Tilache Ladoo Recipe in Marathi तिळाचे लाडू रेसिपी मराठी आपण संक्रांतीला वेगवेगळे गोड तसेच तिखट पदार्थ बनवतो आणि त्यामधील एक लोकप्रिय आणि लोकांना आवडणारा पदार्थ म्हणजे तिळाचे लाडू. भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात आणि त्यामधील एक महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत अपनी आपण संक्रांतीला तिळाचे लाडू बनवतो. तिळाचा लाडू हा तीळ, गुळ आणि शेंगदाण्याचा कुट, खोबरे आणि इतर काही साहित्य घालून बनवला जातो. तिळाचे लाडू बनवताना सर्वप्रथम तीळ कोरडे भाजले जातात आणि मग ते बाजूला काढून त्यामध्ये थोडेसे तूप आणि गुळ घातला जातो आणि त्याचा पाक बनवून मग त्यामध्ये तीळ, शेंगदाण्याचा कुट आणि खोबरे घातले जाते.
आणि ते मिक्स करून २ ते ३ मिनिटे वाफवले जाते आणि मग थोडे गरम असतानाच त्याचे लाडू वळले जातात. तिळाचे लाडू घरी बनवण्यासाठी खूप सोपे आहेत आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच २० ते २५ मिनिटामध्ये बनतात आणि हे बनवण्यासाठी मोजकेच साहित्य लागते. चला तर आता आपण या लेखामध्ये तीळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात.
तिळाचे लाडू रेसिपी मराठी – Tilache Ladoo Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
तिळाचे लाडू बनवताना सर्वप्रथम तीळ कोरडे भाजले जातात आणि मग ते बाजूला काढून त्यामध्ये थोडेसे तूप आणि गुळ घातला जातो आणि त्याचा पाक बनवून मग त्यामध्ये तीळ, शेंगदाण्याचा कुट आणि खोबरे घातले जाते आणि ते मिक्स करून २ ते ३ मिनिटे वाफवले जाते आणि मग थोडे गरम असतानाच त्याचे लाडू वळले जातात.
- नक्की वाचा: रवा लाडू रेसिपी मराठी
- तीळ : तिळाचे लाडू बनवण्यासाठी तीळ हा महत्वाचा घटक आहे. लाडू बनवताना तीळ प्रथम कोरडे भाजून घेतले जातात आणि मग ते गुळाच्या पाकामध्ये घातले जातात.
- गुळ : गुळ हा पाक बनवण्यासाठी वापरला जातो आणि पाक बनवताना गुळ पूर्णपणे विरघळून त्याला फेस यायला लागल्यावर त्यामध्ये तीळ आणि इतर साहित्य घातले जाते.
तिळाचे लाडू रेसिपी – tilache ladoo recipe
तिळाचे लाडू हे आधी मधी कोणीही बनवून खात नाहीत परंतु हे लाडू मकर संक्रांतीला भारतामधील बहुतेक भागामध्ये बनवले जातात किंवा बाजारातून विकत आणले जातात. तिळाचे लाडू घरी बनवण्यासाठी खूप सोपे आहेत आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच २० ते २५ मिनिटामध्ये बनतात आणि हे बनवण्यासाठी मोजकेच साहित्य लागते. चला तर मग आता आपण तिळाचे लाडू कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
तिळाचा लाडू हा तीळ, गुळ आणि शेंगदाण्याचा कुट, खोबरे आणि इतर काही साहित्य घालून बनवला जातो आणि यामधील बहुतेक साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि जर या मधील काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध नसेल तर ते आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेऊ शकतो. चला तर मग तिळाचे लाडू बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- नक्की वाचा: बेसन लाडू रेसिपी मराठी
- २ वाटी तीळ.
- २ वाटी गुळ ( खिसलेले ).
- ५ ते ६ चमचे भाजलेल्या खोबऱ्याचा खीस.
- अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट.
- १ चमचा वेलची पावडर.
- २ चमचे तूप.
तिळाचे लाडू घरी बनवण्यासाठी खूप सोपे आहेत आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच २० ते २५ मिनिटामध्ये बनतात आणि हे बनवण्यासाठी मोजकेच साहित्य लागते. चला तर मग वर दिलेले साहित्य वापरून तिळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात.
- तिळाचे लाडू बनवताना सर्वप्रथम गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि ती गरम झाली कि त्यामध्ये खिसलेले खोबरे घाला आणि ते चांगले कुरकुरीत आणि लालसर रंग येईपर्यंत भाजा आणि मग ते बाजूला काढून ते थोडे हाताने कुसकरा म्हणजे ते बारीक होईल.
- आता त्या कढई मध्ये तीळ घाला आणि ते देखील चांगले भाजून घ्या म्हणजे त्याच भाजलेला खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या आणि ते कढईमधून बाजूला काढा आणि ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.
- आता परत त्याच कढईमध्ये गुळ आणि तूप घाला आणि गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि गुल सतत चमच्याने हलवत रहा आणि तो पूर्णपणे विरघळू द्या.
- गुळ पूर्णपणे विरघळला कि त्याला फेस यायला सुरुवात होईल त्यावेळी गुळाचा पाकचा एक थेंब वाटीमध्ये पाणी घेवून त्यामध्ये टाका आणि मग ते हातावर घेवून त्याची गोळी बनवा आणि एक रिकाम्या वाटीमध्ये वरून टाकून बघा. हि गोळी वाटीमध्ये टाकल्यानंतर खन्न असा आवाज आला तर पाक बनलेला असतो.
- आता त्यामध्ये भाजलेले तीळ, शेंगदाण्याचा कुट, खोबरे आणि वेलची पावडर घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि ते मंद आचेवर २ मिनिटे वाफवा आणि लगेच गॅस बंद करा.
- आता हे मिश्रण एक ताटामध्ये काढून घ्या आणि थोडेसे गार झाले कि हाताला तूप लावून लगेच लाडू वळून घ्या ( मिश्रण गरम असतानाच लाडू वळा ).
- तिळाचे लाडू सर्व्ह करण्यासठी तयार झाले.
- हे लाडू आपण डब्यामध्ये घालून ठेऊन आपल्याला हवे तेंव्हा खावू शकतो कारण हे लाडू २० ते ३० दिवस चांगले टिकतात.
आम्ही दिलेल्या tilache ladoo recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला tilgul ladoo recipe in marathi comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर तिळाचे लाडू रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tilache ladoo in marathi recipe या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि tilache ladoo recipe in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये til gul ladoo Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट