turmeric information in marathi हळदीची माहिती, भारतामध्ये हळदीचा वापर हा मोठ्या प्रमाणात प्राचीन काळापासून केला जात आलेला आहे आणि तो स्वयंपाक करण्यासाठी असो किंवा मग काही आरोग्य फायदे मिळवण्यासाठी असो त्यामुळे आपल्या सर्वांना हळदी विषयी संपूर्ण माहिती आहे, त्यामुळे याचा वेगळा असा परिचय करून देण्याची काही आवश्यकता नाही. हळद हि एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. ज्याचा वापर स्वयंपाकामध्ये पदार्थांना चव आणि रंग देण्यासाठी तसेच काही पोषक घटकांच्यासाठी केला जातो.
त्याचबरोबर हळदीचा वापर अनेक आरोग्य फायदे मिळवण्यासाठी जसे कि प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, जखमाबऱ्या करण्यासाठी त्याचबरोबर सौंदर्य वाढवण्यासाठी अश्या प्रकारे अनेक कारानांच्यासाठी हळद वापरली जाते त्यामुळे हळद याला आयुर्वेदिक शब्दामध्ये याला हरिद्रा या नावाने ओळखले जाते.
हळदीचा वापर हा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे भारतामध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात हळदीची शेती केली जाते आणि हळदीचे पिक घेऊन ते भारतामध्ये तसेच काही इतर देशामध्ये देखील निर्यात केले जाते. हळदीची वनस्पती खूप उंच वाढत नाही तर ती छोटी असते आणि याचे मुख्य पिक हे जमिनीच्या खाली येते.
ज्याला आपण हळकुंड या नावाने ओळखतो. हळदीचे पिक पूर्णपणे परिपक्व ते जमिनीतून काढले जाते आणि ते कडक उन्हामध्ये वाळवून ते नंतर बारीक पावडर बनवली जाते आणि या हळदीच्या पावडरचा जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

हळदीची माहिती – Turmeric Information in Marathi
नाव | हळद |
वैज्ञानिक नाव | करक्युमा लाँगा |
इतर भाषेतील नावे | टर्मरिक (इंग्रजी), हल्दी (हिंदी), हरिद्रा (आयुर्वेदिक) |
हळदीच्या झाडाची उंची | १ मीटर |
वापर | स्वयंपाक आणि आयुर्वेदिक गुणधर्मांच्यासाठी |
हळद विषयी काही महत्वाची माहिती – information about turmeric in marathi
हळद हि एक आयुर्वेदिक वनस्पती असून याचे वैज्ञानिक नाव करक्युमा लाँगा असे आहे आणि ह्याला आयुर्वेदामध्ये हरिद्रा या नावाने ओळखले जाते. ज्यावेळी हळदीची लागवड शेतामध्ये केली जाते त्यावेळी त्याची रोपे शेतामध्ये लावली जातात आणि मग ती पुढे मोठी होतात तसेह जमिनीमध्ये त्याला फळ येते.
हळदीची झाडे १ मीटर उंचीची असतात आणि त्याची पाने १५ ते २० सेंटी मीटर रुंद आणि ३५ सेंटी मीटर लांब असतात. ज्यावेळी जमिनीमध्ये याला फळे म्हणजेच हळकुंड येतात त्या हळकुंडांची संख्या १० ते ११ पर्यंत असते. ते पूर्णपणे परीपक्व झाल्यानंतर ते काढले जाते.
हळदीमधील पोषक घटक – nutritional value
हळदी हि औषधी गुणधर्मासाठी ओळखली जाते आणि म्हणून याचा वापर हा खूप पूर्वीच्या काळापासून केला जातो. हळदीमध्ये खी पोषक घटक समाविष्ट असतात आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.
पोषक घटक | प्रमाण |
चरबी | ३.२५ ग्रॅम |
प्रथिने | ९.६८ ग्रॅम |
ग्लुकोज | ०.३८ ग्रॅम |
सुक्रोज | २.३८ ग्रॅम |
फ्रक्टोज | ०.४५ ग्रॅम |
लोह | ५५ मी ग्रॅम |
फायबर | २२.७ ग्रॅम |
तांबे | १.३ मी ग्रॅम |
पोटॅशियम | २०८० मी ग्रॅम |
मॅग्नेशियम | २०८ मी ग्रॅम |
कार्बोहायड्रेट | ६७.१ ग्रॅम |
सोडियम | २७ मी ग्रॅम |
नियासिन | १.३५ मी ग्रॅम |
थायमिन | ०.०५८ मी ग्रॅम |
व्हीटॅमीन सी | ०.७ मी ग्रॅम |
व्हीटॅमीन बी | ६०.१०७ मी ग्रॅम |
हळदीचे फायदे मराठी – turmeric benefits in marathi
हळदीमध्ये अनेक असे आरोग्य विषयक फायदे आहेत आणि हळद हि खूप पूर्वीपासून आयुर्वेदिक कारानंच्यासाठी वापरली जाते आणि म्हणूनच आपण खाली हळदीचे काय काय फायदे आहेत ते पाहणार आहोत.
- हळद हि सौदर्य वाढवण्यासाठी खूप उपयोगी ठरते त्यामुळे हळदीचा वापर हा सौंदर्य खुलवण्यासाठी खूप पूर्वीपासून केला जातो आणि आज देखील हळदीचा वापर अनेक सौंदर्य प्रसादनांच्यामध्ये वापरला जातो.
- सध्या आपण पाहतो कि अनेकांना संधीवातच्या समस्येला सामोरे जावे लागते आणि अश्या लोकांनी जर हळदीचे सेवन केले तर त्यामुळे संधीवाताची लक्षणे थोड्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते.
- असे म्हणतात कि हळदीमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे हे अनेक जखमा बरे करण्यासाठी देखील वापरले जाते तसेच हळदीचा वापर हा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील केला जातो.
- भारतीय संस्कृतीमध्ये स्वयंपाकामध्ये हळदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो कारण त्यामुळे रक्ताची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते त्याचबरोबर पचनक्रिया होण्यासाठी देखील मदत होते.
- हळद आणि मध हे दोन घटक एकत्र करून ते एक चमचा या प्रमाणात खाल्ले तर त्यामुळे रक्त वाढीस मदत होते.
- खोकला आणि सर्दी झाल्यानंतर ते कमी करण्यासाठी हळदीचा वापर हा खूप आधीपासून केला जातो आणि आपल्या देखील माहित आहे कि खोकला किंवा सर्दी झाल्यानंतर आपल्याला गरम दुधामध्ये हळद घालून ते दुध पिण्यासाठी दिले जाते त्यामुळे खोकला आणि सर्दी बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होते आणि घश्याला आराम मिळण्यास मदत होते.
- अनेकांना पित्ताचा त्रास देखील सतत होतो अश्या लोकांनी हळदीचे सेवन आहारातून करावे कारण हे पित्तनाशक आहे.
- जर एखाद्या व्यक्तीला जखम झाली असेल आणि त्यातून रक्तस्त्राव होत असेल आणि त्यावेळी त्या जखमेत हळद लावलीतर ताबडतोब रक्तस्त्राव बंद होण्यास मदत होते.
- हळदीचा वास घेतल्यामुळे उचकी थांबते तसेच श्वास घेण्याचा वेग देखील कमी होतो.
- स्तनरोग, मुळव्याध, पिष्ट्मेह आणि हृदयरोग यावर देखील हळद हि गुणकारी औषध म्हणून काम करते.
- अनेक प्रकारचे त्वचा रोग बरे करण्यासाठी पूर्वी हळदीचा वापर हा वैद्यांच्याकडून केला जात होता आणि आज देखील त्वचा रोगावर उपचार करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो.
हळदीचा वापर – turmeric uses in marathi
- ओल्या हळकुंडापासून भारतामध्ये काही ठिकाणी लोणचे बनवले जाते आणि हे लोणचे जास्त काळ टिकते देखील.
- हळद पावडरचा वापार हा अनेक पदार्थांना रंग येण्यासाठी वापरली जाते.
- हळद हि सौंदर्य खुलवण्यासाठी खूप चांगली आहे त्यामुळे हळद अनेक सौंदर्य प्रसादानांच्यामध्ये वापरली जाते जसे कि आपल्याला बाजारामध्ये टर्मरिक क्रीम, टर्मरिक फेस पॅक, टर्मरिक फेस वॉश इत्यादी.
- भारतामध्ये धार्मिकतेला खूप महत्व आहे आणि भारतामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे अनेक धार्मिक कार्यक्रम करतात आणि त्यामध्ये हळद आणि कुंकुचा वापर हा मोठ्या प्रमाणात करतात.
आम्ही दिलेल्या turmeric information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर हळदीची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या turmeric information in marathi language या Turmeric information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about turmeric in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये turmeric information in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट