वरळी किल्ला माहिती Worli Fort Information in Marathi

Worli Fort Information in Marathi वरळी किल्ल्याची माहिती वरळी हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरातील वरळी भागामध्ये आहे. हा किल इ. स. १६७५ मध्ये ब्रिटिशांनी बांधला. मुंबई हे शहर पूर्वी सात बेटे एकत्र करून बनलेले आहे आणि तेथे समुद्र असल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांच्या काळात हा किल्ला समुद्रातील शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी, आक्रमणे रोखण्यासाठी आणि विशेषता माहीम खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता. वरळी किल्ला हा एक किनारपट्टी वरील एक छोटासा किल्ला आहे ज्याला भक्कम अशी तटबंदी त्रिकोणी आकाराचा एक बुरुज आणि त्या बुरुजावर एक कोपऱ्यामध्ये एक मनोरा आहे जो घनता त्याचा उपयोग पूर्वीच्या काळी घंटा बांधण्यासाठी केला जात होता. 

worli fort information in marathi language
worli fort information in marathi language

वरळी किल्ला माहिती – Worli Fort Information in Marathi

किल्ल्याचे नाववरळी किल्ला, कोळीवाड्यातील वरळी किल्ला
ठिकाणवरळी हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरातील वरळी भागातील कोळीवाडा परिसरामध्ये हा एक छोटासा किल्ला वसलेला आहे
प्रकारसमुद्र किनारपट्टी किल्ला
समुद्रअरबी
स्थापनाइ. स. १६७५
संस्थापकब्रिटीश
उंचीटेकडीची उंची १ ते २ मीटर
मुख्य उद्देशसमुद्री व्यापारावर आणि शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला.
किल्ल्यावरील ठिकाणेगोड्या पाण्याची विहीर, व्यायाम शाळा, हनुमान मंदिर आणि किल्ल्यावरून अजिबाजुचे समुद्री सौंदर्य आणि वरळी बांद्रे समुद्री पूल

ज्यावेळी मुंबईच्या बेटावर म्हणजे ७ बेटे मिळून जे बेट तयार झाले होते त्यावर एकूण ११ किल्ले बांधण्यात आले होते आणि त्यामधील हा वरळी किल्ला समुद्राच्या भूशिरावर लहानश्या टेकडीवर वसवला. या किल्ल्याला कोळीवाड्यातील वरळी किल्ला या नावाने देखील ओळ्खल जाते.

वरळी किल्ल्याची माहिती – worli fort mumbai information in marathi

वरळी हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरातील वरळी भागातील कोळीवाडा परिसरामध्ये हा एक छोटासा किल्ला वसलेला आहे.  वरळी किल्ला हा साधारण १ ते २ मीटर उंचीच्या एका टेकडीवर बांधला आहे आणि एकदम छोटासा असा हा किल्ला ब्रिटिशांनी वरळी भागात समुद्राच्या भूशिरावर बांधला आहे पण हा किल्ला भूशिरावर बांधण्याचे मुख्य कारण म्हणजे भूशिरावर समुद्राच्या लाटा आदळत नाहीत आणि या ठिकाणी समुद्राचे रौद्र रूप देखील पाहायला मिळत नाही भूशिरावर समुद्र शांत असतो.

किल्ल्यावर भक्कम अशी तटबंदी आहे आणि किल्ल्याला एकच बुरुज आहे जो समुद्रातील शत्रूवर तसेच व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी खास बनवला आहे त्याचबरोर या बुरुजाच्या कोपऱ्यावर एक छोटासा मनोरा आहे ज्याला पूर्वीच्या काळी घंटा बांधली याची. किल्ल्यामध्ये येण्यासाठी कोळीवाड्यात येणारे एक बस स्थानक या किल्ल्यावर आहे जे किल्ल्यावरून देखील दिसते. त्या बस स्थानकावरून पुढे मच्छिमार वसाहतीच्या अरुंद गल्लीतून चालत आल्यानंतर ह्या किल्ल्याजवळ येतो.

आपल्यला कोळीवाड्याच्या बस स्थानकापासून किल्ल्यावर येण्यासाठी १० मिनिटे लागतात. किल्ल्याजवळ आल्यानंतर टेकडीवरून किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्यावरून वरती गेल्यानंतर छोटेसे म्हणजे आपल्या घराला कसे छोटे दरवाजे असतात तसे एक लहान प्रवेश दार आहे हे लोखंडी आहे किल्ल्यामध्ये आत गेल्यानंतर आपल्यला गोड्या पाण्याची छोटीशी विहीर, हनुमानाचे मंदिर आणि व्यायामशाळा आहे.

तसेच किल्ल्यावर आपल्याला छोटी छोटी फुल झाडे कुंडी मध्ये लावलेली पाहायला मिळतील. किल्ल्यामध्ये तटावर चढण्यासाठी पायऱ्या आहे त्या चढून वरती आल्यानंतर आपल्यला किल्ल्याच्या आजूबाजूचे सौंदर्य पाहायला मिळते त्याचबरोबर या तटावरून या किल्ल्याला फेरी सुध्दा मारता येते. किल्ल्यावरून आपल्यला बांद्रा समुद्र, माहीम खाडीचा परिसर, समुद्र किनारी तोफांसाठी बांधलेले चौथरे, दादर चौपाटी, वरळी बांद्रे पूल जो समुद्रावर बांधला आहे तसेच किल्ल्याच्या समोरून मुंबई शहर दिसते.

वरळी किल्ल्याचा इतिहास – Worli Fort History in Marathi

काही इतिहासकार म्हणतात कि हा किल्ला १५ व्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी बांधला पण हा किल्ला ब्रिटीशांच्या काळात म्हणजे इ. स. १६७५ मध्ये ब्रिटिशांनी वरळी भागात समुद्राच्या भूशिरावर बांधला आहे. हा किल्ला माहीम खाडीवर होत असलेल्या विदेशी व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि समुद्र मार्गे येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला आहे.

किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे 

  • हनुमानाचे मंदिर :

आपण किल्ल्याच्या आतमध्ये गेल्यानंतर समोरच एक छोटेसे अलीकडच्या काळा मध्ये बांधलेले मंदिर पाहायला मिळते. या किल्ल्यामध्ये पुरातत्व खात्याने काही बदल तसेच या किल्ल्याची डाकडूजी करून घेतली आहे आणि बहुतेक त्याच वेळी हे मंदिर देखील बांधले असावे. या मंदिरा मध्ये एक शेंदूर लावलेली छोटीसी हनुमानाचे मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्या मागे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला पाहायला मिळतो.

  • गोड्या पाण्याची विहीर :

आपल्यला पोर्तुगीजांनी किवा इंग्रजांनी मुंबई बेटावर बांधलेल्या कुठल्याच किल्ल्यामध्ये पाण्याच्या विहिरी नाहीत पण आपल्यला या किल्ल्यामध्ये हनुमाच्या मंदिराच्या समोरच एक त्यांनी बांधलेली गोड्या पाण्याची विहीर पाहायला मिळते त्या विहिरीमध्ये आजही पाणी आहे.

  • व्यायामशाळा :

या किल्ल्यावर कोळीवाड्यातील लोकांच्या साठी बांधलेली व्यायामशाळा आहे जी किल्ल्यामध्ये प्रवेश करताच पाहायला मिळते.

  • बुरुज :

या किल्ल्यावर एक त्रिकोणाकृती बुरुज आहे आणि त्या बुरुजाच्या कोपऱ्यावर एक छोटासा मोनोर आहे ज्याच्यावर पूर्वीच्या काळी घंटा बांधली जायची. या बुरुजावरून समुद्री शत्रूवर लक्ष ठेवले जायचे.

  • किल्ल्यावरून दिसणारे सौंदर्य :

किल्ल्यामध्ये किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांच्या वरून तटावर गेले कि आपल्याला किल्याच्या चारही बाजूचे सौंदर्य दिसते. किल्ल्यावरून आपल्यला बांद्रा समुद्र, माहीम खाडीचा परिसर, समुद्र किनारी तोफांसाठी बांधलेले चौथरे, दादर चौपाटी, वरळी बांद्रे संपूर्ण पूल जो समुद्रावर बांधला आहे तसेच किल्ल्याच्या समोरून मुंबई शहर दिसते.

वरळी किल्ला फोटो:

worli fort information in marathi language
worli fort

वरळी किल्ल्यावर कसे जायचे ? 

रस्तामार्गे : जर तुम्हाला हा किल्ला पाहण्यासाठी बसने यायचे असेल तर मुंबई मुख्य बस स्थानकावर येवून तेथून वरळी बस किवा टॅक्सीने यावे लागेल.

रेल्वे मार्गे : रेल्वे मार्गे देखील आपल्यला मुंबईच्या मुख्य रेल्वे स्थानकाला येवून तेथून वरळी बस किवा टॅक्सीने यावे लागेल.

टीप

  • ऑक्टोंबर ते फेब्रुवारी हा काळ वरळी किल्ल्याला भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे.
  • हा किल्ला सकाळी ५ ते संध्याकाळी ७ या वेळेमध्ये केव्हाही पाहता येतो आणि हा किल्ला आठवड्याचे सातही दिवस उघडा असतो.
  • हा किल्ला पाहण्यासाठी ३० मिनिटे लागतात.
  • वरळी किल्ल्यावर कोणताही प्रवेश शुल्क घेतला जात नाही.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, वरळी किल्ला worli fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. worli fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about worli fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही वरळी किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या worli killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही worli fort mumbai information in marathi त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!