Veg Kurma Recipe in Marathi व्हेज कुर्मा रेसिपी आपल्याला केंव्हाही आणि कधीही झणझणीत, चमचमीत आणि मसालेदार खावेसे वाटते आणि त्यावेळी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मसालेदार भाज्या बनवून चपाती, रोटी किंवा नान सोबत खावू शकतो आणि त्यामधील एक प्रसिध्द डिश म्हणजे व्हेज कुर्मा जो फ्लॉवर, वाटाणे, बटाटा या भाज्या वापरून बनवला जातो. आज आपण या लेखामध्ये व्हेज कुर्मा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. व्हेज कुर्मा हि एक महाराष्ट्रीयन डिश आहे. जी लोक वारंवार बनवतात आणि आवडीने खातात. व्हेज कुर्मा हि अशी रेसिपी आहे. जी लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडते आणि हि रेसिपी भारताच्या बहुतेक भागामध्ये बनवली जाते.
फ्लॉवर, वटाणे, बटाटा हे तेलामध्ये भाजून घेतले जातात आणि मग ग्रेव्ही बनवून त्यामध्ये घातले जातात. व्हेज कुर्मा हा पदार्थ बनवण्यसाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये अगदी उत्तम बनणारी रेसिपी आहे. चला तर आज आपण या लेखामध्ये झणझणीत आणि मसालेदार हॉटेल सारखे व्हेज कुर्मा कसा बनवायचा ते पाहूयात.
व्हेज कुर्मा रेसिपी – Veg Kurma Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० ते ३५ मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन |
बनवण्याची पध्दत | सोपी |
वाढणी | २ व्यक्ती |
व्हेज कुर्मा रेसिपी – How to make veg kurma recipe
व्हेज कुर्मा हि रेसिपी खूप मसालेदार आणि झणझणीत असल्यामुळे हि रेसिपी अनेक लोकांची आवडती डिश आहे आणि कोल्हापूर तसेच महाराष्ट्राबरोबर देशाच्या काही भागामध्ये देखील हि रेसिपी खूप आवडीने बनवली जाते. व्हेज कुर्मा रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे ३० ते ३५ मिनिटामध्ये बनते. चला तर मग व्हेज कुर्मा कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० ते ३५ मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन |
बनवण्याची पध्दत | सोपी |
वाढणी | २ व्यक्ती |
व्हेज कुर्मा बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लागतात तसेच मसाले देखील लागतात आणि यामधील काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि काही साहित्य उपलब्ध नसते आणि ते आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चाल तर मग पाहूयात व्हेज कुर्मा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.
- अर्धी वाटी मटार.
- अर्धी वाटी फ्लॉवर ( सुटे करून घेतलेले ).
- अर्धी वाटी बटाटा ( चौकोनी चिरलेला ).
- १ कांदा ( बारीक चिरलेला – फोडणीसाठी ).
- १ चमचा आले लसून पेस्ट.
- १/२ चमचा गरम मसाला.
- १ वाटी सुखं खोबरं ( खिसलेलं ).
- १ मोठा चमचा तीळ.
- २ चमचे जिरे.
- १ छोटा कांदा ( उभा चिरलेला ).
- १ धणे पावडर.
- २ चमचे लाल मिरची पावडर.
- १/३ चमचा हळद.
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- तेल ( आवश्यकतेनुसार ).
व्हेज कुर्मा बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि आपण हा कमी वेळेमध्ये अगदी उत्तम बनवू शकतो आणि हा लोक वारंवार बनवून खातात आणि म्हणून आता आपण व्हेज कुर्मा कसा बनवायचा ते पाहूयात. चला तर मग आता आपण वर दिलेले साहित्य वापरून व्हेज कुर्मा कसा बनवायचा ते पाहूयात.
- सर्वप्रथम सर्व भाज्या ( फ्लॉवर, मटार आणि बटाटा ) स्वच्छ धुवून चिरून घ्या आणि त्या बाजूला ठेवा.
- उभा चिरलेला कांदा देखील कोरडा भाजून घ्या.
- आता एक कढई घ्या आणि ती गॅसवर मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये सुखं खोबरं घाला आणि ते भाजून घ्या आणि मग ते बाजूला काढा आणि त्यामध्ये तीळ आणि जिरे देखील भाजून घ्या आणि ते खोबऱ्यामध्ये घाला आणि त्यामध्ये कोथिंबीर आणि कोरडा भाजलेला कांदा घाला आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेवून त्याची बारीक पेस्ट करा आता ते बारीक झाले कि त्यामध्ये आले लसून पेस्ट आणि थोडे पाणी घाला आणि चांगली एकदम बारीक पेस्ट बनवून घ्या आणि ते बाजूला ठेवा.
- आता गॅसवर कढई ठेवा आणि त्यामध्ये तेल घाला आणि सर्व भाज्या ( फ्लॉवर, मटार आणि बटाटा ) मध्यम आचेवर वेगवेगळ्या भाजून घ्या आणि त्या भाज्या बाजूला ठेवा.
- आता त्याच कढई मध्ये तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये थोडेसे जिरे घाला आणि जिरे फुलले कि लगेच त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला आणि तो कांदा थोडा वेळ भाजू द्या कांदा थोडा लालसर झाला कि त्यामध्ये धने पावडर, लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला घाला आणि ते मिक्स करा.
- मग त्यामध्ये आपण बनवून ठेवलेली पेस्ट घाला आणि ते मिक्स करून त्यामध्ये १ ते दीड वाटी गरम पाणी घाला आणि ते चांगले मिक्स करा म्हणजे ग्रेव्ही चांगली सरसरीत होईल.
- आता यामध्ये तेलामध्ये भाजून ठेवलेल्या भाज्या घाला आणि चवीनुसार मीठ आणि साखर घालून ते मिक्स करा.
- यावर झाकण ठेवून व्हेज कुर्मा ७ ते ८ मिनिटे चांगल शिजू द्या. व्हेज कुर्मा चांगला शिजला कि गॅस बंद करा.
- व्हेज कुर्मा सर्व्ह करण्यासाठी तयार झाला.
व्हेज कुर्मा कश्यासोबत सर्व्ह करावा – serving suggestions
- व्हेज कुर्मा हि चमचमीत आणि मसालेदार रेसिपी रोटी, नान, चपाती किंवा जीरा राईस सोबत खावू शकतो.
टिप्स (Tips)
- व्हेज कुर्मा बनवताना यामध्ये वाळलेल्या खोबऱ्याच्या ऐवजी ओले खोबरे देखील वापरले तरी चालते.
- व्हेज कुर्म्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता.
- जरी आपण भाज्या तेलामध्ये भाजत असलो तरी त्या चांगल्या शिजवाव्या लागतात.
- व्हेज कुर्मा रेसिपीमध्ये आपण टोमॅटो प्युरी देखील घालू शकतो.
- व्हेज कुर्मा शक्यतो गरमागरम सर्व्ह करावा.
आम्ही दिलेल्या veg kurma recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर व्हेज कुर्मा रेसिपी माहिती मराठी kurma bhaji बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या veg kurma bhaji recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि veg kurma puri recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये veg kurma recipe in marathi madhura Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट