लसीकरण म्हणजे काय? Vaccination Information in Marathi

vaccination information in marathi लसीकरण म्हणजे काय?, आज आपण या लेखामध्ये व्हॅक्सीनेशन म्हणजेच लस या विषयी माहिती घेणार आहोत म्हणजेच लस केंव्हा घेतली जाते आणि ती कशी काम करते आणि ती का घ्यावी अश्या अनेक प्रश्नांच्याविषयी खाली आपण पाहणार आहोत. व्हॅक्सीनेशन ला मराठी मध्ये लस म्हणतात आणि अनेकांचे असे म्हणणे आहे कि लस घेतल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि लसीमुळे अनेक मोठ्या आजारांच्यापासून बचाव होतो आणि हा एक जैविक पदार्थ आहे.

रोज अनेक रोगांच्यापासून रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दिला जातो. लसीकरण हा एक सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे ज्यामुळे आपल्याला चांगले परिणाम देखील दिसून येतात, कारण अनेक प्रकारच्या लसिकरणामुळे अनेक रोगांच्या पासून संरक्षण होते.

लसीकरणामुळे हे विशिष्ट प्रकारच्या संक्रमणांना थांबवण्यासाठी आणि त्यावर प्रतिकार करण्यासाठी आणि तसेच आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या लसींची रचना केली जाते त्यावेळी रोगप्रतिकार शक्ती जंतूला कसा प्रतिसाद देईल, जंतूविरुध्द लसीकरण करणे आवश्यक आहे का या सारख्या गोष्टींचा विचार केला जातो आणि लास तयार केली जाते.

vaccination information in marathi
vaccination information in marathi

लसीकरण म्हणजे काय – Vaccination Information in Marathi

लसीकरण म्हणजे काय – vaccine meaning in marathi

लस हा एक जैविक पदार्थ आहे जो संबधित व्यक्तीला त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दिला जातो. लसीकरणामुळे हे विशिष्ट प्रकारच्या संक्रमणांना थांबवण्यासाठी आणि त्यावर प्रतिकार करण्यासाठी आणि तसेच आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते.

लसीकरणाचे प्रकार – types

लसीकरण हे अनेक हानिकारक रोगांच्यापासून सुरक्षा मिळवण्यासाठी म्हणजेच आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी वापरले जाते आणि आता आपण खाली लसीकरणाचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत.

लाईव्ह अटेन्युएटेड लस  – live attenuated vaccine

या लसीचा प्रकार रोगास कारणीभूत असलेल्या जंतूंच्या कमकुवत स्वरूपाचा वापर करतात कारण या लसी नैसर्गिक संसर्गासारख्या आहेत ज्यामुळे ते रोखण्यात मदत करतात. परंतु या प्रकारची लस घेताना त्या संबधित व्यक्तीला डॉक्टरांच्या कडून काही सल्ले घ्यावे लागतात.

किंवा त्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असली किंवा त्याला काही दीर्घकालीन आरोग्य समस्या असतील तर त्या व्यक्तीला या प्रकारची लस घेतना विचार करून घेतली पाहिजे. या प्रकारची लस हि गालगुंड, पीतज्वर, कांजिण्या आणि चेचक या सारख्या रोगांची लक्षणे दिसून आल्यानंतर घेतली जाते.

व्हायरल व्हेक्टर लस – viral vector vaccines

सध्याच्या इबोलाच्या उद्रेकासाठी वापरल्या जाणाऱ्या काही लसीमध्ये व्हायरल व्हेक्टर या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे आणि हि लस फ्लू, एचआयव्ही आणि झीका या सारख्या इतर संसर्गजन्य रोगाविरुध्द वापरली जाते. शास्त्रज्ञांनी या तंत्रज्ञानचा वापर हा कोविड १९ लस तयार करण्यासाठी देखील केला जातो.

इनअॅक्टीव्हेटेड लस – inactivated vaccines

निष्क्रिय लस हि रोगास कारणीभूत असलेल्या जंतूंची मारलेली आवृत्ती वापरतात परंतु निक्रीय लस सहसा लाईव्ह अटेन्युएटेड लसीसारखी मजबूत प्रतिकार शक्ती देत नाही. या प्रकारची लस फ्लू, पोलिओ आणि रेबीज या सारख्या रोगांची लक्षणे दिसल्यानंतर दिली जातात.

मेसेंजर आरएनए लस – messenger RNA vaccine

मेसेंजर आरएनए या लसीचा वापर हा कोविड १९ या सारख्या रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी केला जातो. या लसीचा उत्पादन कालावधी हा खूप कमी आहे आणि यामध्ये जिवंत विषाणू नसल्यामुळे लसीकरण झालेल्या व्यक्तीमध्ये रोग होण्याचा धोका नाही.

लस किंवा व्हॅक्सीन कसे काम करते – how it works

लसीकरणामुळे हे विशिष्ट प्रकारच्या संक्रमणांना थांबवण्यासाठी आणि त्यावर प्रतिकार करण्यासाठी आणि तसेच आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते हे आपल्याला माहित आहे परंतु ते कसे काम करते ते आपण खाली पाहूया.

 • लस व्हायरस किंवा बॅक्टेरियासारखे आक्रमण करणारे जंतू ओळखतात.
 • मग त्यानंतर प्रतिपिंडे तयार करतात. प्रतिपिंडे हि प्रथिने आहेत जी रोगाशी लढण्यासाठी रोगप्रतिकार शक्तीद्वारे नैसर्गिकरीत्या तयार केली जातात.
 • मुख्यता लसीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे तब्येत खराब होण्याआधी लवकर रोगांचे जंतू नष्ट होतात.

कोणकोणते रोग टाळण्यासाठी लस दिली जाते

लसीकरण हे अनेक हानिकारक रोगांच्यापासून संरक्षण करते आणि लसीकरण कोणकोणत्या प्रकारचे रोग टाळण्यासाठी दिली जाते ते खाली आपण पाहणार आहोत.

 • गालगुंड.
 • न्युमोनिया.
 • रुबेला.
 • धनुर्वात.
 • कोविड १९
 • पोलिओ.
 • घटसर्प.
 • इबोला व्हायरस रोग.
 • कॉलरा.
 • गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग.
 • हिपॅटायटीस बी.
 • टायफॉईड.
 • पीतज्वर.
 • मेंदूज्वर.
 • गोवर.
 • रोटाव्हायरस.

लसीकरण विषयी विचारले जाणारे प्रश्न – questions

लसीकरण सुरक्षित आहे का ?

होय, लसीकरण सुरक्षित आहे आणि लसीचे दुष्परिणाम सामन्यता किरकोळ आणि तात्पुरते असतात जसे कि हाताला दुखणे आणि गंभीर ताप येणे या सारखी काही किरकोळ लक्षणे दिसून येतात.

कोणाला लसीकरणाची गरज आहे ?

जवळ जवळ सर्वजन लसीकरण करू शकतात परंतु काही केसेसमध्ये जुनाट आजार असणाऱ्या व्यक्तिला, तसेच कोणत्यही प्रकारचे उपचार सुरु असणाऱ्या व्यक्तीने लसीकरण घेताना डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

लसीकरणाचे दुष्परिणाम आहेत काय ?

कोणत्याही औषधांच्याप्रमाणे, लासिंचे काही सौम्य दुष्परिणाम असतात जसे कि ताप येणे, हात दुखणे, इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना होणे किंवा लालसरपणा येणे. परंतु हे किरकोळ दुष्परिणाम लसीमुळे जरी दिसत असले तरी हे जास्त काळ टिकत नाहीत म्हणजेच हे लसीकरणानंतर २ ते ३ दिवस दिसतात.

लसीकरण म्हणजे काय ?

लस हा एक जैविक पदार्थ आहे जो संबधित व्यक्तीला त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दिला जातो.

आम्ही दिलेल्या vaccine information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर लसीकरण म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vaccine meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about vaccine in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये vaccination information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!