स्वाईन फ्लू माहिती Swine Flu Information in Marathi Language

swine flu information in marathi language स्वाईन फ्लू माहिती, सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि त्यामुळे अनेक प्रकारचे संसर्गजण्य रोग पसरत असतात आणि त्यामुळे मानवाला अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या अश्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि आज आपण या लेखामध्ये अश्याच एका रोगाबद्दल म्हणजे स्वाईन फ्लू या रोगाविषयी माहिती पाहणार आहोत. स्वाईन फ्लू हा एक प्रकारचा रोग आहे आणि हा रोग संसर्गजण्य रोग आहे. जो ज्यामध्ये आपल्याला साधारण तापासारखी लक्षणे दिसून येतात.

परंतु हा रोग एक गंभीर रोग आहे. जो इन्फ्लूएन्झा टाईप ए च्या एच१एन१ विषाणूमुळे होतो आणि म्हणून या रोगाला एच१एन१ व्हायरस संसर्ग म्हणून देखील ओळखले जाते.

स्वाईन फ्लू हा मनुष्याला श्वसननलिकेमध्ये संसर्ग होतो आणि पुढे काही तापामध्ये दिसणारी लक्षणे जसे कि अशक्तपणा येणे, सर्दी (वाहते नाक), खोकला, मळमळ आणि उलट्या तसेच घश्यामध्ये खवखव होणे या सारखे अनेक लक्षणे दिसतात. चला तर खाली आपण स्वाईन फ्लू विषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती पाहूया.

swine flu information in marathi language
swine flu information in marathi language

स्वाईन फ्लू माहिती – Swine Flu Information in Marathi Language

स्वाईन फ्लू या रोगाचा संसर्ग कसा होतो ?

स्वाईन फ्लू हा डुकरांच्या पासून होणारा रोग आहे. हे अनेकांना माहित आहे आणि स्वाईन फ्लू या रोगाचा संसर्ग एच१एन१ या विषाणूच्या संसर्गामुळे होतो आणि हा विषाणू डुकरांच्यामध्ये प्रथम संक्रमित आणि मग नंतर डुकरांच्या पासून हा रोग मनुष्य आणि प्राण्यांना प्रभावित करते किंवा मग हे थेट मनुष्याला देखील संक्रमित करू शकते. जर एखाद्या व्यक्तीने व्हायरस असलेल्या हवेमध्ये श्वसन केले तर त्या व्यक्तीला या रोगाचा संसर्ग होऊ शकतो.  

स्वाईन फ्लूची लक्षणे – swine flu symptoms in marathi

स्वाईन फ्लू या रोगामध्ये दिसणारी लक्षणे हि सामान्य फ्लू सारखी असतात आणि या विषाणूचा संसर्ग हा वरच्या आणि खालच्या श्वसन मार्गामध्ये दिसून येतो. चला तर खाली आपण स्वाईन फ्लूची लक्षणे काय आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

  • स्वाईन फ्लू  रोगाची लागण झाली असेल तर त्या व्यक्तीला काही प्रमाणात ताप येतो.
  • त्याच बरोबर त्या संबधित व्यक्तीला घश्यामध्ये खवखवणे, खोकला येणे आणि सर्दी ( नाक वाहने ) या सारख्या सामान्य समस्या देखील उद्भवतात.
  • त्या व्यक्तीला मळमळ आणि उलटीचा त्रास होतो.
  • अंगदुखी आणि डोकेदुखी या सारख्या समस्या उद्भवतात.
  • नाकामध्ये रक्तसंचय होती तसेच डोळे लाल होतात.
  • त्याच बरोबर त्या व्यक्तीला भूक लागत नाही.
  • स्वाईन फ्लू या रोगाचा परिणाम आपल्या श्वास घेण्याच्या प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात होतो कारण याचे विषाणू श्वसन मार्गावर प्रभाव करतात.

स्वाईन फ्लू रोगाचे निदान आणि उपचार पध्दती

उपचार – remedies

  • अनेकांना स्वाईन फ्लूची लक्षणे वेगाने पसरतात त्यावेळी त्या संबधीत रुग्णाला दवाखाण्यामध्ये दाखल केले जाते आणि त्यांच्यावर विशेष असा उपचार केला जातो.
  • त्याचबरोबर या आजाराची लागण झालेल्या व्यक्तींना किंवा त्रस्त असणाऱ्या लोकांना अँटीव्हायरल औषधे दिली जातात आणि त्या व्यक्तीची वेगवेगळ्या प्रकारची तपासणी देखील केली जाते.
  • लोकांना अनेक भयानक रोगांना सामोरे जावे लागले आणि या रोगावर प्रतिबंध करण्यासाठी अनेक प्रकारच्या लस तयार करण्यात आल्या आणि अश्याच प्रकारे स्वाईन फ्लू या रोगावर देखील प्रतिबंध घालण्यासाठी लस शोधून काढली आणि हि रोगाविरुद्ध लढण्यासाठी महत्व्पुरणे कामगिरी बजावते.

चाचण्या – dignosis methods

  • जर एखाद्या व्यक्तीला फ्लू सारखी लक्षणे दिसून येत असतील तर तुम्हाला ताबडतोब डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक आहे आणि तपासणी देखील करून घेणे आवश्यक आहे.
  • तुम्ही स्वाईन फ्लू साठीची चाचणी किंवा परीक्षण करत असताना तुमच्या घश्यातील किंवा नाकातील स्वॅब घेवून त्याचे परीक्षण करून फ्लूची तपासणी केली जाते.

स्वाईन फ्लू या रोगाचा धोका कोणाला असतो ?

स्वाईन फ्लू या संसर्गजण्य रोगाचा धोका हा मधुमेह, फुफ्फुसांचे रोग, अस्थमा, हृदयविकार या प्रकारच्या आरोग्य समस्या असणाऱ्या लोकांना होतो त्याचबरोबर या रोगाची लागण ५ वर्षापेक्षा लहान असणाऱ्या मुलांना, गर्भवती स्त्रियांना आणि ६५ वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींना होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते.

स्वाईन फ्लू या रोगाविषयी विशेष तथ्ये – facts

  • स्वाईन फ्लू या रोग काही देशांच्यामध्ये सर्वात सामान्य आहे म्हणजेच हा रोग काही देशातील लोकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतो आणि हा रोग दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप आणि आशियाच्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे.
  • असे म्हणतात कि स्वाईन फ्लू हा रोग मोठ्या प्रमाणात धोकादायक नाही कारण या प्रकारचा फ्लू झालेले लोक हे आपोआप बरे होतात. परंतु काही लोकांच्यामध्ये या रोगाच्या लक्षणांची गुंतागुंत हि इतकी असते कि ती काही वेळा प्राणघातक देखील ठरू शकते.
  • स्वाईन फ्लू हा रोग एक संसर्गजण्य रोग आहे आणि तो एका व्यक्तीला झाला असेल आणि त्या व्यक्तीने शिंकले, खोकले किंवा त्या व्यक्तीच्या संपर्कात निरोगी व्यक्ती आला तर त्या व्यक्तीला स्वाईन फ्लू रोग होऊ शकतो.
  • जर एकाद्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती खूप कमी असेल तर त्या व्यक्तीला या रोगाची लागण हि लगेच होऊ शकते.
  • स्वाईन फ्लू या रोगाची लागण झाल्यानंतर किंवा विषाणूंच्या संपर्कात आल्यानंतर या रोगाची लक्षणे ५ ते ६ दिवसांनी दिसण्यास सुरुवात होते.
  • लहान मुलांना या रोगाची लागण झाली तर त्यांच्यामध्ये काही वेगळी लक्षणे दिसून येतात जसे कि त्या मुलाला श्वास घेण्यास त्रास होतो, अंगावर पुरळ उटतात आणि ताप येतो, त्या मुलांना उठताना त्रास होतो आणि अश्या प्रकारची अनेक लक्षणे दिसून येतात.
  • जर एखाद्या व्यक्तीला स्वाईन फ्लू हा रोग झाला आहे काय नाही हे समजून घ्यायचे असल्या त्या संबधित व्यक्तीची विशेष अशी चाचणी करावी लागते.
  • जर एखाद्या व्यक्तीला स्वाईन फ्लूच्या लक्षणांचा प्रभाव कमी करायचा असेल तर त्या व्यक्तीने हलका आहार घेतला पाहिजे त्याचबरोबर शक्य तितका आराम घेतला पाहिजे आणि जास्तीत जास्त द्रव पदार्थ खावे त्यामुळे त्या व्यक्तीला तीव्र लक्षणांच्या पासून आराम मिळण्यास मदत होते.

आम्ही दिलेल्या swine flu information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर स्वाईन फ्लू माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या swine flu disease information in marathi या swine flu symptoms in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about swine flu in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये swine flu meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!