typing course information in marathi टायपिंग कोर्स माहिती, सध्या विद्यार्थी हे आपले १० वी चे किंवा १२ वी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोणत्यातरी कमी कालावधीचा चा कोर्स शोधात असतात ज्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये आणखीन भर पडेल आणि असे कमी कालावधीमध्ये करता येणारा अनेक कोर्स आहेत. जे विद्यार्थी करू शकतात आणि त्यामुळे त्यांना फायदा होऊ शकतो जसे कि इंग्लिश स्पिकिंग कोर्स, कॉम्प्यूटर कोर्स, एमएससीआयटी कोर्स, टायपिंग कोर्स, स्टेनोग्राफर कोर्स, फोटोग्राफी कोर्स अश्या प्रकारचे अनेक कोर्स करता येतात आणि आज आपण या लेखामध्ये टायपिंग या कोर्स विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.
टायपिंग हा कोर्स असा आहे ज्यामध्ये कि बोर्डच्या सहाय्याने वाक्ये कशी टाईप करायची या बद्दल माहिती दिली जाते आणि यामध्ये संबधित व्यक्ती कोणत्याही भाषेमध्ये म्हणजेच इंग्रजी, हिंदी किंवा मराठी भाषेमध्ये टायपिंग शिकू शकतो. टायपिंग या कोर्सचा अभ्यासक्रम हा ऑनलाईन किंवा ऑफलाईन असू शकतो.
आणि यामध्ये या कोर्सचा कालावधी १ महिना ते ६ महिने इतका असू शकतो आणि हा कोर्स करण्यासाठी एक मुख्य पात्रता म्हणजे त्या संबधित विद्यार्थ्याचे शिक्षण हे १० वी किंवा १२ वी पर्यंत झाले असावेत आणि हा कोर्स करण्यासाठी कमीत कमी ३००० ते १०००० इतकी फी असू शकते आणि हि फी त्या कोर्सच्या कालावधीवर अवलंबून असते.
टायपिंग कोर्स माहिती – Typing Course Information in Marathi
कोर्सचे नाव | टायपिंग कोर्स |
कोर्सचे स्वरूप | ऑनलाईन किंवा ऑफलाईन |
पात्रता | १० वी किंवा १२ वी चे शिक्षण पूर्ण |
कालावधी | १ महिना ते ६ महिने |
कोर्सची फी | ३००० ते १०००० पर्यंत |
टायपिंग कोर्स म्हणजे काय – typing course meaning in marathi
टायपिंग या कोर्समध्ये कि बोर्ड वापरून जलद गतीने कसे टाईप करायचे या बद्दल शिकवले जाते आणि यामध्ये तंत्र आणि मुद्रा तसेच टायपिंग करताना सर्वोत्तम पध्दतीचा अभ्यास समाविष्ट असतो.
टायपिंग कोर्स करण्यासाठी पात्रता निकष – eligibility
कोणत्याही प्रकारचा कोर्स करण्यासाठी त्या संबधित संस्थेने ठरवलेले पात्रता निकष आपल्याला पार पाडावे लागतात आणि तसेच आपल्याला टायपिंगचा कोएत्स करण्यासाठी देखील काही पात्रता निकष पार पाडावे लागतात ते आपण खाली पाहूया.
- टायपिंगचा कोर्स करण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याने कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आपले १० वी चे किंवा १२ वी चे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- त्या संबधीत विद्यार्थ्याने १० वी किंवा १२ वी मध्ये ५० टक्के गुण मिळाले असले पाहिजेत.
टायपिंग कोर्सनंतर मिळणारा पगार – salary
टायपिंग हा असा कोर्स आहे जो कमी खर्चामध्ये आणि कमी कालावधीमध्ये करता येतो आणि हा कोर्स केल्यानंतर त्या संबधित व्यक्तीला वर्षाला २ ते २.५ लाख पर्यंत पगार मिळू शकतो म्हणजेच त्या व्यक्तीला महिन्याला १५ ते १६ हजार पर्यंत पगार मिळू शकतो. ऑफिस मॅनेजमेंट, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, कोल्ड कॉलिंग, आणि सेल्सबद्दलचे ज्ञान कौशल्य असणाऱ्या टायपिस्टना कोणत्याही संस्थेमध्ये उच्च प्रकारचा जॉब मिळू शकतो.
टायपिंग कोर्स करण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये – skills
कोणताही कोर्स करण्यासाठी त्या संबधित व्यक्तीकडे त्या विषयाविषयी काही आवश्यक कौशल्ये असणे गरजेचे असते तसेच टायपिंगचा कोर्स करण्यासाठी देखील आपल्याजवळ काही कौशल्ये असणे आवश्यक असतात. चला तर खाली आपण टायपिंग कोर्स करण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये कोणती आहेत ते पाहूया.
- टायपिंगचा कोर्स करणारा व्यक्ती हा व्याकरणामध्ये तज्ञ असणे आवश्यक असते म्हणजेच त्याचे व्याकरण चांगले असले पाहिजे.
- त्याच्याकडे संशोधन कौशल्य असणे देखील आवश्यक असते.
- तसेच त्याच्याकडे वेगवेगळ्या शैलीमध्ये म्हणजेच इंग्रजी, मराठी, हिंदी अश्या वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिण्याची क्षमता असणे आवश्यक असते.
- त्याचे कार्य हे वेगवान असणे आवश्यक असते .
- त्याचबरोबर तो संबधित व्यक्ती टायपिंग करत असताना तो अचूकपणे टायपिंग करणे आवश्यक असते म्हणजेच त्याच्याकडे अचूकता असणे देखील आवश्यक असते.
- त्या संबधित व्यक्तीकडे मल्टीटास्किंग कौशल्य देखील असणे आवश्यक असते.
- त्याचबरोबर संघामध्ये काम करण्याची क्षमता असणे गरजेचे असते. तसेच नवीन तंत्रज्ञानासह अद्ययावत असणे आवश्यक असते.
टायपिंग कोर्समधील अभ्यासक्रम – syllabus
खाली आपण टायपिंग कोर्स मध्ये घेतला जाणारा अभ्यासक्रम कोणकोणता असतो ते जाणून घेणार आहोत आणि या अभ्यासक्रमाच्या आधारावर आणि कालावधीवर फीचे स्वरूप ठरलेले असते.
- विंडोज अॅप्लिकेशन्स मध्ये सर्टिफिकेट कोर्स.
- शॉर्टहँडमध्ये प्रमाणपत्र.
- ऑफिस ऑटोमेशनमध्ये डिप्लोमा.
- स्टेनोग्राफी आणि सेक्रेटरीअल प्रॅक्टिसमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
- मेडिकल ट्रान्सक्रीप्शनमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
- दस्तऐवज लेखन डिप्लोमा.
- डिप्लोमा एन मेडिकल रेकॉर्ड टेक्नोलॉजी.
टायपिंग कोर्सचे फायदे – benefits
- टायपिंग हा कॉम्प्युटरची इतर कौशल्ये विकसित करण्यासाठीचा एक प्रारंभिक टप्पा आहे म्हणजेच आपण जर टायपिंग चांगल्या प्रकारे शिकले तर आपण इतर कॉम्प्यूटरची कौशल्ये शिकू शकतो.
- जर आपल्या टायपिंग कौशल्यामध्ये ९० ते ९५ टक्के अचूकता असल्यास ते आपल्याला अनेक क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी मिळवून देण्यास मदत करते.
- टायपिंग हा कोर्स केल्याने आपली मुद्रा सुधारण्यास मदत होते आणि तणाव देखील कमी होण्यास मदत होते.
- टायपिंग हा कोर्स त्या संबधित व्यक्तीला वेळ कार्यक्षम बनवण्यास मदत करते आणि त्यामुळे आपल्या नोकरीच्या शक्यता वाढण्यास मदत होते.
- त्याचबरोबर टायपिंग हा कोर्स आपली व्यावसायिक प्रतिमा वाढवण्यासाठी देखील मदत करते.
आम्ही दिलेल्या typing course information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर टायपिंग कोर्स माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या typing course meaning in marathi या typewriting course fees article मध्ये update करू, मित्रांनो हि information about typing course in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट