्ये मेक्सिकोमध्ये सूर्यफूल आढळून आले होते. सोळाव्या शतकामध्ये सर्वप्रथम सूर्यफूल या जातीचे रोपटे अमेरिकेतून युरोप खंडात अन्वेषण करण्यात आले. आणि पुढे युरोपातून सूर्यफूला चे रोपटे हे रशिया कडे मार्गस्थ झाले. मग पुन्हा विसाव्या शतकाच्या मध्यात रशियातून पुन्हा उत्तर अमेरिकेमध्ये बियाणे उत्पादनासाठी सूर्यफुलाचे उत्पादन व्यावसायिक पद्धतीने करण्यासाठी सुरुवात झाली. पण असे मानण्यात आले आहे की सूर्यफूल हे तीन हजार ते पाच हजार वर्षांपूर्वी सुद्धा स्थानिक अमेरिकन लोकांकडून उघडले जायचे. सूर्यफुलाच्या बिया खाण्यायोग्य असल्यामुळे त्यांचा खाद्यपदार्थांमध्ये बऱ्याच प्रमाणात वापर केला जायचा.
सूर्यफुलाची रचना!(Description Of Sunflower)
वर्तुळाकार असलेले सूर्यफूल मध्यभागी असलेल्या कॅलिक्सच्या संख्येमुळे खूप मोठे दिसते. सूर्यफुलाची लागवड ही उष्ण प्रदेशात आणि तसेच काही उष्ण कटिबंध असलेल्या प्रदेशात ही केली जाते. सूर्यफूल या रोपाची उंचीशी जवळ जवळ 300 सेंटीमीटर पर्यंत असते. सूर्य फुलाच्या पाकळ्या ह्या नारिंगी आणि पिवळ्या रंगाच्या असून त्या बाहेरच्या दिशेला निमुळत्या स्वरूपात वाढलेले असतात. पाकळ्यांच्या अगदी अगदी मधोमध पिवळसर तपकिरी रंगाची वर्तुळ असते. सूर्यफुलाची वाढ होत असताना ते सूर्याच्या दिशेला आकर्षित होत असते. जेव्हा हे फूल मोहरते तेव्हा ते सूर्याच्या दिशेकडे आकर्षित होण्याचे थांबते. संपूर्ण दिवसभरात सूर्याच्या हालचाली नुसार किंवा सूर्याच्या आकाशातील जागेनुसार सूर्यफुलाचे मुख हे वळत असते. अशा प्रक्रियेला हेलिएट्रोपिस्म असे इंग्रजी मध्ये म्हटले जाते. सूर्य फुलाचे देठ हे थोडेफार खडबडीत आणि केसाळ असून ते वरच्या दिशेला बऱ्याच भागात विभागलेले असते. सूर्यफुलाच्या पाकळ्यांच्या अगदी खालच्या बाजूला लागूनच असलेली पाने ही कात्री सारखी असून सहसा चिकट असतात. त्याच्याही खालची पाने ही हिरव्या रंगाची असून बदामाच्या आकाराची असतात. सूर्यफुलाच्या मध्यभागी गोलाकार चकती असते ती असंख्य सूक्ष्म फुलांनी भरलेली असते. त्यातील पुष्पक हे चक्राकार पद्धतीने तयार झालेले असते.
सूर्यफुलाची वाढ! (Growth Of Sunflower)
सूर्यफुलाची वाढ ही ही त्या त्या प्रजातींवर आणि ऋतूंवर अवलंबून असते. बहुदा उन्हाळा आणि पावसाळ्यात प्रारंभ या दरम्यान सूर्यफुलाची वाढ होत असते. सूर्यफुलाची वाढ होण्यासाठी जसे वरील प्रमाणे नैसर्गिक घटक अवलंबून असतात तसेच कृत्रिम घटकांनीचाही वापर केला जातो. म्हणजेच अमोनियम नायट्रेट या लागवडीचा उपयोग केला जातो.
सूर्यफूल हे इतर उपयोगी किटकांना आकर्षित करते. त्यामुळे सूर्यफुलाच्या रचनेमध्ये खूप सुधारणा होते. तसेच मधमाशांना ही आकर्षित करते.
सुर्यफुलाचे महत्त्व आणि उपयोग! (Importance and uses of a sunflower!)
सूर्यफुलाचा आणि सूर्यफुलांच्या पानांचा , त्यांच्या बियांचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. सूर्यफुलाचा वापर मानवाप्रमाणेच ,दुभती जनावरे, कोंबड्या यांच्यासाठी सुद्धा खाद्यपदार्थ म्हणून होतो. सूर्यफुलाच्या बिया मध्ये बरीच उपयुक्त पोषक तत्वे असतात. त्यामध्ये फेनोलिक आम्ल, फ्लावोनोईड, जीवनसत्व अ, ब , क आणि मोठ्या प्रमाणात मिएसिन असते. तसेच सूर्यफूल हे पेशीय नुकसान होऊ नये म्हणून अँटिऑक्सिडंट म्हणून ही काम करते. फायटोकेमिकल्स बरोबर कॅल्शियम ,पोटॅशियम आणि लोहाचे प्रमाण ही सूर्य फुला मध्ये असते. छातीतील जळजळ, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांवरील सूर्यफूल गुणकारी असते. तसेच शरीरावरील जखमा भरून येण्यासाठी देखील सूर्यफुलाचा वापर केला जातो.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि सुंदर असे दिसणारे सूर्यफूल व त्याचे प्रकार किती आहेत तो कसा लावावा व तोडावा. sunflower information in Marathi/ information about sunflower flower in marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही पफ्फिन या पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट