वटपौर्णिमा माहिती मराठी Vat Purnima Information in Marathi

vat purnima information in marathi वटपौर्णिमा माहिती मराठी, भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सण आणि उपवास केले जाते आणि या सणांना आणि उपवासांना भारतामध्ये खूप महत्व आहे आणि त्या सणांच्या किंवा उपवासाच्या पाठीमागे काही ना काही इतिहास आणि मनोरंजक अश्या गोष्टी आहेत. आज आपण या लेखामध्ये सण आणि उपवास म्हणून ओळखला जाणाऱ्या वट पौर्णिमेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. वटपौर्णिमा हि एक पौर्णिमा आहे, जी वर्षातील ज्येष्ठ महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला वट पौर्णिमा म्हणून ओळखले जाते.

जसे हरतालिकेचा उपवास हा स्त्रिया आपल्याला पतीच्या चांगल्या आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी करतात तसेच वट पौर्णिमेच्या दिवशी देखील सर्व सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या चांगल्या आणि दीर्घायुष्यासाठी, तसेच तिच्या संसाराची चांगल्या वृध्दी होण्यासाठी त्या दिवशी कडक उपवास करतात.

तसेच त्या वडाच्या झाडाची पूजा देखील करतात आणि त्या वाडाच्या झाडाला जाऊन त्या ठिकाणी वडाच्या झाडाला हळदी कुंकू वाहतात तसेच त्या वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून दोऱ्यासोबत सात प्रदक्षिणा घालतात तसेच सावित्री आणि सत्यवानयांच्या मुर्त्या पुजून प्रार्थना देखील करतात.

वट पौर्णिमा ह्या व्रताला वट सावित्री व्रत म्हणून देखील ओळखले जाते आणि हे व्रत भारतातील महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि पूर्ण उत्तर प्रदेशामध्ये केले जाते आणि ह्या दिवसाला असे देखील म्हटले जाते कि हे दिवस पतीवरचे प्रेम साजरे करण्याचा दिवस असतो.

हा दिवस हा सत्यवान सावित्रीच्या साठी ओळखला जातो कारण तिने याच दिवाशी आपल्या पतीचे प्राण वाचवले होते आणि ते देखील वडाच्या झाडाखाली बसून आणि म्हणून या दिवशी स्त्रिया आपल्या पतीसाठी व्रत करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात.

vat purnima information in marathi
vat purnima information in marathi

वटपौर्णिमा माहिती मराठी – Vat Purnima Information in Marathi

वट पौर्णिमा म्हणजे काय – vat purnima in marathi

वटपौर्णिमा हि एक पौर्णिमा आहे जी वर्षातील ज्येष्ठ महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला वट पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. वट पौर्णिमेच्या दिवशी देखील सर्व सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या चांगल्या आणि दीर्घायुष्यासाठी, तसेच तिच्या संसाराची चांगल्या वृध्दी होण्यासाठी त्या दिवशी कडक उपवास करतात.

तसेच त्या वडाच्या झाडाची पूजा देखील करतात आणि त्या वडाच्या झाडाला जाऊन त्या ठिकाणी वडाच्या झाडाला हळदी कुंकू वाहतात तसेच त्या वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून दोऱ्यासोबत सात प्रदक्षिणा घालतात

सत्यवान सावित्रीची कथा – vat purnima marathi

सावित्रीचा जन्म हा राजा अश्वपती आणि त्यांची पत्नी मालवी यांच्या पोटी झाला होता आणि ती मोठी झाल्यानंतर तिच्यासाठी नवरा शोधण्यास सुरुवात झाली आणि त्याच काळामध्ये सावित्रीची भेट हि सत्यवानाशी झाली आणि सत्यवान विषयी असे सांगितले होते कि त्याचा मृत्यू हा एका वर्षामध्ये होणार आहे.

आणि सावित्रीला हे माहिती असून देखील तिने त्याच्यासोबत लागण केले. लग्नानंतर काही दिवसांनी सत्यवानाला अचानक अशक्त वाटू लागले आणि त्याचा अचानक मृत्यू झाला आणि मग दुखी सावित्रीने त्यावेळी सत्यवानाचा मृतदेह वटवृक्षाखाली ठेवला आणि ती तेथे बसून राहिली.

त्यावेळी त्या ठिकाणी यम देव सत्यवानाच्या आत्म्याला नेण्यासाठी आले त्यावेळी यम देवांची स्तुती केली आणि त्यावेळी यम देव तिच्यावर खुश होऊन त्यांनी तिला तीन वर मागण्यास सांगितले त्यावेळी तिने त्यांच्या कडे तीन वर मागितले ते म्हणजे पहिल्या वरदानामध्ये तिने तिच्या सासरच्या लोकांना त्यांच्या राज्यात पूर्ण वैभवाने बहाल करण्याची मागणी केली.

आणि दुसऱ्या वरदानामध्ये तिने आपल्या वडिलांच्यासाठी मुलगा मागितला आणि तिने तिसरे वरदान मुलांच्यासाठी मागितले आणि यामुळे यम देवाला कोंडीत टाकले गेले आणि त्यांनी शेवटी सावित्रीच्या चिकाटी आणि समर्पणामुळे सत्यवानाला जिवंत ठेवण्याचे मान्य केले.

त्यावेळी सावित्रीने वटवृक्षाला प्रदक्षिणा घातली आणि सत्यवान जागा झाला आणि म्हणून या दिवसापासून हे व्रत भारतातील अनेक ठिकाणावरील स्त्रिया आपल्या पतीच्या चांगल्या आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी करतात.

वटपोर्णिमा कशी साजरी केली जाते – vat purnima pooja in marathi

  • वट पौर्णिमेच्यादिवशी सर्व स्त्रिया ह्या सकाळी लवकर उठतात आणि पवित्रा स्नान करतात आणि मग नवीन कपडे, साड्या किंवा त्यांचा पारंपारिक पोशाख घालतात तसेच अंगावर सर्व दागिने घालून शृंगार करतात.
  • या दिवशी नवविवाहित स्त्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी उपवास करतात तसेचकाही कुमारिका स्त्रिया देखील इच्छित पती मिळावा म्हणून हा उपवास करतात.
  • तसेच या दिवशी सर्व स्त्रिया मंदिरामध्ये जातात तसेच वटवृक्षाची देखील प्रार्थना करतात.
  • स्त्रिया या दिवशी वडाच्या झाडाला दिवा लावतात, फुले, हळदी कुंकू आणि अक्षता वाहतात आणि वडाच्या झाडाभोवती ७ प्रदक्षिणा घालतात आणि झाडाभोवती पवित्र पांढरा कच्चा धागा बांधतात आणि पाणी अर्पण करतात.
  • तसेच झाडाच्या मुळांना पाणी अर्पण केल्यानंतर स्त्रिया मिठाई किंवा फळे अर्पण करतात आणि सावित्री सत्यवानाची कथा सांगतात आणि नंतर आपल्या पतीच्या कल्याणासाठी आणि सौभाग्यासाठी प्रार्थना करतात.
  • सर्व विधी पूर्ण केल्यानंतर त्या महिला कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा पाय स्पर्श करून आशीर्वाद घेतात.

वट पोर्णिमेविषयी काही विशेष तथ्ये – facts

  • हा सण सावित्रीच्या तिच्या पती प्रती असलेली निष्ठा आणि समर्पण साजरे करतो आणि उपवास पाळणाऱ्या स्त्रिया देखील अश्याच गुणांची प्राप्ती करतात.
  • महिलांनी वट पौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी काळे, निळे आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्यास टाळले पाहिजे आणि शक्यतो या दिवशी स्त्रियांनी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले पाहिजेत.
  • वटपौर्णिमा हि एक पौर्णिमा आहे जी वर्षातील ज्येष्ठ महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला वट पौर्णिमा म्हणून ओळखले जाते.
  • कुमारिका मुली देखील त्यांना चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत करू शकतात.
  • काही ठिकाणी स्त्रिया या दिवशी वडाच्या झाडाला दोरा गुंडाळन्यासाठी कच्च्या दोऱ्याऐवजी कलवा देखील वापरतात.
  • वट पौर्णिमेच्या ह्या व्रताला वट सावित्री व्रतम्हणून देखील ओळखले जाते.
  • वट पौर्णिमा हा एक सण आहे आणि हा सण हिंदू धर्मातील एक शुभ सण आहे.
  • या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि हि पूजा करण्यासाठी हळदी कुंकू, अगरबत्ती, धूप, दिवा, कापूर, फुले, पाच फळे, वडाला गुंडाळण्यासाठी दोरा, तांदूळ, पाण्याचा एक छोटासा कलश, आरती आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या असे साहित्य लागते.
  • हे व्रत भारतातील महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि पूर्ण उत्तर प्रदेशामध्ये केले जाते.

आम्ही दिलेल्या vat purnima information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर वटपौर्णिमा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vat purnima pooja in marathi या vat purnima scientific reason in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about vat purnima in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये marathi vat purnima Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!