विजयदुर्ग किल्ला माहिती Vijaydurg Fort Information in Marathi

Vijaydurg Fort Information in Marathi आज आपण या लेखामध्ये विजयदुर्ग किल्ल्याची माहिती घेणार आहोत जो कायमस्वरूपी अजिंक्य आणि अभेद्य राहिला. विजयदुर्ग हा किल्ला ८२० वर्ष प्राचीन आहे आणि हा किल्ला इ. स. ११९३ ते १२०६ मध्ये राजा भोज याने बांधला कारण त्यावेळी राजा भोज यांचे कोकण प्रांतावर वर्चस्व होते. या किल्ल्यावर विजयनगराचे सम्राट, बहामनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशहाने या किल्ल्यावर राज्य केले. १६५३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्यावर हल्ला करून हा किल्ला आदिलशहा कडून आपल्या ताब्यात घेतला.

विजयदुर्ग या किल्ल्याला पूर्वीच्या काळी घेरीया या नावाने ओळखले जायचे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकण्याच्या अगोदर ५ एकर च्या क्षेत्रफळा मध्ये वसलेला होता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला तटबंदी वाढवून या किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर केले.

vijaydurg fort information in marathi
vijaydurg fort information in marathi

विजयदुर्ग किल्ला माहिती – Vijaydurg Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावविजय दुर्ग
प्राचीन नावघेरिया
ठिकाणविजयदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये आहे.
प्रकारजलदुर्ग
उंची३० मीटर उंचीच्या खडकावर वसलेला आहे.
स्थापनाइ. स. ११९३
संस्थापकराजा भोज
एकूण क्षेत्रफळ१७ एकर
विजयदुर्ग किल्ल्यावरील ठिकाणेहनुमान मंदिर, तिहेरी तटबंदी, गोमुखी दरवाजा, ध्वजस्तंभ, जीभीचा दरवाजा, ध्वजस्तंभ, खुबलढा बुरुज, सदर, गुहा, खलबत खाणा आणि सुरंग

विजयदुर्ग किल्ल्याविषयी माहिती 

अजिंक्य आणि अभेद्य असणारा विजयदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये आहे. विजयदुर्ग हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याचे तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने जमीन आहे जेथून किल्ल्यामध्ये प्रवेश केला जातो. ३० मीटर उंच खडकावर आहे. या किल्ल्याची तटबंदीची भिंत ३०० फुट उंच आहे आणि किल्ल्याची भिंत हि १० मीटर उंच आहे. या किल्ल्याभोवती तीन बिनती आहेत एक आहे ती समुद्र किनाऱ्या लागत आहे. दुसरी बुरुजांची म्हणजेच संरक्षक भिंत आणि तिसरी मुख्य किल्ल्याची भिंत.

जर शत्रूने अचानक हल्ला केला तर बचावासाठी किल्ल्यामध्ये दोन सुरंग बनवल्या होत्या एक सुरंग किल्ल्याच्या पूर्वेकडे आणि दुसरी सुरंग किल्ल्याच्या पश्चिमेकडे आहे. या किल्ल्याला तीन तटबंदी आहेत आणि या तटबंदीना चिलखती तटबंदी देखील म्हंटले जाते. पूर्वीच्या काळी या किल्ल्याच्या समोरून एक खाडी होती आणि त्यावर पूल बांधला होता त्यामुळे तिन्ही बाजूने समुद्र आणि एका बाजूने खाडी असल्यामुळे या किल्ल्यावर हल्ला करणे तसे सोपे नव्हते. या किल्ल्याचे मुख्य प्रवेशदार उतरेकडील बाजूस आहे.

विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास – Vijaydurg Fort History In Marathi

मराठी आरमाराच्या कारभारामध्ये विजयदुर्ग या किल्ल्याने मोलाची कामगिरी बजावली आहे. विजयदुर्ग किल्ला हा इ. स. ११९३ ते १२०६ मध्ये राजा भोज याने बांधला आणि हा किल्ला ५ एकर क्षेत्रामध्ये वसलेला होता आणि या किल्ल्याचे पूर्वीची नाव घेरिया असे होते आणि त्यानंतर या किल्ल्यावर विजयनगराचे सम्राट, बहामनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशहाने या किल्ल्यावर राज्य केले.

१६ फेब्रुवारी १६५३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्यावर हल्ला करून हा किल्ला आदिलशहा कडून आपल्या ताब्यात घेतला आणि किल्ल्याला तटबंदी बांधली आणि या किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर केले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याला ३ तटबंदीच्या भिंती बांधल्या आहेत जेणेकरून या किल्ल्यावर सहसा कोणालाहि हल्ला करता येणार नाही. इ. स. १७५६ पर्यंत हा किल्ला कान्होजी आंग्रे व त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळाजी आंग्रे यांच्या ताब्यात होता.

त्यानंतर इंग्रज आणि पेशवे यांनी मिळून या किल्ल्यावर हल्ला केला आणि कान्होजी आंग्रे यांच्या सैनाचा परभाव केला आणि किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्यावेळी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये एक करार झाला होता आणि त्या करारामध्ये असे ठरले होते कि हा किल्ला पेशव्यांना ध्यायचा पण करारामध्ये ठरल्याप्रमाणे काहीच झाले नाही. इंग्रजांनी पेशव्यांकडून बाणकोट जिल्ह्यातील पेशव्यांच्या वर्चस्वा खाली असलेली ७ गावे घेतली आणि पेशव्यांना विजयदुर्ग हा किल्ला देण्यात आला. या किल्ल्यावर १६५३ पासून १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठ्यांचे वर्चस्व होते.

विजयदुर्ग किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे 

 • हनुमान मंदिर :

आपल्यला किल्ल्यामध्ये जाताना सुरुवातीला एक हनुमानाचे मंदिर आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात आल्यानंतर बांधले आहे. असे म्हणतात कि समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि समर्थ रामदास यांची हनुमानावर भक्ती होती त्यामुळे आपल्यला शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ल्यांवर आपल्यला हनुमान मंदिरे पाहायला मिळतात.

 • तिहेरी तटबंदी :

समुद्राच्या जवळची तटबंदी म्हणजे पडकोट खुश्की, दुसरी तटबंदी बुराजांच्या भोवती आणि तिसरी तटबंदी किल्ल्याच्या भोवती आहे.

 • गोमुखी दरवाजा :

गोमुखी दरवाजा हा दरवाजा म्हणजे किल्ल्याचे प्रवेशदार. या किल्ल्याच्या प्रवेशदाराची रचना अशी केली आहे कि हे दार किल्ल्याजवळ गेल्याशिवाय दिसत नाही.

 • ध्वजस्तंभ :

खलबत खाण्यापासून थोडे पुढे गेल्यानंतर आपल्यला ध्वजस्तंभ दिसतो. ध्वजस्तंभावर किल्ल्यावर ज्यांचे वर्चस्व आहे त्यांचा झेंडा फडकवला जात असतो.

 • जीभीचा दरवाजा :

किल्ल्याच्या दरवाजातून पुढे गेल्यानंतर एक छोटा दरवाजा लागतो ज्याला जीभीचा दरवाजा म्हणतात.

 • खुबलढा बुरुज :

खुबलढा बुरुज हा किल्ल्यावरील प्रसिध्द बुरुज आहे ज्याचा वापर समुद्रावरील शत्रूंच्या तोफांनी मारा करण्यासाठी केला जाता होता तसेच या बुजुजावरून समुद्री शत्रूवर लक्ष देखील ठेवले जात होते. या बुरुजावर जाण्यासाठी एका भुयारी मार्गाचा वापर केला जात होता.

 • गुहा :

विजयदुर्ग किल्ल्यावर आपल्याला वेगवेगळ्या गुहा देखील पाहायला मिळतात.

 • खलबत खाना :

खलबत खाण्यामध्ये गुप्त खलबती चालतात म्हणजेच या खलबत खाण्यामध्ये गुप्त राजकारण किवा मोहिमांचे पूर्वनियोजन व्हायचे.

 • सदर :

किल्ल्याच्या आतल्या बाजूमध्ये आपल्यला एक इमारत पाहायला मिळते जी अजूनही सुस्थितीत आहे आणि ती भोज राजाने बांधली होती.

 • सुरंग :

जर शत्रूने अचानक हल्ला केला तर बचावासाठी किल्ल्यामध्ये दोन सुरंग बनवल्या होत्या एक सुरंग किल्ल्याच्या पूर्वेकडे आणि दुसरी सुरंग किल्ल्याच्या पश्चिमेकडे आहे.

विजयदुर्ग किल्ला फोटो:

vijaydurg fort information in marathi

विजयदुर्ग किल्ल्यावर कसे जायचे ? 

 • हवाई मार्गे : जर तुम्हाला विमानाने यायचे असले तर विजयदुर्ग किल्ल्याजवळील सर्वात जवळचे विमानतळ रत्नागिरी येथे आहे तेथून तुम्ही विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत बसने किवा टॅक्सीला जावू शकता.
 • रेल्वे मार्गे : या किल्ल्यापासून जवळचे रेल्वे स्टेशन कणकवली येथे आहे आणि जर हा किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला रेल्वेने यायचे असेल तर कणकवलीला यावे लागते आणि तेथून विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत बसने किवा टॅक्सीला जावू शकता.
 • रस्ता मार्गे : या किल्ल्यावर जाण्यासाठी कोणतीही थेट बस नाही त्यामुळे आपल्यला कणकवली बसने येवून तेथून विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत बसने किवा टॅक्सीला जावू शकता.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, विजयदुर्ग किल्ला vijaydurg fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. vijaydurg fort information in marathi pdf हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information of vijaydurg fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही विजयदुर्ग किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या vijaydurg killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!