यूपीएससी म्हणजे काय? UPSC Full Form in Marathi

UPSC Full Form in Marathi –  UPSC Meaning in Marathi युपीएससी चे पूर्ण स्वरूप आज आपण या लेखामध्ये युपीएससी चा फुल फॉर्म म्हणजेच पूर्ण स्वरूप काय आहे तसेच युपीएससी म्हणजे काय, युपीएससी कश्यासाठी द्यायची असते, युपीएससी देण्याची प्रक्रिया कशी असते आणि युपीएससी  परीक्षेचा अर्ज कसा भरायचा अश्या सर्व युपीएससी संबंधित विशायान्च्यावर आज आपण माहिती घेणार आहोत. भारतातील शिक्षण पध्दतीमध्ये मध्ये परीक्षेला अनन्य साधारण महत्व आहे तसेच भारतामध्ये अनेक स्पर्धात्मक परीक्षांना देखील खूप महत्व आहे.

कारण अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांना स्पर्धात्मक परीक्षा देवून कोणत्यातरी चांगल्या हुद्यावर आपले कामकाज पार पडायचे आणि युपीएससी हि एक स्पर्धात्मक परीक्षा आहे ज्या मार्फत आय ए एस ( IAS ), आय एफ एस ( IFS ), आय पी एस ( IPS ) यासारख्या अनेक परीक्षा विद्यार्थ्यांना देता येतात आणि चांगल्या हुद्यावर काम मिळवण्याची संधी ते साकारू शकतात. युपीएससी UPSC याचे पूर्ण स्वरूप ( full form ) इंग्रजी मध्ये union public service commission असे आहे आणि मराठीमध्ये याला केंद्रीय लोकसेवा आयोग या नावाने ओळखले जाते आणि केंद्रीय लोकसेवा आयोग ( युपीएससी ) हि संस्था अशी आहे.

जी केंद्र सरकारच्या उच्च स्तरीय नोकऱ्यांच्यासाठी भरती करण्यासाठी हि संस्था मुख्य काम करते म्हणजेच एक ठरलेल्या प्रक्रीये द्वारे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातात आणि विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये पास झाले कि त्यांना सरकारी क्षेत्रामध्ये उच्च स्थरावर नोकरी करण्यासाठी संधी मिळू शकते. केंद्रीय लोकसेवा आयोग ( युपीएससी ) ह्या परीक्षा पूर्वीच्या काळापासून म्हणजेच ब्रिटीशांच्या काळापासून सुरु झाल्या आहेत.

म्हणजेच ज्यावेळी भारतामध्ये ब्रिटीश राज्य करत होते त्यावेळी त्यांनी १८५४ मध्ये नागरी सेवा परीक्षेची संकल्पना मंडळी होती आणि भारतीय नागरी सेवा परीक्षेमार्फत उच्च सरकारी नागरी सेवा नोकरी देण्यासाठी त्यावेळी लंडन मध्ये परीक्षा घेतली जायची पण या परीक्षेचे स्वरूप खूप बदलले आहे आणि हि परीक्षा आता भारतामध्ये सर्वत्र घेतली जाते.

upsc full form in marathi
upsc full form in marathi

यूपीएससी म्हणजे काय – UPSC Full Form in Marathi

संस्थायुपीएससी 
उद्देशस्पर्धात्मक आणि प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक म्हणजे नागरी सेवा, संघ लोकसेवा आयोग आणि भारताची प्रमुख नियामक संस्था युपीएससी UPSC द्वारे आयोजित केले जाते
स्थापना१ ऑक्टोबर १९२६
युपीएससी केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Commission)
शैक्षणिक पात्रताकोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी
राष्ट्रीयत्वभारतीय

युपीएससी म्हणजे काय – upsc meaning in marathi

केंद्रीय लोकसेवा आयोग ( युपीएससी ) हि संस्था अशी आहे जी केंद्र सरकारच्या उच्च स्तरीय नोकऱ्यांच्यासाठी भरती करण्यासाठी हि संस्था मुख्य काम करते. युपीएससी UPSC हि एक संस्था आहे ज्या मार्फत भारतातील काही महत्वाच्या स्पर्धात्मक परीक्षा घेतल्या जातात.

स्पर्धात्मक आणि प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक म्हणजे नागरी सेवा, संघ लोकसेवा आयोग आणि भारताची प्रमुख नियामक संस्था युपीएससी UPSC द्वारे आयोजित केले जाते तसेच भारतातील सरकारसाठी नागरी सेवा रिक्त जागा भरण्यासाठी युपीएससी UPSC परीक्षा देखील आयोजित करते. जे युपीएससी UPSC विद्यार्थी आहेत त्यांना नागरी सेवा आणि संरक्षक सेवा या दोन्ही पदांच्यासाठी भारती होता येते.

युपीएससी चे पूर्ण स्वरूप – upsc long form in marathi

युपीएससी UPSC ला मराठीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा संघ लोकसेवा आयोग म्हटले जाते आणि युपीएससी UPSC चा इंग्रजीमध्ये फुल फॉर्म union public service commission असा आहे.

युपीएससी चा इतिहास – history of UPSC 

केंद्रीय लोकसेवा आयोग ( युपीएससी ) ह्या परीक्षा पूर्वीच्या काळापासून म्हणजेच ब्रिटीशांच्या काळापासून सुरु झाल्या आहेत म्हणजेच ज्यावेळी भारतामध्ये ब्रिटीश राज्य करत होते त्यावेळी त्यांनी १८५४ मध्ये नागरी सेवा परीक्षेची संकल्पना मंडळी होती आणि भारतीय नागरी सेवा परीक्षेमार्फत उच्च सरकारी नागरी सेवा नोकरी देण्यासाठी त्यावेळी लंडन मध्ये परीक्षा घेतली जायची. भारतातील प्रसिध्द कवी आणि लेखक रवींद्रनाथ टागोर यांचे बांधी सत्येंद्रनाथ टागोर हे इ.स १८६४ मध्ये परीक्षेमध्ये यश मिळवणारे पहिले भारतीय होते. मग त्यानंतर भारतामध्ये १ ऑक्टोबर १९२६ मध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना प्रथमच झाली आणि या आयोगाचे अध्यक्ष सर रॉस बार्कर हे होते.

युपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा – exams 

युपीएससी UPSC मार्फत स्पर्धात्मक आणि प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक म्हणजे नागरी सेवा, संघ लोकसेवा आयोग आणि भारताची प्रमुख नियामक संस्था युपीएससी UPSC द्वारे आयोजित केले जाते तसेच आणखी काही परीक्षा देखील युपीएससी UPSC मार्फत घेतल्या जातात त्या आपण आता खाली पाहूयात.

अ.     क्रपरीक्षा
१.        भारतीय नागरी सेवा परीक्षा ( IPS, IAS, IRS )
२.        भारतीय आर्थिक सेवा परीक्षा ( IES )
३.        एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा (CMS )
४.        भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा ( ISS )
५.        केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा
६.        भारतीय वन सेवा परीक्षा ( IFS )
७.        एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा ( CDS )
८.        अबियांत्रिकी सेवा परीक्षा ( ESE )
९.        विशेष श्रेणी रेल्वे प्रशिक्षणार्थी परीक्षा ( SCRA )
१०.    राष्ट्रीय संरक्षन अॅकॅडमी आणि नौदल अॅकॅडमी परीक्षा ( NDA, NA )

या सारख्या आणखीन काही परीक्षा ह्या केंद्रीय लोकसेवा आयोगा [ युपीएससी UPSC ] मार्फत घेतल्या जातात.

युपीएससी ची कार्ये – functions of UPSC 

चला तर आता आपण खाली युपीएससी UPSC महत्वाच्या स्पर्धात्मक परीक्षा पार पाडण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची कामे करते.

  • युपीएससी UPSC चे महत्वाचे काम म्हणजे व्यवस्थापन करणे म्हणजेच या द्वारे विविध नागरी सेवा किंवा अधिकाऱ्यांच्या संबंधित अनुशासनात्मक प्रकरणांचे व्यवस्थापन केले जाते.
  • तसेच युपीएससी UPSC मार्फत इच्छुकांची मुलाखत घेवून त्यांची थेट भरती करून घेण्याचे मुख्य काम हा आयोग करते.
  • भारताच्या राष्ट्रपतींनी आयोगाला नियुक्त केलेल्या कोणत्याही विषयावर सरकारला सल्ला देण्याचे काम युपीएससी UPSC आयोग करते.
  • भारतातील सरकारच्या आदेशाप्रमाणे सेवा आणि पदांच्यासाठी भरती नियम तयार करणे, त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करणे आणि ते लागू करणे.
  • स्पर्धा परीक्षा आयोजित करणे म्हणजेच त्याचे स्परूप आणि तारीख ठरवणे.

युपीएससी नागरी सेवा परीक्षेचे टप्पे

युपीएससी नागरी सेवा परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत ते आपण खाली पाहूयात.

  • प्राथमिक परीक्षा (preliminary).
  • मुख्य परीक्षा (mains).
  • मुलाखत (interview).

सर्व प्रथम इच्छुक व्यक्तीची उदिष्ट चाचणी घेतली जाते ज्याला आपण preliminary म्हणून ओळखतो आणि इच्छुक व्यक्तीला यामध्ये उतीर्ण व्हावे लागते कारण यामध्ये उतीर्ण झाल्या शिवाय तो व्यक्ती मुख्य परीक्षेसाठी पात्र होत नाही.

मग त्यानंतर त्या व्यक्तीची लेखी परीक्षा घेतली जाते मग तो संबधित व्यक्ती त्या परीक्षेमध्ये उतीर्ण झाला कि तो पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरतो.

मग मुख्य परीक्षेमध्ये पात्र झालेला व्यक्तीला मुलाखतीसाठी म्हणजेच त्याचा व्यक्तिमत्व चाचणी घेण्यासाठी बोलवले जाते. मुलाखतीचा उद्देश हा सक्षम आणि निपक्षपाती निरीक्षकांच्या मंडळाद्वारे सार्वजनिक सेवेतील करियरसाठी उमेदवाराच्या वैयक्तिक योग्यतेचे मुल्यांकन केले जाते आणि मग त्या संबधित व्यक्तीची त्या जागेसाठी निवड केली जाते.  

आम्ही दिलेल्या upsc full form in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर यूपीएससी म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या upsc meaning in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि upsc long form in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये upsc full form marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!