अजिंक्यतारा किल्ला माहिती Ajinkyatara Fort Information in Marathi

Ajinkyatara Fort Information in Marathi अजिंक्यतारा किल्ल्याची माहिती मराठीत अजिंक्यतारा हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये आहे. हा किल्ला प्रतापगडापासून पुढे सुरु होणाऱ्या बामणोली पर्वत रांगेवर हा किल्ला वसलेला आहे. अजिंक्यतारा हा किल्ला सातारा शहरामध्ये असल्यामुळे म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याशीच सातारा शहर असल्यामुळे या किल्ल्यावर जाण्यासाठी साताऱ्यातून अनेक वाटा आहेत. अजिंक्यतारा या किल्ल्याची इतिहासातील ओळख सांगायची म्हंटली तर १८ व्या शतकातील मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेला किल्ले अजिंक्यतारा. अजिंक्यतारा या किल्ल्याला सातारच किल्ला म्हणून देळील ओळखले जाते. सह्याद्री पर्वत रांगेवर आपल्यला बरेच किल्ले पाहायला मिळतील पण एका किल्ल्यापासून दुसऱ्या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी येथे कोणतेही मार्ग नाहीत.

ajinkyatara fort information in marathi
ajinkyatara fort information in marathi

अजिंक्यतारा किल्ला माहिती – Ajinkyatara Fort Information in Marathi

किल्याचे नावअजिंक्यतारा
स्थापनाइ. स. ११९०
संस्थापकशिलाहार वंशामधील दुसरा भोज राजा
ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये हा किल्ला वसलेला आहे.
प्रकारगिरिदुर्ग
डोंगर रांगामुख्य डोंगर रांग – सह्याद्री, उप डोंगर रांग – बामणोली
किल्ल्याची उंची४४०० फुट
चढण्याची श्रेणीसोपी
ओळखमराठा साम्राज्याची चौथी राजधानी
किल्ल्यावरील ठिकाणेमहाराणी ताराबाई राजवाडा, महादेवाचे मंदिर, मंगळाई देवीचे मंदिर, किल्ल्यावरील सात तळे, हनुमानाचे मंदिर आणि मंगळाई बुरुज

अजिंक्यतारा हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या बामणोली उप पर्वतरांगेवर हा किल्ला वसलेला आहे. अजिंक्यतारा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून या किल्ल्याची उंची ४४०० फुट असून हा किल्ला दक्षिनेकडे हा किल्ला ६०० मीटर विस्तारलेला आहे. हा किल्ला मराठा साम्राज्याची चौथी राजधानी होती. पहिली राजधानी राजगड, दुसरी रायगड, तिसरी राजधानी जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. अजिंक्यतारा हा किल्ला इ. स. ११९० मध्ये हा किल्ला शिलाहार वंशामधील दुसरा भोज राजा याने बांधला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला इ. स. १६७३ मध्ये हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला होता त्याचबरोबर या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना ज्वर आला होता त्यावेळी महाराज या किल्ल्यावर २ महिन्यासाठी वास्तव्य केले होते.

ह्या किल्ल्यावर चढण्याची श्रेणी एकदम सोपी आहे आणि या किल्ल्यावरून चंदनवंदन किल्ला, कल्यानगड, यातेश्वराचे पठार, पश्चिमेकडील सज्जनगड आणि जरंडा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. या किल्ल्यावर आपल्यला महाराणी ताराबाई राजवाडा, महादेवाचे मंदिर, मंगळाई देवीचे मंदिर, किल्ल्यावरील सात तळे, हनुमानाचे मंदिर आणि मंगळाई बुरुज देखील पाहायला मिळतो.

अजिंक्यतारा किल्ला इतिहास – ajinkyatara fort history in marathi

अजिंक्यतारा या किल्ल्याची स्थापना इ. स. ११९० मध्ये शिलाहार वंशामधील दुसरा भोज राजा याने केली होती. त्यानंतर हा किल्ला बहामनी वंशाच्या ताब्यात गेला व अजिंक्यतारा या किल्ल्यावर विजापूरचा आदिलशहा याचे वर्चस्व आले. या किल्ल्यामध्ये पहिला आदिलशहा याची पत्नी चांदबीबी हिला किश्वर खानाने कैदेत ठेवले त्यानंतर काही दिवस हा किल्ला लोकांना कैद करण्यासाठी वापरला जावू लागला.

पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला त्याचबरोबर या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना ज्वर आला होता त्यावेळी महाराज या किल्ल्यावर २ महिन्यासाठी वास्तव्य केले होते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर औरंगजेबाने महाष्ट्रामध्ये आपली सत्ता बळकट करण्यासाठी प्रयत्न चालू केले आणि इ. स. १६९९ मध्ये औरंगजेबाच्या सैनिकांनी अजिंक्यतारा या किल्ल्याला वेढा घातला आणि हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

ज्यावेळी हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात होता तेव्हा या किल्ल्याचे नाव आझमतारा असे ठेवले. ज्यावेळी मराठी साम्राज्य ताराराणींच्याकडे होते त्यावेळी सरदार परशुराम त्रंबक आणि सैनिकांनी हा किल्ला परत स्वराज्यामध्ये सामील केला त्यावेळी ताराराणींनी या किल्ल्याचे आझमतारा हे नाव अजिंक्यतारा असे ठेवले परंतु थोड्या दिवसातच हा किल्ला मोगलांना परत द्यावा लागला.

इ. स. १७०८ मध्ये हा किल्ला शाहू महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि तेथेच आपला राज्याभिषेक करून घेवून किल्ल्याच्या पायथ्याशी सातारा हे शहर वसवले. दुसऱ्या शाहू महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला इंग्रजांच्या वर्चस्वा खाली गेला. अश्याप्रकारे या किल्ल्याचा इतिहास घडत गेला आहे.

अजिंक्यतारा या किल्ल्याला औरंगजेबाचा वेढा 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने महाष्ट्रामध्ये आपली सत्ता बळकट करण्यासाठी प्रयत्न चालू केले आणि इ. स. १६९९ मध्ये औरंगजेब आणि औरंगजेबाच्या सैनिकांनी अजिंक्यतारा या किल्ल्याला वेढा खटला त्यावेळी त्या किल्ल्याचे किल्लेदार प्रयागजी प्रभू हे होते. १३ एप्रिल १७०० या दिवशी सकाळी औरंगजेबाचे सैनिकांनी किल्ल्याजवळ सुरंग लावण्यासाठी २ भुयारे खणायला सुरुवात केली. भुयारी खणून झाल्यानंतर त्यामध्ये सुरंग लावण्यात आले.

सुरांगांना बत्ती देताच मंगळाई बुरुज आकाशामध्ये उडून खाली जमिनीवर कोसळला आणि यामध्ये मराठ्यांचे काही सैनिक दगावले तर काही मरण पावले. या स्पोटामध्ये या किल्ल्याचे किल्लेदार प्रयागजी प्रभू देखील होते पण त्यांना कोणतीही इजा झाली नाही. मंगळाई बुरुज उडून पडल्यामुळे त्या बुरुजाजवळचा तट मोगलांच्या सैनिकांच्या अंगावर पडून त्यामध्ये १५०० मोगलांचे सैन्य मारले गेले.

या किल्ल्यावरी हि लढाई खूप दिवस चालू असल्यामुळे गडावरील दानागोटा आणि दारुगोळा संपला त्यामुळे हा किल्ला औरंगजेबाच्या हाती गेला पण ताराराणींच्या सैनिकांनी हा किल्ला परत स्वराज्यामध्ये सामील केला.

अजिंक्यतारा किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे 

  • ताराराणी राजवाडा :

ज्यावेळी अजिंक्यतारा हा किल्ला ताराराणींच्या वर्चस्वा खाली होता त्यावेळी त्यांनी हा वाडा बांधला होता. आज हा किल्ला आपल्यला पडझड अवस्थेमध्ये पाहायला मिळतो.

  • महादरवाजा:

आपल्याला अजिंक्यतारा किल्ल्याजवळ गेल्यानंतर एक मोठे आणि भव्य असे प्रवेश दार दिसते ते म्हणजे महादरवाजा. या प्रवेश दाराला दोन्ही बाजूला २ मोठे बुरुज आहे आणि या दरवाज्याला एक छोटा दिंडी दरवाजा देखील आहे. या दरवाजाची उंची एवधी आहे कि या दरवाजातून हत्ती अंबारी सहित जावू शकतो.

  • दक्षिण दरवाजा :

किल्ल्याच्या दक्षिणेला देखील एक दार आहे ज्याला दक्षिण दरवाजा म्हणतात आणि या दरवाज्याचा उपयोग पूर्वीच्या काळी दक्षिणेकडून येणाऱ्या किल्ल्यामध्ये येणाऱ्या लोकांच्यासाठी केला जात होता.

  • तलाव/ तळे :

या किल्ल्यावर आपल्यला सात तळे पाहायला मिळतात आणि पावसाळ्यामध्ये हे दृश्य डोळ्याचे पारणे फेडते.

  • महादेवाचे मंदिर :

किल्ल्यामध्ये प्रवेशदारातून आतमध्ये गेल्यानंतर काही पायऱ्या चढून वरती गेले कि छोटेशे महादेवाचे मंदिर पाहायला मिळते.

  • हनुमानाचे मंदिर :

किल्ल्यावर महादेवाच्या मंदिराच्या मागच्या बाजूला हनुमानाचे मंदिर आहे आणि जर किल्ल्यावर मुक्काम करायचा असेल तर या मंदिरामध्ये राहण्याची सोय होऊ शकते.

  • मंगळाई देवीचे मंदिर :

अजिंक्यतारा किल्ल्यावर आपल्यला पूर्वेकडील टोकाला मंगळाई देवीचे मंदिर पाहायला मिळते.

अजिंक्यतारा किल्ला फोटो:

ajinkyatara fort information in marathi
ajinkyatara fort information in marathi

अजिंक्यतारा या किल्ल्यावर कसे जायचे 

  • जर तुम्ही रेल्वेने येत असाल तर सातारा हे प्रतापगडाचे जवळचे रेल्वे स्थानक आहे आणि साताऱ्यातून गडावर टॅक्सीने जावू शकता.
  • जर तुम्हाला हा किल्ला पाहायला बस पकडून यायचे असेल तर बसने तुम्ही साताऱ्या पर्यंत येवू शकता आणि तेथून टॅक्सीने गडावर जावू शकता.

टीप

  • जर या किल्ल्यावर मुक्कामासाठी जाणार असाल तर या किल्ल्यावर जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यामुळे जेवण आणि पाणी सोबत घेवून गेले तर सोयीस्कर होईल.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, अजिंक्यतारा किल्ला ajinkyatara fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. ajinkyatara fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about ajinkyatara fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही अजिंक्यतारा  किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या ajinkyatara killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही ajinkyatara fort kolhapur information in marathi त्यामध्ये नक्की बदल करू.  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!